मधुमालती- नवी ओळख भाग तीन
विषय -फिरूनी नवी जन्मेन मी.
************************
मागच्या भागात आपण वाचले मालतीताई त्यांना दिलेल्या पत्त्यावर गेल्या तिथे मधू नावाची मुलगी त्यांना भेटली. आता पुढे....
************************
मागच्या भागात आपण वाचले मालतीताई त्यांना दिलेल्या पत्त्यावर गेल्या तिथे मधू नावाची मुलगी त्यांना भेटली. आता पुढे....
"तुम्ही तुमच्या बद्दल थोडसं सांगाल."......मधु
मालती ताईनी सगळं सांगितले.
"असं आहे तर...ठीक आहे.
मालती ताई, मी ही एक संस्था चालवते. संस्थाही म्हणाला नको माझ्या परीने मी हे एक मदत केंद्र आहे स्त्रियांसाठी सुरू केलेले. पण हो याचं काम जरा वेगळं आहे. मी इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, मदत करते.शक्यतो अशा मुली ज्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा कुठला अत्याचार झाला आहे,ज्यांना राहायला जागा नाही अशा स्त्रियांसाठी ही संस्था आहे.
आणि ह्या संस्थेच नाव आहे
"फिरूनी नवी जन्मेन मी". एका नवीन सुरुवातीसाठी एका नवीन जन्मासाठी."

(वयस्कर बाईकडे हात दाखवून)
"या चारू मावशी इथेच असतात."
"या चारू मावशी इथेच असतात."
चारू मावशींनी मालती ताईंना चहा दिला.
"तुम्ही इथे राहू शकतात पण तुम्हाला तुमच्यासाठी काम शोधावं लागेल. ते मिळेपर्यंत मी तुम्हाला हवी ती सगळी मदत करेल .एकदा का तुम्हाला काम मिळालं की मग तुम्ही तुमचं सगळं बघू शकता."
मालती ताईंनी चहा घेतला आणि उठून बॅग घेऊन जायला निघाल्या.
"कुठे निघाल्या"------- मधु ताई.
"तुम्ही म्हणालात काम करावं लागतं, पण मला काहीच येत नाही. इतक्या वर्ष फक्त घरातलीच काम केली. इथे या सगळ्या तरुण मुली आहेत. मी काय काम करणार आणि कोण देईल मला काम."
"मी आहे ना म्हातारी. तुमच्याही पेक्षा जास्त वय आहे माझे."---------चारू मावशी
मधु हसून,
"अहो माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला तुम्ही, आणि तसे बघितले तर प्रत्येकाकडे काही ना काही विशेष असतेच जे तुम्ही करू शकतात. तुमच्याकडेही असे काही विशेष असेलच पण तुम्हाला ते माहित नाही.
आपण ते शोधून काढू तोपर्यंत तुम्ही इथे सगळ्या जणी राहतात त्यांच्यासाठी जेवण तयार करा म्हणजे चारु मावशीनाही मदत होईल. चालेल ना."

यावर मालती ताई.....
"हो चालेल मी इथले सगळं काम करेल."
"हो चालेल मी इथले सगळं काम करेल."
चारू मावशींनी त्यांना रूम मधील एक बेड दाखवला. "ही तुमची झोपण्याची जागा इथे तुमचे सामान ठेवा आणि कामाला लागा."
राहण्याची व्यवस्था झाल्याने मालती ताईंना हायसं वाटले.चारुताईंकडून त्यांनी सगळी माहिती करून घेतली.
रात्री मधूने तिथे राहत असणाऱ्या सगळ्या जणींबरोबर मालती ताईंची ओळख करून दिली.
तिथल्या मुलींची कहाणी ऐकून मालती ताईंना खूप वाईट वाटले, प्रत्येकीची वेगळी कहाणी होती.कोणी सासरच्या छळाला कंटाळून आली होती, तर कोणी खोट्या प्रेमाला बळी पडून.जवळच्या कोणी आसरा दिला नाही म्हणून त्या इथे होत्या.
त्या सगळ्या समोर मालती ताईंना स्वतःचे दुःख खूप कमी वाटले.
मधुचे आई वडील तिच्या लहानपणीच गेले होते. मधुच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांभाळले होते. मधुचे आजोबा समाजसेवक होते त्यांनी मधुला खूप शिकवले.आजोबांच्या समाजसेवेमुळेच तिला याची प्रेरणा मिळाली होती. स्वतःचा जॉब करून ती हे सांभाळत होती. ते सर्वजण राहत असलेले घर मधुच्या आजोबांचेच होते.
तिथे येणाऱ्या स्त्रियांना मधु आसरा देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे राहिला मदत करत होती. त्या व्यवस्थित कमवायला लागल्या की त्यांना हवे तिथे जाण्याची मुभा होती.
मालती ताईंना पहिल्याच दिवशी इथल्या सगळ्या जणी खूप जवळच्या वाटू लागल्या. त्यांना त्या दिवशी शांत झोप लागली.
दुसऱ्या दिवशी त्या सकाळी लवकर उठल्या.त्यांनी आधी बाहेरचे अंगण झाडले. घरातली साफसफाई केली. चारू मावशी उठल्यावर त्यांना या गोष्टीचे नवल वाटले आणि आपल्याला करावे लागणारे काम सगळे झाले यामुळे त्यांना आनंदही झाला. त्यांनी मालती ताईंना किचन मधील सगळ्या गोष्टींची माहिती दिली आणि नाश्ता तयार करायला सांगून त्या दुसऱ्या कामासाठी गेल्या.
मालती ताई कामाला लागल्या.
12 ते 13 जणांसाठी त्यांना पोहे करायचे होते.पोहे तयार झाले तसे प्रत्येक जण त्याच्या सुगंधाने धावतच किचनमध्ये आले.
मालती ताई कामाला लागल्या.
12 ते 13 जणांसाठी त्यांना पोहे करायचे होते.पोहे तयार झाले तसे प्रत्येक जण त्याच्या सुगंधाने धावतच किचनमध्ये आले.
"वा काय छान सुगंध येतोय पोह्यांचा."-------पहिली
"मला तर खूप भूक लागली आहे."-----दुसरी
"मालती काकू द्या बरं लवकर मला."------तिसरी
"चारू मावशी तुम्ही पोहे करायच्या त्यावेळेस कधीच असा सुगंध आला नाही."--------चौथी
"हो का? खा गुपचूप" --------चारू मावशी.
सगळ्यांनी मनसोक्त नाष्टा केला. सगळ्यांना पोहे खूप आवडले होते.
मधु घडलेला सगळा प्रकार बघत होती .
ती स्वतःशीच हसत होती जणू काही तिच्या मनाने काहीतरी पक्के केले होते.
ती स्वतःशीच हसत होती जणू काही तिच्या मनाने काहीतरी पक्के केले होते.
"मधु ताई तुम्ही पण घ्या ना."------- मालती ताई
"अहो तुम्ही काय म्हणता मला तू म्हना."
"द्या इकडे आणि तुम्ही दोघी पण घ्या."
मधूने पोह्यांचा पहिला घास खाल्ला आणि तिची खात्री पटली.
ती मालती ताईंना म्हणाली,"काय म्हणत होता काल तुम्ही मला की मी कधी काही काम केले नाही मला या वयात काही जमणार नाही."
"हो खरं तेच बोलले"------ मालती ताई.
"अहो एवढी छान चव आहे तुमच्या हाताला, हां आता या वयात तुमचे थोडे कष्ट करायचे तयारी असेल तर खूप छान व्यवसाय आहे माझ्याकडे, तुमच्यासाठी."
"कोणता व्यवसाय?आहे तयारी कष्टाची."
"मग ठरलं तर,
इथे जवळच कॉलेज आहे. तुम्ही कॉलेजच्या मुलींसाठी मेस सुरू करा.तिथल्या काही मुली माझ्या ओळखीच्या आहेत.मेस मधले जेवण चांगले नसते म्हणून नुसती कुरकुर चालू असते त्यांची. तुमच्या हातचे जेवण त्यांना नक्की आवडेल.
काय म्हणता? चालेल का तुम्हाला."

"हो पण जमेल का मला सगळे."
"नक्की जमेल. चारू मावशी आहेतच मदतीला.
आपण आजच बसून सगळे व्यवस्थित ठरवू."
आपण आजच बसून सगळे व्यवस्थित ठरवू."
मधूने खूप छान कल्पना दिली होती.ती म्हटल्याप्रमाणे मालती ताईंची मेस जोरात चालू झाली. सुरुवातीला तीन चार डब्यांपासून सुरुवात झाली.थोड्याच दिवसांत दहा ते पंधरा डब्यांपर्यंत गेली होती.
परंतू कदाचित मालती ताईंच्या नशिबात वेगळेच काहतरी होते.
सगळे सुरळीत चाललेले होते. अचानक एक दिवस मधूला, कोर्टाकडून रहात असलेला बंगला खाली करण्याची नोटिस आली आणि एका क्षणात सगळे बदलले.
मधुच्या चुलत आजोबांच्या मुलांनी त्या जागेवर आपला हक्क असल्याचा दावा केला होता. हे प्रकरण लवकर मिटेलअसे वाटत नव्हते. कोर्टाच्या कामाला वेळ लागणार हे मधुला माहीत होते.
आता काय करायचे हा प्रश्न सर्वांसमोरच होता.
आता काय करायचे हा प्रश्न सर्वांसमोरच होता.
क्रमशः
काय होईल आता.यातून मधु आणि मालती ताई कोणता मार्ग काढतील वाचू पुढील भागात.
काय होईल आता.यातून मधु आणि मालती ताई कोणता मार्ग काढतील वाचू पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा