किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
साळुंके सोमनाथ आणि सानप पोलिस कॉनस्टेबल
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
लीयान्का विल्सनची बायको.
अंतोन विल्सनचा माणूस.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय राव विनयचे वडील.
सुभद्राबाई विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
सूरी दिल्लीचे पोलिस इंस्पेक्टर
आसिफ मास्टर माइंड
दयानिधी /कुमार आसिफचा माणूस.
पूर्ववृत्त
अंतोनला जेरबंद करून अंधेरी पोलिस स्टेशन ला घेऊन गेले. अंतोन आणि विल्सन दोघांनाही समोरासमोर उभ केलं. त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. दयानिधीचा शोध घेण्या साठी वेळेकर दिल्लीला गेले. दयानिधीचा पत्ता लागला आता वाचा पुढे.
भाग ८५
भाग ८४ वरुन पुढे वाचा......
“म्हणूनच कुमार साहेबांना बोलवा.” – सूरी.
तिने कुमारला आवाज दिला. कुमार हॉल मधे आला. वेळेकर आणि सूरी हातातल्या मोबाइल वर स्केच बघत होते. दोघांचीही खात्री झाली की 100 टक्के दयानिधी हाच कुमार म्हणून. कुमार हॉल मधे आला.
“माझं व्यालेट माझ्या जवळच आहे. तुम्हाला कोणी तरी मिसलीड केलं आहे. कोणी सांगितलं तुम्हाला?” – कुमार.
“रुपचंदने.” – वेळेकर.
कुमारच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्याला कल्पनाच नव्हती की असं काही अंगावर येईल म्हणून. तेवढी चेहऱ्यावरची फेरफार वेळेकरांना पुरेशी होती. त्यांनी सुरीकडे बघितलं. त्यांनी नजरेनेच ओके केलं.
“कोण रुपचंद? मी ओळखत नाही. त्याला काय माहीत माझं पाकीट हरवलं आहे म्हणून?” – कुमार.
“ते आम्ही कसं सांगणार? तुम्ही रुपचंदला फोन लावा आणि विचारा.” – वेळेकर.
“काही तरी गडबड आहे. तुम्हाला काय हवं आहे?” – कुमार.
“रुपचंद आणि तुमच्या मधे काय डील झाली?” – वेळेकर.
“हा कोण रुपचंद आहे. ज्याला मी ओळखतच नाही त्याच्याशी मी डील कशाला करू? साहेब तुमचा गैरसमज झाला आहे.” – कुमार.
“तुमचा व्यवसाय काय? कोणाशी तुम्ही व्यवहार करता?” – वेळेकर.
“मी बिल्डर आहे. इमारती बांधण्याचं कॉंट्रॅक्ट घेतो.” – कुमार.
“आत्ता कोणाचं काम चालू आहे?” – वेळेकर.
“काय कारण आहे? माझ्या कामाची चौकशी तुम्ही का करता आहात? ते आधी सांगा मगच मी बोलेन.” – कुमार.
“पोलिस जेंव्हा समोर असतात, तेंव्हा प्रश्न विचारण्याचा फक्त त्यांचा अधिकार असतो. तुम्ही प्रश्न विचारू नका. उत्तर द्या. नसेल द्यायचं तर नकार द्या. आम्ही तशी नोंद करू.” – सूरी.
“सध्या कोणा कोणाची काम चालली आहेत?” – वेळेकर.
“सॉरी. मी सांगणार नाही.” – कुमार.
“तुमच्या कामाची लिस्ट तर आम्हाला मिळून जाईल. रुपचंदला तुम्ही कशासाठी भेटला होता?- वेळेकर.
“पुन्हा रुपचंद. मी या माणसाला ओळखत नाही.” – कुमार.
“दयानिधी कोण आहे?” – वेळेकर.
“मी ज्यांना ओळखतच नाही त्यांच्या बद्दल तुम्ही मला प्रश्न का विचारता आहात? मी तुमची वर तक्रार करेन.” – कुमारच्या चेहऱ्यावरच्या छटा आता गडद व्हायला लागल्या होत्या.
“आसिफ कोण आहे? तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे?” – वेळेकर.
कुमार गप्प बसला.
“आमच्या जवळ तुमचे आणि आसिफचे फोन रेकॉर्डस आहेत. तुम्ही प्रत्येक वेळेस फोन आणि सीम तोडलं पण आमच्या जवळ त्यांचे पण रेकॉर्डस आहेत. आता तुझ्याजवळ सांगण्या सारख काय आहे?”- वेळेकर.
तुम्ही खोटं बोलता आहात. आसिफचे रेकॉर्डस तुमच्या जवळ असणं शक्यच नाही.” – कुमार असं बोलला आणि अडकला. वेळेकर आणि सूरी हसले.
“Mr. कुमार, तुम्ही आसिफला ओळखत नाही का?” – वेळेकर.
“नाही मी ओळखत नाही.” -कुमार.
“मग त्यांचे कॉल रेकॉर्डस आमच्या जवळ असणं शक्यच नाही असं का म्हणालात? का चुकीचं उत्तर दिलं तुम्ही.’ – वेळेकर.
“हो, म्हणजे नाही, मी आसिफला ओळखतच नाही तर त्याच्या बद्दल मी काय सांगणार? माझा गोंधळ उडाला होता, म्हणून असं बोललो.” - कुमार.
“पण आसिफला तसं वाटत नाही. त्यानेच आम्हाला तुमच्या घराचा पत्ता दिला, म्हणून तर आम्ही पार मुंबईवरुन इथे येऊ शकलो.” – वेळेकर.
“हे केवळ अशक्य आहे. तुम्ही खोटं बोलत आहात. आसिफ जर देशातच नाहीये, तर तो तुम्हाला काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही.” – कुमार.
“तुमचा विश्वास बसत नसला तरी हेच सत्य आहे.” – वेळेकर.
“म्हणजे तुमचं म्हणण आहे की तुम्ही त्याला मुंबई एयरपोर्ट वर पकडलं?” – कुमार.
“हो.” – वेळेकर जास्त डीटेल द्यायच्या अजिबात मूड मधे नव्हते.
“मग तर तुम्ही नक्कीच खोटं बोलत आहात. मी स्वत: त्याला दिल्ली एयरपोर्ट वर सोडून आलो आहे.” कुमार बोलला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच्या हातून प्रचंड घोडचूक झाली आहे. पण शब्द तोंडातून निघून गेले होते. तो स्वत:वरच चिडला.
“तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आसिफ पण तेच म्हणाला. आमचा त्याच्यावर विश्वास बसला नव्हता, पण आता तुम्ही पण पुष्टी करता आहात यांचा अर्थ तो सत्यच सांगत होता.” – वेळेकर.
“काय सांगितलं त्याने तुम्हाला?” कुमार आता एक एक पायरी खाली उतरत होता.
“त्याने सांगितलं की तुम्हाला कळू नये म्हणून तो दिल्ली एयरपोर्ट वर गेला, पण तिथून त्याने मुंबईची फ्लाइट पकडली. आणि तिथेच आम्ही त्याला घेरलं.” – वेळेकर.
कुमार आता चांगलाच गोंधळला होता. त्यांची बुद्धी काम करेनाशी झाली. तो ट्रॅप मधे अडकत चालला होता.
“म्हणजे तो दुबईला गेलाच नाही?” – कुमार. अजून एकदा कुमारने माती खाल्ली.
“कसा जाईल? तो आता आमचा पाहुणचार घेत आहे. त्याने बऱ्याच गोष्टींची कबुली दिली आहे. पण तो म्हणतो की हे सगळं त्याने तुझ्या सांगण्यावरून केलं. तो फक्त कार्यकर्ता होता. डायरेक्शन तुमचंच आहे. यू आर द बॉस, म्हणजे असं तो म्हणाला.” वेळेकर आता गिरमिट चालवायलाच बसले. त्यांना कुमारला टोटल कन्फ्युजन मधे टाकायचं होतं. आणि त्यात ते यशस्वी होत होते.
“नाही साहेब हे खोटं आहे. पण मुळात आसिफ तुमच्या ताब्यात आहे हेच मला मान्य नाही.” – कुमार.
“कुमार साहेब, आधी आसिफला ओळखत नाही असं म्हणालात, आणि आता आसिफ बद्दल आम्ही काही सांगतो आहोत, तर तुमचा विश्वास नाही असं म्हणता. हे बघा कुमार साहेब, तुम्ही उलटी सुलटी विधानं करता आहात. इथे तुमच्या घरी आम्ही सर्व मर्यादा सांभाळून सभ्य माणसा सारखे प्रश्न विचारतो आहोत. पोलिस स्टेशन मधल्या इंट्रोगेशन रूम मधे एक ऑफिसर असतो, बाजूला दोन शिपाई असतात आणि समोर गुन्हेगार असतो. आणि तिथल्या भाषेला कुठलीही मर्यादा नसते. आता तुम्ही ठरवा की इथे बोलायचं की मुंबईला?” – वेळेकर.
“ठीक आहे विचारा.” – कुमार.
“आसिफला तुम्ही कसे आणि केंव्हा पासून ओळखता?” – वेळेकर.
“आसिफ एक मोठा बिल्डर आहे. माझ्या काही स्कीम मधे तो कॉंट्रॅक्टर होता. एक दिवस त्याने मला माझ्या मोबाइल वरुन एक मेसेज पाठवायला दिला. मला कळेना की त्यांच्या जवळ मोबाइल असून तो माझ्या मोबाइल वर पाठवायला का सांगत होता? पण दोन दिवसांनी त्याने माझ्या हातावर एक लाख रुपये ठेवले. म्हणाला, त्या दिवशीच्या सेवेचा मोबदला. असं दोन चार वेळेस झाल्यावर, मी त्याला विचारलं तर म्हणाला की तो ड्रग डीलर आहे. मग त्यानंतर मी त्यांचे मेसेज पाठवणं बंद केलं.
