सुनेची किंमत - भाग -1
सुनबाई उदया माझ्या माहेरची माणसं येणार आहेत, इंदूरची माझी चुलत बहीण आणि तिचे मिस्टर आपल्याकडे दोन दिवसांसाठी येणार आहेत, त्यामुळे सगळं घरं आजच्या आज झाडून पुसून लक्ख करून ठेवं, ताई फार स्वच्छतेची आहे हो, सगळं जागच्या जागी ठेवं, मला घरात अजिबात पसारा दिसला नाही पाहिजे, श्यामलताई आपल्या सुनेला स्वराला सांगत होत्या.
हो आई, घेते मी सगळं आवरून स्वरा म्हणाली.
स्वरा साफ, सफाई करताना श्यामलताई सतत ओरडत होत्या, हे साफ कर, हे पुसून घे, हे फॅन, ट्यूबलाईट पण पुसून घे, खिडकीच्या काचा पण पुसून घे, अशा सतत ऑर्डर सोडत होत्या.
स्वराने सगळं पुसून झाडून घेतलं आणि जरा सोफ्यावर बसली तोपर्यंत सासूबाई पुन्हा बोलल्या, एवढ्यात दमलीस कांयं, लगेंचंच बसली आराम करायला..
स्वरा पण नाराजीने म्हणाली, आई अहो मे महिना आहे, खूप गरम होतंय, त्यामुळे गर्मीत काम करून थकायला झालं मला आणि झालं आहे सगळं, जरा बसली तर् पुन्हा तुम्ही सुरवात केलीत कां..
सासूबाई चिडून बोलल्या, उलटं कधीपासून बोलायला लागलीस, जरासं कामं केलं तर् लगेंचंच दमली, माझ्या माहेरची माणसं येणार आहेत ना म्हणून दमलीस होय, उठ आणि उद्याची अर्धी तयारी करून ठेवं, नारळ फोडून देते, तो किसून ठेवं, गवार मोडून ठेवं, जास्तीचं वाटप करून ठेवं, आंबे आहेत तर् आमरस पण करून ठेवं.
तेवढ्यात स्वराचा नवरा वरद घरी आला तर् सासूबाई लगेंचंच त्याला सांगू लागल्या, अरे उदया तुझी इंदूरची मावशी येणार आहे म्हणून हिला चार कामं सांगितली तर् दमली लगेंचंच, आणि मी बोलायला गेली तर् उलटं बोलतेय मला.
वरद पण स्वराचं काही ऐकून घेण्याआधीच बोलू लागला, जरा एक दिवस जास्तीचं कामं पडलं तर् त्रास होतो कांय तुला, लग्नाला दोन वर्ष होतं आली आपल्या जरा सुधर, नीट वाग आईशी.
अहो पण माझं ऐका तरी, स्वरा रडतं बोलली, पण वरद नं ऐकता सरळ बेडरूममध्ये निघून गेला.
स्वरा मनात म्हणू लागली, हे कधीच माझी बाजू घेत नाहीत, ह्यांना कायम सासूबाईचं बरोबर असणार असं वाटतं, मी पण दमते असं बोलायला गेलं की सासूबाई लगेचं बोलणार आम्ही जवान असताना एवढी कामं केली, एवढ्या माणसाचं जेवण केलं, हे केलं ते केलं असं बोलतं राहणार, सतत टोमणे मारत राहणार.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सासूबाईची बहीण आल्यावर त्या तिला सुनेबद्दल अजून कशा सगळं चढवून सांगतात आणि मग शेवटी सासूबाईना स्वतःची चुक कशी कळते.)
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
