मनाच्या गाभाऱ्यात : शोध अस्तित्वाचा..
अंधाऱ्या खोलीत ती अजूनही जागीच , टेबल लॅम्प चालू बंद होणारा प्रकाश आणि बटणाचा टक टक आवाज तिच्या आतल्या गोंधळाला साथ देत होता .
थकलेला निस्तेज चेहरा , खोल गेलेले डोळे, खाली काळी वर्तुळे तिच्या कित्येक जागलेल्या रात्रींची साक्ष देत होते, विस्कडलेले केस , एका हाताने घट्ट पकडलेले केस , स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असावी..
तिच्या मनाच्या गाभाऱ्यात विचारांचं थैमान उठलं होतं , एक प्रश्न सुटता सुटता .. प्रश्नांची रांग लागली होती .
"माझ्याच बाबतीत असं का होतं?""मीच इतकी कमनशिबी आहे का?"
"माझ्याच बाबतीत असं का होतं?""मीच इतकी कमनशिबी आहे का?"
ती स्वतःलाच दोष देत होती , भिंतीवरच्या फोटोकडे एकटक बघत, स्वतःशीच भांडत होती.
मन दिसत नाही म्हणजे त्याला वेदना होत नाहीत ,असं नसतं.. मनाचं दुखणं ना सहज सांगता येत , ना पटकन भरून येत ..बस रोज उठून परत त्याच चक्रात अडकून जायचं—हेच जणू तिचं आयुष्य बनलं होतं...
"मी एकटीच आहे… कुणीच माझं नाही."लोकांच्या वागण्याचे विचार तिच्या डोक्यात फिरत होते.
रोजचा दिवस एक नवं आव्हान घेऊन उगवत होता. "आज काय होईल? कसं होईल? जमेल ना?"ना ना प्रकारच्या प्रश्नांत मात्र अस्तित्व हरवून चाललं आहे.
जगाच्या स्पर्धेत उतरताना , स्वतः साठी धडपडाव लागत होते,प्रत्येक दिवस स्वतः ला सिद्ध करण्यासाठी लढत होती,पणतुलना करताना 'आपण किती पाण्यात आहोत' याची जाणीव अजूनच अस्वस्थ आणि बेचैन करून टाकत.
"टेंशन नको घेऊन..! "म्हणून मन विचार करायचं थांबले नाही .. टेंशन कसं कमी करूं? याच उत्तर अजून मिळाले नाही .
वेळेसारख मनही शांत थांबत नाही ,एकामागून एक आव्हान उभं राहत.. एक निर्णय घेताना मन शंभर चौकटीतून डोकावायला लागतं , बस्स एक चुक आणि आयुष्याची राखरांगोळी होईल ही भीती काही बाहेर पडायचं नाव घेत नव्हती ...
यशाच्या चौकटीत बसायचं होतं....अपयशाची भीती मनाच्या कोपऱ्यात साठलेली, अतिविचारच्या गर्द सावलीत सुखाची झोप हरवली ..
जर-तरच्या खेळात सारा वर्तमान हरवला ...करियर, शिक्षण, वाढता खर्च, घरची जबाबदारी सांभाळता सांभाळता स्वतः कडे दुर्लक्ष होऊन गेले .
कमवायला लागल्यावर करून म्हणून मारून ठेवलेल्या इच्छा मात्र अडगळीत धूळ खात पडल्या, बस विचारांच्या थैमानात स्वतः ला विसरून लागली ..
कमवायला लागल्यावर करून म्हणून मारून ठेवलेल्या इच्छा मात्र अडगळीत धूळ खात पडल्या, बस विचारांच्या थैमानात स्वतः ला विसरून लागली ..
घड्याळाचा काटा पुढे सरकत होता , मनातले विचार वाऱ्याच्या वेगाने धावत होते . झोप मात्र मैलोनमैल लांब होती ..
तेवढ्यात पहाटेचा अलार्म वाजला,ती भानावर आली,आता घरचे हळूहळू उठतील, म्हणून बेडवर जाऊन पडली.डोळ्यावर झोप नाही पण तरी तिने डोळे मिटून घेतले.
" विचारांचं वादळ कधी दिसत नाही...पण इथूनच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आणि शोध सुरू होतो "
अतिविचार किंवा ओव्हरथिंकींग नुसार विचारांचा गुंता वाढवतात, साध्या सोप्या गोष्टी सोप्या ठेवून हाताळायला गेलं की सगळं सोपं होतं .
आपण माणसांना काही गोष्टी विनाकारण अवघड, किचकट, गुंतागुंतीच्या करून त्या सोडवून महान कार्य करण्यात जरा जास्तच उत्साह असतो .
