Login

बंद खोलीतलं रहस्य

Manjulika

धाड!

धाड!

धाड!

वरच्या मजल्यावरचं दार अजूनही जोरात आपटत होतं.

सुनंदा भीतीनं आण्णाच्या मागं लपली.

“आण्णा… तिकडं जाऊ नका… पाय पडते…”

पण आण्णाच्या डोळ्यांत आता भीतीपेक्षा जास्त कुतूहल होतं.

“त्या खोलीत काहीतरी दडलं आसा.”

त्याने पुन्हा कंदील पेटवला.

कापऱ्या हातांनी.

लहानशी ज्योत पेटली…

आणि दोघं पुन्हा जिना चढू लागले.

चर्र… चर्र…

जिना जणू त्यांच्या वजनाने कुरकुरत होता.

वर पोहोचताच थंड वाऱ्याचा जोरदार झोत आला.

कंदील पुन्हा हलू लागला.

कॉरिडॉरमध्ये अंधार पसरलेला.

पण त्या बंद खोलीच्या फटीतून मंद लाल प्रकाश बाहेर येत होता.

आण्णा थबकला.

“आधी हा प्रकाश न्हवता…”

धाड!

दार पुन्हा हादरलं.

आतून कुणीतरी ओरडत होतं.

पण आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता.

जणू अनेक लोक एकत्र कुजबुजत होते.

सुनंदा कान झाकत म्हणाली, “देवा… हे मान्सांचे आवाज नाय!”

आण्णा हळूहळू दाराजवळ गेला.

त्याने हात पुढं केला…

आणि दाराला स्पर्श करताच
त्याच्या डोक्यात अचानक विचित्र चित्रं चमकली.

एक तरुण मुलगी.

लाल साडी.

डोळ्यांत अश्रू.

ती हाच वाडा पाहत होती.

आणि तिच्यासमोर उभा होता एक रागीट माणूस.

“या घरात तुला जागा नाय!” तो ओरडत होता.

ती मुलगी रडत म्हणाली, “मी त्याच्यावर प्रेम करत होते…”

धाड!

आण्णा भानावर आला.

त्याचा श्वास जोरात चालू होता.

सुनंदा घाबरून म्हणाली, “काय झालं?”

आण्णा कुजबुजला, “मला… काही दिसलं.”

अचानक खोलीतून बाईच्या रडण्याचा आवाज आला.

हूंऽऽ… हूंऽऽ…

तो आवाज इतका दुःखी होता की सुनंदाच्या डोळ्यांत पाणी आलं.

पण पुढच्याच क्षणी तो रडण्याचा आवाज हसण्यात बदलला.

भयानक हसू.

“हाहाहाहा…”

आण्णाच्या अंगावर काटा आला.

तो धाडस करून दार उघडू लागला.

कर्कररर…

दार हळूहळू उघडलं.

आतला लाल प्रकाश आता स्पष्ट दिसत होता.

खोलीच्या मध्यभागी तीच काळी पूजा मांडलेली.

पण यावेळी त्या वर्तुळाच्या आत कुणीतरी बसलं होतं.

पाठ फिरवून.

लाल साडी.

लांब केस जमिनीवर पसरलेले.

सुनंदा थरथरली.

“मं… मंजुलिका…”

ती आकृती हळूहळू उभी राहिली.

पण तिची हालचाल माणसासारखी नव्हती.

जणू शरीरातली हाडंच मोडलेली.

टक… टक… टक…

मान विचित्रपणे वाकवत ती मागं फिरली.

आणि तिचा चेहरा दिसताच सुनंदा किंचाळली.

तो चेहरा मंजुलिकाचा नव्हता.

तो पूर्ण जळालेला होता.

डोळ्यांच्या जागी काळे खड्डे.

ओठ फाटलेले.

आण्णा मागं सरकला.

“तू कोण?”

ती आकृती हसली.

“मंजुलिका एकटी नाय…”

खोलीत अचानक अनेक सावल्या दिसू लागल्या.

भिंतीवर.

छतावर.

जमिनीवर.

सगळ्या सावल्या त्यांच्या दिशेनं सरकत होत्या.

आणि त्या जळालेल्या बाईने हळूच हात वर केला.

“त्याला सोडा…”

“तो माझा आहे…”

तेवढ्यात कॉरिडॉरमध्ये पैंजणांचा आवाज पुन्हा घुमला.

छन… छन… छन…

आणि खोलीच्या दारात मंजुलिका उभी दिसली.

पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर भीती होती.

ती जोरात ओरडली
“पळा! त्यानं जागा घेतली!”

अचानक खोलीतल्या सगळ्या सावल्या आण्णाकडं झेपावल्या…

क्रमशः…
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →