आण्णाच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्याचे डोळे मंजूलीकाच्या पायांकडं खिळले.
पाय पूर्ण उलटे.
टाच पुढं, बोटं मागं.
घामाच्या धारा आण्णाच्या कपाळावरून वाहू लागल्या.
“तू… तू कोण आयेस?” त्याचा आवाज थरथरला.
मंजूलीका हळूच हसली.
ते हसू इतकं विचित्र होतं की आण्णाच्या छातीत धडधड वाढली.
“माझो चेहरो पाहून प्रेम जडलो… आता खरं रूप बघून घाबरलात?”
आण्णा दोन पावलं मागं झाला.
आण्णा दोन पावलं मागं झाला.
पण त्याचे पाय जड झालेले.
जणू कुणीतरी त्याला जमिनीत खिळवलं होतं.
वारा अचानक वेड्यासारखा सुटलो.
विहिरीतून थंड धूर वर येऊ लागलो.
मंजूलीका हळूहळू आण्णाच्या जवळ आली.
तिच्या लाल साडीचा पदर हवेत फडफडत होतो.
“आण्णा… मी तुमका सोडू नाय शकत.”
“का?” आण्णा कसाबसा बोलला.
तिचा चेहरा अचानक गंभीर झाला.
“कारण माझो जीव तुमच्याकडंच अडकलो.”
आण्णा गोंधळला.
“म्हणजे?”
मंजूलीका विहिरीच्या कडेला बसली.
तिचे डोळे काळोखात हरवले.
“खूप वर्षांपूर्वी… ह्याच गावात मी राहत हते.”
आण्णाच्या अंगावर काटा आला.
“मग?”
“माझं पण एक स्वप्न होतं. मोठ्या वाड्यात राहायचं… प्रेम मिळवायचं… आपलो संसार करायचो.”
तिचा आवाज अचानक दुःखी झाला.
“पण गावातल्या लोकांनी माझ्याकडं कधी माणूस म्हणून बघितलंच नाय.”
आण्णा शांत.
फक्त ऐकत होता.
“लोक म्हणायचे मी सुंदर आसा… पण सुंदरतेनं सुख मिळत नाय.”
मंजूलीकानं खाली पडलेलं लिंबू उचललं.
त्यावर काळे ठिपके, कुंकू आणि राख होती.
“मग मी काळी विद्या शिकले.”
आण्णाचा श्वास अडकला.
“करणी?"
ती मान हलवते.
“होय.”
ती पुढं म्हणाली, “एका तांत्रिकाकडं गेले. त्यानं मला सांगितलं lज्याच्यावर जीव जडलो, त्याला मिळवायचं असेल तर काळ्या शक्तीला जागं करावं लागतं.”
विहिरीतून पुन्हा आवाज.
हूंऊऊ…
आण्णा दचकला.
“हा आवाज कसला?”
मंजूलीका खाली बघत म्हणाली, “त्या रात्री विधी चुकलो.”
“काय झालं?”
तिचे डोळे लाल झाले.
“मी पडले."
आण्णा गप्प.
“ह्याच विहिरीत.”
क्षणभर सगळं शांत.
फक्त वाऱ्याचा आवाज.
आण्णाच्या तोंडून शब्द फुटेना.
“म्हणजे… तू मेलीयेस?”
ती हसली.
“शरीर मेलं. इच्छा नाय.”
हे ऐकताच आण्णा मागं सरकला.
त्याच्या पायाखाली काहीतरी आलं.
तो खाली पाहतो तर...
एक काळी बाहुली.
तिच्या गळ्यात लाल धागा बांधलेलो.
डोक्यावर त्याच्यासारख्या मिशा काढलेल्या.
आण्णाचे डोळे मोठे झाले.
“हे काय?”
मंजूलीका उठली.
“तुमी आता माझे.”
आण्णा घाबरला.
“मी घरी जातो.”
तो वळून चालू लागला.
पण अचानक त्याच्या कानात आवाज घुमला.
छन… छन… छन…
पैंजण.
आण्णा वळला.
मंजूलीका तिथं नव्हती.
आजूबाजूला कुणीच नाय.
फक्त काळोख.
तो धावत वाड्याकडं निघाला.
धापा टाकत घरी पोहोचला.
वाड्याचं दार उघडलं.
आत सुनंदा उभी.
“कुठं गेलात एवढ्या राती?”
“कुठं गेलात एवढ्या राती?”
आण्णा काही बोलला नाय.
सरळ खोलीत गेला.
पलंगावर बसला.
हात अजूनही थरथरत होते.
सुनंदा जवळ आली.
“तुमचा चेहरो असा पांढरो का दिसता?”
आण्णा हळूच म्हणाला, “सुनंदा… गावात कुणी मंजूलीका नावाची बाई होती का?”
हे नाव ऐकताच सुनंदाच्या हातातला दिवा थरथरला.
“तुमका हे नाव कुठून कळलं?”
आण्णा दचकला.
“म्हणजे होती?”
“म्हणजे होती?”
सुनंदा हळू आवाजात म्हणाली, “होती.”
आण्णाचं हृदय धडधडलं.
“कोण होती?”
सुनंदा बसली.
“खूप वर्षांपूर्वी गावात एक बाई राहत हती. सुंदर, पण विचित्र. लोक म्हणायचे ती करणी करत.”
आण्णा शांत.
“एक राती ती अचानक गायब झाली.”
“मग?”
सुनंदा त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, “दुसऱ्या दिवशी तिची लाल साडी विहिरीत तरंगताना दिसली.”
आण्णाचा घसा कोरडा पडला.
“पण शरीर कधीच सापडलं नाय.”
आण्णाच्या कानात पुन्हा मंजूलीकाचा आवाज घुमला.
मी परत आली… फक्त तुमच्यासाठी.
आण्णानं डोकं पकडलं.
“नाय… नाय…”
तेवढ्यात बाहेरून पुन्हा आवाज आला.
छन… छन… छन…
दोघेही थिजले.
सुनंदा कुजबुजली, “ऐकलंत?”
आवाज आता अगदी जवळ.
वाड्याच्या अंगणातून.
आण्णा आणि सुनंदा खिडकीपाशी गेले.
खाली अंधारात कुणीतरी उभो होतं.
लाल साडी.
मोकळे केस.
आणि वर पाहून हसणारी मंजूलीका.
तिनं हळूच हात वर केला.
आण्णाला बोलावत.
सुनंदा घाबरून मागं झाली.
“देवा… ती परत आली!”
मग अचानक खिडकीवर जोरात आपटण्याचा आवाज.
धाडकन!
काच तडकली.
आणि काचेवर रक्तानं एक शब्द उमटला
आण्णा.
