माझा पैसा उधळण्यासाठी नाही भाग १
जयंतला रात्री जान्हवीचा म्हणजेच त्याच्या बायकोचा सारखा कॉल येतं होता. कटाळून त्याने कॉल उचलला आणि तिच्यावर ओरडू लागला, " मी कामासाठी बाहेर आलोय मज्जा करण्यासाठी नाही. " त्यावर जान्हवी म्हणते, " अहो एक प्रॉब्लेम झाला आहे. बाबांची तब्बेत बिघडली आहे. थोडे पैसे urgent पाठवा. हॉस्पिटल मध्ये त्याशिवाय त्यांना भरती करता येणार नाही. प्लीज जरा लवकर करा. " हे ऐकल्यानंतर जयंतचा पारा चढला. तो जान्हवीला ओरडू लागला, " माझा पैसा उधळण्यासाठी नाहीये. मी यासाठी नाही कमवत की तो पैसा तू तुझ्या माहेरच्यासाठी वापरावा किंवा उधळावा. आता परत मला कॉल करू नकोस नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. " असं म्हणून जयंतने कॉल कट केला आणि फोन बंद करून काम करू लागला.
जयंतला आठवू लागलं की जान्हवी आपल्या माहेरच्या लोकांना पैसा पुरवत होती. अनेकदा तिला तिच्या भावाकडे पैसे देताना पाहिलं होतं. आपण जे पैसे घरखर्चासाठी देतो त्यातले पैसे जान्हवी आपल्या भावाला देत होती. एकदा लपून पैसे देताना त्याने पाहिलं होतं. त्यानंतर त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने लक्ष ठेवायला सुरुवात केली. जान्हवी प्रत्येक महिन्याच्या एका ठराविक तारखेपर्यंत भावाला पैसे देत होती. जयंत वाट पाहत होता की जान्हवी कधीतरी त्याला सांगेल किंवा पैसे देणे थांबवेल. पण असं काही झालं नाही उलट मागच्या आठवड्यात त्याने पाहिलं की जान्हवीने तिच्या भावाला बोलावून जवळ जवळ दहा हजार दिले होते. तेव्हापासून जयंतचा राग प्रचंड वाढला होता.
दोन दिवसांनी जयंत आपलं काम संपवून घरी परत आला. घरात प्रवेश करताच त्याच्या घरचे काहीही न बोलता आपापल्या कामाला गेले कोणीही त्याच्याशी बोललं नाही. जयंतला खूप विचित्र वाटलं. जयंत त्याच्या रूममध्ये गेला तिथे जान्हवीही नव्हती. फ्रेश होवून बाहेर आला तर कोणीही त्याच्याशी बोलत नव्हतं. त्याने त्याच्या मोठ्या भावाला विचारलं, " दादा, काय झालं? सर्व शांत का आहेत? कोणी माझ्याशी बोललं ही नाही. नक्की काय झालंय. " तुला कोणाचं ऐकायला वेळ आहे का?" जयंतचा भाऊ त्याला विचारतो.
" काय झालं दादा असं का बोलतोयस? " जयंत.
" मग कसं बोलू? तूच सांग. " जयंतचा मोठा भाऊ.
" दादा, प्लीज कोड्यात नको बोलूस. नीट सांग काय झालं आहे ते. " जयंत.
" त्या दिवशी जान्हवीने तुला कॉल केला तेव्हा तू काय म्हणालास? ' माझा पैसा उधळण्यासाठी नाही.? ' असंच ना.? जयंतचा भाऊ.
" दादा अरे तिचं नेहमीच आहे. नेहमी ती तिच्या भावाला पैसे देते. मी स्वतः कितीतरी वेळा पाहिलं होतं. म्हणून म्हणालो मी तसं. " जयंत.
" अरे ती गोष्ट वेगळी आहे. त्या वेळी तिने तुला सांगितलं होतं ना की बाबांची तब्बेत बरी नाही म्हणून मग?" जयंत चा भाऊ.
" दादा, अरे मग मी काय करू? तो तिचा आणि तिच्या भावाचा, तिच्या माहेरच्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मी पैसे का देऊ? माझे पैसे मी तिच्या घरच्यांवर का उधळू? " जयंत.
" जयंत पहिली गोष्ट बाबा तिचे नाही तर आपले सिरीयस होते. हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करायचं होतं. आणि दुसरी 'गोष्ट तिचे बाबा हॉस्पिटल मध्ये आहे मग मी माझा पैसा उधाळू?' असं तू म्हणतोयस पण जेव्हा तू पूर्ण न एकता कॉल कट केलास आणि फोन बंद केलंस तेव्हा तिने तिचे दागिने गहाण ठेवून हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केले. तुझी वहिनी तिच्या माहेरी गावी गेलीये तिथे रेंज नाही म्हणून कॉन्टॅक्ट झाला नाही. माझा कार्ड ब्लॉक झालंय मागच्या आठवड्यात म्हणून मी पैसे काढू शकतं नव्हतो. आणि बाबा रात्री सिरीयस झाले म्हणून मला बँकेत जावून मला पैसे काढता आले नाहीत. तू जान्हवीला नोकरी सोडायला लावलीस म्हणून तिच्याकडे पैसे नव्हते. मग ती कॉल करून तुलाच मागणार ना? तू पैसे पाठवले असतेस तर जान्हवीला दागिने गहाण ठेवावे लागले नसते." जयंतच्या भाऊ.
भावाचं बोलणं ऐकून जयंतला आश्चर्य वाटतं. स्वतःच्या चुकीची जाणीव होते. आपण जान्हवीशी खूप चुकीचं वागलो याचा त्याला पश्चाताप होतो. तो भावाला विचारतो, " दादा जान्हवी कुठे आहे. "
त्यावर दादा म्हणतात, " बाबांना हॉस्पिटलमधून घरी आणल्यावर ती बॅग भरून बाळासोबत तिच्या माहेरी निघून गेली. आम्ही कोणत्या तोंडाने तिला थांब म्हणू?
जयंत आता डोकं धरून बसला होता.
क्रमश.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा