Login

"लेक : परकं धन!" भाग - १५

स्त्री जन्माची व्यथा मांडणारी कथा.
"लेक : परकं धन!" भाग - १५

गावातील चौकात झालेल्या घटनेनंतर कल्पना घरी आली होती. तिला घरी आलेले बघून वंदना आणि मीनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तर चंद्रकला आवाक होऊन बघत होती.

कल्पनाच्या पाठोपाठ दिनकर देखिल घरी आला होता. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्याचा रागीट चेहरा बघून वंदनाच्या चेहऱ्यावर भीती होती.

"मी बोलत होतो, पोरीला कॉलेजला पाठवू नको... पाठवू नको. पण माझं ऐकलं नाही. घे आज ती लागली डोक्यावर मिऱ्या वाटायला." दिनकर वरच्या आवाजात बोलत होता.

"काय झालं?" वंदना कल्पनाकडे बघून विचारते.

"विचार तुझ्या लेकीला! भर चौकात अब्रूचे धिंडवडे काढले आज हिने. मी काही बोललो तर ही पोलिसात जाईल. मग तूच ठरव तुझ्या पोरीचे काय करायचे. माझा आणि हिचा आजपासून काहीही संबंध नाही." दिनकरने असे बोलून चौकातला रागाने ओकून टाकला.

ते सर्व ऐकून वंदनाला मोठा धक्का बसला. गावातील लोकं आता काय विचार करतील या कल्पनेने ती हादरून गेली. दिनकर घरात खाली बसून घेतो. कल्पनाने एवढे मोठे पाऊल उचलले, याचे कुतूहल मीनाला वाटत होते.

"कल्पना काय हे? हे काय करून ठेवलय तू? आस कोण करतं? भर चौकात रस्त्यावर झोपलीस! गावातील लोकं हसतील तुझ्यावर! उद्या तुझ्या लग्नाचं कसं होणार?" वंदना रडत होती.

आईचे बोलणे झाल्यावर कल्पना शांतपणे तिला समजावते, "आई, ज्या समजात आपण राहतो त्या समाजाचा नक्कीच विचार केला पाहिजे. पण ज्यांना फक्त दुसऱ्यांवर हसता येते, अशा लोकांचा आपण का विचार करायचा?"

"अगं पोरी आस नसतं. उद्या तुझ्या लग्नाला अडचण येईल. हे प्रताप ऐकल्यावर कोण तुझ्यासाठी लग्नाला तयार होईल." वंदना काळजीने बोलते.

"आई, तू माझ्या लग्नाची आजिबात काळजी करू नकोस. सगळकाही नीट होईल. मला कॉलेजला जायला उशीर झाला आहे, मी निघते."

कल्पना कॉलेजला जाण्याची तयारी करत होती. दिनकर टीव्हीवर बातम्या लावतो. बातम्यांमध्ये एक सुन्न करणारी बलात्काराची बातमी चालू होती.

"जास्त आगावू वागलं का मग हे आसचं होतं. अगोदर उनाडक्या करायच्या आणि नंतर बोलायचं आमची इज्जत गेली." दिनकर कल्पनाकडे बघून तिला टोमणा मारतो.

"बापाच्या पुढं जाणाऱ्या पोरींची मग अशी नाचक्की होती. तोंड दाखवायला जागा राहत नाही." चंद्रकला देखील कल्पनाला टोमणा मारते.

कल्पना मग राहवत नाही ती टीव्ही बंद करून दोघांकडेही एक तिश्न नजरेने बघते.

"बाबा, आजी तुम्हाला कोणी सांगितली की एका स्त्रीची इज्जत तिच्या शरीरात असते. इज्जत स्वतःच्या वागण्या, बोलण्यात, विचारांत असते. बलात्काराने त्या निष्पाप मुलीची इज्जत नाही जात... इज्जत जाती ज्याची त्याने ते नीच कृत्य केलंय! आणि बाबा, इज्जत तुमच्यासारख्या लोकांचीपण जाते, जे त्यांना पाठीशी घालतात आणि मुलींना दोष देतात.

कल्पना थेट दिनकरवर आरोप करते. याने दिनकर खवळून कल्पनावर धाऊन जातो आणि बोलतो, "तुला बोलून देतो म्हणून काहीही घाणेरडे आरोप माझ्यावर करशील का? मी कोणत्या अशा माणसाला पाठीशी घालते."

"तुम्ही ताईच्या बाबतीत जे केले ते बरोबर होते का? तिचा सौदाच केला ना तुम्ही त्या सतीश बरोबर. तुम्हाला काय वाटत तिच्या बरोबर जे होते ते तिच्या मर्जीने होते. तिच्या शरीरावर कुठे कुठे आणि कसले कसले डाग आहे, याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला?" कल्पनाचा आवाज वाढला होता.

"सतिशरावांच्या सोबत तिचे लग्न झाले आहे. नवरा आहे तो तिचा." दिनकर म्हणतो.

"एक स्री जेव्हा एका पुरुषाला 'नाही' म्हणतेना तेव्हा त्याचा अर्थ नाहीच असतो! मग तो पुरुष तिचा नवरा असला तरी!
बाबा, जेव्हा ताईसारख्या मुलींचे लग्न त्यांच्या इचेविरुद्ध, जबरदस्तीने होते. तेव्हा तो नवऱ्याचा अधिकार न राहता एक 'समाजमान्य बलात्कार' असतो.

"असा समाजमान्य बलात्कार की जी कोणाला सांगूही शकत नाही. आणि तिने सांगितले तरी तिचे कोणी ऐकणार नाही. ना तिचे आई-बाप, ना हा ढोंगी समाज. पिढ्यान पिढ्या असेच चालू आले आहे."

कल्पनाचा आवाज धारधार झाला होता. ती बोलत होती आणि सगळे ऐकत होते.

"बाबा, तुम्ही इज्जतीचे बोलत होता. आज तुमच्या मुलीच्या नजरेत तुमची काय इज्जत आहे याचा विचार केला का कधी? नसेल केला तर करा! तुम्हाला तुमची काय इज्जत आहे ते कळेल."

कल्पनाच्या आवाजात वेदना होत्या. तिची कॉलेजची बॅग उचलते आणि घराबाहेर पडते. घरात एकच शांतता पसरली होती. दिनकर आ वासून उभा होता. मीनाच्या डोळे पाणावले होते. तिचे दुःख तिला बोलण्याची हिंमत झाली नाही पण आज तिच्या बहिणीने बोलून दाखवले होते. वंदना शांत उभी होती.

कल्पना कॉलेजला पोहोचली होती. घरात जे झाले त्याचा राग अजूनही तिच्या डोक्यात होता. त्या रागातच होती तोच एका मुलाने पाठीमागून तिच्या डोक्यात हलकीशी टपली मारली. तिचा राग अजून वाढला.

कल्पना झटकन मागे वळली. त्या मुलाला मारण्यासाठी हात वर केला पण त्याला बघताच कल्पनाचा राग शांत होतो. ती हात खाली घेते. आणि तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू येते.
तो मुलगा होता "राघव."

राघव... कल्पनाचा प्रियकर. दिसायला रुबाबदार, विचाराने प्रगल्भ आणि अत्यंत सुसंस्कृत घरातील मुलगा. राघवचे वडील, आशुतोष देशपांडे आणि नलिनी देशपांडे हे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. ते दोघेही मिळून महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतःच एक 'एनजीओ' चालवत होते.

"काय झाले मॅडम, एवढ्या कोणावर चिडल्या आहेत?" राघव कल्पनाला विचारतो.

कल्पना घरात जे झाले ते सर्व सांगते, "राघव घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे. आणि तुला माझ्या बाबांचा स्वभाव, आमच्या घरातील सर्व पार्श्वभूमी माहिती आहे. आपल्याला लवकर लग्नाचा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल."

"लग्नाचा निर्णय म्हणजे, तू लग्न करण्याचा विचार करते का?"

"राघव, बहुतेक वेळ आली तर आपल्याला तसा निर्णय घ्यायला लागू शकतो."

"पण कल्पना एवढ्या लवकर लग्न? आपल्याला अजून स्वतःच्या पायावर उभं रहायचं, आपण सेटल पण नाहीये!"

"तू नक्की माझ्याशी लग्न करणार आहेना? का फक्त टाईमपास करतोय?"

"कल्पना, वेडी का तू! काही बोलते का? मला जर तुझ्या लग्न करायचे नसते तर मी आपल्या नात्याबद्दल माझ्या आई-बाबांना का सांगितले असते? त्यांनीही आपल्या नात्याला का परवानगी दिली असती? मी तुझ्याशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाही." राघव कल्पनाचे हात हातात घेऊन तिला समजावून सांगतो.

"राघव, मला तुझ्या आई-बाबांना भेटायचे आहे?

"आई-बाबांनी तुला सांगितले आहेना, तुला त्यांना भेटण्यासाठी परवानगीची गरज नाहीये. तू कधीही घरी येऊ शकते. आणि असंही एक दिवस मी तुला कायमचे घरी घेऊन जाईल."

"ठीक आहे राघव. आज कॉलेज सुटल्यावर मी तुझ्या घरी येते."

"पण कल्पना एक विचारू का?"

"हो विचार."

"मीना, तुझे माझ्या बाबांकडे काय काम आहे? म्हणजे सहज विचारत आहे. तुझ्या मनावर आहे तुला सांगायचे की नाही."

"तुझ्यापासून काय लपवायचे! तुला घरातले सर्वकाही माहिती आहे. मीनाताई साठी जीव तुटतो रे. तिच्यासाठी काहीतरी करायचे आहे मला. नाहीतर तिचेही आयुष्य आई सारखे फक्त सहन करण्यातच जाईल."

"कल्पना, मीनाताईंसाठी माझी कोणतीही मदत लागली तर मला सांग. मी नक्कीच करेल."

"बाकी काही नाही राघव. पण ती तिच्या पायावर उभी राहिली तर तिच्यासाठी चांगले होईल."

"राघव, तुझ्या घरी तू असणार ना माझ्या बरोबर? का कुठे जाणार आहे?"

"कल्पना, माझी काय गरज आहे तुला?"

"राघव, मला तुझ्या आई-बाबांना भेटायचे म्हटले की दडपण येते."

"कल्पना, तू त्यांना ओळखत नव्हती तेव्हा ठीक होते. आता चांगली ओळख झाली आहे का तुमची."

"तरीपण तू थांबायचे."

कल्पनाने आग्रह केल्यावर राघव तयार होतो. कॉलेज सुटल्यावर राघव आणि कल्पना राघवच्या घरी जायला निघाले. कल्पनाच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते.

"ताईला नोकरी मिळेल का? कारण मीनाचे शिक्षण फक्त नववी झाले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे होते, मीना नोकरीसाठी तयार होईल का...? "

क्रमश:
0

🎭 Series Post

View all