पण चार पांच महिन्या पूर्वी तो म्हणाला की एकच काम आहे शेवटचं. आणि ते ही मित्रांसाठी. तू फक्त दोघांची गाठ घालून दे. मग मी रुपचंद आणि हंसराजची गाठ घालून दिली. त्यांच्या मीटिंग मधे काय बोलणी झाली मला माहीत नाही. या सर्व प्रकरणात माझा इतकाच सहभाग आहे.” – कुमार.
“आत्ता आसिफ कुठे आहे?” - वेळेकर.
तो दुबईला जाणार होता, नंतर माहीत नाही.” – कुमार.
“त्यांच्या घराचा पत्ता दे. घरी कोण कोण आहे?” – वेळेकर.
“त्याची बायको आणि मुलगी. मी कधी त्यांच्या घरी गेलो नाही. त्याने सुद्धा तो कुठे राहतो हे सांगितलं नाही. जेंव्हा त्यांच्या बद्दल एक एक गोष्टी कळत गेल्या, त्यानंतर माझी त्याच्याशी बोलण्याची इच्छाच राहिली नाही. मी संबंधच जवळ जवळ तोडले. त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत ते चालू आहेत.” – कुमार.
“ओके. त्यांच्या सगळ्या ऑफिसेस चे पत्ते द्या. बाकी आम्ही शोधून घेऊ.” – सूरी.
“देतो.” – कुमार.
“आत्ता पर्यन्त किती मुली पळवल्या?” – वेळेकर.
“नाही साहेब, मला काहीच कल्पना नाही. मी अंग काढून घेतलं. हा सगळा प्रकार मला मुळीच पचला नाही. मी बिझनेसमन आहे. क्रिमिनल नाही.” - कुमार.
“हे बघा कुमार साहेब, आसिफ बद्दल अजून काय माहिती आहे?” – वेळेकर.
‘जेवढं माहीत आहे ते सांगितलं. मी संबंध तर पूर्ण पणे तोडू शकलो नाही लेकिन दूरी बनाना शुरू कर दिया.” – कुमार.
“रुपचंद कुठे आहे?” – वेळेकर.
“त्या बद्दल मला फार काही माहीत नाही. आमची एकदाच गाठ पडली होती. पण तो भावनगरचा आहे असं म्हणाल्याचं आठवतं” – कुमार.
“त्यांच्या आधार कार्ड वर तर हिस्सारचा पत्ता आहे, आता तुम्ही म्हणता आहात की तो भावनगरचा आहे. खरं काय आहे?” – वेळेकर.
“नाही साहेब, असं असेल तर मला काही माहीत नाही.” – कुमार.
“तुम्हाला आमच्या बरोबर मुंबईला यावं लागेल.” – वेळेकर.
“पण तुम्ही म्हणाला होता की आत्ता मी जर सगळं सांगून टाकलं तर मला त्रास होणार नाही.” – कुमार.
“केस मुंबईची आहे तेंव्हा मुंबईला यावंच लागेल. तुम्ही तूमच्या वकिलाला बेल अॅप्लिकेशन करायला सांगा. आम्ही विरोध करणार नाही.” – वेळेकर.
*****
कावेरीच्या घरी, ज्योति आणि गणेशन नुकतेच पोचले होते. तिच्या आईवडिलांना ज्योतीला अचानक पाहून आश्चर्यच वाटलं. थोडीशी धास्ती पण वाटली, पण मागून गणेशन येतांना दिसला म्हणून भीती बरीचशी कमी झाली. तरी थोडी हुर हुर लागलीच होती.
“काय ग अचानक अशी दत्त म्हणून उभी राहिलीस? सगळं ठीक आहे न?” – मालतीबाई.
“सगळं ठीक आहे आई, घरात तर येऊ देशील. मग सांगते सविस्तर. आधी आम्ही जरा फ्रेश होतो, चहा पितांना बोलू.” – ज्योति.
“म्हणजे सांगण्यासारखं काही तरी आहे. सांग बाई लगेच अंत नको पाहुस आमचा. आजकाल तुमचं जे काही सर्प्राइज वगैरे चालतं ना, ते नाही सहन होत. जे काही असेल ते सांगून टाक. नसती घालमेल नको.” – मालतीबाई.
ज्योतिने गणेशन कडे पाहिलं, त्याने संमती दिल्यावर ज्योति सांगायला सुरवातच करणार होती, तेवढ्यात धनशेखर तिथे पोचले. वेळेकर दिल्लीला गेले असल्याने, धनशेखर एकटेच कावेरीच्या घरी आले होते. त्यांना पाहून विश्वासराव आणि मालतीबाई अजूनच बुचकळ्यात पडले. कावेरीचं काही बरं वाईट तर सांगायला आले नसतील? या विचाराने दोघांचे चेहरे काळवंडले. धनशेखर, ज्योति आणि गणेशन सर्वांना एकाच वेळेस घरी आलेलं बघून त्यांच्या पोटात गोळाच उठला. मालती बाईंना सहन होईना त्या कश्या बश्या सोफ्यावर मटकन बसल्या. हे पाहून ज्योति त्यांच्याकडे धावली.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने