मदतीचा हात की डोक्याला ताप ?
भाग १
भाग १
" सुयश, हे जे बेसिनमध्ये भांड्यांचे कुतुबमिनार उभे राहिलेत ना, ते बघून आता माझं कोडिंग हँग व्हायला लागलंय!
सकाळपासून त्या किचकट प्रोग्रामिंगमध्ये डोकं उपसून मी आधीच वैतागली आहे, त्यात आता हे 'एक्स्ट्रा फिचर' नकोय मला!"
सकाळपासून त्या किचकट प्रोग्रामिंगमध्ये डोकं उपसून मी आधीच वैतागली आहे, त्यात आता हे 'एक्स्ट्रा फिचर' नकोय मला!"
नीरजा किचनमधून ओरडली. तिचा आवाज हॉलमध्ये बसलेल्या सुयशच्या कानावर आदळला, पण त्याने केवळ लॅपटॉपच्या स्क्रीनवरून एक नजर वर केली . नकारार्थी मान हलवली.पुन्हा चहाचा घुटका घेतला.
सुयश सोफ्यावर पाय लांब करून निवांत बसला होता.
" अगं नीरू, शांत हो ! मी पण ऑफिसचंच काम करतोय ना ? आणि मी तुला किती मदत करतो गं... कालच बाहेरून वाणसामानाची पिशवी मी वर घेऊन आलो. मागच्या आठवड्यात लाइट बिल भरलं. अगदी न विसरता ! आपण किती 'परफेक्ट बॅलन्स' ठेवलाय बघ ना !"
त्याने एका प्रोफेशनल प्रोजेक्ट मॅनेजरसारखा युक्तिवाद मांडला.
त्याने एका प्रोफेशनल प्रोजेक्ट मॅनेजरसारखा युक्तिवाद मांडला.
नीरजा किचनच्या दारात उभी राहिली. अंगावरचा अॅप्रन, कपाळावर आलेला घामाचा थेंब गालावर ओघळला. हातातला ओला नॅपकिन तिच्या रागाची तीव्रता सांगायला पुरेसा होता.
" बॅलन्स ? सुयश, बाहेरची कामं म्हणजे 'बॅलन्स' नसतो रे! इथे किचनमध्ये 'क्रिटिकल एरर' आलाय. चल, पटकन उठ. जरा रात्रीच्या जेवणासाठी साठी हा कोबी चिरून दे, सकाळी मी घासून ठेवलेली भांडी वाळली आहेत, ती निमूटपणे जागेवर लावून दे. जा... लवकर!"
नीरजाने हातातला टॉवेल टी पॉयवर ठेवला. त्याच्या हाताला धरून उठवत म्हणली.
सुयशने एक दीर्घ सुस्कारा सोडला, जणू त्याच्यावर फार मोठा अन्याय होतोय.
नीरजाने हातातला टॉवेल टी पॉयवर ठेवला. त्याच्या हाताला धरून उठवत म्हणली.
सुयशने एक दीर्घ सुस्कारा सोडला, जणू त्याच्यावर फार मोठा अन्याय होतोय.
" नीरजा, भाजी चिरणं हे माझं डिपार्टमेंट नाहीये गं! मला त्या कोबीच्या ढोबळ आकारात लॉजिक सापडत नाही. आणि ती भांडी... ती तिथेच टोपलीत बरी दिसतात, कशाला उगाच जागा बदलून त्यांना विनाकारण डिस्टर्ब करायचं ?"
" सध्या तुझं लॉजिक नको लढवू, हात चालव!" नीरजाचा पारा आता चढला होता.
" मला आज खूप थकवा आलाय. तू इथे चहा पित बसलायस. ही घरची कामं काय फक्त माझीच जबाबदारी आहेत का?"
सुयश नाईलाजाने उठला, लॅपटॉप बाजूला ठेवला. अगदी मोठ्या आविर्भावात म्हणाला,
" हे बघ नीरजा, रोजच्या या 'तू-तू मैं-मैं' पेक्षा आपण एक कायमस्वरूपी तोडगा काढूया. आपण दोघंही बऱ्यापैकी कमावतो, पुण्यासारख्या शहरात राहतो, मग कशाला या घरकामावरून डोकं फोडून घ्यायचं ?
आपण एक हेल्पिंग हँड म्हणजेच कामाला बाई लावूया. मग तुला कोबी चिरायचा त्रास नाही आणि मला भांडी लावण्याचा कंटाळा नाही!"
आपण एक हेल्पिंग हँड म्हणजेच कामाला बाई लावूया. मग तुला कोबी चिरायचा त्रास नाही आणि मला भांडी लावण्याचा कंटाळा नाही!"
नीरजाला सुयशचा हा शॉर्टकट माहीत होता. तिला माहीत होतं की मदतनीस शोधणं हे सोपं काम नाही, पण सुयशला धडा शिकवण्यासाठी ही उत्तम संधी होती. तिने डोळे मिचकावत एक गुगली टाकली.
" ठीक आहे सुयश, पण एक चॅलेंज आहे. मदतनीस शोधण्यापासून ते निगोशिएशन करण्यापर्यंत सगळी जबाबदारी तुझी! तिला काय काम सांगायचं, किती पगार द्यायचा, सुट्ट्यांचे काय नियम... हे सगळं तू फायनल करायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ती घरात असताना घरी थांबण्याची ड्युटी तुझी ! मंजूर?"
" मंजूर! उद्याच बघ, एक प्रोफेशनल मदतनीस शोधून दाखवतो तुला."
सुयश आत्मविश्वासाने म्हणाला. नीरजा हळूच हसली.
त्याला वाटलं होतं की एखादा सॉफ्टवेअर इंजिनिअर हायर करण्यापेक्षा हे काम सोपं असेल. पण त्याची ही समजूत लवकरच दूर होणार होती.
सुयश आत्मविश्वासाने म्हणाला. नीरजा हळूच हसली.
त्याला वाटलं होतं की एखादा सॉफ्टवेअर इंजिनिअर हायर करण्यापेक्षा हे काम सोपं असेल. पण त्याची ही समजूत लवकरच दूर होणार होती.
पुढचा रविवार उजाडला. सुयशने सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज टाकला होता. दुपारी पहिली 'कॅन्डिडेट' मुलाखतीसाठी आली. सुयश डायरी आणि पेन घेऊन सोफ्यावर 'इंटरव्ह्यू' घ्यायला बसल्याचा थाटात बसला.
"काय नाव तुमचं?" सुयशने विचारलं.
" सखूबाई... पण सगळे मला सखू मावशी म्हणतात." त्या मावशींनी सोफ्यावर बसत सुयशकडे रोखून पाहिलं.
" बरं मावशी, भांडी आणि कपडे करायचे आहेत. काय घेणार?" सुयशने व्यावसायिक सुरात विचारलं.
सखू मावशींनी एक लांबलचक यादीच वाचली,
" बघा भाऊ, सुटीचा पगार कट करायचा नाही. खरकटी भांडी तुम्ही नळाखाली धुवून बेसिनमध्ये लावायची, तरच मी हात लावीन. मी खरकट काढणार नाही.कुकर आठवड्यातून फक्त दोनदाच घासीन, आणि जर घरी पाहुणे आले आणि भांडी जास्त झाली, तर पर हेड पन्नास रुपये एक्स्ट्रा लागतील! मान्य असेल तर बोला."
सुयशचं पेन डायरीवरच थबकलं. त्याने नीरजाकडे पाहिलं, ती किचनच्या दारातून मिश्किलपणे हसत होती. सुयशने मनातल्या मनात कॅल्क्युलेटर चालवलं. ही तर त्याच्या कंपनीच्या एच.आर. पॉलिसीपेक्षाही कडक पॉलिसी होती.
दुसरी मुलाखत एका स्वयंपाकाच्या काकूंची होती.
" मी सकाळी ६:३० ला येणार. भाजी रात्रीच आणून, निवडून, कापून ठेवायची. भाजी मी निवडणार आणि आणणार असेल तर त्याचे चार्जेस एक्सट्रा होतील.बाकी मी फक्त फोडणी देणार. दहा पोळ्या लाटणार. साडेसातला मी दुसऱ्या घरी जाणार. महिन्यातून दोन सुट्ट्या फिक्स. मला विश्रांती हवी. दिवाळीला अख्खा पगार बोनस!"
सुयशला आता घाम फुटू लागला होता. नऊ वाजता ऑफिसला जाणाऱ्या सुयशला साडेसहाच्या बाईंसाठी साडेपाचला उठावं लागणार होतं. पण त्याने हार मानली नव्हती. त्याने एका बाईंना फायनल केलं आणि उद्यापासून कामावर बोलावलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सव्व सहा वाजले. सुयश कसाबसा डोळे चोळत उठला. स्वयंपाकाच्या मावशी येणार होत्या म्हणून त्याने घाईघाईत फ्रिज उघडला आणि त्याचे डोळे विस्फारले. फ्रिजमध्ये भाजीच नव्हती ! नीरजाला सांगायचं तो काल विसरला होता. त्याने धावत जाऊन मोबाईल उचलला. भाजी ऑर्डर करायला सुरुवात केली.
बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. सुयश डिलिव्हरी बॉयची वाट पाहत होता आणि घड्याळाचा काटा टिक-टिक करत साडेसहाकडे सरकत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सुयशने दरवाजा उघडला, पण समोर मदतनीस नव्हती, तर दुसरंच कोणीतरी उभं होतं, ज्याला बघून सुयशचे पाय लटपटू लागले...
आता दारात नेमकं कोण होतं ?
सुयशची ही 'मदतनीस शोधण्याची' मोहीम त्याला कोणत्या संकटात टाकणार होती ? आणि
नीरजाचं हे चॅलेंज सुयश पेलू शकणार का ?
सुयशची ही 'मदतनीस शोधण्याची' मोहीम त्याला कोणत्या संकटात टाकणार होती ? आणि
नीरजाचं हे चॅलेंज सुयश पेलू शकणार का ?
क्रमशः...
