Login

श्रीमंती मनाची

Man Mothe asle Ki Garbit Pan Shrimanti Vatate
​स्थळ: सोसायटीचे मुख्य गेट.
दुपारची वेळ उन्हाचा कडाका आहे. काम संपवून आलेल्या दोघी मोलकरणी (शालू


आणि मीरा) गेटपाशी उभ्या राहून बोलत आहेत.


​शालू: (कपाळावरचा घाम पुसत) "काय ग मीरा, झालं का तुझं काम ?नशीबवान आहेस बाई हातात ऐवढी फळानी भरलेली पिशवी. तुझी मालकिण सढळहस्ते देते बाई.

मीरा:हो ग शालू ताई खुपच चांगल्या आहेत. दुपारचे जेवण माझं तिकडेच होते. कामावर गेले कि, म्हणतात," मीरा काम नंतर आधी जेवण कर बर माझ्याबरोबर. असं कोणी ताटाला ताट लावून जेवायला बसवील का तुच सांग.

शालू :होग खरय आज तर माझ्या बाईंनी फरशी पुसताना अशी कटकट केली की विचारू नको. म्हणतात, प्रत्येक रूमला वेगळं पाणी घे, आणि वर पाणी जरा जपून वापर'."
जाऊ दे मी बघणार आहे पगार वाढवते का! नाहीतर पुढच्या महिन्यात सोडणार काम, बघ कुठे मला असेल तर!"

मीरा :हो असेल तर देईन तुला, पोरगी काय म्हणते. तुझी?

शालू :आणायची पुढच्या महिन्यात बाळंतपणाला. बघितलस दुष्काळात तेरावा महिना दुसरं काय.

शालू:(कंटाळून) "अगं, जाऊ दे ना! माझ्या बाईचं तर वेगळंच महिन्याला लाख-दीड लाख पगार असेल त्यांचा, पण माझा पाचशे रुपये पगार वाढवायला तोंड असं वाकडं करतात विचारू नको

​शालू: (हसत, पण उपरोधिक) "अगं, त्यांना काय वाटतं माहितीये? 'ही कामवाली आहे गरज तिलाच आहे.' दिवाळीचा बोनस मागायला जा, तर म्हणतात, पुर्ण पगार नाही. घरातलंच काहीतरी देतात. स्वतःची खरेदी मात्र विचारू नको. रोज एक ड्रेस चढवला तरी, पहिल्या कपड्यांचा सहा महिन्यात नंबर लागणार नाही.

​मीरा: "खरंच ग या बाबतीत माझी मालकीणबाई विचारू नको.बोनस सहित गिफ्ट पण भरपूर देते. मग खरं सांगायचं तर मी पण घरच्या सारखे सगळे काम मनापासून करते त्यांच्याच घरची असल्यावाणी!

शालू: असं असेल तर जीव ओवाळून टाकावा वाटतो ग! या महिन्यात मला घरच्या कामासाठी दोन दिवस सुट्टी हवी होती, तर म्हणाली, 'शालू, एक दिवस मिळेल, जास्त सुट्टी हवी असेल तर पैसे कापणार ! खरे सांगू मीरा "गरजवंताला अक्कल नसते ग!" त्याचाच फायदा घेते ही बाई! "

​शालू: (निराश होऊन) "नशीब माझं! शिक्षण नाही म्हणून गरिबीची झळ सोसून काम करतोय. घरात लेकरं त्यांची शिक्षण, पोरीचं बाळंतपण,
ह्याच्या कामाचा काही भरोसा नाही. मालकाने बोलावले तर जायचे नाहीतर घरीच बसायचे..
आज काल ते नवीन काय आले आहे तिथं नाव नोंदवून दिलं कि काम मिळतात. तुला माहिती आहे का ग मीरा!

मीरा :हो हो आलय ते पण त्याला मोबाईल लागतो. मी शिकवते तुला!

शालू :हो का घेऊन येते उद्या

मीरा :ठीक आहे शिकवते तुला

​मीरा:कमाल आहे बाई तुझ्या मालकणीची "बडा पोकळ वासा" पगार द्यायचा आला की, यांचा नुसता जळफळाट,बघते मी काम तुला ताईच्या ओळखीत.

लेकीच्या लेकराला दुपटी शिवून घेऊन देईल . डिंकाचे लाडु घेऊन येईल.सांग तेंव्हा मला जमेल तशी मदत करेल ग!काळजी नको करू!

शालू :खरच ग मीरा नक्कीच किती ग तुझं मन मोठं. म्हणत शालूनं डोळ्याला पदर लावला.

मीरा :(हसत, पिशवीतलं फळं पुढे करते) हे घे मुलांना फळे बघून आनंद होईल.

(दोघी एकमेकींकडे बघून हसतात.)








0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →