Login

किडनॅप भाग ८४

कावेरीच्या अपहरणांने सुरू झालेला तपास आता मानव तस्करी वर येऊन ठेपला होता.
किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
साळुंके सोमनाथ आणि सानप पोलिस कॉनस्टेबल
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
लीयान्का विल्सनची बायको.
अंतोन विल्सनचा माणूस.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय राव विनयचे वडील.
सुभद्राबाई विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
सूरी दिल्लीचे पोलिस इंस्पेक्टर
आसिफ मास्टर माइंड
दयानिधी /कुमार आसिफचा माणूस.
पूर्ववृत्त
भावेशचा खूनी अंतोन कुठे आहे हे कळलं. पण त्याचा पत्ता विल्सन देत नव्हता. वेळेकर मग गोव्याला गेले आणि त्याची बायको लीयान्काला भेटले. अंतोनला जेरबंद करून अंधेरी पोलिस स्टेशन ला घेऊन गेले. आता वाचा पुढे.
भाग ८४
भाग ८३ वरुन पुढे वाचा......
सर्व प्रोसीजर पूर्ण करून दुसऱ्या दिवशी रात्री वेळेकर अंतोनला घेऊन अंधेरीला आले. अंधेरीची व्हॅन पाठवण्याची व्यवस्था धनशेखर साहेबांनी केलीच होती. त्यांनी वेळेकरांचं अभिनंदन पण केलं. सावंत साहेबांना धन्यवाद दिलेत.
दुसऱ्या दिवशी, सकाळी,
“बघा, वेळेकर मी म्हंटलं होतं ना की तुम्ही स्वत:च गेलात तर नक्कीच यशस्वी होऊन याल. तसंच झालं. अभिनंदन तुमचं. या अतिशय गुंतागुंतीच्या आणि खतरनाक प्रकरणाची तुम्ही ज्या पद्धतीने तपास केला, त्यांची मी प्रशंसा करतो.” – धनशेखर.
पोलिस ऑफिसरला कोणी लाजतांना पाहिलं आहे का? तो अपूर्व क्षण आत्ता आला होता.
तपास कोठडीत विल्सन ला बोलावलं.
“विल्सन, तुला एक सर्प्राइज द्यायचं आहे. आमच्याकडून सस्नेह भेट.” – वेळेकर.
विल्सन नुसताच बघत राहिला. पोलिस भेट वस्तु देताहेत म्हणजे नक्कीच आपले बारा वाजवणार या विचाराने तो अस्वस्थ झाला. तो काहीच बोलला नाही.
“तुला आनंद झाला नाही का?” - वेळेकर.
“काय आहे?” विल्सन ने मलूल आवाजात विचारलं.
“हे बघ तुझ्या साठी काय आणलं आहे आम्ही” – असं म्हणून त्यांनी खूण केली. साळुंके अंतोनला घेऊन आत आले. अंतोनला पाहिल्यावर विल्सनच्या पायाखालची जमीनच सरकली. तो वेड्या सारखा अंतोन कडे बघतच राहिला. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना.
अंतोन सुद्धा विल्सनला कोठडीत बघून स्तंभित झाला होता. पोलिस काय चीज आहेत हे त्याला आज पुन्हा एकदा कळलं.
“अंतोन, विल्सन च्या सांगण्यावरूनच आम्ही तुला पकडलं आहे. त्यानेच आम्हाला सांगितलं की तूच भावेशचा खून केलास ते. आता तू खून कसा केलास तेवढं सांग. बाकी आम्हाला माहीत आहे.” – वेळेकर.
“विली, तूच माझ्यावर उलटलास? तूच माझ्यासाठी काल सापळा लावायला यांना मदत केलीस? गद्दार माणूस. तुझ्यावर मी विश्वास ठेवला ही फार मोठी चूक केली. पण मी तुला असा सोडणार नाही.” असं म्हणून तो विल्सनला भिडला. वेळेकर आणि साळुंके शांतपणे खोलीच्या बाहेर पडले. साळुंके बाहेरूनच लक्ष ठेवत होता. वेळेकर आपल्या सीट वर चालले गेले. साधारण २० मिनिटं कोंकणी भाषेत शिव्या गाळी आणि जीवघेणी मारामारी केल्यावर दोघेही थकून दोन कोपऱ्यात जाऊन बसले. मग साळुंके आत आला.
“तुमच्या प्रेमाची बातचीत संपली असेल तर साहेबांना बोलावू का? म्हणजे पुढची चौकशी करता येईल. तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर तसं सांगा. तुम्हाला आम्ही हवा तितका वेळ देऊ.” – साळुंके.
आता विल्सन चवताळून उठला आणि त्याने अंतोन वर झेप घेतली. “हमारी बिल्ली हमीसे म्याव?” माणूस रागाने बेभान झाला की हिंदीचा आश्रय घेतो आता हिदितुन गालीप्रदान चालू झालं आणि हात पाय पण चालायला लागले. साळुंके शांतपणे मौज बघत होते. अर्ध्या तासानंतर दोघांनी इतका मार खाल्ला होता, की डॉक्टरांना बोलवायची वेळ आली.
अंतोनला कळत नव्हतं की विल्सन असा का वागला? आणि विल्सनला कळत नव्हतं की अंतोन त्याच्यावर का आरोप करतो आहे? आणि वेळेकरांनी तर सांगून टाकलं होतं की विल्सनच्या सहकार्या मुळेच ते अंतोन पर्यन्त पोचू शकले म्हणून. दोघेही कन्फ्युज झाले होते, आणि एकमेकांकडे खाऊ की गिळू अश्या नजरेने बघत होते.
