लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६
विषय:- अंतिम इच्छा
केशव बऱ्याच दिवसापासून अगदी शांत शांत राहत होता, त्यांना ना अन्न जात होते ना पाणी, सतत कोणत्या तरी विचारात पडून असायचा ना कोणाला काही बोलायचा ना मनातले काही सांगायचा.
त्यांची पत्नी पार्वती त्यांना बोलायचा त्यांच्या मनातले काढून घ्यायचा प्रयत्न करायची पण तरी ते काहीच सांगायला तयार नव्हते. जणु तो त्याच्याच विचारात गुरफटत चालला होता.
एके दिवशी त्यांचा बालपणीचा मित्र त्याला भेटायला आला...
"काय रे केशव काय झालेय बाहेर ही दिसत नाहीत इतक काय मनावर ओझ घेतल आहेस? "म्हणत तो हसून बोलू लागला खर तर त्याला पार्वती नेच फोन करून बोलवून घेतले होते..
"नाही काही नाही रे ते आपल असच.. झाले सरले रे दिवस गेला आपला काळ, "म्हणत तो हळूच अन उदास मनाने बोलला.
"अरे अस का बोलतोय अजून बरच बाकी आहे आपल्याला फिरायला जायचे आहे जोडीने आपल ठरल आहे ना अन तु मध्येच अस काही तरी बोलतोय.. मी लवकरच तिकीट बुक करतो आपण जाऊ मित्र मित्र मस्त फिरून येऊ...हव तर वहिणी ला घेऊ सोबत काय वहिणी.." केशवचा मित्र मोहन हसून बोलला.
तशी ती फक्त गप्प राहिला...
तशी ती फक्त गप्प राहिला...
"नाही रे आता माझ्याने नाही होणार, तु जा जाऊन ये अन आला का मला सांग काय काय बघितले कुठे कुठे गेला होता ते..." केशव बोलला..
"काय रे तु ... बर ते सोड काय सुरू आहे तुझ्या मनात ?का जेवन करत नाहीत तुला माहीत आहे का वहिणी किती परेशान आहे तुझ्या या अशा वागण्याने... अरे तुम्ही दोघे तर आहात एकमेकांसाठी पोर तर काय जिकडे तिकडे सेटल झाली त्यांना त्यांची लाईफ आहे आपणच एकमेकासाठी आहोत.. तू जर अस विचारात पडून राहिला तर त्यांना तरि जेवन जाणार आहे का...? "मोहन विचारू लागला...
"नाही रे मला कळतेय सगळे, पण मला खाऊ वाटत नाही माझ कशातच मन लागत नाही... "केशव बोलला
"तुझ्या मनात नेमक काय सुरू आहे मला सांगशील का? "मोहन विचारू लागले...
"काही नाही.." केशव बोलला
"हे बघ तू सांग हं नाही तर बघ मी नंतर तुला कधी भेटायला येणार नाही बघ... "मोहन त्याला धमकी देत बोलले.
"तू नको येऊ मिळच येतो कि भेटायला.." केशव हसत बोलला
"बर बर...ये तु तर त्यासाठी आधी जेवन करत जा अन लवकर बरा हो..उठ कर धर हा नाश्ता. माझ्यासाठी केला आहे हं सोबत तुलाही..."म्हणत मोहन हसून त्याच्या हातात प्लेट देत बोलला व तो त्या दोघांचा निरोप घेऊन निघून गेला...
असेच चार पाच दिवस गेले...
एका दिवशी अचानक मोहन ला रात्री दीड दोनच्या सुमारास जाग आली अन तो दचकून उठून बसला...
एका दिवशी अचानक मोहन ला रात्री दीड दोनच्या सुमारास जाग आली अन तो दचकून उठून बसला...
"हे काय? हे काय असलं स्वप्न पडलं... स्वप्न पण ना काहीहि पडत....कोण कुठला माणूस अन मी का इतका दुखी झालो कोणासाठी....स्वप्न च पण ना काहीच कळत नाही.कुठेच काही लिंक लागत नाही..."म्हणत त्याने परत पाणी पिले व तो परत झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला काही केल्या झोप लागत नव्हती... तो तसाच कूस बदलत राहिला पहाटे पहाटे त्याला झोप लागली...
"मोहन... मोहन..... अरे कुठे आहेस... बघ मी आलो बघ तुला भेटायला... दार काढ रे...मी भेटायला आले अन तू दार लावून बसला आहेस...कधी पासून आवाज देतोय तुला, माझ ऐकायच नाही का? तू विचारत होतात ना माझ्या मनात काय ते...मि सांगतो तुला...माझ्या मनात काय ते..."म्हणत केशव त्याला बोलू लागला...
पण अचानक तो परत दचकून जागा झाला...
"हे काय होतेय आज....मला स्वप्न का पडत आहेत..."म्हणत तो अंथरुणात उठून बसला सकाळचे सात वाजत होते तेवढ्यात त्याला त्याच्या मोबाईल चा आवाज ऐकू येऊ लागला.. व त्याने आळसावलेले डोळे चोळतच तो फोन घेतला..
"हॅलो... "तो बोलला
"भावोजी..... तुम्ही लवकर घरी या..." पलीकडून केशव ची बायको पार्वती चा घाबरलेला व रडण्याचा आवाज कानी पडला... व त्याच्या हातून त्याचा मोबाईल ही कधि गळून पडला त्याचे त्याला हि समजले नाही अन तोही अगदी सुन्न होऊन एकदमच खाली बसला..
"केशव...!! केशव.!!"म्हणत तो रडायलाच लागला...
अन त्याला रात्री पडलेली व पहाटे पडलेली स्वप्न आठवू लागली...
अन त्याला रात्री पडलेली व पहाटे पडलेली स्वप्न आठवू लागली...
मोहन..ने त्याच्याशी मारलेल्या गप्पा व त्यात त्याने त्याच्या मनातली इच्छा ही बोलून दाखवली होती...ते आठवून त्याला जास्तच गहिवरून येत होते..
"शेवटी मी आलोच बघ भेटायला तुला तेही माझ्या पायाने... मी माझा शब्द पाळला आता तुझी बारी तु ही तुझा शब्द पाळ.. तु माझी इच्छा विचारत होतास ना ?माझ्या मनात काय सुरू आहे ते विचारत होतास मी सांगतो पण ते तूला पूर्ण करावं लागेल...
माझी इच्छा आहे कि तु पार्वती चा सांभाळ करावास... तसही तू ही एकटाच आहेच मी तुला किती दिवस झाल सांगतोय दुसर लग्न कर पण तू आहेस कि ऐकायच नाव घेत नाहीत... स्वतः च सगळ काही करतोस, घराला बाई लागतेच रे... पण तू आहेस कि माझ बोलण मनावर घेत नाहीस...
पुरुष काय कसतरी राहिल रे पण बाई कशी राहणार मला तर ना पार्वती ची खूपच काळजी वाटते बघ.. एकतर ती कधी कुठे एकटी गेली नाही बाजारातले ही काही जास्त समजत नाही...
मुल ही त्यांच्या बायका मुलासोबत खुशाल आहेत, ते तरी कशाला हिला विचारतील.. प्रत्येक जण आपापल बघतोच.... शेवटी काय जोडीदारच काय तो आपला... पण मी ही असा आज आहे अन उद्या नाही.. माझ्या आजारपणाने तिला ही अगदी खचून टाकलं आहे बघ... " केशव उदास होत व नाराजीच्या सुरात बोलला
"होशील रे तू ठीक... काय उगाच अस बोलतोय... "मोहन त्याला बोलला
"नाही मी नाही होणार ठीक मला कळले आहे.!मला एक वचन दे... "केशव त्याच्याकडे पाहत बोलले
"वचन..? आता हे काय मध्येच.. "मोहन हसून बोलला
"तू दे तर... " केशव त्याच्याकडे अगदी टक लावून पाहत होता.. जणू तो त्याला नंतर कधु पाहूच शकणार नाही.
"बर बाबा बोल काय... "मोहन हसून बोलला
"तू पार्वती ला सांभाळून घेशील ना... तिची साथ देशील ना... ? " केशव विचारू लागले
"अरे हे काय विचारण झाल का तुझ? माझा यार आहेस, मी कायम तुम्हा दोघासोबत आहे तु जरी माझ्या विरोधात गेलास ना तरी मी वहिणीची साथ देईन... " मोहन हसून बोलला.
"मला हेच हव होत आता मी मोकळा झालो... " केशव बोलला
"अरे काही काय मोकळा काय मोकळा..." म्हणत मोहन हसून बोलला.
"अरे काही काय मोकळा काय मोकळा..." म्हणत मोहन हसून बोलला.
मोहनला ते स्वप्न जसेच्या तसे आठवत होते अन त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.. त्याने लगेच स्वतः ला सावरले व तो लगेच तयार झाला त्याने जात जातच केशव च्या मुलांना फोन केला पण त्याची दोन्ही मुल आत्ता लगेच येऊ शकणार नाहीत अस त्यांनी सांगितले.
तसा तो आणखीनच खचला व तो स्वतः केशव च्या घरी पोचला... तिथे त्याच्या घरी आसपासची बरीच माणसे जमा झाली होती, पार्वती ची तर खूपच खराब हालत होती. त्याने स्वतः ला सावरले व तो पुढे झाला त्याने तिथले सगळे कार्य पार पाडले...
तसा तो आणखीनच खचला व तो स्वतः केशव च्या घरी पोचला... तिथे त्याच्या घरी आसपासची बरीच माणसे जमा झाली होती, पार्वती ची तर खूपच खराब हालत होती. त्याने स्वतः ला सावरले व तो पुढे झाला त्याने तिथले सगळे कार्य पार पाडले...
त्यानेच केशव ला मुखाग्नी दिला कारण त्याची मुल या घडीला लगेच काही येणार नव्हती अन तिथली माणस काही एक दिवस थांबायला तयार नव्हती. त्यानेच पुढाकार घेऊन सगळ्या विधी पार केल्या...
'केशव तु मला जे सांगायचा प्रयत्न करत होतास ते मला समजलेच नाही तु मला भेटायला आला होता तेही तुझी शेवटची इच्छा सांगायला, पण मी समजूच शकलो नाही तुझ्या मनात होणारी घालमेल.. मी तुझ बोलण हसण्यावर घेतल.. पण माझ्यावर खूप मोठ ओझ ठेवून गेलास तू... तु काय बोलत होता ते आत्ता समजते मला पण मी कस असा विचार करू... पण तुला दिलेल वचन...?
मला कात्रीत पकडल्यासारखे झाले आहे काहीच समजत नाही मला... 'मोहन मनातच बोलत होता... त्याच्या पेटलेल्या त्या चितेकडे पाहत जणू तो केशव शी मनातून बोलत होता.. अन तो त्याचे बोलणे ऐकत होता.
केशववा जणू त्याच्या मरणाची जाणीव आधीच झाली होती अन त्या जाणिवेमुळे तो आणखी जास्त खचला होता त्यात पार्वती च त्याच्या माघारी कस होणार ही गोष्ट त्याला आतल्या आत खात होती. , त्याने त्याच्या मित्रापर्यंत स्वप्नात जाऊन त्याची अंतिम इच्छा पोहचवली...
✍️स्वागंधरा
