Login

लेखकांच्या कसदार अभिनयातून साकारलेली ईराची शाॕर्ट फिल्म माहेरपणाचा वारसा..!

वैचारिक संपन्नते बरोबर अभिनयाची कला लेखकामध्ये ओतप्रोत भरलेली आहे.
लेखकांच्या कसदार अभिनयातून साकारलेली ईरा ब्लाॕगिंग प्रा.लि.कंपनीची शाॕर्ट फिल्म ' माहेरपणाचा वारसा '

ईरा हे साहित्यक्षेत्रातील नवे पर्व असून या आॕनलाईन प्लॕटफॉर्मवर हजारो लेखक दररोज मनमुराद लिहीत आहेत. नुकताच याचे ईरा ब्लाॕगिंग प्रा.लि.यामध्ये रुपांतर झाले असून ईराच्या सिईओ सौ. संजना इंगळे आहेत तर डायरेक्टपदी श्री. सुरेश सुर्यवंशी म्हणून महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.

लेखक हा समाजाचा आरसा आहे. आपल्या वैभवशाली विचारातून समाज घडवण्याचे कार्य तो सातत्याने करत आहे.लेखनकलेबरोबर त्यांच्यात अभिनयाची कलाही दडलेली आहे याचे निरीक्षण सौ. संजना इंगळे यांनी केले. ईराच्या कर्जत येथील संमेलनात जनशारदा रिसाॕर्टमध्ये ' माहेरपणाचा वारसा ' या शाॕर्ट फिल्मची निर्मिती केली.

आई गेल्यानंतर तिची मुलगी पहिल्यांदाच माहेरी जाते. तिचे पावलं जड व्हायला लागतात कारण आई गेल्यानंतर आईसारखा आपलं माहेर पण होईल की नाही अशी शंका तिच्या मनात असते. घरामध्ये गेल्यावर ती प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्या आईला शोधत असते. घरातही तिला सारखा आईचा भास होतो. पण भावजया तिला मायेने वागवत असतात कारण तिच्या आईने जाताने सांगितलेलं असतं की माझ्या लेकीला जीव लावा म्हणून.
जेव्हा तिची माहेरी परतायची वेळ येते तेव्हा भिंतीवर तिला ती पिशवी दिसते जी पिशवी तिची आई जाताना नेहमी भरून द्यायची. आणि आई असताना ती नेहमीच आईला इतकं सामान देऊ नको म्हणून सांगत असते. पण आई गेल्यानंतर आईची ही मायेची शिदोरी आता कधीच भेटणार नाही असं तिला वाटत असतं.
जड अंतकरणाने जेव्हा ती घरातून बाहेर पडून बस मध्ये बसते तेव्हा तिचे भाचे तीच पिशवी भरून घेऊन येतात. त्यावेळेसच तिला जाणवतं की आई जरी गेली असली तरी माहेरचा वारसा सुनांना देऊन गेली आहे. आणि आपल्या भावजयांमुळे आपलं माहेर आबादीत आहे

माहेर म्हणजे महिलांचे आवडते ठिकाण तिथं जीवनाच्या सगळ्या आठवणी जपल्या जातात. आई गेल्यानंतर माहेर पोरकं होतं ; पण भाऊ, बहिण मुलं हा माहेरपणाचा वारसा मनापासून जपतात. असा संदेश देणारी हि शाॕर्ट फिल्म प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. आत्तापर्यंत या फिल्मला सात लाख प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. यामध्ये कलाकार म्हणून सरिताच्या हृदयस्पर्शी भूमिकेत खुशी कांबळे यांनी भूमिका केली आहे.सहृदयी भावजय म्हणून प्रज्ञा बो-हाडे व अश्विनी ओगले तर भाच्याच्या भूमिकेत अथरवंश वसतकार व आरव ओगले , प्रेमळ भाऊ म्हणून नामदेव पाटील ,आईची भूमिका सौ. रेखा देशमुख यांनी साकारली आहे. कॕमरामन म्हणून पार्थ सुर्यवंशी तर लेखन दिग्दर्शन ईराच्या सिईओ संजना इंगळे यांनी केले आहे. अत्यंत भावस्पर्शी कथानक असलेली या शाॕर्ट फिल्ममध्ये कलाकारांनी जिवंत अभिनय करुन प्रेक्षकांची मने जिकली आहेत.

हे सर्व कलाकार ईरावर लेखन करतात. लेखनाबरोबर त्यांच्यातील ही अभिनयकुशलता वाखाणण्याजोगी असून ईराने सुरु केलेली शाॕर्ट फिल्म निर्मिती भविष्यात लेखकांच्या कलेला नवे व्यासपीठ मिळवून देणारी आहे.ईराने या अगोदर ' पन्न्नास रुपयाची गोष्ट ' ही शाॕर्ट फिल्म प्रदर्शित केली आहे.

तरी प्रेक्षकांनी ' माहेरपणाचा वारसा ' या शाॕर्ट फिल्ममधील लेखकांचा हा कसदार अभिनय जरुर पहावा.

नामदेव पाटील
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →