किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
साळुंके सोमनाथ आणि सानप पोलिस कॉनस्टेबल
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
लीयान्का विल्सनची बायको.
अंतोन विल्सनचा माणूस.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय राव विनयचे वडील.
सुभद्राबाई विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
सूरी दिल्लीचे पोलिस इंस्पेक्टर
आसिफ मास्टर माइंड
दयानिधी /कुमार आसिफचा माणूस.
पूर्ववृत्त
दयानिधीचा शोध घेण्या साठी वेळेकर दिल्लीला गेले. दयानिधीचा पत्ता लागला आता त्याची चौकशी पण झाली. धनशेखर कावेरीच्या आईवडिलांना कावेरीची बातमी सांगायला त्यांच्या घरी गेले. मंगेश आणि विभा भावनगरला पोचले. वेळेकर सुद्धा भावनगरच्या वाटेवर. आता वाचा पुढे.
भाग ८७ ( अंतिम भाग.)
भाग ८६ वरुन पुढे वाचा......
विभा, मंगेश आणि निशांतची भावनगरला मीटिंग भरली होती.
“हां निशांत बोल आता, तुझ्या सांगण्या प्रमाणे आम्ही तातडीने इथ आलो आहोत. तू इथे काय करतो आहेस?” – मंगेश.
“मी कावेरीच्या शोधात इथे आलो आहे.” – निशांत.
“काय? भावनगरला सापडली का कावेरी? कुठे आहे?” – विभा.
“५० % सापडली.” – निशांत.
“हे काय उत्तर आहे? नीट सांग. ५०% म्हणजे काय? तिचा अॅक्सिडेंट झाला आहे का? कोड्यात बोलू नकोस. सरळ काय ते सांग.” मंगेश आता पॅनिक झाला होता.
“ती एकदम धड धाकट आणि सुखरूप आहे. अडचण वेगळीच आहे. ती तिची स्मृति पूर्ण पणे गमावून बसली आहे.” – निशांत.
“अरे बापरे, हे कसं झालं? आणि तरी तुला तिचा पत्ता लागला? जरा आम्हाला कळेल, असं सविस्तर सांग.” – मंगेश.
निशांत याच प्रश्नांची वाट पहात होता. त्याने लगेच कावेरीची स्टोरी सांगायला सुरवात केली. सगळं सांगून झाल्यावर निशांत थांबला. मंगेश आणि विभा हा सर्व प्रकार ऐकून सुन्न झाले होते.
“बापरे इतकं सारं घडलं? तिच्या आईवडीलांना कळवलं आहे का?” – विभा.
“हो. ते सगळेच भावनगरच्या वाटेवर आहेत. धनशेखर साहेबांनी त्यांना पूर्ण कल्पना दिली आहे. माझा असा अंदाज आहे, की बहुधा ते लोकं विनय साठी कावेरीला मागणी घालतील. आणि हाही अंदाज आहे की कावेरी होकार देईल.” – निशांत.
“कावेरी आहेच तशी. पटकन कोणाच्याही मनात जागा निर्माण करेल.” – मंगेश.
मंगेशचं बोलणं ऐकून निशांत आणि विभाला पण एकदम सुटल्यासारखं झालं.
वातावरणात एकदम मोकळेपणा आला. मंगेशच्या दृष्टीने कावेरीचा चॅप्टर संपला होता, यावर शिक्का मोर्तब झालं. विभावरीने आपलं सर्व कसब पणाला लावलं होतं, त्याचं फळ मिळालं.
तासाभराने धनशेखर, आणि सर्व मंडळी पण येऊन पोचली. निशांतने सर्वांसाठी रूम बूक केल्याच होत्या. मग सर्व एकत्र जेवायला गेले. तिथे पण बरीच चर्चा झाली. फायदा एकच झाला की आता कोणीच टेंशन मधे नव्हतं. सकाळी सकाळी वेळेकर सुद्धा येऊन पोचले. भरूचा साहेबांचा निशांत ला फोन आला. सर्वांना साधारण अकरा वाजता विनय कडे जायचं आहे म्हणून सांगितल. त्या प्रमाणे सर्व विनय कडे पोचले.
****
धनशेखर आणि भरूचा साहेबांच रुपचंद बद्दल आधीच बोलणं झालं होतं.
“तुम्ही रुपचंदचे जे लोकेशन मला पाठवलं, ते वरतेज गावाचं आहे. इथून साधारण २०-२५ किलोमीटर वर आहे. तसा तो भाग भावनगर मध्येच मोडतो, पण अजून ग्राम पंचायत आहे.” – भरूचा.
“मला असं वाटतं की आधी साध्या ड्रेस मधले दोघं जण पाठवावेत, म्हणजे रुपचंदला संशय येणार नाही. छोटसं गाव असल्याने, पोलिस त्याची चौकशी करताहेत ही बातमी त्याच्या पर्यन्त पोचायला वेळ लागणार नाही.” - वेळेकर.
“तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे. तुमच्या जवळ साध्या वेषातला निशांत नावाचा सर्वोत्कृष्ट पोलिस आहेच की. त्यालाच बोलावून घ्या. नाही तरी आता विनय च्या घरी फॅमिली मॅटर चाललं असणार आहे. लग्ना साठी पुढच्या गोष्टी पक्क करणं चालल्या असतील. निशांतचं काय काम तिथे? तो आणि सरोश यांच्या पेक्षा उत्कृष्ट जोडी कुठे मिळणार आपल्याला?” – भरूचा.
धनशेखर हसले. म्हणाले,
“१०० टक्के खरं आहे. या माणसाचं लॉजिक अफलातून आहे. हा माणूस पोलिस खात्यात असायला हवा होता, असं मला नेहमीच वाटत आलं आहे.” – धनशेखर.
धनशेखर साहेबांनी निशांतला फोन करून पोलिस स्टेशनला बोलावून घेतलं.
“ये निशांत, तुला आम्ही मुद्दाम बोलावून घेतलं.” – धनशेखर.
“रुपचंदला शोधायचं आहे?” – निशांत.
“हो पण तुला असं का वाटलं?” – धनशेखर.
“मी बराच विचार करत होतो. सर्व मोठी शहरं सोडून रुपचंद कावेरीला घेऊन भावनगरलाच का आला? शेवटी मी तर्क केला की नक्कीच भावनगर मधे कोणी कस्टमर असेल, किंवा त्याचं घर असेल. कस्टमर जर भावनगरचा असेल, तर तो भावनगर सारख्या छोट्या शहरात व्यवहार करणार नाही. सेफ जागा म्हणजे मुंबई किंवा दिल्ली. मग तो इथे आला म्हणजे त्याला खरंच कावेरीशी लग्न करून घरी न्यायचं असेल. शेवटी विचारांती हाच विचार मला पटला.” – निशांत.
‘मग आता काय करायचं ठरवलं आहे तू? रुपचंदला कसं शोधणार आहेस?” – भरूचा.
“वेळेकर साहेब, मला असं वाटतं की विल्सनला नक्की त्याचा पत्ता माहीत असावा, कारण ते परस्परांच्या खूप जवळचे आहेत. त्याशिवाय काही रुपचंद विल्सनच्या घरी गोव्याला आठ दिवस मुक्काम ठोकून राहिला नसता” – निशांत.
“हा काय! शिंदे साहेबांनी त्याचा पत्ता विल्सन कडून कालच घेतला आहे.” – वेळेकर.
निशांत आणि सरोश वेळेकरांनी दिलेल्या पत्त्यावर वरतेजला पोचले.
“निशांत सर, हा तर जुन्या गावाचा भाग दिसतो आहे. इथे घराला घर लागून आहे. इथे नेमकी लोकेशन कशी शोधणार आपण?” – सरोश.
“खरं आहे, आणि इथे सगळी घरच आहेत, एकही दुकान किंवा चहाची टपरी पण नाहीये. कठीणच दिसतं आहे.” – निशांत.
थोडं समोर गेल्यावर एक छोटीशी बाजार पेठ दिसली.
“इथे विचारायचं का? फोटो दाखवला तर कोणी तरी नक्कीच सांगेल.” – सरोश.
“नको, आपण विचारपूस करत असतांना, रुपचंद पर्यन्त, जर कोणी तरी चौकशी करत आहे ही बातमी पोचली, तर तो अंडरग्राऊंड होईल. आपण वाट पाहू.” – निशांत.
बराच वेळ तसाच गेला, रुपचंद काही दिसला नाही. मग सरोशला एकदम काही आठवलं.
“सर, आपण पोस्टात जाऊ. तिथे आपल्याला नक्की कळेल.” – सरोश.
निशांतला ती आयडिया पटली.
“सरोश आधी आपल्याला इथल्या पोलिसांची मदत घ्यावी लागेल. पोस्टातले लोकं आपल्याला मदत करतील असं वाटत नाही.” – निशांत.
“सर आपण फक्त पत्ता विचारणार, त्यात काय प्रॉब्लेम आहे?” – सरोश.
“आपण फक्त पत्ता नाही विचारणार. चल आपण पोलिस स्टेशन मधे. जाऊ.” – निशांत.
निशांतने मग भरूचा साहेबांना फोन करून त्याची आयडिया सांगितली. त्यांना पण ती आवडली. त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकल पोलिसांना कॉनटॅक्ट करा, मी फोन करतो. तुम्हाला सर्व मदत मिळेल..” – भरूचा.
मग तिथल्या पोलीसा बरोबर, निशांत आणि सरोश पोस्टात पोचले. सब पोस्ट मास्टरला प्रसंगाचं गांभीर्य समजाऊन सांगितलं आणि मदत करण्याची विनंती केली. म्हणाला,
“साहेब, हे राष्ट्र कार्य आहे. नाही म्हणू नका.” – निशांत.
राष्ट्र कार्य म्हणताच पोस्ट मास्टरचा चेहरा आनंदाने फुलून गेला. तिथे असलेल्या दोघा पोस्टमनचे खाकी शर्ट निशांत आणि सरोश दोघांनी अंगावर चढवले. मग खरा पोस्टमन आणि त्यांच्या बरोबर हे दोघे खोटे पोस्टमन रुपचंदच्या घरी निघाले. त्यांच्या थोडा मागे पोलिस येत होता.
दार ठोठावल्यावर एका तरुण मुलीने दार उघडलं.
“रुपचंद राठोड, त्यांच्या नावे रजिस्टर्ड पार्सल आहे.” – पोस्टमनने सांगितले.
“ठीक आहे. द्या.” – मुलगी.
“स्वाती, कोण आहे?” पाठीमागून एका वयस्कर स्त्रीचा आवाज आला.
“माँजी पोस्टमन आहे. रुपचंदजी चं पार्सल पार्सल आहे.” – मुलगी.
“घे मग.” – रुपचंद ची आई.
“डिलीव्हरी फक्त रुपचंद राठोड यांनाच द्यायची अश्या सूचना आहेत. त्यांना बोलवा. ID प्रूफ पण आणायला सांगा.” – पोस्टमन
आता पर्यन्त रुपचंद ची आई बाहेर आली होती. ती म्हणाली,
“मी आई आहे त्याची. मला तुम्ही देऊ शकता.” – आई.
“नाही. आम्हाला सुचनेचं पालन करावं लागतं. नोकरी आहे.” – पोस्टमन
“स्वाती जा रूपला बोलाव.” – आई.
रुपचंदला स्वातीने बोलावून आणलं.
“मी रुपचंद, मी काहीच मागवलं नव्हतं मग हे कसं आलं?” – रुपचंद.
निशांत त्यांच्याकडे बघत होता आणि मोबईलवरचा फोटो ताडून बघत होता. खात्री झाल्यावर त्याने वेळेकरांना मेसेज केला, आणि पोलिस पार्टी पाठवायची विनंती केली.
“आम्हाला कसं कळणार? तुमच्या नावाचं पार्सल आहे, ID दाखवा आणि पार्सल ताब्यात घ्या.” - पोस्टमन.
“रुपचंद गोंधळात पडला.
“कुठून आलं आहे? कोणी पाठवलं आहे?” – रुपचंद.
पोस्टमनने त्यांच्या बॅग मधे पाहिल्या सारखं केलं आणि म्हणाला,
“दिल्ली वरुन आलं आहे. कोणी आसिफ नावाच्या माणसाने पाठवलं आहे.” – पोस्टमन
आसिफचं नाव कानावर पडताच रुपचंदचा चेहरा बदलला. निशांत बघतच होता.
“हे घ्या ID प्रूफ. द्या पार्सल.” – रुपचंद.
स्वाती कडे बघून निशांतने विचारलं,
“या तुमच्या पत्नी का? यांची पण सही लागेल. मॅम, ID प्रूफ द्या.” – निशांत.
“ही माझी बायको नाहीये, पण तुम्ही कोण?” – रुपचंद.
“साहेब, पार्सल रुपचंद राठोड आणि कावेरी राठोड यांच्या नावाचं आहे. या जर कावेरी मॅडम नाही, तर मग कावेरी मॅडमला बोलवा.” – निशांत.
“कोण कावेरी? मी ओळखत नाही, आणि तुम्ही कोण? हे फालतू प्रश्न का विचारता आहात?” – रुपचंद.
कावेरीचं नाव ऐकल्यावर रुपचंद ची जीभ प्रथम अडखळली पण मग तो सावरला.
“मला पार्सल नको आहे. तुम्ही कोण आहात, या चौकश्या का करता आहात? निघा तुम्ही.” – रुपचंद.
सरोशने खिशातून आपलं ID कार्ड काढलं,
“मी सरोश. मुंबई पोलिस. हे माझं ID कार्ड. कावेरी कुठे आहे?” – सरोश.
हे ऐकल्यावर, रुपचंदने सरोशला ढकललं आणि बाहेर पळायला लागला. पण दरवाजात वरतेज चे दोन पोलिस उभे होते. त्यांना भरूचा साहेबांनी फोन करून ताबडतोब मदतीला जायला सांगितलं होतं. त्यांनी रुपचंदला धरलं. आणि क्षणाचाही विलंब न करता, बाहेर उभ्या असलेल्या जीप मधे कोंबलं. सर्व वरात वरतेज पोलिस स्टेशनला.
धनशेखर साहेबांनी भावनगरला व्हॅन मागवून घेतली आणि वेळेकर रुपचंदला घेऊन अंधेरी पोलिस स्टेशन च्या वाटेवर.
विल्सन, रुपचंद आणि अंतोन यांच्या चार्ज शीट बनवण्याचं काम सुरू झालं. दयानिधी उर्फ कुमारचा उल्लेखही पोलिसांनी केला नाही. विल्सन, अंसारी आणि सुलेमान यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यांवर जामीन मिळाला. त्यांचे पासपोर्ट त्यांना कोर्टात जमा करावे लागले. आता केस जेंव्हा सुनावणीला येईल, तेंव्हा सर्वांचाच कस लागणार होता.
कावेरीने कोणालाच ओळखलं नाही. सर्वांनीच खूप प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. वातावरण निवळल्यावर मग गप्पा टप्पा सुरू झाल्या. आणि धनंजय रावांनी लग्नाचा विषय काढला. त्यावर मग चर्चा सुरू झाली.
***समाप्त.****

Disclaimer
ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे आणि यातील सर्व व्यक्तिरेखा आणि प्रसंग काल्पनिकच आहेत. यांचा कोणत्याही जीवंत अथवा मृत व्यक्तीशी अथवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर कोणाला काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
दिलीप भिडे

मनोगत -: विनय साहेबांच्या घरी काय चर्चा झाली? कावेरीच्या आई वडिलांनी होकार दिला का? मंगेश आणि विभाचं लग्न झालं का? की कावेरी त्रिकोणाचा एक बिंदु म्हणून त्यांच्या मधे आली? केस सुनावणीला आल्यावर कसे साक्षी पुरावे झाले, उलट तपासणी कशी झाली? काय काय फटाके फुटले, केस कशी हेलकावे घेत होती, हे सगळं वाचकहो तुम्हाला पुढच्या पर्वात वाचायला मिळेल. आशा करतो की हे पर्व तुम्हाला आवडलं असेल. तुमच्या परखड अभिप्रायांची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.
आपला दिलीप भिडे.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने