लाठी
(शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट)
लेखिका - स्वाती बालूरकर , सखी
( घरची बैठक आहे, एक तरुण मुलगी येऊन आईला विचारते.)
मानसी - आई, बाबा कुठे गेलेत गं , कालपासून दिसले नाहीत.
मीरा - अगं, ते सांगतात का मला कधी? कुठल्यातरी विशेष कामासाठी बाहेर गेलेत. वाच्यता नाही करायची म्हणालेत. तीन-चार दिवस लागतील त्यांना यायला.
मानसी - ओके . ऐक ना, मी आज दुपारी बाहेर जाणार आहे, यायला थोडा उशीर होईल.

मीरा - उशीर म्हणजे किती उशीर होईल ? ए बाई, बाबा घरी नसताना तू कुठे जात जाऊ नकोस आणि . .
मानसी - आई . . आई, त्रिशाचा वाढदिवस आहे तर आम्ही सगळ्या सात-आठ मैत्रिणी मिळून बाहेर जातोय, उशीर झाला तर काळजी करू नको तिकडेच थांबेन.
मीरा - पण मनू कॉल कर ग ! मी आणि दादा दोघेच आहोत घरी.
मानसी - अगं कशाला एवढी काळजी करतेस, बाबा एवढे धाडसी काम करतात , तू मला अशी भित्री बनवतेस काय ?
मीरा - प्रत्येक वेळी धाडस कामाला येत नाही मनू!
मानसी - बरं ते असू दे .मी निघते अर्ध्या तासात.
(संध्याकाळचे पाच सहा वाजले तरी मानसी आली नाही, आईला काळजी वाटायला लागली कारण आई सतत कॉल लावते आहे पण कॉल लागत नाही, त्रिशाचाही कॉल लागत नाही, दुसऱ्या मैत्रिणीचाही लागत नाही. ती घाबरून मुलाला आवाज देते तर मुलगा पण खोलीत नव्हता.
मीरा -"आदित्य सतत अभ्यास करत असतो, तो न सांगता कुठे गेला ?"
मीरा -"आदित्य सतत अभ्यास करत असतो, तो न सांगता कुठे गेला ?"
मनात म्हणते
नवऱ्याला फोन करावा, ते ड्युटी वरती असताना बोलत नाहीत. तरी एकदा करतेच फोन, किती वेळ रिंग होतो आहे, पुन्हा दुसऱ्यांदा लावते तो एंगेज येतो, फोन घेतला जात नाही.
नवऱ्याला फोन करावा, ते ड्युटी वरती असताना बोलत नाहीत. तरी एकदा करतेच फोन, किती वेळ रिंग होतो आहे, पुन्हा दुसऱ्यांदा लावते तो एंगेज येतो, फोन घेतला जात नाही.
मग ती टीव्ही लावते.
मीरा स्वतः शी - या राजकारणाची काय आंदोलने चालू आहेत काय माहिती? बिनडोक कुठले? काहीतरी स्टंट करायला हवा यांना, सरकारला हैराण करतात उगीच.
मीरा स्वतः शी - या राजकारणाची काय आंदोलने चालू आहेत काय माहिती? बिनडोक कुठले? काहीतरी स्टंट करायला हवा यांना, सरकारला हैराण करतात उगीच.
असं म्हणून ती टीव्ही बंद करते आणि सहज फोन उघडते .खूप दिवसानंतर फेसबुक उघडते आणि त्यावर सगळ्या क्लिप्स बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते .
मीरा . . . घाबरून. . . अरे इतक्या कोवळ्या मुलांना अशी मारहाण चालू आहे ? हे काय आहे? पोलीस का मारतात निष्पाप विद्यार्थ्यांना ?
जखमी मुलांच्या क्लिप्स यायला लागतात . ती भीत भीत पाहते आणि त्यात आदित्य सारखाच टी-शर्ट ? तिला दिसतं की हात . . तुटलेला आहे ,रक्त वाहत आहे . . हा तिथे कसा?
" अरे नाही . . देवा! (ती कॉल लावते त्याचाही फोन लागत नाही आता तिचा जीव घाबरतो )
मीरा - देशाच्या राजधानीत राहिलो तरी सुद्धा फोन लागत नाहीत काय उपयोग आहे?
सतत तिचा फोन वाजायला लागतो, आदित्यचे मित्र, मानसीच्या मैत्रिणी कॉल करताय. . ती घेत नाही.
सतत तिचा फोन वाजायला लागतो, आदित्यचे मित्र, मानसीच्या मैत्रिणी कॉल करताय. . ती घेत नाही.
वेगळा नंबर ती घाबरून उचलते. . . " मॅडम साहेबांनी विचारलं त म्हणजे बेबी घरी आहे का?"
मीरा - घरी ?? नाही मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली.
नवऱ्याचा आवाज. . . " अग मीरा, तिच्या डोक्यात लाठी लागली आहे , तिला ॲम्बुलन्स मध्ये नेत आहेत . . . . आपल्या मुलांना आज बाहेर पाठवलं? तू घरी काय करतीयेस ? " तो ओरडला.
मीरा. . .अहो, तुम्ही कुठे आहात?
नवरा," माझी इकडे संसदे जवळ व्हीआयपी ड्युटी आहे . . मी कुठे कुठे पाहू?
मीरा. . . (रडत खाली बसते, आक्रोश करीत म्हणते )आदित्य ची नीट परीक्षा गेली, तो भ्रमिष्ट झालाय, त्याचा हात मोडला. . . मनूच्या डोक्यात लाठी लागलीय. . . अहो कशाला करायची अशी नोकरी. . . !. . . सोडा आता.
©® लेखिका - स्वाती बालूरकर , सखी
दिनांक 23.07.2026
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने