मधुमालती -नवी ओळख भाग चौथा(अंतिम)
विषय- फिरूनी नवी जन्मेन मी.
*************************
मागच्या भागात आपण वाचले मधुला कोर्टाची नोटीस आली होती आणि सगळेच बदलले. आता पुढे
*************************
मागच्या भागात आपण वाचले मधुला कोर्टाची नोटीस आली होती आणि सगळेच बदलले. आता पुढे
मधूने प्रत्येकीला स्वतःच्या पायावर उभे केले होते, त्यामुळे त्या प्रत्येकीने आम्ही आमची राहण्याची जागा शोधू आमची काळजी करू नको असे मधू ताईला सांगितले.
मधु समोर आता प्रश्न होता तो चारू मावशी आणि मालती ताईंचा.
मालती ताईंना मेस चालवता यावी यासाठी कॉलेजच्या आसपासच मधूनं एक छोटं घर शोधायला सुरुवात केली.
एका अपार्टमेंट मध्ये तीला एक फ्लॅट मिळाला देखील.
एका अपार्टमेंट मध्ये तीला एक फ्लॅट मिळाला देखील.
ती,चारू मावशी,आणि मालती ताई एकत्र राहू लागल्या.
मधु तिच्या कामात व्यस्त झाली. तिचा जॉब सांभाळून कोर्टाचे काम तिच्याकडे होते. त्यामुळे मालती ताई आणि चारू मावशीकडे मेस ची सगळी जबाबदारी होती.
संध्याकाळी भाजी आणण्यासाठी मालतीताई बाहेर गेल्या.
रस्त्याच्या कडेला तिथे बऱ्याच वडापाव, दाबेली आणि पाणीपुरीच्या गाड्या होत्या. तिथे कॉलेजच्या मुलांची तर सोडाच पण बाकीच्या लोकांची ही खूप गर्दी होती. ते पाहून मालती ताईंना आपणही एक गाडी टाकावी असे वाटले.हा विचार त्यांनी मधूला आणि चारू मावशींना बोलून दाखवला.
मधुलाही हा विचार आवडला होता.
मधुलाही हा विचार आवडला होता.
मधुने तिच्या कामातून वेळ काढून सगळी माहिती काढली आणि मालती ताईंची ब्रेड पॅटीस आणि ओली भेळ ची गाडी सुरू झाली.
संध्याकाळी पाच ते साडेसात या वेळा त्या गाडी चालवत आणि सकाळी एक वाजता डबे आणि रात्रीचे ८.३० ला डबे अशी वेळ त्यांनी ठरवून घेतली होती.
त्यांच्या ब्रेड पॅटीसला आणि भेळीलाही भरपूर प्रतिसाद मिळत होता.थोड्या दिवसात त्यांच्या गाडीवर ही कस्टमरची झुंबड उडाली.
त्यांच्या ब्रेड पॅटीसला आणि भेळीलाही भरपूर प्रतिसाद मिळत होता.थोड्या दिवसात त्यांच्या गाडीवर ही कस्टमरची झुंबड उडाली.
एक दिवस एक कळ्या रंगाची कार तिथे जवळच उभी होती. चार-पाच दिवस ती रोज तिथे पाच ते सात या दरम्यान 15 ते 20 मिनिट उभी असायची.
एक दिवस त्या कारचा ड्रायव्हर मालती ताई कडे आला आणि म्हणाला
"आमच्या साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे ते त्या जवळच्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तुम्हाला भेटायला बोलावले आहे."
"आमच्या साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे ते त्या जवळच्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तुम्हाला भेटायला बोलावले आहे."
मालती ताईंना आश्चर्य वाटले.
'कोण आहे कशासाठी बोलवतोय '. ....मालती ताई स्वतःशीच
'कोण आहे कशासाठी बोलवतोय '. ....मालती ताई स्वतःशीच
परंतु त्यांना डब्याची तयारी करायची होती त्यामुळे
"मला आत्ता वेळ नाही असे सांगून त्या न भेटताच निघून गेल्या."
दुसऱ्या दिवशी गाडी बंद करायच्या आधीच तो ड्रायव्हर आला त्याला पाहून
"मला आत्ता वेळ नाही असे सांगून त्या न भेटताच निघून गेल्या."
दुसऱ्या दिवशी गाडी बंद करायच्या आधीच तो ड्रायव्हर आला त्याला पाहून
"तुम्ही आज परत इथे. काय काम आहे तुमच्या साहेबांचं माझ्याकडे अहो मला वेळ नाही त्यांना काही पॅटीस वगैरे पाहिजे का"
"अहो त्यांना तुम्हाला भेटायचे आहे तुम्ही थोडा वेळ काढलं का"
ड्रायव्हर खूपच मागे लागल्याने मालती ताईंनी त्या दिवशी गाडी लवकर बंद केली. त्यांना ड्रायव्हरने हॉटेलमध्ये एका टेबलाजवळ नेऊन सोडले.
तिथे बसलेल्या व्यक्तीला पाहून,
"नमस्कार
कोण तुम्ही
कशासाठी भेटायचे होते मला"------ मालती ताई
कोण तुम्ही
कशासाठी भेटायचे होते मला"------ मालती ताई
"नमस्कार
तुम्ही आधी बसा. सगळं सांगतो."
तुम्ही आधी बसा. सगळं सांगतो."
एक मध्यम वयाचा माणूस, उंचपुरा, रंग गोरा.चेहऱ्यावरूनच श्रीमंत दिसत होता.
"मी एक व्यावसायिक आहे.
माझे नाव अनिरुद्ध शहा.
इथे जवळच माझ्या एका रेस्टॉरंटची काम चालू आहे. लवकरच ते सुरू होईल माझा जाण्याचा हाच रस्ता असल्याने गेली पाच-सहा दिवस मी बघतोय तुमच्या गाडीवर भरपूर कस्टमर असतात.
आणि तुमच्या हाताला ही चांगली चव आहे."

यावर मालती ताईंनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले.
मिस्टर शहा थोडेसे थांबून हसून...
"हो म्हणजे मी तुमच्या हातचा ब्रेड पॅटीस आणि भेळ ट्राय केली आहे.खूप गर्दी होती तुमच्या लक्षात आले नसेल, माझा ड्रायव्हर घेऊन आला होता."
"खरंतर मी तुम्हाला एक ऑफर देतोय. माझ्या नवीन रेस्टॉरंट साठी मेन शेप म्हणून तुम्ही काम केलं तर मला खूप आनंद होईल ; आणि त्याचा योग्य तो मोबदला मी तुम्हाला देईल."
हे ऐकून मालती ताईंना काय बोलावे ते सुचेना. त्यांना गोंधळलेल्या अवस्थेत पाहून मिस्टर शाह म्हणाले,
"काही घाई नाहीये तुम्ही तुमचा निर्णय उद्या कळवा मी उद्या परत येईल.
"ठीक आहे,उद्या भेटू."
असे म्हणून मालती ताई निघाल्या.
असे म्हणून मालती ताई निघाल्या.
घरी आल्यावर त्यांनी घडलेली हकीकत मधु आणि चारू मावशीला सांगितली.
सगळं ऐकून मधु विचार करत होती.
सगळं ऐकून मधु विचार करत होती.
"उद्या त्यांना नाही म्हणून सांगते. कशाला कोणाच्या इथे काम करायचे. थोडे तर थोडे पैसे.". .......मालती ताई
"थांबा तुम्ही. नाही म्हणून सांगायचे नाही."..... मधु
"मग?"------मालती ताईंनी आश्चर्याने विचारले.
"मी बोलते त्यांच्याशी. उद्या संध्याकाळी येणार ना परत ते. आपण दोघी भेटू."
दुसऱ्या दिवशी त्या दोघी मिस्टर शहाणा भेटल्या.
मालती ताईनी मधुची ओळख करून दिली आणि या म्हणतील तसं मी करणार असं मिस्टर शहाणा सांगून टाकले.
मालती ताईनी मधुची ओळख करून दिली आणि या म्हणतील तसं मी करणार असं मिस्टर शहाणा सांगून टाकले.
"मी डायरेक्ट मुद्द्यावरच येते------मधु
तुम्हाला नाही का वाटत मोबदला देऊन तुम्ही यांच्यावर अन्याय करताय."
तुम्हाला नाही का वाटत मोबदला देऊन तुम्ही यांच्यावर अन्याय करताय."
"तुम्हाला काय म्हणायचे ते स्पष्ट सांगाल का"----मिस्टर शहा
"मला वाटतं मोबदल्याऐवजी तुम्ही मालती ताईंना पार्टनरशिप दिली पाहिजे.
त्यांनी का म्हणून स्वतःच सोडून तुमच्याकडे काम करायचं.
फिफ्टी-फिफ्टी पार्टनरशिप असली तरच मालती ताई स्वीकारतील.
आणि हो काही घाई नाही तुम्ही विचार करून कळवा."
त्यांनी का म्हणून स्वतःच सोडून तुमच्याकडे काम करायचं.
फिफ्टी-फिफ्टी पार्टनरशिप असली तरच मालती ताई स्वीकारतील.
आणि हो काही घाई नाही तुम्ही विचार करून कळवा."
मालती ताई मधुकडे कौतुकाने बघत होत्या. तिचे रोखठोक बोलणे त्यांना खूप आवडले होते. मधूच्या रूपात आपल्याला मुलगी मिळाली असेच त्यांना वाटत होते.
आता, मिस्टर शहा काय म्हणतात हेच बघायचे होते.
ते काहीच बोलत नाही; हे बघून मधु ,निघतो आम्ही. असं म्हणून जायला निघाली.
ते काहीच बोलत नाही; हे बघून मधु ,निघतो आम्ही. असं म्हणून जायला निघाली.
"थांबा .कधी करायचं पुढचं बोलणे."
"म्हणजे"----मालती ताई.
"मला मंजूर आहे .मी यांना पार्टनरशिप द्यायला तयार आहे."....... शहा
मधु आणि मालती ताई दोघीही खूप खुश झाल्या.
पुढच्या भेटीत सर्व काही ठरलं. कागदपत्रांवर सह्या झाल्या.
रेस्टॉरंटचं नावही मिस्टर शहाणी मालती ताईंनाच सुचवायला सांगितले.
मालती ताईनी नाव सुचविले ------"मधुमालती"
शहाना हे नाव आवडले.
मधु मालती ताईकडे बघून हलकीशी हसली.
मधु मालती ताईकडे बघून हलकीशी हसली.
लवकरच "मधुमालती"सुरू झाले.
"मधुमालती"म्हणजे नवीन आणि जुन्या पारंपारिक पदार्थांची सांगड होती.
लवकरच ते रेस्टॉरंट लोकप्रिय झाले.शहाणा पार्टनरशिप चा फायदाच झाला.
लवकरच ते रेस्टॉरंट लोकप्रिय झाले.शहाणा पार्टनरशिप चा फायदाच झाला.
एक दिवस वेळ पाहून मालती ताईंनी शहांकडे मधुच्या घराचा विषय काढला.
सर्व परिस्थिती कळाल्यावर शहांना मधुचेही कौतुक वाटले. निराधार स्त्रियांसाठीचे तिचे काम कौतुकास्पद होते. शहांनी मधुला मदत करायचे ठरवले.
त्यांच्या मदतीने मधुला लवकरच तिचे घर परत मिळाले. पुन्हा एकदा
"फिरूनी नवी जन्मेन मी" नव्या जोमाने सुरू झाले.
त्यांच्या मदतीने मधुला लवकरच तिचे घर परत मिळाले. पुन्हा एकदा
"फिरूनी नवी जन्मेन मी" नव्या जोमाने सुरू झाले.
इकडे मालती ताईंनी स्वतःसाठीही एक छान बंगला घेतला.तिथे सर्व त्यांच्या आवडीच्या गोष्टी ठेवल्या होत्या.मोहन रावांचा एक मोठे फोटो करून हॉलमध्ये लावला होता. त्यांना आणि मोहनरावांना एक ग्रामोफोन घेण्याची इच्छा होती. ती त्यांनी आता पूर्ण केली.
एक छानसा ग्रामोफोन त्यांनी घेतला होता आणि त्यावर त्यांच्या आवडीची गाणी त्या ऐकत असत.
चारू मावशी ही त्यांच्यासोबतच राहत होत्या. त्यांच्या मदतीला दोन-तीन नोकर चाकर होते.
एक छानसा ग्रामोफोन त्यांनी घेतला होता आणि त्यावर त्यांच्या आवडीची गाणी त्या ऐकत असत.
चारू मावशी ही त्यांच्यासोबतच राहत होत्या. त्यांच्या मदतीला दोन-तीन नोकर चाकर होते.
"फिरूनी नवी जन्मेन मी " ने त्यांना एक नवीन जन्म दिला होता. एक नवीन ओळख दिली होती. त्याचे ऋण त्या कधीही विसरल्या नाहीत.त्यांच्या परीने त्या नेहमीच मधुला,संस्थेला मदत करत होत्या.
"मधुमालती"खूप नावारूपाला आले होते. लांबून लांबून लोक मधुमालतीतील पदार्थांचा आस्वाद घ्यायला येऊ लागले.
एक दिवस मालती ताईंचे दोन्ही मुलं आणि त्यांची कुटुंब मधुमालती मध्ये जेवायला आले. अमित थोड्या दिवसांसाठी भारतात आला होता.
काउंटरवर बिल पे करताना अमितने मोहन रावांचा फोटो बघितला. त्याने मॅनेजर कडे चौकशी केली तर त्याला समजले की ते इथले मालक आहेत. रेस्टॉरंट च्या नावातही मालती हे नाव होते.त्यावरून दोन्ही मुलांना आपली आई असेल असे वाटले. रेवा आणि श्वेताला ही गोष्ट समजली.

रेवा लगेचच -----
"अरे म्हणजे हे आपलेच रेस्टॉरंट आहे चल लगेच जाऊ त्यांना पत्ता विचारू."
"अरे म्हणजे हे आपलेच रेस्टॉरंट आहे चल लगेच जाऊ त्यांना पत्ता विचारू."
अंकित चिडून....
"तू तर शांत बस कुठल्या तोंडाने बोलतेस तू हे. तुम्ही दोघी मुलांना घेऊन घरी जा आम्ही आलोच."
"तू तर शांत बस कुठल्या तोंडाने बोलतेस तू हे. तुम्ही दोघी मुलांना घेऊन घरी जा आम्ही आलोच."
अंकितला चिडलेला बघून दोघीही काहीही न बोलता घरी गेल्या.
अंकित आणि अमित मॅनेजर कडून पत्ता घेऊन मालती ताईंच्या घरी गेले.
खूप मोठा बंगला. हॉलमध्ये मोठा मोहनरावांचा फोटो.
तिथे काम करणारा एक जण त्यांना हॉलमध्ये बसायला सांगून मॅडम येतीलच असे सांगून बाहेर गेला.
तिथे काम करणारा एक जण त्यांना हॉलमध्ये बसायला सांगून मॅडम येतीलच असे सांगून बाहेर गेला.
मालती ताई आल्या.
"कोण, कोण आहे"
अंकित अमित उठून उभे राहिले.
"आई"----दोघे एकदम.
"कोण, कोण आहे"
अंकित अमित उठून उभे राहिले.
"आई"----दोघे एकदम.
"अरे तुम्ही दोघे ,आज इथे कसे? वाट चुकलात का.
अमित तू कधी आलास."........मालती ताई
अमित तू कधी आलास."........मालती ताई
"दोन दिवस झाले. चार दिवसात परत निघणार आहे."...... अमित
"बरं झालं भेटला. नाही तर मला वाटले तुला न बघताच जाते की काय मी
पाणी घेतले का तुम्ही"
पाणी घेतले का तुम्ही"
"हो घेतले."...... दोघेही
अंकितच्या डोळ्यात पाणी आले.
मालती ताई तिथल्या आराम खुर्चीवर बसला.
अंकित पुढे होऊन त्यांच्या पायाजवळ बसला.
"आई चुकले माझे...."
त्याला थांबवत, मालती ताई....
त्याला थांबवत, मालती ताई....
"काही बोलू नको तुझे काही नाही चुकले. आता मला मागे जायचे नाही.
मी आता कोणाची आई नाही की सासू नाही. मी आता फक्त मालती आहे.
मधुमालतीची मालकीण मालती."
मी आता कोणाची आई नाही की सासू नाही. मी आता फक्त मालती आहे.
मधुमालतीची मालकीण मालती."
"मधुमालती"हीच माझी नवी ओळख.
"या आता तुम्ही.जाताना दरवाजा लावून जा. रामू बाहेर गेलाय."
असं म्हणून त्यानी शेजारीच ठेवलेला ग्रामोफोन चालू केला.
डोळे मिटून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते.खुर्ची हालत होती.
अंकित आणि अमित आईकडे बघून जायला निघाले
ग्रामोफोनवर गाणे सुरू झाले....
" एकाच ह्या जन्मी जणू
फिरूनी नवी जन्मेन मी."
***** *****

समाप्त.
सुजाता इथापे
सुजाता इथापे