Login

मधुमालती- नवी ओळख भाग दोन

Story of one Women,Who Start New journy of Her Life.
मधुमालती- नवी ओळख भाग दोन

विषय- फिरूनी नवी जन्मेन मी.
*************************

मागील भागात आपण पाहिले मालतीताई सुशीला च्या घरून निघाल्या होत्या.


मालती ताई रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. कुठे जावं? काय करावं ?त्यांना काही सुचत नव्हतं.

गावाकडे त्यांचा मोठा भाऊ होता पण आपल्या स्वतःच्याच मुलांना आपला एवढा त्रास होतोय तर भावाकडे जाऊन अजून परवड कशाला म्हणून तिकडे जाण्याचा विचार त्यानी सोडून दिला.

रस्त्याच्या कडेला एक छोटे मंदिर होते. मंदिरातील घंटा वाजली,ती घंटा ऐकून मालती ताईंना जवळच्या भागातील एका मोठ्या महादेव मंदिराची आठवण झाली. आजची रात्र तिथे काढता येईल या विचाराने त्या तिथे पोहोचल्या.
*****
इकडे अंकितआणि रेवा घरी आले.अंकित चावी आणायला गेला.

"आई गावाकडे गेली वाटतं, हातामध्ये बॅग होती म्हणून विचारलं"------- शेजारी.

हे ऐकून अंकित जरा गोंधळला पण जास्त काही बोलायला नको म्हणून तो 'हो' उत्तर देऊन निघाला.

दार उघडताना घडलेला प्रकार त्याने रेवाला सांगितला.ते ऐकून रेवा,
" गेल्या असतील तर बरेच होईल."

"अगं काहीतरीच काय बोलते.कोण आहे गावाकडे, तिकडे कशाला जाईल आई."

अंकित मालती ताईंच्या रूम मध्ये गेला त्यांचे कपाट उघडले ते रिकामे होते.

अंकित मोठ्याने... रेवा, रेवा

"काय झाले का ओरडतोस?"

"हे बघ."

"अरे बापरे, खरच गेल्या की काय गावाला.
ऐकलं माझं देवानं."

"रेवा" --------- अंकित मोठ्याने

' अशी कशी जाईल आई.
कुठे गेली असेल'
विचार करत अंकित हॉलमध्ये आला तिथे मालती ताईंनी ठेवलेली चिट्ठी त्याला दिसली.

प्रिय अंकित,

"मी जात आहे. कुठे ते माहीत नाही, पण आता इथून पुढे मला इथे राहणे शक्य नाही.कपाटातील माझे कपडे आणि माझ्याकडे थोडे पैसे होते ते घेऊन जात आहे. जास्त नाही पण दोन गळ्यातले सोन्याचे दागिने कपाटातील आतल्या लॉकरमध्ये आहेत. एक रेवाला आणि एक श्वेताला घ्यायला सांग. याव्यतिरिक्त माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही. माझ्यामुळे रेवाला आणि तुला त्रास झाला. मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. उगाचच सगळीकडे चर्चा होईल.घरातील सगळी कामं झालेली आहेत.
तुला आणि अमितला खूप आशीर्वाद.
सुखी रहा."

तुमची आई.

हे वाचून अंकितच्या डोळ्यासमोर काजवे चमकले.तो तसाच खाली बसला.

"काय रे, काय लिहिले आहे त्यात."........ रेवा

अंकितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
ते बघून रेवाने स्वतःच, चिठ्ठी त्याच्याकडून ओढून घेतली आणि वाचायला सुरुवात केली.
वाचतानाच तिला खूप आनंद झाला.

"अरे बापरे सोन्याचा दागिना मी बघते जाऊन."

तीने ते दागिने काढून आणले. तिची अखंड बडबड चालू होती.

अंकित उठला.

'नाही, मला पोलीस स्टेशनला गेले पाहिजे.आईला शोधले पाहिजे.'

तो निघाला.

रेवाने त्याला अडवले.

"त्यांना कळतंय पण तुला कळत नाही का, शोधू नका असं स्पष्ट लिहिले आहे त्यांनी,आणि काय सांगणार पोलिसांना."

अंकित तिथेच थांबला.
****
इकडे रात्रीचं मंदिर बंद करायची वेळ झाली. वॉचमनने मालती ताईंना जाण्यासाठी सांगितले.

"मला इथेच आजची रात्र राहू द्या"
अशी मालती ताईनीं वॉचमनला विनंती केली.

वॉचमननेही ती मान्य केली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मालती ताई आपली बॅग आवरून बसल्या.मंदिरातील पुजारी आले. वॉचमनने त्यांना मालती ताईंची हकीकत सांगितली.
ते मालती ताईकडे गेले...

"ताई तुम्हाला इथे असं राहता येणार नाही."

"मी निघतेच आहे."------मालती ताई.

"थांबा. तुम्ही कुठे जाणार आहे.-"---------पुजारी.

"माहित नाही."------------मालती ताई

"मी तुम्हाला एक पत्ता देतो त्या पत्त्यावर जा तुम्ही. तुम्हाला मदत मिळेल."----------पुजारी

त्यांनी मालती ताईंना एक चिठ्ठी लिहून दिली. मालती ताई चिठ्ठी घेऊन त्या पत्त्यावर पोहचल्या.

एक बंगला होता. त्याचे समोरचे गेट लावलेले होते. गेटच्या बाहेर नावाची पाटी होती. आपल्याकडील चिठ्ठी वरचे नाव आणि ते नाव एक आहे का हे त्यांनी वाचले....

"फिरूनी नवी जन्मेन मी.".......

"हो हेच आहे ते "आतून एका वयस्कर बाईचा आवाज आला.

"या आत."

मालती ताईंना आत येण्यासाठी त्यानी गेट उघडले.

मालती ताई आत गेल्या.

तिथेच एका खुर्चीवर एक 28- 29 वर्षाची तरुणी लॅपटॉपवर काम करत बसलेली होती.

"मधु ताई ह्या बघा ह्या उभ्या होत्या गेटच्या बाहेर."------ वयस्कर बाई.

"कोण तुम्ही? काय काम आहे तुमचं."
मधु ने एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली.

तेवढ्यात-----

"मधु ताई मी निघते मला उशीर होतोय"....... एक तरुणी.

"हो हो मला पण निघायचय."------दुसरी तरुणी.

तिथे आठ ते दहा मुली होत्या. सर्वच जवळ जवळ 25 ते 30 वयापर्यंतच्या, एकच वयस्कर बाई.

हे सगळं मालती ताई उभे राहून बघत होत्या.

"सांगताय ना तुमचं नाव"... मधूने परत विचारलं.

तसं मालती ताई भानावर आल्या....
" माझं नाव मालती."

"काही काम होतं का?" -------- मधु ताई.

"ही चिठ्ठी दिली होती मला...म्हणून आले."

मधुने चिट्ठी बघितलीआणि तिच्या लक्षात आले.

"तुम्हाला राहायला घर नाहीये."

क्रमशः
इथे तरी मिळेल का मालती ताईंना आसरा.
कोण आहे मधु.
वाचा पुढच्या भागात....


0

🎭 Series Post

View all