Login

माहेरची ओढ...भाग 2

Pratyek stri la Maherchi oth Astech
माहेरची ओढ...भाग 2

तिने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि रूम मधून बाहेर यायला निघाली,

"अंजली एक मिनिट थांब ना."

ती थांबली.

"आय एम सॉरी अंजली, आय एम एक्सट्रेमली सॉरी."

"कशाबद्दल सॉरी बोलताय तुम्ही? तुम्हाला मला सॉरी म्हणण्याची खरच काही गरज नाहीये. सगळी चूक माझी आहे मी तुमच्यासाठी जेवायला वाट बघत असते, दुसऱ्या बायकांसारखं आधी जेवण करून नवऱ्याचं ताट करून करून ठेवून द्यायचं असं करायला हवं मी, पण मी तुमचा विचार करते तुम्हाला गरम जेवण आवडतं म्हणून कधी वेळेवर गरम पोळ्या करून देते, ही माझी चूक आहे.

तुम्हाला माहितीये परवा मी पेपर मध्ये वाचलं बाईची इच्छा नसतानाही नवऱ्याने तिच्याशी संबंध बनवण्याचा प्रयत्न केला त्यावर त्या बाईने त्याच्या गालावर फाडकन मारली आता विचार करा मी असं काही केलंय का?"


"सॉरी ना डियर यानंतर असं होणार नाही." अंजली समोरच काही न ऐकता तिथून निघून गेली.


दिवस सरत गेले, अंजलीला दिवस गेले. घरातले सगळे खूप आनंदात होते.

पण समीरचं काहीतरी वेगळंच सुरू होतं, त्याला दारूच व्यसन लागलेलं होतं. दारू प्यायल्यानंतर त्याला कसं भान राहायचं नाही. आपण कोणाशी बोलतोय काय बोलतोय काय करतोय त्याचा काहीच भान राहत नसे. छोट्या छोट्या गोष्टीवरून तो चिडचिड करायचा. ती प्रेग्नेंट असताना त्याने तिला मारझोड देखील केली.


एका रात्री तो असाच चिडला आणि त्याने तिच्यावर हात उगारला, ती ओरडली.
तिच्या आवाजाने सासूबाई आत आल्या, सासूबाईंनी वाचवलं, घरात खूप वाद झाले. त्याने तिची माफी मागितली पण चार भिंतीच्या आत ते सगळं सुरूच होतं.

नऊ महिने पूर्ण झाले आणि गोंडस बाळ म्हणून मुलगी जन्माला आली. तिला आरामाला माहेरी जायचं होतं, पण समीरने जाऊ दिल नव्हतं. काहीतरी बहाणे सांगून तो तिला अडवायचा.

तिनेही तिचं मन घट्ट केलं आणि जाण्याचा हट्ट सोडला.
अंजलीचा पूर्ण वेळ मुलीमध्ये जायचा पण समीरचाच प्रॉब्लेम होता, तो प्रत्येक गोष्टीत अंजलीला गृहीत धरायचा कधी कधी तिचा बांध तुटायचा आणि तीही खूप बोलायची पण तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्याच्याशिवाय काहीही करण्याचा विचारही मनात येत नव्हता.


हळूहळू मुलगी एक वर्षाची झाली आणि तिचा मोठा थाटामाटात वाढदिवस साजरा केला.

आरवचं इंजीनियरिंग होऊन तो जॉबला लागलेला होता, आता घरात त्याच्या लग्नाची चर्चा सुरू व्हायला लागली.


"काय आरव एखादी मुलगी बघून ठेवली आहेस की आम्ही बघू?" त्याच्या काकांनी त्याला विचारलं.


"नाही नाही काका असं काही नाहीये." असं म्हणत आरवने खाली मान टाकली.

"अरे अरे बघा बघा कसा लाजतोय हा. आरव खरं सांग रे बघून ठेवलीस का मुलगी तसं आम्हाला कष्ट नकोत." त्याच्या काकूंनी त्याला चिडवायला सुरुवात केली.


"काकू असं काहीच नाहीये तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता म्हणजे माझ्याकडून असं काही नाहीये."


"चला याने आपल्याला सांगितले ना मग आपण आपली शोधमोहीम सुरू करूया." त्याच्या आईने दुजोरा दिला. घरात सगळा आनंदही आनंद होता.

आरवसाठी एक स्थळ चालून आलं, सगळ्यांना मुलगी पसंत पडली. काही महिन्यात आरवचं लग्न झालं आणि दीपिका त्या घरात लहान सून बनून आली.

दीपिकाच्या स्वभाव थोडा वेगळा होता. दीपिकाच्या काही काही गोष्टी अंजलीला पटत नसत मग ती आईजवळ सांगायची. मग सासूबाई दीपिकाला टोकायच्या. यावरूनच त्यांचे रुसवे फुगवे व्हायचे.

लग्नानंतरची दीपिकाची पहिली दिवाळी आली, दिवाळी सण खूप छान थाटामाटात साजरा केला. त्यानंतर दीपिका दिवाळी सणाला म्हणून तिच्या माहेरी गेली. पंधरा दिवस झाले तरी यायचं नाव नव्हतं. अंजलीला माहेरी जायची ओढ लागलेली होती पण दीपिकासाठी ती घरात थांबलेली होती. कारण सासूबाईंनी सांगून ठेवलेले होतं.

दोन पैकी एकीने जावे तोवर दुसरीने घरी असायला हवं. दोन्ही सुनांना एका वेळी जाता येणार नाही. त्यामुळे आता दीपिका येईस्तोवर अंजलीला वाट बघणे गरजेचे होते.

क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →