Login

आत्मसन्मानाचा लढा - भाग -1

Ladha
आत्मसन्मानाचा लढा - भाग -1


     बस झालं शेखर, आता माझ्यात अजून काही सहन करण्याची अजिबात ताकद उरलेली नाही आहे, सायली रडत बोलतं होती..


    समोर शेखर दारूच्या नशेत डगमगत उभा राहून बोलतं होता, पुन्हा तेंच सुरु केलं आहेसं, रोजची किटकिट आहे तुझी, शेखर चिडून बोलला.


किटकिट करणार मी....चार वर्ष झालीत आपल्या लग्नाला, किती नवस केले, डॉक्टर पण केले, तुला हजारदा समजावून झालं आहे, पण तू पुन्हा दारू पिऊन घरी येतोचं आहेस नां, मग चिडू नाहीतर काय करू मी, तुझं हे व्यसन काही केल्या सुटत नाही आहे.


    शेखरने रागाने पाण्याचा ग्लास भिंतीवर फेकून मारला, आणि ओरडला, गप्प बस नाहीतर...


सायली रडत आतं निघून गेली.


    लग्नाच्या सुरवातीला शेखर खूप चांगला होता, नोकरीं करणारा, हसतमुख, आई, वडिलांचा लाडका मुलगा होता तो, त्याचे आई, वडील गावाला रहात असल्याने इकडे हे दोघेचं रहात होते, सगळं छान होतं त्यामुळे सायलीला वाटलं सुरेख सासर मिळालं आहे तिला.

 

       पण लग्नानंतर तीन महिन्यांनी तिला समजलं, शेखर अधूनमधून मिंत्रासोबत दारू पियायचा, पण पूर्ण नशेत नसे, पण नंतर नंतर आठवडयातून एकदा, नंतर दोनदा आणि काही दिवसांनी रोजचं घेऊ लागला.


      मग हळूहळू घरात पैसे कमी पडू लागले, त्याच्या पगाराच्या अर्ध्याहुन पैसे तो दारूत घालवत असे, तिने त्याला खूप समजवून पाहिलं, मध्ये मध्ये तो बरा असे, पण पुन्हा चार दिवसांनी दारू पियायला चालू करत असे.


    असेच दिवस जातं होते, लग्नाला दोन वर्ष होतं आली होती, सायली त्याला समजवत असे, कधी कधी तो तीन महिने अगदी बरा असे, पण मध्ये पुन्हा दारू पियायला सुरवात करत असे.

  
     बघता बघता लग्नाला चार वर्ष झाली होती, पण मुलं होतं नव्हतं, त्याचं टेन्शन असेल असं बोलून सायली आला दिवस ढकलत होती.


      एके दिवस शेखर अतिशय दारू पिऊन आला होता, सायलीला ताप आला आहे ती दोन दिवस आजारी आहे हे ही तो विसरला होता, तो घरी आल्यावर सायली जेवायला वाढ असं नशेत बोलू लागला.


    सायलीने आजारी असल्यामुळे डाळ, भात एवढंच केलं होतं ते बघून त्याने सायलीला नशेत मारायला सुरवात केली, सायली म्हणत होती अरे मला ताप भरलायं, कणकण होती म्हणून मी पडून राहिले होते त्यामुळे जास्त काही करायला जमलं नाही.


पण शेखरने तिचं ऐकलं नाही आणि तिला मारायला सुरवात केली, सायली बोलू लागली मारून टाक एकदाच मला म्हणजे मोकळा होशील तू, आईकडे पण जाऊ देतं नाहीसं...


    घर सोडून गेलीस नां तर आत्महत्या करेन मी असं शेखर ओरडून बोलला.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सायलीने शेखरला सोडून जायचं म्हंटल कि तो तिला धमकी देतं राहायचा, शेवटी सायली एके दिवशी काय निर्णय घेते ते.)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →