प्रेम, अफेअर आणि डिजिटल युगातील शॉपिंग ऐन्जॉयमेंट....!
प्रेमळ लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065
एक काळ होता, प्रेमपत्र लिहायला आठवडे जायचे. पोस्टमन हा प्रेमाचा अधिकृत दूत असायचा. एखाद्या मुलीच्या घरासमोरून सायकलवरून पाच वेळा फेऱ्या मारल्या की तेच प्रेमाचं मोठं धाडस मानलं जायचं.
पण आता डिजिटल युग आलं आहे. आता प्रेमाची सुरुवात "नमस्कार" ने होत नाही, तर "हाय. ऑनलाइन आहात का?" ने होते. प्रेमपत्रांची जागा व्हॉट्सॲपने घेतली आहे आणि हृदयाच्या ठोक्यांची जागा मोबाईलच्या नोटिफिकेशनने घेतली आहे.
पूर्वी प्रेमात पडलेला माणूस चंद्राकडे पाहायचा. आता तो मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहतो. चंद्र उगवला नाही तरी चालेल, पण "Last Seen" दिसलं पाहिजे!
आजकाल प्रेम आणि अफेअर दोन्हीही फास्ट फूडसारखे झाले आहेत लगेच होते आणि लगेच ब्रेकअप कसे तर असे, एका क्लिकवर ओळख, दुसऱ्या क्लिकवर मैत्री आणि तिसऱ्या क्लिकवर "तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस" असा मेसेज तयार असतो आणि लगेच शॉपिंग चल सोबत, कार आण बाईक नको नाहीतर ब्रेक अप.
डिजिटल प्रेमात एक वेगळीच गंमत असते. सकाळी "गुड मॉर्निंग" चा गुलाब येतो, दुपारी हृदयाचा इमोजी येतो आणि संध्याकाळी "तू रिप्लाय का दिला नाहीस?" अशी चौकशी सुरू होते आणि नंतर ₹370 ची बिर्याणी खाल्ली की वसुली नक्की.
अफेअर करणाऱ्यांची तर मजाच असते. मोबाईलमध्ये नाव सेव्ह केलेलं असतं "इलेक्ट्रिशियन", "LIC एजंट", "किराणा दुकान" किंवा "बँक मॅनेजर". पण कॉल आला की चेहऱ्यावर येणारं स्मितहास्य मात्र सगळं सत्य सांगून जातं.
सोशल मीडियाने प्रेमाला नवे पंख दिले आहेत. आता लोक एकमेकांना भेटण्यापूर्वी त्यांचे फोटो, स्टेटस, रील्स, फॉलोअर्स आणि कमेंट्स तपासतात. म्हणजे प्रेमापेक्षा प्रोफाइलची चौकशी जास्त होते.
पण या सगळ्या ऐन्जॉयमेंटमध्ये एक गोष्ट विसरून चालणार नाही. प्रेम हे फक्त टाइमपास नसतं. प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं, विश्वास जपणं आणि संकटातही सोबत उभं राहणं असतं.
कारण डिजिटल युगात मेसेज डिलीट होऊ शकतात, चॅट गायब होऊ शकतात, अकाउंट बंद होऊ शकतं. पण खरं प्रेम असेल तर आठवणींचा बॅकअप कायम मनात सेव्ह राहतो.
म्हणून प्रेम करा, हसा, ऐन्जॉय करा, पण कोणाचं मन दुखावून नाही. कारण इंटरनेटचा स्पीड वाढला असला तरी हृदय तुटण्याचा वेग आजही तितकाच वेदनादायक असतो.
"प्रेमात ऑनलाइन असणं महत्त्वाचं नाही,
तर आयुष्यभर एकमेकांसाठी उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे!"
तर आयुष्यभर एकमेकांसाठी उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे!"
प्रेमळ लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065, topsunil@gmail.com
हा लेख नावासकट फॉरवर्ड करू शकता
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
