लाडकी नणंद - भाग -1
वहिनी अगं काय करते आहेस,ऑफिसमधून आली आहे मी, मला जेवायला वाढ नां मला खूप भूक लागली आहे, स्वाती तिच्या वहिनीला कामावरून आल्यावर हाक मारत होती...
हो, तु फ्रेश झालीस कां, वाढतेच आहे मी पाच मिनिटात, आज तूझ्या आवडीची भाजी पण केलीय, आलीच जेवण घेऊन,गीतांजली किचनमधून म्हणाली..
गीतांजली आणि स्वाती नणंद, भावजया होत्या, पण दोघी अगदी मैत्रिणीसारखं राहत असतं, गीतांजली गृहिणी होती, आणि स्वाती नोकरी करत होती, भाऊ, वहिनी, आणि स्वाती असे तिघेच मुंबईला राहत होते, आई स्वातीच्या लहानपणीचं वारलेली होती आणि त्यांचे वडील गावी शेती करत असतं.
गीतांजलीचं लग्न होऊन एक वर्ष झालं होतं, स्वाती तिला कधीच कामात, काहीच मदत करत नसे, गीतांजली घरीचं असे, पण गीतांजलीची त्याबद्दल काहींचं तक्रार नसे, असंच सगळं छान चाललं होतं, आणि गीतांजलीला स्वातीच्या वागण्यात अचानक बदल जाणवू लागला, स्वाती सतत मोबाईलवर कोणाला तरी मेसेज करत असे.
एके दिवशी स्वातीं ऑफिसमधून लवकर आली आणि बोलू लागली, वहिनी आज मी माझ्या ऑफिसमधल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाणार आहे तर् मी जेवायला नाही आहे हा, बरं एवढंच गीतांजली बोलली.
सात वाजता स्वाती मिडी घालून निघाल्यावर गीतांजलीने तिला टोकलं आणि म्हंटल असा ड्रेसं घालून बाहेर जायचं नाही, अगं चांगलासा ड्रेस घालं नां.
स्वाती ओरडून बोलली मग काय पंजाबी ड्रेस घालून जायचं कां, पूजा नाही आहे तिथे....
गीतांजली पण चिडून म्हणू लागली, तुम्हा आजकालच्या मुलींना शॉर्ट ड्रेस घातले म्हणजे फॅशन वाटते कां, कसं दिसतय बघ ते, तुला वाटतंय नां टिपिकल ड्रेस नकोयं, मग तुझा वन पीस आहे फुलं तो घालून जां नां, लोकांच्या नजरा घाणेरड्या असतात गं, ह्या ड्रेसमध्ये अंगप्रदर्शन होतंय अगं.....
बरं बाई बसं झालं तूझं लेक्चर, ड्रेस बदलते मी, आता पुन्हा दादा आल्यावर त्याला सांगत बसू नकोसं हे सगळं... हो गं जां तु वन पीस घाल जां.. गीतांजली पण हसून म्हणाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी गीतांजलीला जरा ताप भरला होता, ते स्वातीने बघितलं आणि तिला म्हंटल जां आराम कर, टिफिन नको करुसं, मी आज सुट्टी घेते, स्वातीने गीतांजलीला म्हटलं, अगं वहिनी मला आईनंतर तुचं आहेस जिने माझी आईसारखी काळजी घेतली आहे..
बरं बरं बसं झालं माझं कौतुक, जां तु ऑफिसचं कामं कर जां, असं हसत गीतांजली स्वातीला बोलते.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोतं - नणंद, भावजया एवढ्या छान रहात असताना असं काय होतं, ज्याने हे नातं विस्कटू लागतं, आणि स्वाती लग्नाच्या बेडीत कशी फसली जाते )
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
