कोल्होबांची शाळा

एक होता ससा......

एक होता ससा
शाळेत जाऊन हसला
कोल्होबा होते मास्तर
त्यांनी मारला डस्टर

ससोबाने मारली उडी
गुटख्याची पडली पुडी
कोल्होबा फारच रागावले
छडी घेऊन मागे लागले

" गुटखा खातोस
तंबाखू खातोस ?
आईवडलांना घेऊन ये
पेनल्टीचे पैसे घेऊन ये "

शाळेतून नावं काढून टाकीन
परीक्षेत नापास करीन
खालच्या वर्गात बसवून ठेवीन
वर्गाबाहेर उभा करिन "

ससा मग घाबरला
आईवडील मारतील म्हणाला
शिक्षा थोडी कमी करा
पेनल्टी लावू नका

पुन्हा असं करणार नाही
गुटखा तंबाखू आणून देईन
मास्टर मग हळूच हसले
गुटखा खात खुर्चीवर बसले

" पुन्हा गुटखा घेऊन ये
माझ्या तोंडात कोंबून दे
पिंक टाकायला थुकदाणी दे
सगळं नीट समजून घे. "

ससोबाची मान खाली गेली
आई चुपचाप घेऊन गेली

अरुण कोर्डे
©®
9004808486

****************************†****************
पोपट
*****

एक होता पोपट
म्हातारीने पाळलेला
होता मोठा खवंचट
सारखा खाई तिखट

कधी कधी म्हातारी
त्याला ठेवी उपाशी
दिवसभर रागाने तो
तिला करी शिवीगाळी

एक दिवस एक पाहुणा
म्हातारीच्या घरी आला
म्हातारीने कौतुकाने
पोपट त्याला दाखवला

पोपटाशी बोलून बोलून
पाहुणा थकून गेला
विठू विठू बोलेना
शिट्टी काही मारीना

पाहुणा कंटाळून निघाला
म्हातारीचा निरोप घेतला
तेव्हा कुठे पोपट ओरडला
"ही म्हातारी मरत का नाही?"

म्हातारीला राग आला
तिने पिंजरा उघडून दिला
" चल, मेल्या मर बाहेर
कावळे गिधाडे खातील तुला "

तिच्या डोकीवर पोपट शिटला
शिटता शिटता ओरडला
"माझ्या मुळे माणसं आली
घराला घरपण देऊन गेली "

म्हणून म्हणतो मित्रानो
" गोड बोला, चांगल बोला
घराचं नंदनवन करा
गोकुळ करा नाहीतर?
एकटेच मरा "

अरुण कोर्डे
©®

सूचना
**********

वरील पैकी एक कविता बालकाव्य आहे. केवळ मनोरंजन म्हणून लिहिली. कृपया वसतावरण निर्मिती पाहावी. दुसरी कविता आयुष्यात गोड वागलात, लोकांना आवडेल असं वागकात तर दिवस चांगले जातील.
दुसऱ्याच महत्व ठेवलात तर दुसरे तुमचं महत्व ठेवतील. आणि जीवनक्रम सुखात जाईल. आपण साध्या गोष्टी विसरतो. आणि दुसऱ्यावर रागावून वातावरण बिघडवतो. लोकांच्या मनात तिरस्कार व द्वेष निर्माण करतो. द्वेष्यातून भांडण, पूर्वग्रह, ईर्षा निर्माण होते व कायमचे वितुष्ट निर्माण होते. जगणं सुश्या करण्यासाठी दुसऱ्याला ही जगायचं असतं हे लक्षात घ्यायला हवं. जग सर्वांसाठी आहे. माझ्या एकत्यासाठी नाही.

अरुण कोर्डे




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →