Login

प्रीत जपावी

Love Preserving by Me
रंग तुझा संग तुझा वेड जीवा लावी
तुझ्या सवे बहरणारी प्रीत जपावी

आरशात पाहताना हसलीस तू
गालावर फुलले, किती ऋतू
बहारदार रूप, तुझे लाघवी
धुंद मनी, स्वप्न जागवी

आभाळाच्या अंगणात तू चांदणी
हृदयाचे हाल, लवता पापणी
तुझ्या हाती स्वप्नांची देत चावी
प्रेमाची गोड गंमत पहावी

हळवे हृदय तुला सुपूर्द व्हावे
आनंदाने तुझ्यात विरघळावे
प्रेमाची वाट सुखमय व्हावी
अखंड सोबत तुझी लाभावी

....... योगिता मिलिंद नाखरे






0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →