आज मातृदिन त्यानिमित्ताने
मायची माया
"तू अगदी आईसारखीच दिसतेस.
ते पांढरे केस, चेहरा,बोलणं आणि तुझं प्रेमळ वागणं.तू अगदी मनुबाईसारखीच दिसते.
वाटतं आत्याशीच भेटतोय आपण."
मेघनाला तिचा मामेभाऊ खूप वर्षांनंतर भेटल्यावर त्याची प्रतिक्रिया होती ही.
त्यावेळी मेघनाने हसून दाद दिली त्याला.
तो निघून गेल्यानंतर मात्र मेघना विचार करत राहिली,
वाटतं आत्याशीच भेटतोय आपण."
मेघनाला तिचा मामेभाऊ खूप वर्षांनंतर भेटल्यावर त्याची प्रतिक्रिया होती ही.
त्यावेळी मेघनाने हसून दाद दिली त्याला.
तो निघून गेल्यानंतर मात्र मेघना विचार करत राहिली,
"मी आई सारखी दिसते हे खरं पण आईचं आईपण माझ्यात किती उतरलंय?"
किती कष्टाळू, मायाळू, सोशिक,प्रेमळ, कर्तव्यतत्पर,त्यागमूर्ती, निस्वार्थ, संस्कार प्रदात्री किती विशेषणं लावू ? तिही कमी पडतात.गुणांची खाणच ती.शब्दात मावत नाहीच 'आई'
आई एक असं विद्यापीठ आहे, ज्या मुलाला कुणीच वठणीवर आणू शकत नाही त्याला फक्त आईच वठणीवर आणू शकते.
आईच्या न्यायालयात चुकीला स्थान नाही.ती हवं तेव्हा कान पिरगाळू शकते.
मेघनाला आठवलं तिचं अवखळ बालपण आणि स्वप्न पहाणारं तरुणपण.
तिला आठवलं तिची शेजारच्या मैत्रिणीशी लताशी कट्टी झाली भांडण झालं त्यावेळी आठ दिवस अबोला धरलेला.
आईला कळलं तेव्हा ती मेघनाला काहीच बोलली नाही.
उलट तिच्या इतर मैत्रिणींना सांगितलं तुम्ही मेघनाशी कट्टी करा.
मैत्रिणींनी तसंच केलं मेघना रडकुंडीला आलेली .
आईजवळ तक्रार घेऊन आली.
तेव्हा आई मेघनाला जवळ घेत म्हणाली ,"बाळा, खूप दुःख होते का गं मैत्रिणीने कट्टी केली तर?"

"हो ना गं .मी कुणाशी खेळू? कोणाशी भांडू? कोणासोबत शाळेत जाऊ?"
"बघ एका दिवसातच तू मेटाकुटीला आलीस तू तर गेले आठ दिवसापासून लताशी कट्टी धरलीय तिला काय वाटत असेल?"
मेघना सगळं समजून गेली. न रागवता, न दुखवता कृतीतून किती छान संस्कार दिला.
असे किती प्रसंग.
मेघना बारावीला होती तेव्हा.
आईची नजर फार चाणाक्ष.
मेघनाचं अभ्यासातील लक्ष जरा कमी झालंय,ती शाळेतून उशिरा घरी येते, रोज रोज मैत्रिणीकडे काय करते? पूर्वी तर सरळ घरी यायची.
आईने घरात राहून बरोबर बाहेरचा कानोसा घेतला.
मेघनाचे वर्गातीलच एका मुलाशी सूत जुळले होते.
पण गोष्ट हाताबाहेर जाण्या अगोदरच आईने पायबंद घातला.
अशी कान उघाडणी की पुन्हा त्या वाटेने पुढे जाऊच नको.

जेवढी प्रेमळ तेवढीच शिस्तीची आणि कडक.
मेघनालाही त्यावेळी आश्चर्य वाटलं की आपली आई एवढी कठोर कशी होऊ शकते?
मेघनालाही त्यावेळी आश्चर्य वाटलं की आपली आई एवढी कठोर कशी होऊ शकते?
त्यावेळी मेघनानी आईला खूप कोसलं.
"अशी कुठे आई असते का आईने तरी समजून घ्यायला हवं होतं."
"अशी कुठे आई असते का आईने तरी समजून घ्यायला हवं होतं."
पण नंतर जेव्हा तिला कळले की तो व्यसनाधीन आहे .तो मुलींना असंच जाळ्यात फसवतो.
त्यावेळी तिला आईच्या दूरदृष्टीचा आणि तिच्या निर्णय क्षमतेचा हेवा तर वाटलाच पण आपल्याला वाचवलं, संस्काररुपी घडा हाती देऊन घडवलं याचा अभिमान वाटला.
आई तिच्यासाठी आदर्श होती, सुपरहिरो होती.
तिच्याच ठायी चारीधाम होते तिचे.
लग्न होईपर्यंत ठीक पण नंतरही ती जणू आईचा पदर धरूनच वावरत होती.सासरी कुठला नवीन पदार्थ बनवायचा तर आईला फोन करून रेसिपी विचारायची.
करमलं नाही की आईशी गप्पा करायची फोनवर.
कधी नवऱ्याशी वाजलं किंवा सासूबाईंनी रागवलं तर आई जवळच मन मोकळ व्हायचं.
अशी जवळची मैत्रीण 'आई'

आता 'ती'च आई झाली होती तिच्या मुलांची.
आणि हो आईची पण आई झाली होती.
म्हातारपणामुळे आई बेडवरच होती ना. म्हातारपण आणि बालपण सारखंच म्हणतात.
आणि हो आईची पण आई झाली होती.
म्हातारपणामुळे आई बेडवरच होती ना. म्हातारपण आणि बालपण सारखंच म्हणतात.
एक दिवस बोलता बोलता आई तिला म्हणाली होती," स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते."
अगदी खरं आहे .अनंत काळाची माता आणि फक्त तिच्या मुलांचीच नाही तर ती आईची आई असते, वडिलांची आई असते, वेळ पडली तर नवऱ्याची, सासू-सासर्यांची सगळ्यांचीच आई होऊन ममतेने सेवा करते.
ममत्व हा तिचा स्थायीभाव.
ममत्व हा तिचा स्थायीभाव.
आईच देव,आईच देवालय
आईच संस्काराची पाठशाळा
आई पहिला गुरु.
आईच संस्काराची पाठशाळा
आई पहिला गुरु.
"मी 'आई'हे बिरुद तर कधीच धारण केलंय
पण... ते आईपण मिरविण्याची क्षमता धारण केली कां?"
पण... ते आईपण मिरविण्याची क्षमता धारण केली कां?"
ती स्वतः लाच प्रश्न विचारत होती तोच तिची लेक बाहेरुन धावत आली,
" ममा,ममा, हॅप्पी मदर्स डे"
आणि गळ्यात पडून आईला बिलगत म्हणाली,
"आई!तूच माझा आदर्श,तुच आधार,तुच सर्वकाही.तुझ्याशिवाय मी माझा विचारच करु शकत नाही."
त्यावेळी मेघनाला जाणवले,"आईपण सर्वत्र सारखंच असतं.पाण्यात पडलं की पोहणं जसं शिकतो तसं आई झाली की आईपण कळतं."
त्यासाठी 'आई' व्हावं लागतं.
©®शरयू महाजन

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने