Login

वाडयातली काळी सावली

Manjulika

“मी आले... माझ्या घरी.”

तो आवाज संपूर्ण वाड्यात घुमला.

सुनंदा थरथर कापत होती.

आण्णाच्या हातातून कंदील जवळजवळ पडायचाच बाकी होता.

समोरची सावली हळूहळू मोठी होत होती…

भिंतीवरून सरकत…

त्यांच्याकडे येत…

आणि अचानक
कंदील विझला.

फुस्स!

पूर्ण काळोख.

सुनंदा जोरात ओरडली, “आण्णा… मला सोडू नका!”

आण्णाने तिचा हात घट्ट पकडला.

दोघांचे श्वास वेगाने चालू होते.

त्या अंधारात फक्त एकच आवाज ऐकू येत होता

छन… छन… छन…

पैंजणांचा.

तो आवाज आता अगदी जवळ आला होता.

जणू कुणीतरी त्यांच्या भोवती फिरत होतं.

अचानक सुनंदाच्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजलं

“हा वाडा माझा आसा…”

सुनंदा किंचाळली.
“आऽऽण्णा!”

त्याच क्षणी विजेचा मोठा कडकडाट झाला.

धाड!

आणि क्षणभरासाठी संपूर्ण हॉल उजळला.

त्या प्रकाशात आण्णाने जे पाहिलं…

त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

त्यांच्या समोर मंजुलिका उभी होती.

लाल साडी.

मोकळे केस.

डोळ्यांत काळा काजळ पसरलेला.

ओठांवर विचित्र हसू.

आणि तिचे पाय…

उलटे.

सुनंदा रडू लागली.

“देवा… ही मानूस नाय!”

मंजुलिका हळूहळू पुढं आली.

तिचा आवाज थंड होता.

“माझ्या खोलीत कोण गेलं?”

आण्णाचा घसा कोरडा पडला.

“तू… तू कोण आहस?”

ती हसली.

पण ते हसू मानवी नव्हतं.

“जिला या वाड्यानं जिवंतपणी स्वीकारलं नाय… तीच मंजुलिका.”

अचानक वरच्या मजल्यावरून पुन्हा आवाज आला.

धप्प!

धप्प!

जणू कुणीतरी धावत होतं.

मंजुलिकाने हळूच वर पाहिलं.

तिचा चेहरा अचानक रागानं बदलला.

“तो पुन्हा जागा झाला…”

आण्णा गोंधळला.

“कोण?”

पण मंजुलिका काही बोलली नाय.
ती सरळ जिन्याकडं वळली.

तिचे पैंजण जिन्यावर घुमू लागले.

छन… छन… छन…

आण्णा आणि सुनंदा भीतीनं तिच्याकडे पाहत राहिले.

ती वर पोहोचली…

आणि अचानक थांबली.

हळूहळू तिने मान मागे वळवली.

तिचे डोळे आता पूर्ण पांढरे झाले होते.

“वर येऊ नका…”

ती कुजबुजली.

“नायतर तो तुम्हाला जिवंत ठेवणार नाय.”

हे बोलून ती अंधारात गायब झाली.

क्षणात.

वाडा पुन्हा शांत झाला.

फक्त बाहेर वारा सुटला होता.

सुनंदा रडत म्हणाली, “आण्णा… आपण हा वाडा सोडूया.”

पण आण्णाच्या मनात वेगळाच प्रश्न फिरत होता.

“तो” कोण?

आणि मंजुलिका त्यालाही घाबरत होती?

तेवढ्यात…

वरच्या मजल्यावरून एक भयानक किंकाळी आली.

आणि लगेच

जुन्या खोलीचं दार आपोआप धाडधाड वाजू लागलं.

धाड! धाड! धाड!

जणू आतून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं…

क्रमशः…
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →