Login

लेखिका निकिता पाठक- जोग : जीवनमूल्य ,संस्कारक्षम पिढी निर्मितीतून लेखनकलेचा अरुणोदय ..!!

स्री प्रतिभा ही साहित्याची मांदियाळी आहे.

स्री ही अनेक जबाबदारीचे ओझे लिलया पेलत असते. सहनशीलतेच्या जोरावर अनेक कर्तव्य निष्ठेने तिने पार पाडली आहेत. विविध बदल स्वीकारताना आपल्या चातुर्याचा तितक्याच दूरदृष्टीने स्रीने उपयोग केला आहे. या सगळ्यातून वैयक्तिक छंदाला प्राधान्य देत आपल्या अंगभूत कलागुणाला तिने वाव दिला आहे. अशाच लेखिका निकिता पाठक यांनी लेखनकलेला मनापासून जपले आहे. एक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना मुलांना संस्काराची शिदोरी प्रदान करताना लेखणीची शालिनता मनसोक्त जपली आहे.

लेखिका म्हणून वावरत असताना ईरा व्यासपिठाची ओळख झाली. तेथील स्पर्धा ,नियोजन , कौटुंबिक भावनिकता भावली आणि ईरावर निकिताजी यांचा सुरेल प्रवास सुरु झाला. ईराच्या ऐतिहासिक चॕम्पियन स्पर्धेत भाग घेऊन आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. अनेक पुरस्कार मिळवले. सातत्याने लेखनात स्वतःला गुंतून ठेवताना वाचकांच्या मनावर भुरळ घातली.चूक , सायलेंट डिव्होर्स , विश्वास , खरा आधार ,दोन नणंदा ,आपुलकी ,अनुभूती , त्यागाचं शांत सौंदर्य ,दिसतं तसं नसतं, प्रेमाचा सरळ मार्ग , शापित बंगला ,कौतुक , खरी मैत्री , नियम, स्री शक्ती जागर ,अंधविश्वास ,मानसिक ताण, समंजस ,ऋण,आपली ती लेक ,बदल , समजूतदार ,स्वीकृती ,तिरस्कार ,दुर्बल ,मौन,निर्णय , अपेक्षा , मोठेपणा , जबाबदारी ,स्वाभिमान ,आस्तित्व अशा अनेक कथेतून त्यांनी वैचारिक संपन्नता निर्दशनास आणुन दिली आहे. आकर्षक भाषाशैली ,गोड संवाद ,दर्जेदार कथानक , उत्कंठावर्धक शेवट , उत्तम निरीक्षणशक्ती यामुळे निकिताजी यांचे लेखन ईरावर बहरले आहे.

एकीकडे शाळेत मुलांना घडवायचे , कुटुंबाची जबाबदारीचे भान राखायचे यातून फावल्या वेळेत समाजातील स्थित्यंतरे लेखणीने टिपायची ..! हे केवळ निकिताजी सारख्या सक्षम वैचारिक स्रीलाच जमले आहे.समाजाला सकारात्मक विचारांची गरज असेल तर स्रीयांचे मोलाचे विचार स्वीकारावे लागतील. याची सुस्पष्टता ईरा व्यासपिठावर अधिक गडद दिसते. विचारांच्या या कुंभमेळ्यात अनेक लेखिकां भगिनिंची प्रगल्भता दिसली आहे. आधुनिक बदलत्या स्री जगण्याला ईरा हा मोठा आधारस्तंभ आहे याची प्रचिती ईराला मिळालेल्या लेखिकांच्या प्रतिसादात सहज जाणवते.

निकिताजी यांच्या या लेखनप्रवासाला सलाम..! आपली सजगता ,कल्पकता आणखी गतीमान करुन आपले लेखन व सातत्याने साहित्यक्षेत्रात प्रकाशझोतात आणावे. वेगवेगळे विषय हाताळावे ,ईरावरील प्रत्येक स्पर्धेत सहभाग घ्यावा. शैक्षणिक मार्गदर्शनाने पुढील पिढी समृद्ध करावी.हिच आपल्याला वाढदिवसाच्या मंगलमय क्षणाला शुभेच्छा ..!!

©नामदेव पाटील
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →