"लेक : परक धन!" भाग - १४
कल्पनावर दिनकर खवळला होता. पण त्याला काय करावे हे सुचत नव्हते. अशात चंद्रकला त्याला सांगते की कल्पनाला घरच्या बाहेर काढून दे.
कल्पना कॉलेजला निघाली असताना दिनकर तिला बोलतो, "कॉलेजला चालली आहे तर परत येण्याची गरज नाहीये. माझ्या घरात जो माझे ऐकणार नाही त्याला माझ्या घरात जागा नाही."
हे ऐकताच कल्पनाचे पाय दरवाजातच थबकतात. वंदना आणि मीनाला मोठा धक्का बसतो. दोघींनाही कल्पनाची काळजी वाटत होती.
वंदना धावत जाऊन दिनकरच्या पायावर पडली. "अहो नका... असं नका करू. आपली लेक कुठ जाईल? तिच्या वतीने मी माफी मागते." वंदना रडत होती.
"ती फक्त तुझी पोरगी आहे. ती जेव्हा माझ्या विरोधात गेली तेव्हाच माझ्यासाठी मेली."
"अहो असू नका बोलू. पोरगी नादान आहे." वंदना बोलत होती तोच, कल्पना पुढे येऊन आईला उठवते.
"आई तुला यांच्या पाया पडायची गरज नाहीये. तुझी काहीही चूक नसताना कशाला पाया पडते. आणि आई तू काळजी करू नकोस. बाबा स्वतः मला थोड्यावेळाने घरात घेऊन येतील." कल्पना आत्मविश्वासाने बोलते.
कल्पना बॅग उचलून बाहेर पडते. चंद्रकलाच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य होते. दिनकर मात्र विचारत पडला होता की कल्पना असे का म्हटली असेल, "मी स्वतःहून तिला घरात आणेल."
कल्पना ना कोणत्याही नातेवाईकाकडे गेली, नाही मैत्रिणीकडे. ती थेट गावातील मुख्य चौकात, जिथून सर्वांची ये-जा असते, अशा भररस्त्यात गेली. तिने आपली बॅग एका बाजूला ठेवली आणि सर्वांच्या देखत रस्त्याच्या मधोमध जाऊन चक्क झोपली!
तिला असे करून स्वतःचे हसू करण्याची इच्छा नव्हती. पण दिनकरला वठणीवर आणण्याचा दुसरा पर्याय पण नव्हता. दिनकर गावातील खोट्या प्रतिष्ठेसाठी हापापलेले होता हे तिला माहित होते. "नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही" म्हणून तिने असा मार्ग वापरला.
सकाळची वेळ होती. गावातल्या चौकात गर्दी होती. दिनकर मोरेची पोरगी अशी भररस्त्यात झोपलेली बघून लोकांची गर्दी जमायला लागली. लोकांची कुजबूज चालू झाली.
"दिनकरच्या पोरीला वेड लागले वाटते...!
"हिला लवकर उठवा नाहीतर हिच्या नादी लागून आपल्या पोरी बिघडतील...!
"हिच डोकं फिरलं वाटतं...!
"हिला लवकर उठवा नाहीतर हिच्या नादी लागून आपल्या पोरी बिघडतील...!
"हिच डोकं फिरलं वाटतं...!
गर्दीतला प्रत्येकजण ज्याच्यात्याच्या सोयीने अर्थ लावत होता.
थोड्या वेळातच ही बातमी गावातल्या सरपंचापर्यंत पोहोचली. सरपंच आणि काही प्रतिष्ठित लोकं तिथे आली.
"ऐ पोरी, तू दिनकर मोरेची पोरगी आहेना?" सरपंच विचारतात.
"हो." कल्पना बोलते.
"हे काय नाटकं आहे? तुला काय वेडबिड लागलंय का? चल उठ इथून. रस्ता काय झोपायची जागा आहे का? कशाला बापाची इज्जत वेशीवर टांगते?" सरपंच एका श्वासात सर्व प्रश्न विचारतात.
"झालं तुमचं. आता माझे ऐका. माझ्या बाबांनी मला घरा बाहेर काढले. मग आता मला तुम्हीच सांगा मी रस्त्यावर आले की नाही?" कल्पना त्यांनाच प्रश्न करते.
कल्पना बोलताच लोकांमध्ये खळबळ मजली.
"तुमचं जे काही असेल ते तुमच्या घरात मिटवा. घरगुती प्रश्न गावच्या चौकात नका आणू. चल जा इथून." सरपंच मोठ्या आवाजात सांगतात.
"जोपर्यंत माझे बाबा येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही." कल्पना अतिशय शांतपणे बोलते.
"ही अशी ऐकणार नाही. दोन-तीन जण पुढे येऊन हिला उचलून हाकलून द्यारे." सरपंच बोलतात.
तीन तरुण मुलं पिढी आली. ते कल्पनाला हात लावणार तोच तिने मोठ्या आवाजात गर्जना केली, "खबरदार जर कोणी मला हात लावला तर! माझ्या संमतीशिवाय मला कोणी हात लावला तर मी छेडछाडीचा गुन्हा दाखल करेल."
ती मुलं आहे त्याच जागेवर थांबतात.
"अरे हिला कसले घाबरताय. ही काहीच तक्रार करणार नाही." गर्दीतला एकजण बोलतो.
"कोण बोलले? त्याने समोर या माझ्या. मी माझ्या बाबांच्या विरोधात जाऊन असं रस्त्यावर झोपू शकते तर तक्रार दाखल करणार नाही. मला कीव येते त्याच्या बुद्धीची." कल्पना पुन्हा गरजते.
"सरपंच, ही पोरगी वेडी झाली आहे. काही करू शकते. आम्ही नाही हात लावणार हिला." तिघांपैकी एकजण बोलतो आणि मग सर्वजण मागे फिरतात.
"ऐ कोणीतरी जाऊन त्या दिनकरला बोलून आणा?" सरपंच बोलतात.
सरपंचाच्या सांगण्यावरून गर्दीतला एकजण धावत दिनकरच्या दुकानात जातो. दिनकर नुकताच दुकानात आला होता.
"अरे दिनकर तुझ्या पोरीने तिकडे चौकात किती मोठा तमाशा मांडला आहे."
"काय झाले?"
तो व्यक्ती दिनकरला सर्व सांगतो. दिनकरच्या पायाखालची जमीनच सरकली. " गावात आपली आता काय इज्जत राहील" असा विचार तो करू लागला. दिनकर आहे तसाच चौकाच्या दिशेने धावत सुटतो. दुकानाचे शटर सुद्धा तो बंद करत नाही.
दिनकर चौकात पोहोचला तेव्हा गर्दीने त्याला वाट करून दिली. पण त्या वाटेवरून चालताना प्रत्येक पाऊल त्याला जड वाटत होते. आजुबाजूला उभे असलेले गावकरी आता दबक्या आवाजात बोलत होते, काही जण उघडपणे हसत होते, तर काही जण टोमणे मारत होते.
"काय दिनकर! स्वतःच्याच पोरीने भर चौकात इज्जत काढली." गर्दीतून दिनकरच्या कानावर पडते. पण दिनकर तिकडे लक्ष ने देता मान खाली घेऊन चालत होता.
"काय दिनकर! स्वतःच्याच पोरीने भर चौकात इज्जत काढली." गर्दीतून दिनकरच्या कानावर पडते. पण दिनकर तिकडे लक्ष ने देता मान खाली घेऊन चालत होता.
दिनकर कल्पना जवळ आला. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. पण तो काही बोलू शकत नव्हता.
"बस झाली नाटकं! चल घरी आता. पूर्ण गावाला तमाशा दाखवायचा आहे का?" दिनकर दातओठ खात, पण दबक्या आवाजात बोलतो.
कल्पना जागेवरून न हलता ठामपणे म्हणते, "मी नाटक करत नाहीये बाबा. तुम्हीच मला घरातून हाकलून दिले होते ना? आता हेच माझं घर आहे."
"मान्य आहे मी तुला घरातून बाहेर काढले. पण मीच तुला आता घरी बोलवत आहे." दिनकर विनवणीच्या सुरात बोलत होता.
"ठीक आहे मी येईल घरी, पण माझी एक अट आहे." कल्पना बोलते.
"आता अट बिट हे काय आहे? कशाला तमाशा वाढवते?" दिनकरचा आवाज आता मात्र वाढला होता.
"मी अशीच घरी आले आणि तुम्ही परत मला घरच्या बाहेर काढले मग?" कल्पना शंका उपस्थित करते.
गर्दीतले लोकं कुतुहलाने बाप-लेकीचा हा सामना बघत होते. दिनकर अधूनमधून लोकांकडे बघत होता. लोकांच्या त्या नजरा मात्र दिनकरला चांगल्याच लागत होत्या.
"तुझं नेमकं म्हणणं तरी काय आहे?" दिनकर हतबल होऊन कल्पनाला विचारतो.
"तुम्ही आता, इथे सगळ्या गावासमोर आजीची शपथ घ्यायची की तुम्ही आई आणि आम्हा कोणालाच काहीही झाले तरी घराबाहेर काढणार नाही." कल्पना तिची अट सांगते.
"तुझं हे अती होतंय आता." दिनकरचा आवाज परत वाढतो.
"मला जे सांगायचे होते, ते मी सांगितले. आता मी काहीही बोलणार नाही." कल्पना असे बोलून पुन्हा रस्त्यावर झोपून घेते.
दिनकरची चांगलीच कोंडी झाली होती. त्याच्यासमोर कल्पनाची अट मान्य केल्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.
"ठीक आहे बाई. मी आईची शपथ घेऊन सगळ्या गावासमोर सांगतो की, कधीच कोणाला घरच्या बाहेर काढणार नाही."
दिनकर अखेर कल्पना पुढे झुकतो.
दिनकर अखेर कल्पना पुढे झुकतो.
कल्पना लगेच उठते आणि तडक घरी जायला निघते. दिनकरला देखील आता दुकानात जायची इच्छा नव्हती. पण त्याच्या लक्षात येते की दुकानाचे शटर उघडे आहे. तो ते बंद करून घरी जाण्याचा विचार करतो.
इकडे घरी वंदना आणि आणि मीना काळजीत होत्या.
"कल्पना कुठे गेली असेल?"
"ती काय करीत असेल?"
असे प्रश्न वंदनाला पडले होते.
"ती काय करीत असेल?"
असे प्रश्न वंदनाला पडले होते.
चंद्रकलाच्या चेहऱ्यावर मात्र आनंद होता. ज्या कल्पनाने तिला उलट उत्तरे दिले आता ती घरच्या बाहेर होती.
पण तेवढ्यात कल्पना दरवाजात येते. "आई... मी आले." असे बोलून कल्पना वंदनाला मिठी मारते. नंतर मीनाला मिठी मारते.
हे सगळे बघून चंद्रकला आवाक झाली होती. "ही परत कशी आली? असा प्रश्न चंद्रकलाच्या मनात आला होता. चंद्रकला कल्पनाला काही विचारणार तोच दिनकर देखील कल्पनाच्या पाठोपाठ आला होता. दिनकरला बघून चंद्रकला शांत बसते. तिच्या लक्षात येते, यानेच हिला आणले असणार.
दिनकरचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्याचा राग बघून वंदनाला धडकीच भरते. तिला प्रश्न पडतो, नेमके कल्पनाने काय केले असणार...?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा