Login

प्रामाणिकपणाची किंमत - भाग -1

Kimat
प्रामाणिकपणाची किंमत - भाग -1


       आई तू एवढी साधी कां आहेस गं, प्रत्येक ठिकाणी तुला लोक फसवतात, तरीही तू स्वतःला बदलत नाही आहेस, रुपाली तिच्या आईला कावेरीला रागाने बोलतं होती.


    समोर बसलेल्या कावेरीताई फक्त हसल्या आणि रूपालीच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाल्या, बाळा माणसाने परिस्थितीनुसार स्वतःला बदलावं, पण स्वतःचे संस्कार विसरू नयेत.


   आईचं हे बोलणं रुपालीला अजिबात पटलं नव्हतं, कारण लहानपणापासून तिने आईला फक्त संघर्ष करतांनाचा बघितलं होतं, कुणी तिच्या कामाचं श्रेय घेतलं, तर्  ,कुणी तिच्या विश्वासाचं गैरफायदा घेतला, पण प्रत्येकवेळी कावेरीताई शांत राहिल्या.


     रुपालीचे बाबा प्रायव्हेट ऑफिसमध्ये नोकरीत होते, रुपाली दहा वर्षांची असताना त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं, त्यामुळे घरात कावेरीताई, रुपाली आणि तिची आजी होती, घरात ह्या तिघीचं उरल्या, घरं चालवण्यासाठी कावेरीताईनी एका कंपनीत नोकरी स्विकारली.


   
      कंपनीत कोणाला अडचण आली तर् कावेरीताई लगेचंच मदत करत असतं, त्यांच्या कंपनीतली एक बाई मालती कायम रडून ताई, मला ही अडचण आली, मुलीची शाळेत फि भरायची आहे, सासूबाई आजारी आहेत, असं बोलून त्यांच्याकडून पैसे उकळत असे, कावेरीताईनां कोणाचं दुःख पाहवत नसे, म्हणूनं त्या कोणाला पण पटकन मदत करत असतं.


   असेचं एकदा त्या मालतीताईनी कावेरीताईकडून दहा हजार घेतले होते,आणि आणि एक महिन्याने परत करते असं बोलल्या होत्या, पण एक महिना संपला, दुसरा महिना संपला, सहा महिने उलटले.


     शेवटी कावेरीताईनी पैसे मागितले तर् मालतीबाई पलटली आणि म्हणू लागली...मी कधी तुमच्याकडून पैसे घेतले, तिने कावेरीताईनाचं खोटं ठरवलं.


त्यादिवशी कावेरीताई खूप रडल्या, त्यांना पैसे गेल्याचं दुःख पण होतंच , पण विश्वास हरवल्याचं पण जास्त दुःख होतं.


    रुपालीला खूप राग आला होता, ती म्हणू लागली, आई त्या मालतीविरोधात पोलिसांतं तक्रार कर, त्यांना धडा शिकवं.


कावेरीताई म्हणू लागल्या, बाळा काही गोष्टी न्यायालयात जिंकता येतात, पण माणुसकी हरवून नाही, मी तक्रार केली तर कंपनीत पोलीस येणार, त्या मालतीला सर्वांसमोर ओरडणार, सगळे तिला नावं ठेवणार, त्यापेक्षा राहुदेत.


    पण आई तू हरलीस नां, रुपाली रागाने म्हणाली.


त्यावरं कावेरीताई म्हणू लागल्या, नाही मी हरले नाही, मी फक्त पैसे गमावले आहेत, असूदेत आपण समोरच्याप्रमाणे चुकीचं वागायचं नाही.


      काळ पुढे सरकत होता, रुपालीने इंजिनिअरिंग पूर्ण केलं, ती एका मोठया कंपनीत नोकरीला लागली, तिला जगाचा अनुभव येऊ लागला.


    ( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - रुपालीच्या बाबतीत असं काय घडतं कीं ज्याने तिला हे पटतं, कीं वाईट मार्गाने किंवा लबाडी करून कोणीही आयुष्यात पुढे जाऊ शकतं नाही.)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →