किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
साळुंके सोमनाथ आणि सानप पोलिस कॉनस्टेबल
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
लीयान्का विल्सनची बायको.
अंतोन विल्सनचा माणूस.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय राव विनयचे वडील.
सुभद्राबाई विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
सूरी दिल्लीचे पोलिस इंस्पेक्टर
आसिफ मास्टर माइंड
दयानिधी /कुमार आसिफचा माणूस.
पूर्ववृत्त
दयानिधीचा शोध घेण्या साठी वेळेकर दिल्लीला गेले. दयानिधीचा पत्ता लागला आता त्याची चौकशी पण झाली. धनशेखर कावेरीच्या आईवडिलांना कावेरीची बातमी सांगायला त्यांच्या घरी गेले. आता वाचा पुढे.
भाग ८६
भाग ८५ वरुन पुढे वाचा......
धनशेखर, ज्योति आणि गणेशन सर्वांना एकाच वेळेस घरी आलेलं बघून त्यांच्या पोटात गोळाच उठला. मालती बाईंना सहन होईना त्या कश्या बश्या सोफ्यावर मटकन बसल्या. हे पाहून ज्योति त्यांच्याकडे धावली.
“हा काय प्रकार आहे? तुम्ही सगळे एकाच वेळेस कसे? कावेरी आता या जगात नाही हे सांगायला आला आहात का?” – मालतीबाई.
“विश्वासराव अरे, आनंद साजरा करा. कावेरी मिळाली. अगदी सुखरूप आहे. आहात कुठे.” – धनशेखर.
दोन मिनिटं विश्वासराव आणि मालतीबाई धानशेखात्र साहेबांच्या कडे अवशवासाने बघतच राहिले. नंतर मात्र त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. ते दोघंही जरा शांत झाल्यावर ज्योति म्हणाली,
“आई, म्हणूनच आम्हीपण आलो आहोत. कावेरीला भेटायला जायचं आहे ना?”– ज्योति.
“भेटायला जायचं? म्हणजे? ती कुठे दुसरीकडे आहे का? मग तिला का नाही आणलं? काही गडबड आहे का?” – मालतीबाई.
“हो थोडी अडचण आहे. ती हॉस्पिटल मधे आहे. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. म्हणून आत्ता तरी तिला भेटायला आपल्यालाच जावं लागणार आहे.” – ज्योति.
“अरे देवा, हे कसं झालं? पण आता कशी आहे ती? साहेब तुम्ही भेटलात का तिला. सगळं ठीक आहे न?” – मालतीबाई.
“मालतीबाई, कावेरी एकदम ठीक आहे. मी अजून तिला भेटलो नाहीये. आम्हाला पण कालच रात्री कळलं. ती भावनगरला आहे. आणि आता आपण जाऊ सगळे.” – धनशेखर.
“पण इतके दिवस तिने फोन का नाही केला? साहेब, नेमकं काय घडलं ते सांगाल का? माझा जीव टांगणीला लागला आहे.” – मालतीबाई.
मग धनशेखर साहेबांनी कावेरीची पूर्ण कथा सांगितली. निशांतने तिच्या शोधासाठी किती कष्ट घेतले ते ही अगदी सविस्तर सांगितल.
“म्हणजे ती आता हॉस्पिटल मधे नाहीये?” – मालतीबाई.
“नाही ती अगदी पूर्वीसारखी एकदम तंदुरुस्त आहे. फक्त तिला काहीच आठवत नाहीये. तिला ज्या लोकांनी संरक्षण दिलं, सांभाळलं, ते साधन लोकं आहेत. त्या विनय साहेबांची फॅक्टरी आहे. आणि खूप मोठा व्यवसाय आहे. खूप भली माणसं आहेत. कावेरीच काही बरं वाईट होऊ नये म्हणून त्यांनी पाण्या सारखा पैसा खर्च केला आहे.” – धनशेखर.
“पण साहेब तिने आमचे फोटो सुद्धा ओळखले नाहीत म्हणता, हे विचित्र नाही का? असं कधी ऐकलं नव्हतं. आता आम्ही काय करायचं?” – विश्वासराव.
“आई, बाबा, कावेरीला फोटो ओळखता आले नाहीत, पण आपण समोर प्रत्यक्ष उभं राहिल्यावर कदाचित फरक पडू शकतो. निदान आपण अशी आशा तरी नक्कीच धरू शकतो.” – ज्योति.
“करेक्ट आहे. ज्योति अगदी बरोबर बोलते आहे. विश्वासराव, इतके दिवस आपण नुसती वाट पहात होतो. पण आता वेळ आली आहे, तर आपण मुळीच वेळ न गमावता भावनगरला जायला पाहिजे.” – धनशेखर.
“बाबा, धनशेखर साहेब अगदी बरोबर बोलताहेत. मी आत्ताच बघतो कोणची फ्लाइट आहे ते. आणि बूक करून टाकतो.” – गणेशन.
विश्वासरावांनी मान डोलावली आणि धनशेखरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. काम झालं होतं. गणेशन ने बूकिंग करून टाकलं. संध्याकाळची फ्लाइट होती.
“मी निशांतला सर्वांचं हॉटेल बूकिंग करायला सांगतो. गणेशन, माझे किती पैसे झाले ते सांग, मी G PAY करून टाकतो.” – धनशेखर.
“एक करा, कावेरीचे सर्व सर्टिफिकेट, डिग्री, फोटो अल्बम सगळं बरोबर घ्या. तिचे मैत्रिणींच्या बरोबर असलेले फोटो पण घ्या. तिची एखादी आवडती वस्तु असेल तर ती पण घ्या. कुठे तरी जर कनेक्शन लागलं तर फायदाच होईल. फक्त तिला काही आठवत नाही म्हणून रडून काही गोंधळ घालू नका. त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. तेंव्हा जरा सांभाळून.” – धनशेखर.
धनशेखरांना जायच्या आधी काही कामं निपटवायची होती म्हणून ते पोलिस स्टेशन ला आले. कामं आटोपून ते घरी जायला निघणार तर, वेळेकरांचा फोन आला.
“सर दयानिधीचा पत्ता लागला. त्याची चौकशी पण झाली.” – वेळेकर.
“काय निष्पन्न निघालं?” – धनशेखर.
मग वेळेकरांनी त्यांना सविस्तर अपडेट दिलं. ते ऐकल्यावर,
“म्हणजे त्यांच्या म्हणण्या नुसार, रुपचंद भावनगरचाच आहे. इतके दिवस, हा प्रश्न अनूत्तरीतच होता की सगळी मोठी शहरं सोडून रुपचंद भावनगरच्या वाटेवर का गेला? या बाबतीत विल्सन पण काही बोलला नाही. पण आता लक्षात येतं आहे. तुम्ही असं करा, दयानिधीला मुंबईला घेऊन यायच्या ऐवजी, जेंव्हा बोलावू तेंव्हा तो मुंबईला यायला तयार असेल, जर त्याला कबूल असेल, तर त्याला आत्ता अरेस्ट करू नका. त्याला सांगा की त्याला देशाच्या बाहेर जाता येणार नाही म्हणून. तसंही या केस मधे त्याचा फारसा पार्ट नाहीये. आणि हे झाल्यावर तुम्ही सरळ भावनगरला या. रुपचंद ताब्यात आलाच पाहिजे.” – धनशेखर.
“ठीक आहे साहेब. असच करतो.” – वेळेकर.
संध्याकाळी कुमारकडून सगळी कबुली घेतल्यावर वेळेकरांनी शिंदे साहेबांना फोन केला. कुमारच्या बद्दल सगळं अपडेट दिल्यावर, म्हणाले,
“साहेब एकदा विल्सन ला समोर घेऊन रुपचंदचा भावनगरचा पत्ता मिळतो का बघा. आता आम्ही भावनगरला जातोच आहोत, तर रिकाम्या हाताने कसं परत यायचं? काही लीड मिळाली तर बरं पडेल.” – वेळेकर.
“ठीक आहे आत्ताच घेतो त्याला. तुम्ही निश्चिंत रहा.” – शिंदे.
तासाभराने शिंदे त्यांच्या समोर असलेल्या कामातून मोकळे झाले. मग त्यांनी सोमनाथ आणि साळुंकेला बोलावलं.
“सोमनाथ आपल्याकडे हॉकी स्टिक आहे का?” – शिंदे.
“हो. आहे.” – सोमनाथ.
“छान ती स्टिक घेऊन इंट्रो रूम मधे या. साळुंके तुम्ही विल्सनला घेऊन या.
शिंदे इंट्रो रूम मधे गेले, तेंव्हा विल्सन, साळुंके आणि सोमनाथ तिथे आधीच आले होते.
“काय विल्सन कसं काय? तब्येत बरी दिसते आहे.” – शिंदे.
“काय साहेब, मला जेवढं माहीत होतं ते सर्व तुम्हाला सांगितलंच आहे साहेब. मग आता माझ्या तब्येतीची अचानक चौकशी? या सोमनाथ साहेबांच्या हातात स्टिक का आहे?” – विल्सन.
“अरे, नाही, तुला एक बातमी सांगायची आहे म्हणून तुला बोलावलं.” – शिंदे.
“विल्सन काही बोलला नाही पण नजर स्टिक वर खिळून होती. जाम घाबरला होता.
“वेळेकर आज दयानिधीला भेटले. दिल्लीला. आणि त्याने सांगितलं की रुपचंद हा भावनगरचा राहणारा आहे. आता तू त्याच्या घराचा खरा पत्ता सांगितला तर बरं.”- शिंदे
मुंबई पोलिस म्हणजे काय रसायन आहे हे विल्सनला नव्याने कळलं. त्याचा चेहरा पांढरा फाटक पडला.
“साहेब, रुपचंद माझा बॉस आहे, त्याच्या घराचा पत्ता मला कसा माहीत असणार? मला मरायचं नव्हतं.” - विल्सन.
“सोमनाथ, रुपचंद जेंव्हा भेटेल तेंव्हा काय होईल याची चिंता याला सतावते आहे. आत्ता इथे काय होईल याची फिकीर याला नाहीये. काय म्हणतोस?” – शिंदे.
“मी आणि साळुंके याला एकदम बेफिकीर करतो साहेब. सोपवा आमच्यावर.” सोमनाथने असं म्हणून स्टिक दोन्ही हातात पकडली आणि तो पवित्रा घेऊन विल्सनच्या जवळ गेला. विल्सनचं सगळं अवसान गळून पडलं. म्हणाला,
“साहेब, पत्ता नाही माहीत, पण हिंट देऊ शकतो.” – विल्सन.
“विल्सन, तू आम्हाला येडा समजतोस की खुळा? सोमनाथ तुम्हीच याला एक हिंट द्या. स्टिक आहेच तुमच्या जवळ. वाट कसली पाहता?” – शिंदे.
“साहेब, साहेब, माझं म्हणण तरी ऐकून घ्या. तुम्हाला पत्ता मिळेल. मी काय सांगतो ते तर ऐका.” – विल्सन खूप आजिजीने म्हणाला.
“हूं बोल. दिला एक चान्स तुला.” – शिंदे.
“साहेब कावेरीला उचलण्याच्या अगोदर आठ एक दिवस आम्हा दोघांचं बरेच वेळा फोन वर बोलणं झालं प्लॅनिंग साठी. त्यातल्या तीन वेळा तो घरून बोलत होता. म्हणजे घरून बोलतांना बॅक ग्राउंडला जे आवाज ऐकू येतात, तसे येत होते. मी तुम्हाला कॉल रेकॉर्डस वर ते कॉल्स मार्क करून देतो. त्याचे लोकेशन तुम्हाला मिळतील.” – विल्सन.
“हूं, साळुंके याच्या बोलण्यात दम दिसतो आहे. याच्या जुन्या फोनचे कॉल रेकॉर्डस आणा.” – शिंदे.
कॉल रेकॉर्डस पाहून विल्सनने तीन कॉल्स मार्क केले. तिन्ही कॉल वर रुपचंदचं नाव होतं.
“सायबर ऑफिस ला द्या. अर्जंटली लोकेशन मागवा.” – शिंदे.
“साहेब, ती पण लिस्ट आपल्या जवळ आहे. मी घेऊन येतो. वेळेकर साहेब गोव्याला गेले होते तेंव्हा त्यांनी मागवले होते.” – साळुंके.
लिस्ट आली. शिंदे साहेबांनी तिन्ही कॉल्स चे लोकेशन पाहिले. एकच लोकेशन होतं. त्यांनी तिन्ही लोकेशन मार्करने हायलाइट केले आणि वेळेकरांना पाठवून दिले. पांच मिनिटांनी वेळेकरांचा फोन आला. धन्यवाद देण्यासाठी.
“आता काय प्रोग्राम?” – शिंदे.
“मी आता एयरपोर्ट च्या वाटेवर आहे. अहमदाबाद ची फ्लाइट आहे. तिथून सकाळ पर्यन्त भावनगर ला पोचलो की मिशन सुरू.” – वेळेकर.
“ऑल द बेस्ट.” – शिंदे.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने