"माझ्या पोराला बरबाद केलं या चांडाळणीने.... पैशाला हपापली आहे नुसती.... खेळ मांडला आहे नुसता माझ्या पोराच्या आयुष्याचा......" असे म्हणत डोके बडवत वर्षाताई कोर्टाच्या पायरीवरच बसल्या.
निलेश सुन्न होऊन कोर्टाच्या बाहेर आला होता. जे काय झाले, जे काही ऐकले, ते सगळे त्याच्या समजण्याच्या पलीकडचे होते.
दिव्याही त्याच्यापाठोपाठ तिच्या वकिलांसोबत बाहेर पडली. तिने एक नजर निलेशकडे टाकली आणि तशीच पुढे निघून गेली. निलेशने तिच्याशी बोलायचं प्रयत्न केला, पण तिने सरळ मान वळवली.
निलेशच्या मित्राने प्रतापने निलेशच्या आईला आणि निलेशला कॅन्टीनमध्ये नेले आणि चहा पाजला .. तेव्हा कुठे निलेशला तरतरी आली आणि तो प्रतापच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला,
"मी चुकलो प्रताप... मी साफ चुकलो... मी हा निर्णय घ्यायला नको होता... मी अजून विचार करायला हवा होता...मी साफ चुकलो ... आता काहीच होऊ शकत नाही का रे ???? माझा अक्षरशः जीव गुदमरायची वेळ आली आहे.. श्वास घेणे कठीण होऊन बसले आहे ,प्लीज सांग ना रे.."
"आधी तू काहीतरी खाऊन घे. आपण यातून मार्ग काढू नक्कीच. तू प्लीज रडू नकोस." असे म्हणून प्रतापने बळजबरी त्याला खायला दिले.
नऊ महिन्यांपूर्वी.........
"अरे निल्या , कुठे हरवला आहेस ?? चल ना मस्तपैकी काहीतरी खालून खाऊन येऊ.." प्रताप
"तू हो पुढेच मी आलो."
"काय इतका विचार करत आहेस ??कसला प्रॉब्लेम आहे का??"
" प्रॉब्लेम असा काही नाही रे प्रताप.. उलट काहीतरी चांगलेच घडते आहे असं वाटतंय.. तुला आठवते का मागच्या आठवड्यात आपला सगळा ग्रुप भेटला होता.."
"हो त्याचे काय..?"
"अरे बघ निशाची एक मावस बहीण आली होती, दिव्या नावाची.. तिने मला त्याच दिवशी फेसबुकला फॉलो केले आणि मेसेज सुद्धा केला.."
"अच्छा मग..?"
" काही नाही रे.. मग बाकी आम्ही नॉर्मली बोलायला लागलो आणि काल बोलता बोलता ती मला म्हणाली की मला तू आवडला आहेस, मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे, तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी आहे का??"
"अरे वा निल्या, पोरींकडून प्रपोजल यायला लागले तुला आता.."
" गप रे.. मी तिला माझ्या आयुष्यात कोणीही नाही असे सांगितले आहे. पण तिला होकार द्यावा की नकार काही कळत नाही आहे. ती निशाची बहीण आहे या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही .. आणि ती म्हणते आहे की तिच्या घरी स्थळ बघणे चालू आहे, त्यामुळे लग्नासाठी जर मी होकार दिलाच, तर तिला लगेचच लग्न करावे लागेल, तिच्याकडे फारसा वेळ नाही ..असे ती म्हणते.."
"इतका काय विचार करायचं त्यात?? निशाकडे चौकशी कर आणि निशा तर आपल्या ओळखीचीच आहे. तिची बहीण म्हणजे चांगलीच असणार .. इतका विचार करू नकोस..
तुला आवडली आहे तर होकार दे. अरे आजकाल मुली मिळणे लग्नाला अवघड झाले आहे .. तुझ्या घरचेही कुणी खमके नाही तुझ्यासाठी स्थळ बघायला.. त्यात तुला समोरून जर प्रपोजल आले आहे तर कशाला इतका विचार करतो आहेस??? बाकी बेसिक चौकशी कर. मला तर याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम वाटत नाही."
तुला आवडली आहे तर होकार दे. अरे आजकाल मुली मिळणे लग्नाला अवघड झाले आहे .. तुझ्या घरचेही कुणी खमके नाही तुझ्यासाठी स्थळ बघायला.. त्यात तुला समोरून जर प्रपोजल आले आहे तर कशाला इतका विचार करतो आहेस??? बाकी बेसिक चौकशी कर. मला तर याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम वाटत नाही."
"ठीक आहे.. मी घरच्यांशी बोलून तिला कळवतो. तशी वागायला बोलायला आणि दिसायला मलाही बरीच वाटली. त्यात निशाची बहिण आहे म्हणजे मला फारसे टेन्शन येत नाही आहे.."
तर निलेश आणि दिव्याची अशी ओळख झाली होती. दिव्यानेच त्याला लग्नासाठी विचारले आणि निशाची मावस बहीण असल्याने निलेशने सुद्धा फारसा काही विचार केला नाही..
निलेशला वडील नसल्यामुळे त्याच्या आईवर एकटीवर निलेशला स्थळ बघण्याचा भार होता.. त्यामुळे निलेश च्या घरच्यांना तर बरेच झाले होते, त्यांचा स्थळ बघायचा त्रास वाचला होता..
काही दिवस एकमेकांच्या भेटी गाठी झाल्या.. निलेशची आई दिव्याला भेटली..
त्यांना सुद्धा ती आवडली कारण, दिव्या गोड बोलायची, वागायची..तिच्या घरचे सुद्धा वर्षाताईंना आवडले होते.. शिवाय त्यांना वयोमानानुसार स्थळे बघण्याचा त्रास झेपणारच नव्हता. तर एक स्थळ आहे ते चालून आले आहे तर त्यांना त्यात काहीच गैर वाटत नव्हते.. कारण त्यांचा मुलगा सुस्वाभावी, सुस्वरूप आणि कमावणारा होता आणि हे स्थळ त्याच्या मैत्रिणीकडूनच आलेले असल्यामुळे त्या निश्चित होत्या..
दोघांच्या घरच्या संमतीने त्या दोघांचे लग्न झाले.. निशा तर भलतीच खुश होती , की तिच्या मित्राबरोबर त्याच्या बहिणीचे लग्न झाले..
या सर्वांमध्ये निलेश ला दिव्याला ओळखायला फक्त दोन ते तीन महिनेच मिळाले.. त्याला तिचा स्वभाव सुद्धा निशा सारखाच खेळकर, हसरा वाटला त्यामुळे तो तर भलताच खुश होता.
लग्न होताच एकमेकांना अजून जाणून घेण्यासाठी दोघे हनिमूनला केरळला गेले.. तिथे शॉपिंगला गेलेले असताना दिव्याने तिच्या माहेरच्यांसाठी भरपूर शॉपिंग केली पण सासरच्यांसाठी काही घ्यायचे नाव सुद्धा काढले नाही, ते बघून निलेश ला जरासे वाईट वाटले पण नात्यांची बळजबरी लगेच कशाला करा , असे म्हणून त्याने तो विषय तिथेच सोडून दिला..
केरळमध्ये निलेशला तिचा स्वभाव बराच खर्चिक असल्याचे सुद्धा जाणवले होते, पण हनिमूनच्या एन्जॉयमेंट मध्ये कुठे कंजूसी करा असे म्हणून त्याने तिच्यावरती भरपूर पैसे खर्च केले..
आठ दिवस मनसोक्त हिंडून फिरून झाल्यानंतर दोघेही घरी परतले, घरी परतल्यानंतर दुसरेच दिवशी दिव्या माहेरी आली.. ते चांगली सात ते आठ दिवस राहिली..
निलेश नवीन लग्न झालेले असल्यामुळे सतत तिला आठवण करून द्यायचा की, लवकर ये लवकर ये, पण ती ताकास तूर लागू द्यायची नाही.. शेवटी कसे तरी आठ दिवसानंतर ती सासरी परतली..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
