लाखात एक ---भाग 5
( मागील भागात--
रियाच्या आईने सांगायला सुरुवात केली रुममधल्या सगळ्यांना आश्चर्याचे धक्के बसले.
सगळे सुन्न झाले होते.)
सगळे सुन्न झाले होते.)
आता पुढे---
रियाची आई सांगू लागली,
"हो, आहे माझ्या मुलीला मानसिक आजार.
उपचार पण सुरूच आहेत, मानसिकरित्या अस्थिर आहे माझी मुलगी पण... ती मीरा नाही.. तर... रिया आहे..."
"हो, आहे माझ्या मुलीला मानसिक आजार.
उपचार पण सुरूच आहेत, मानसिकरित्या अस्थिर आहे माझी मुलगी पण... ती मीरा नाही.. तर... रिया आहे..."
"काय.... कस शक्य आहे हे! काय बोलत आहेस तू आई?
तू या मीराला वाचविण्यासाठी मलाच मूर्ख आणि पागल ठरवत आहे," रिया अजूनच रागात बोलत होती.
तू या मीराला वाचविण्यासाठी मलाच मूर्ख आणि पागल ठरवत आहे," रिया अजूनच रागात बोलत होती.
"रिया, थांब म्हटलं ना तुला. माझं ऐकून घे पूर्ण." इति आई.
रिया एकदम सुन्न होऊन ऐकत होती.
" रिया लहान असतानाच तिच्यात स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणे दिसत होती. कधी एकदम हायपर व्हायची तर कधी नॉर्मल वागायची.
त्यात एक दिवस तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला. कारण काय तर तिच्या भावाला तिच्याच सख्ख्या बहिणीने म्हणजेच मीराने नदीत ढकलले, हे तिच्यासाठी खूपच शॉकिंग होते."
त्यात एक दिवस तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला. कारण काय तर तिच्या भावाला तिच्याच सख्ख्या बहिणीने म्हणजेच मीराने नदीत ढकलले, हे तिच्यासाठी खूपच शॉकिंग होते."
आई बोलत असताना रियाच्या डोळ्यांत मीराबद्दल तिरस्कार दाटून आला होता.
रिया काही बोलणार तोच आईने पुन्हा सांगायला सुरुवात केली होती.
"तिचं भावविश्व आधीच अस्थिर त्यात या घटनेने ते पूर्णतः कोलमडून गेलं.
तिला सावरण्यासाठी तिच्या कलाकलाने वागत तिचं भावविश्व परत मिळवून देणे, आमच्यासाठी एक आव्हान होते.
या धक्क्यातून ती बाहेर यावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पण काही उपयोग झाला नाही.

सगळ्यांनी हेच सांगितलं की, तिचं वय वाढत जाईल, तसं उपचारात आपण पुढची एक एक पायरी चढू शकतो. तिला एकदम तीव्र उपचार देता येणार नाही, ती खूप छोटी आहे.
लहान असल्यामुळे रियाला आम्ही खूप जपत होतो, शक्यतोवर तिचे मन दुखवत नव्हतो."
लहान असल्यामुळे रियाला आम्ही खूप जपत होतो, शक्यतोवर तिचे मन दुखवत नव्हतो."
रियाच्या आईचा कंठ दाटून आला होता. स्वतःवर नियंत्रण ठेवता त्या पुढे बोलायला लागल्या,
"औषधांचा म्हणावा तसा उपयोग होत नव्हता. अजूनही रिया कधीतरी तिच्याच वेगळ्या विश्वात वावरायची, नंतर नॉर्मल व्हायची पण तिला आधीचे आठवायचे नाही.
शेवटी एकच उपाय उरला होता आणि तो म्हणजे ज्या प्रसंगामुळे रियाला धक्का बसला होता तसाच एखादा प्रसंग पुन्हा घडूवुन आणने.
म्हणूनच मीरा, मी आणि अनयने हे नाटक करायचं ठरवलं. "
शेवटी एकच उपाय उरला होता आणि तो म्हणजे ज्या प्रसंगामुळे रियाला धक्का बसला होता तसाच एखादा प्रसंग पुन्हा घडूवुन आणने.
म्हणूनच मीरा, मी आणि अनयने हे नाटक करायचं ठरवलं. "
"काय? नाटक? प्रिप्लॅन्ड होतं सगळं? आणि मला काहीच माहिती नाही..." अनयची आई त्याच्याकडे अविश्वासाने बघत म्हणाली.
"आणि रियाच्या आई, या नाटकाबद्दल तुम्ही मला सांगणे महत्त्वाचे नव्हते का? इफ इन केस,देव ना करो, पण माझ्या मुलाला जर काही झाले असते तर? जसा तुमच्या मुलाने जीव गमावला, तसा माझ्या एकुलत्या एक मुलाचा जीव गेला असता तर मी कसं जगू शकले असते." अनयची आई संतापली होती.
"कोणत्या मुलाबद्दल बोलत आहेत तुम्ही ताई? मला कधीच मुलगा नव्हता. मला फक्त या दोन मुली आहेत." रियाची आई अनयच्या आईचे बोलणे तोडत अतिशय आवेशाने म्हणाली.
"मुलाचा जीव गेला तर तुम्ही त्याला विसरलात सुद्धा!" इति अनयची आई.
" अहो एकून तर घ्या माझा आधी. हे खरंच आहे की, रियाला कधी कोणता भाऊ नव्हताच."
रियाची आई पुढे बोलू लागली,
"रिया लहान होती तेव्हा तिची एक मैत्रीण होती. तिला एक लहान भाऊ सुद्धा होता. त्या दोघांचं नातं बघून रियाला पण वाटायचं की आपल्याला पण एक छोटा भाऊ असायला हवा.
आणि लवकरच तिला कळलं की आपला छोटा भाऊ किंवा बहीण या जगात येणार आहे.
पण तिने हे गृहीतच धरल होता की भाऊच येणार आहे. ती सगळ्यांना अगदी उत्साहात सांगायची, 'माझा लहान भाऊ येणार आहे.
चार वर्षाचीच होती तेव्हा ती फक्त. जेव्हा कोणी तिला विचारात असे की जर तुला बहीण झाली तर?, तर ती चिडायची की, नाही मला तर भाऊच होणार."

रिया देखील आईचे बोलणे ऐकत होती. तिलाही काही जुन्या गोष्टी, तिचा हट्ट आठवत होते.
" पण झाला मात्रं वेगळं. मीराच्या जन्म झाला. खूपच गोंडस होती ती. आम्ही तर खूप आनंदात होतो. आम्हाला वाटलं होतं की रियाला पण छोटी बहुलीसारखी गोड बहीण प्रिय होईल, भावाचे वेड ती विसरेल.
पण तसं काही झालं नाही. रियाच्या बाल मनाला ते पटलं नाहीचं."
पण तसं काही झालं नाही. रियाच्या बाल मनाला ते पटलं नाहीचं."
रिया आणि अनयची आई थक्क होऊन ऐकत होत्या.
" आधीच चाईल्ड स्क्रीझोफ्रेनिया होता त्यामुळे तिच्या मनाला समाधान लाभावे, रियाची समजूत काढावी म्हणून, तिचा एक टेडी बेअर होता, त्यालाच आम्ही 'हा तुझा भाऊ आहे ' असे सांगितले.
वाटलं होतं की रिया हळूहळू समजेल.
पण तिथेच आम्ही चुकलो."
वाटलं होतं की रिया हळूहळू समजेल.
पण तिथेच आम्ही चुकलो."
ऐकता ऐकता रिया अस्वस्थ होत चालली होती. तिच्या डोळ्यांत वेगळेच वेडसर भाव दिसत होते.
आई तिच्याजवळ जाऊन बसली, तिचा हात हातात घेऊन त्या पुढे सांगू लागल्या.
" रियाच्या मनाचे खेळ सुरू झाले होते. रिया टेडी बिअरला आपला भाऊ मानायला लागली.
वय इतकं कोवळं होत की तिच्या मनावर सत्य सांगून एकदम आघात केला असता तर ती डिप्रेशन मध्ये जाण्याची भीती होती. तिला आम्ही इंडायरेक्टली हरप्रकारे समजावलं पण काहीच उपयोग झाला नाही.
स्क्रिझोफ्रेनिया वाढत चालला होता, टेडी तिचा जीव की प्राण बनला होता. तिचा भाऊ, तिचा सखा, तिचं सर्वकाही.
आम्ही तेव्हा एक छोट्या शहरात राहत होतो.
तिथे चांगला उपचार मिळने खूप कठीण होते.
म्हणून उपचारासाठी आम्ही मुंबईला आलो."

"मुंबईला गेल्यावर तिने हट्टच धरला होता की तिला बोटीत बसायचे आहे. आम्ही तर तिचं मन दुखवत नव्हतोच. बोटींग साठी तयार झालो. बोटीत बसल्यावर रिया खूप खुश झाली होती. ती तिच्या भावाला, म्हणजेच त्या टेडीला सुद्धा बोटीच्या एकदम काठावर ठेवून समुद्र दाखवत होती."
"मी रियाच्या बाजूला बसली होती आणि मीरा माझ्या मांडीवर बसली होती.
चुकून मीराचा हात रियाच्या टेडीला लागला आणि तो टेडी पण्यात बुडाला.
हे बघून रिया जोरात किंचाळली आणि बेशुद्ध झाली. तेव्हापासून तिला हेच वाटत होते की मीराने आपल्या भावाला मारले आहे.
या मानसिक चक्रव्यूहातुन तिची सुटका व्हावी म्हणून आज अनयची आम्ही मदत घेतली."

रियाची आई रडू लागली.
"खरेतर मी मीराची गुन्हेगार आहे.
सतत बहिणीच्या काळजीपोटी ती नमते घेत राहिली.
रियावर तिचं इतकं प्रेम आहे की ताईला बरे करणारचं हे ठरवत रियाचा तिरस्कार, रियाने तिला वेडं ठरवणं, खुनी म्हणणं, हे सगळं माझी मीरु सहन करीत राहिली, फक्त आणि फक्त तिच्या प्रिय ताईसाठी."

"आणि रिया, तू नेहमी तिला औषध दे म्हणायची ना, तिच्या बॅगमध्ये औषधं असायची ना, ती तुझ्यासाठी होती. तुझ्या नकळत तुझ्या जेवणात मिसळून तुला आम्ही द्यायचो.
एका आईपेक्षा जास्त काळजी आणि प्रेम तुझ्या बहिणीने तुझ्यावर केलं आहे, आता तरी भानावर ये, " हात जोडून रडत रडत आई रियाला म्हणत होती.
एका आईपेक्षा जास्त काळजी आणि प्रेम तुझ्या बहिणीने तुझ्यावर केलं आहे, आता तरी भानावर ये, " हात जोडून रडत रडत आई रियाला म्हणत होती.
हे सगळं ऐकता ऐकता रियाच्या मनावरचा ताण वाढत चालला होता, दोन्ही हातांनी तिने डोकं गच्च पकडून ठेवले होते, डोळ्यांतून अखंड अश्रू वाहत होते आणि ताण सहन न झाल्यामुळे पुन्हा एकदा तिची शुद्ध हरपली.
काही तासांनी ती शुद्धीवर आली तेच हॉस्पिटलमध्ये.
तिने डोळे उघडताच आई आणि मीरा तिच्या जवळ गेल्या. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली तर मीराने तिचा हात घट्ट पकडला.
तिने डोळे उघडताच आई आणि मीरा तिच्या जवळ गेल्या. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली तर मीराने तिचा हात घट्ट पकडला.
रियाची नजर सौम्य झाली होती. नेहमीप्रमाणे अग्रेशन नव्हे तर स्मित तिच्या चेहऱ्यावर आणि अश्रू डोळ्यांत होते.
"मीरु, तुझी माफी मागायची पण लायकी नाही माझी, तरी सॉरी, रिअली सॉरी....मी तुझी बहीण आहे हे तुझं दुर्दैव...," मीराला कवेत घेऊन रडू लागली.
तिचे अश्रू पुसत मीरा गाऊ लागली,
"फुलों का तारों का सबका कहना है
एक हजारेंमे मेरी बेहना है...."
एक हजारेंमे मेरी बेहना है...."
रिया तिला थांबवत म्हणाली,
"और मेरी बेहना हजारोंमे एक नही, तर...लाखात एक आहे....लाखात एक."
बहिणीच्या मायेची जादू पसरली होती आणि रिया मीराच्या साथीने पुन्हा मायेच्या भावविश्वात परतणार होती.
समाप्त।
© डॉ समृध्दी अनंत रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने