कोडिंग स्वप्नांचे
भाग १
भाग १
" अगं अमृता, आज साहेबांना जेवायला बोलावलंय मी... स्वयंपाकाचं काय ठरलंय ? आणि महत्त्वाचं म्हणजे, जरा आवरून घे, साहेबांच्या मिसेस खूप फॅशनेबल आहेत." हॉलमधून नितीनचा आरशासमोर उभे राहून टाय नीट करत असलेला आवाज आला.
अमृता किचनमध्ये कुकरच्या शिट्ट्यांच्या तालावर काम करत होती. तिने कपाळावरचा घाम पुसला आणि शांतपणे म्हणाली,
"सगळं होईल हो, तुम्ही काळजी नका करू. बेत साग्रसंगीत केलाय."
नितीन आरशात स्वतःला बघत हसून म्हणाला,
"हेच तर छान आहे तुझं. घर कसं अगदी टापटीप ठेवतेस. म्हणूनच मला ऑफिसच्या टेन्शनमध्येही घराची काळजी नसते. तुला माहितीये ?
माझ्या ऑफिसमधल्या बऱ्याच जणी नोकरी करतात, पण त्यांचं घर मात्र विस्कळीत असतं. तू घरी आहेस म्हणून आमचं सगळं कसं वेळेवर चालतं!"
माझ्या ऑफिसमधल्या बऱ्याच जणी नोकरी करतात, पण त्यांचं घर मात्र विस्कळीत असतं. तू घरी आहेस म्हणून आमचं सगळं कसं वेळेवर चालतं!"
नितीनने हे कौतुकाने म्हटलं होतं, पण अमृताच्या मनात कुठेतरी एक कळ उमटली. लग्नापूर्वी कॉम्प्युटर सायन्समध्ये गोल्ड मेडलिस्ट राहिलेली अमृता, जिच्या कोडिंगच्या वेगाची कॉलेजमध्ये चर्चा असायची, ती आज फक्त घर टापटीप ठेवण्यासाठी ओळखली जात होती.
लग्नानंतरच्या या १० वर्षांत तिचं जग स्वयंपाकघर, ९ वर्षांचा मुलगा अर्णवचा अभ्यास, त्याची शाळा आणि सासू-सासऱ्यांच्या औषधपाण्यातच सामावलं होतं.
तिने हळूच बाजूला सोफ्यावर असलेल्या नितीनच्या लॅपटॉपकडे पाहिलं. तो लॅपटॉप म्हणजे नितीनचा जीव होता. त्याच्या ऑफिसच्या कामासाठी तो त्याला चोवीस तास लागायचा, त्यामुळे अमृताला त्याला स्पर्श करण्याचीही मुभा नव्हती.
संध्याकाळी पाहुणे आले. जेवणं झाली, गप्पांचे फड रंगले. नितीनचे साहेब, जे एका मोठ्या आयटी कंपनीत मॅनेजर होते, ते त्यांच्या नवीन स्टार्टअपबद्दल बोलत होते.
" सध्या सगळं डिजिटल होतंय, पण आम्हाला आमच्या कंपनीसाठी एक चांगला युजर इंटरफेस (UI) डिझायनर मिळत नाहीये. जे आहेत ते खूप महाग आहेत किंवा त्यांना कामातली ती सफाई नाहीये."
अमृताने चहा देताना सहज विचारलं,
"सर, तुम्हाला नेमकी कोणती फ्रेमवर्क हवी आहे? 'रिॲक्ट' की साध्या 'बूस्ट्रॅप'वर डिझाइन हवंय ?"
हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली. साहेबांनी आश्चर्याने अमृताकडे पाहिलं.
" तुम्हाला यातलं कळतं?" त्यांनी विचारलं.
अमृता काही बोलण्यापूर्वीच नितीन उपरोधिकपणे हसून म्हणाला,
"अहो सर, तिने १० वर्षांपूर्वी हे सगळं केलंय. आता टेक्नॉलॉजी कुठेच्या कुठे गेलीय ! तिला तर आता साधा पासवर्ड रिसेट करायलाही माझी मदत लागते. आता ती आमचं घर डिझाइन करण्यात एक्स्पर्ट आहे. लग्नानंतर या तांत्रिक गोष्टींचा काय उपयोग ?"
सगळे हसले, पण अमृताला ते हसू काळजात टोचलं. तिला पेपरमध्ये वाचलेल्या त्या ओळी आठवल्या,
"महत्वाकांक्षा तुमच्या रक्तामध्ये असावी लागते. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय साध्य करायचं आहे, हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुमचा आहे."
पाहुणे गेल्यावर अमृताने धाडस करून नितीनला विचारलं,
"नितीन, मला वेब डिझायनिंगचं फ्रीलान्सिंग सुरू करायचं आहे. मी घरची सगळी जबाबदारी सांभाळून हे करेन. मला माझं ज्ञान वाया घालवायचं नाहीये."
नितीन जोरात हसून म्हणाला,
" फ्रीलान्सिंग ? अगं अमृता, तुला घर सांभाळता सांभाळता स्वतःच्या केसांच टोपल नीट करायला वेळ मिळत नाही, तू काय काम करणार ?
आणि तुला माहितीये का, या १० वर्षांत तंत्रज्ञान किती बदललंय ? तुला साधं नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येणार नाही. उगीच मुलाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असे उपदव्याप नकोत."
अमृता हिरमुसून गेली. तिच्याकडे स्वतःचा लॅपटॉप नव्हता. दुसरीकडे नितीनने तर तिची खिल्ली उडवून तिला बाद केलं होतं. नितीनला वाटलं आपण 'जिंकलो', पण त्याला माहीत नव्हतं अमृताच्या मनात एक वेगळीच जिद्द आकार घेत होती.
चार महिन्यांनंतर, नितीनला ऑफिसकडून बोनस मिळाला आणि त्याने नवीन हाय-एंड लॅपटॉप घेण्याचं ठरवलं.
"हा जुना लॅपटॉप आता विकून टाकू, थोडे पैसे येतील," तो म्हणाला.
"हा जुना लॅपटॉप आता विकून टाकू, थोडे पैसे येतील," तो म्हणाला.
अमृताने संधी साधली. ती शांतपणे म्हणाली,
"नितीन, हा जुना लॅपटॉप विकू नका. अर्णव आता पाचवीत जाईल, त्याला स्कूल प्रोजेक्ट्स आणि अभ्यासासाठी कॉम्प्युटरची गरज लागेल. बाहेर सायबर कॅफेत पाठवण्यापेक्षा हे बरं पडेल ना ?"
नितीनला हे कारण पटलं. त्याने नवा लॅपटॉप विकत घेतला. त्याचा जुना अर्णवच्या अभ्यासाच्या टेबलावर विसावला. अमृतासाठी तो केवळ एक जुना लॅपटॉप नव्हता, तर तिच्या स्वप्नांच उड्डाण घेण्यासाठी मिळालेलं एक विमान होतं.
आता अमृताचं वेळापत्रक बदललं होतं. सकाळी लवकर उठून ती घरची सगळी कामं, अर्णवचा डबा आणि सासू-सासऱ्यांचं पथ्यपाणी आवरून घ्यायची. दुपारी अर्णव शाळेत गेल्यावर आणि सासू-सासरे विश्रांती घेत असताना, ती तो जुना लॅपटॉप घेऊन बसायची.
इंटरनेटवर 'युट्यूब' आणि 'फ्री कोर्सेस'च्या माध्यमातून तिने नवीन टेक्नॉलॉजी— 'फिगमा' (Figma), 'नेक्स्ट जेएस' (Next.js), शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला तिला काहीच कळत नव्हतं, पण तिने हार मानली नाही.
तिने स्वतःला 'अपडेट' केलं. रात्री जेव्हा घर शांत व्हायचं, तेव्हा ती जागून कोडिंगचे प्रॉब्लेम्स सोडवायची.
तिने स्वतःला 'अपडेट' केलं. रात्री जेव्हा घर शांत व्हायचं, तेव्हा ती जागून कोडिंगचे प्रॉब्लेम्स सोडवायची.
तिला सिद्ध करायचं होतं की, गृहिणीची महत्त्वाची महत्त्वाकांक्षा ही केवळ घरा पुरती मर्यादित नसते. पुढच्या काही महिन्यांत तिच्या या छुप्या तपश्चर्येचं फळ तिला मिळणार होतं, ज्याची कल्पना नितीनला स्वप्नातही नव्हती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा