"लेक : परकं धन!" भाग - १८
मीनाने सतीशचे एक भयानक सत्य कल्पनाला सांगितले होते. ते ऐकून कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकली होती. तिच्या स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. "ताई अशा माणसाबरोबर राहते काही?" असा प्रश्न तिला पडला होता.
रात्रभर कल्पनाच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. मीनाने सांगितलेले ते भयंकर सत्य तिच्या डोक्यात घर करून बसले होते. 'सतीश एक खुनी आहे... त्याने पहिल्या बायकोला मारून टाकलंय...' हे शब्द तिला झोपू देत नव्हते.
एका बाजूला बापाचा जुलूम आणि दुसऱ्या बाजूला बहिणीचा नवरा साक्षात एक राक्षस! या दुष्टचक्रातून ताईला कसे बाहेर काढावे, या विचाराने कल्पना आतून अक्षरशः तडफडत होती. या अस्वस्थ अवस्थेतेच तिने रात्र कशीबशी काढली.
सकाळ झाली होती. घरात वातावरण नेहमी सारखेच तणावपूर्ण होते. ओट्यावर दिनकर खुर्ची टाकून चहा पित बसला होता. चंद्रकला तिची माळ जपत बसली होती.
कल्पना हातात चहाचा कप घेऊन शून्यात नजर लावून बसली होती. तिच्या विचारत चहा पूर्णपणे थंड होऊन गेला होता. तरीही तिला कळाले नव्हते. मीनाही मान खाली घालून शांत बसली होती.
तेवढ्यात स्वयंपाकघरातून वंदना बाहेर आली. तिच्या हातात पाण्याच्या तांब्या होता. अचानक तिचे पाऊल अडखळले. तिला भोवळ आल्यासारखे झाले आणि ती भिंतीला हात लावून उभी राहिली.
पुढच्याच क्षणी वंदनाने तोंडावर हात ठेवला आणि ती धावत मोरीत गेली. तिला भयंकर कोरड्या उलट्या सुरू झाल्या.
कल्पनाने हातातला चहाचा कप बाजूला ठेवून आईकडे धाव घेतली. पण तिच्या आधी चंद्रकलाचे तरबेज डोळे आणि कान वंदनाकडे पोहोचले होते. वंदनाला होणारा त्रास आणि तिचा चेहरा बघून चंद्रकलाच्या डोक्यात एका सेकंदात लख्ख प्रकाश पडला.
"अरे दिनकर... ऐ दिनकर!" चंद्रकला जागेवरून उठत आनंदाने ओरडली. दिनकर लगेच घरात आला.
"काय झाले आई?" दिनकर विचारतो.
"पोरा, आरे आधी मीनाची बातमी आली आणि आता वंदनाची! तू बाप होणार आहे. आपल्या घरावर जणू देवाचीच कृपा झाली.
"आई, काय सांगतेस काय!" दिनकर आनंदाच्या भरात उड्याच मारायला लागतो.
आतमध्ये हे कल्पनाने हे ऐकताच तिची विचारशक्तीच जणू गोठून गेली. तिला असे वाटले की तिच्या कानात कुणीतरी गरम शिशाचे तेल ओतले आहे.
एकाच वेळी आई आणि मुलगी... दोघीही गरोदर...? याचा विचारच तिला करवत नव्हता. तिथल्या तिथे थिजून तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती.
दिनकरचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हसू होते. तो वंदनाजवळ गेला आणि अत्यंत मग्रुरीने म्हणाला, "वंदे, देवाने परत एकदा हाक ऐकली आहे. आता यावेळेस तू मला वंशाचा दिवाच द्यायचा. मुलगाच पाहिजे मला. तू काहीही कर. जर मुलगा नाही झाला तर तू आहे आणि मी आहे!"
वंदना मान खाली घालून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही आनंद नव्हता. पंचेचाळीशी उलटून गेलेल्या वयात पुन्हा एकदा बाळंतपणाच्या यातना आणि तोच वंशाचा हट्ट तिच्या माथी मारला होता.
"जा वंदना, साखर आन डब्यातून आणि सगळ्यांच्या हातावर दे. दोन दोन आनंदाच्या बातम्या आहेत घरात तर तोंड गोड कर सगळ्यांचे." चंद्रकला रुबाबात म्हणते.
वंदना मुकाट्याने आत गेली आणि वाटीत साखर घेऊन बाहेर आली. तिने दिनकर आणि चंद्रकालाच्या हातावर साखर ठेवली. मग ती कल्पनाच्या जवळ गेली. पण वंदना कल्पनाला नजर देऊ शकली नाही.
वंदना नजर खाली ठेवूनच साखरेचा हात पुढे करतो. पण कल्पना काही साखर घेण्यासाठी हात पुढे करत नाही. ती तशीच आतल्या खोलीत जाते.
थोड्यावेळाने दिनकर आणि चंद्रकला बाहेर जातात. मग कल्पनाचा बांध फुटला. ती वंदनाच्या समोर उभी राहिली.
"आई, मला बोलायला कसे तरी वाटत आहे. तुम्ही माझे आईवडील आहात. पण मला बोलावे लागत आहे. बाबा, आजी यांना तर काहीच वाटत नाही. पण मग तुलाही काहीच वाटत नाही का? या वयात गरोदरपण? आई तुझ्या मुलीला दिवस गेलेत लक्षात येते का तुझ्या? बाकी सगळे जाऊदे याचा तुझ्या तब्येतीवर किती परिणाम होईल हे तरी माहीत आहे का तुला?" कल्पना एका दमात सर्वकाही बोलून टाकते.
वंदनाने डोळ्यांना पदर लावला. ती हुंदके देत रडू लागली.
"मी काय करू कल्पना? मला काय हवं? काय नकोय? कोण विचारणार आहे इथे. नवऱ्याला नाही म्हणण्याचा अधिकार आहे का मला!"
"मी काय करू कल्पना? मला काय हवं? काय नकोय? कोण विचारणार आहे इथे. नवऱ्याला नाही म्हणण्याचा अधिकार आहे का मला!"
"आई, सरळ नाही सांग बाबांना. त्या वंशाच्या दिव्यासाठी काय काय करणार आहे अजून तुम्ही? लोकं हसतील तुम्हाला! एवढी साधं न कळण्या इतपत आंधळे झाले का तुम्ही? आणि परत मुलगीच झाली तर काय करणार तुम्ही?"
कल्पना पोटतिडकीने बोलत होती.
कल्पना पोटतिडकीने बोलत होती.
"तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे पण तुझ्या बाबाला मी नाही बोलू शकत नाही." वंदना हतबल होऊन बोलते.
"आई, तू या दलदलीत इतकी अडकली का आता तुला यातून बाहेर पडता पण येणार नाही. तू खूप अगोदरच या घराचा त्याग करायला लागत होता." कल्पना बोलते.
"तू बोलतेय ते एवढे सोपे नाहीये कल्पना. तुझ्या सारख्या शिकलेल्या मुलींचं वेगळं असतं. मी, आई सारख्या महिला कुठे जाणार? आई जेव्हा कधी घर सोडलं असतं तेव्हा तिला आपल्याला घेऊनच घराबाहेर पडावे लागले असते. तिने कसं आपल्याला सांभाळलं असतं? कुठे गेली असती? शिक्षणाचा काही पत्ता नाही! कोणी नोकरी दिली असती? कुठून पैसा कमावला असता?" आमच्या सारख्या बायकांना पहिल्यापासून कोणाच्या तरी आधारावर जगवले जाते. मग ती उडी घेताच येत नाही." मीना तिच्यासारख्या अनेक बायकांची हतबलता सांगते.
"ताई, या जगात अशा कितीतरी बायका ज्यांनी अशा परिस्थितीला झुगारून एक नवीन स्वतःचे विश्व सुरू केले आहे." कल्पना मीनाला समजावण्याचा प्रयत्न करते.
"पण सगळे सारखे नसतात कल्पना. आमच्यात नाहीये तेवढी हिंमत." मीना बोलते.
कल्पना सरळ तिची बॅग उचलते आणि कॉलेजला जायला निघते. ती त्यानंतर एक क्षण देखील त्या घरात थांबत नाही. कॉलेजला पोहोचताच तिने राघवला शोधले. राघव समोर दिसताच तिचे स्वतःवरील नियंत्रण सुटले. कल्पना धावत राघवकडे गेली आणि त्याच्या गळ्यात पडून रडू लागली.
आजवर खंबीर असलेली कल्पना पूर्णपणे गळून गेली होती. राघवला समजले हिच्या घरी पुन्हा काही तरी झाले आहे.
"कल्पना... काय झालं? तू का रडतेय? कोणी काही बोललं का?" राघव काळजीने विचारत होता.
कल्पनाने रडत रडत घरात घडलेली सर्व परिस्थित राघवला सांगितली. सतिशच्या पहिल्या बायकोच्या खुनापासून ते आई आणि ताई गरोदर असल्यापर्यंत सर्व काही सांगते. हे ऐकून राघव देखील हादरला.
कल्पना, तू शांत हो. मी आहे तुझ्यासोबत. आपण आताच्या आता माझ्या आईबाबांना जाऊन सांगुया. मला खात्री आहे ते याच्यावर नक्कीच काहीतरी मार्ग काढतील." राघव तिला आधार देत बोलला.
दोघेही लगेच आशुतोष देशपांडे यांच्या एनजीओच्या ऑफिसमध्ये आले. तिथे कल्पनाने आशुतोष आणि नलिनी या दोघांनाही मीनाच्या सासरचे सत्य आणि सतीशच्या पहिल्या बायकोच्या मृत्यूची हकीकत सांगते. हे ऐकून दोघेही गंभीर होतात.
"कल्पना, हे प्रकरण वाटत होते तेवढे सोपे नाहीये. सतीश हा सराईत गुन्हेगार आहे. आपण सरळ त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही, नाहीतर तो मीनाला दुखापत करेल. आपल्याला जे काही करायचे असेल ते अतिशय विचारपूर्वक करावे लागेल." आशुतोषराव बोलतात.
"सर्वात अगोदर आपल्याला मीनाला तयार करावे लागेल. मीनामध्ये ती हिंमत निर्माण करावी लागेल ज्यामुळे ती स्वतः सतिशच्या विरोधात उभे राहील." नलिनीताई बोलतात.
"काकू, मी पूर्ण प्रयत्न करते ताईला तयार करण्याचा पण तिच्या मनात जी भीती आहे ती काही केल्या दूर होत नाही." कल्पना बोलते.
"कल्पना, एवढ्या वर्षांची भीती तुझ्या एकदोन बोलण्याने लगेच जाईल का? हळूहळ तिच्यात बदल होईल. तू तुझे प्रयत्न सोडू नको." नलिनताई कल्पनाला समजून सांगतात.
थोड्यावेळाने कल्पना घरी निघते. घरी गेल्यावर तिला अंगणातच मोठी गाडी दिसते. ती गाडी सतिशची होती. त्यावरूनच तिला समजते की सतीश आला आहे. कल्पनाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती रागातच अंगातून घरात जायला निघते...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा