माहेरची ओढ...भाग 1
आज अंजलीने खूप मोठा निर्णय घेतला, खरंतर तिला हे आधी करायला हवं होत, पण आपण राहिलो टिपिकल मराठी बायका, नवरा म्हणजेच सर्व काही, त्याच्या प्रेमापोटी त्याच्या सगळ्या चुका पोटात घालतो आणि मग नको तेच घडतं.
अंजली साधारण बारा वर्षा आधी समीरची बायको म्हणून त्या घरात आली.
म्हणायला सगळं छान, मोठं घर म्हणजे आलिशान बंगला, मोठी फॅमिली, सगळ्यांचे वेगवेगळे व्यवसाय, खाऊन पिऊन सुखी फॅमिली.
अंजलीचे आई वडील खूप आनंदात होते, असणारच लेकीचं चांगल्या घराण्यात लग्न झालेल होतं.
सुरुवातीचे दिवस खूप छान गेले, नव्या नवलाईचे दिवस संपले आणि अंजली घरकामात रमली, सगळ्या बायका सकाळी उठुन किचनमध्ये जायच्या. सगळ्यांच्या आवडीचं बनवून त्यांना खाऊ घालणे यातच त्यांना खूप समाधान मिळत असे.
अंजलीलाही ते आवडत होतं.
सगळं छान चाललेलं होतं, अंजली घरातली मोठी सून होती.
सगळं छान चाललेलं होतं, अंजली घरातली मोठी सून होती.
समीरपेक्षा एक मोठी बहीण (अनघा) होती, तिचे लग्न झालेले होते. एक लहान भाऊ (आरव) इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता.
नणंद अधून मधून येऊन राहायची, त्याच शहरात असल्यामुळे तिला माहेरची ओढ जास्त होती.
दोघेच नवरा बायको राहत असल्यामुळे कुणी टोकणार नव्हतं.
दोघेच नवरा बायको राहत असल्यामुळे कुणी टोकणार नव्हतं.
सुरुवातीला अंजलीला खुप छान वाटायचं पण हळूहळू काही गोष्टींचा तिला त्रास व्हायला लागला.
घरातलं सगळं करूनही
"तू दिवसभर काय करतेस? घरातच तर असतेस." असे टोमणे नवऱ्याकडून ऐकायला मिळायचे.
अंजलीला खुप वाईट वाटत होतं, पण कुणाजवळ कधीही काहीही बोलत नव्हती.
समीर शोरूम मधून रात्री उशिरा आला, अंजली तिच्या खोलीत होती. अंजलीला बरं वाटत नव्हतं म्हणून ती लेटलेली होती, समीर आलाय हे तिच्या लक्षातच आले नाही.
समीरने तिला आवाज आला,
"अंजली मी आलोय ग, अंजली.."
त्याच्या आवाजाने ती लगबगीने उठायला गेली पण तिच्या कमरेची नस लागली आणि तिच्या तोंडातून कींचाळी निघाली.
"आई ग$$."
"काय ग काय झालं?"
"काही नाही कमरेची नस लागली."
"हे छान आहे, आम्ही दिवसभर बाहेर जाऊन काम करायचं तुम्ही घरात असून देखील तुमच्या कमरेची नस लगतीय.
काय करतेस ग तू दिवसभर? घरीच तर असतेस ना? अशे किती काम असतात घरी आणि तरी तुझी नाटकं.."
काय करतेस ग तू दिवसभर? घरीच तर असतेस ना? अशे किती काम असतात घरी आणि तरी तुझी नाटकं.."
तो समोर काही बोलणार तशीच अंजली ताडकन उठून उभी झाली.
पुन्हा तोंडातून आवाज निघाला.
"आई ग.."
तिने कमरेला हात धरला.
तिने कमरेला हात धरला.
त्याच्याकडे बघून ती बोलली,
"अहो काय बोलताय तुम्ही? खरच माझ्या कमरेची नस लागली आहे आणि आणि हे माझ्या हातात नाही ना किंवा मी मुद्दामही केलेले नाही मग तरी असं का बोलताय तुम्ही?"
"जेवायला घे, मी फ्रेश होतो."तो सरळ वॉशरूमला निघून गेला. अंजलीला हे ऐकून खूप वाईट वाटलं पण तरीही ती उठून गेली. तिने त्याला जेवण वाढलं, सगळं आवरून ती खोलीत गेली.
समीर मोबाईल बघत बसलेला होता, अंजली त्याच्याकडे पाठ करून झोपली.
काही वेळाने तिला झोप लागली, अचानक त्याने कमरेत हात घातला आणि ती दचकून उठली.
"अहो काय करताय झोपू द्या ना?"
"नाटक दाखवू नको जास्तीचे." असं म्हणून त्याने तिला स्वतःकडे वळवलं. तिच्या ओठांजवळ ओठ नेले.
अंजलीची इच्छा नसतानाही त्याने त्याची इच्छा पूर्ण केली. तिच्या मनाचा देखील विचार केलेला नव्हता,तिच्या शरीराचा देखील विचार केला नव्हता. अंजलीला खूप वाईट वाटलं डोळ्यातून अश्रू ढाळतच ती झोपली.
अंजलीची इच्छा नसतानाही त्याने त्याची इच्छा पूर्ण केली. तिच्या मनाचा देखील विचार केलेला नव्हता,तिच्या शरीराचा देखील विचार केला नव्हता. अंजलीला खूप वाईट वाटलं डोळ्यातून अश्रू ढाळतच ती झोपली.
पहाटे तिला उशिरा जाग आली, उठून लगबगीने किचनमध्ये गेली.
"काय ग अंजली चेहरा का असा दिसतोय? बरं नाहीये का?" सासूबाईंनी विचारलं.
"ठीक आहे मी." तिला जास्त काही बोलायची इच्छा झाली नव्हती.
"समीर अजून उठलेला नाही आहे?"
"ते उठायचे आहेत अजून."
"तू चहा बनव मी आहे समोर हॉलमध्ये."
अंजलीने सगळ्यांना चहा दिला आणि समीरसाठी ती रूममध्ये चहा घेऊन गेली.
तो उठलेला होता, तिने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि रूम मधून बाहेर यायला निघाली.