*****
“साहेब, हंसराजने दयानिधीचे जे नंबर सांगितले होते, त्याप्रमाणे इथे त्या त्या दुकानांवर जाऊन चौकशी केली आणि त्या माणसांना भेटलो. सगळ्यांची एकच स्टोरी आहे साहेब.” – सानप दिल्ली वरुन बोलत होते. दयानिधीचा खुलासा हंसराज आणि अंसारी कडून झाला होता, त्याचा तपास करायला सानप दिल्लीला गेले होते.
“काय स्टोरी आहे?” – वेळेकर.
“चार पांच लोकं मिळाले साहेब. दयानिधीने त्यांना आपला महागाचा फोन दिला आणि
त्यांचा घेतला. दयानिधीने सांगितलं की त्याचं सीम खराब झालं आहे, म्हणून त्याला सीम सकट फोन हवा आहे. त्याच्या बदल्यात त्याने त्याचा महागडा फोन दिला. वरतून २००० रुपये पण दिलेत. त्याने सांगितलं की दोन दिवसांनंतर फोन ब्लॉक करा. साध्या फोनच्या बदल्यात अत्यंत महाग फोन मिळाला म्हणून सर्वच खुश झाले. वरतून प्रत्येकाला दोन दोन हजार मिळाले. त्यामुळे ते तयार झाले.” – सानप
“त्या लोकांना भीती नाही वाटली? आपल्या फोन चा दुरुपयोग होईल म्हणून?”- वेळेकर
“विचारलं मी. पण ते सर्व निम्न स्तरांचे लोकं होते, त्यांना काही वाटलं नाही. नवीन ऊंची मोबाइल मिळाला यातच सर्व खुश होते.” – सानप.
“ठीक आहे. त्या चार लोकांना घ्या बरोबर आणि दयानिधीचं स्केच तयार करा. ते चारही वेगवेगळी स्केच काढा आणि त्यांना सुपर इंपोज करून बघा. वेगळी माणसं आहेत की एकच आहे ते कळेल. सर्व नंबर मला पाठवून द्या.” – वेळेकर.
सानपांनी दिलेले फोन नंबर वेळेकरांनी सायबर ऑफिस ला पाठवले.
“या नंबरचे गेल्या चार महिन्यातले कॉल रेकॉर्डस काढा. लोकेशन पण काढा. मोबाइल जेंव्हा स्विच ऑफ झाला ती लास्ट लोकेशन सर्वात महत्वाची आहे.” – वेळेकर.
संध्याकाळी त्यांना कॉल रेकॉर्डस आणि लोकेशन मिळाले. वेळेकर तपासायला बसले. सहा पैकी चार फोनचे लास्ट लोकेशन एकच येत होते.
सानपांचा फोन आला.
“साहेब चार फोटो पाठवतो आहे. चारही फोटो सुपर इंपोज करून पाहिले. एकाच माणसाचे आहेत साहेब.
वेळेकर धनशेखर साहेबांसमोर बसले होते. त्यांना सर्व अपडेट दिल्यावर, धनशेखर म्हणाले,
“वेळेकर तुमचा आजपर्यन्तचा सक्सेस रेट बघता, तुम्हीच दिल्लीला जावं हेच मला सयुक्तिक वाटत आहे. काय करता?” – धनशेखर.
“मला खात्रीच होती की तुम्ही माझ्याच गळ्यात हे काम घालणार म्हणून. आणि मी पण याचीच वाट पहात होतो. ठीक आहे साहेब बघतो कोणची टिकीटं मिळतात ते. आणि लगेच निघतो.” – वेळेकर.
“नाही आता वेळ वाया घालवून चालणार नाही. दयानिधी ताब्यात आला, तर रुपचंद आणि आसिफ पर्यन्त लवकरात लवकर आपल्याला पोचता येईल. आधीच चार पांच महीने उलटून गेले आहे. मुलींची अजून एखादी खेप करायला त्यांना अवसर मिळता कामा नये. तुम्ही जी फ्लाइट मिळेल त्या फ्लाइट ने निघा.” – धनशेखर.
“साहेब, उद्या सकाळी आपण ज्योतीला घरी येतो म्हणून सांगितलं होतं.” – वेळेकर.
मी स्वत: जाईन काळजी करू नका. दिल्ली महत्वाची आहे. तुम्ही निघा”- धनशेखर
वेळेकर आणि सानप दिल्लीला इंस्पेक्टर सूरींच्या समोर बसले होते.
“सानपांनी बरीचशी स्टोरी सांगितली आहेच. पण तुम्ही जरा डीटेल मधे सांगाल तर बरं होईल.” – सूरी
मग वेळेकरांनी सर्व स्टोरी डीटेल मधे सांगितली. म्हणाले,
“हा दयानिधी हंसराज आणि अंसारीशी कॉनटॅक्ट मधे होता. त्याचाच फोन स्पीकर वर टाकून कोणीतरी सूचना द्यायचा. या सूचना देणारा माणूस जर पकडल्या गेला तर वर्तुळ पूर्ण होईल. पण त्यासाठी दयानिधी ताब्यात यायला हवा.” – वेळेकर.
“तुम्ही काही योजना घेऊन आला आहात का?” – सूरी.
“हो. ही दयानिधीची लास्ट लोकेशन मिळाली आहे. त्याने चारही फोन याच ठिकाणी बंद केले आहेत. कदाचित हे त्याचं घर किंवा ऑफिस असू शकेल. इथे पाळत ठेवायला हवी.” – वेळेकर.
“चला आपणच जाऊ लोकेशन वर. म्हणजे कुठे पाळत ठेवायची ते कळेल.” – सूरी.
लोकेशन वर गेल्यावर दिसलं की ती एक हाऊसिंग सोसायटी आहे. जवळपास 400 फ्लॅट्स असलेली सोसायटी होती. कसं शोधणार दयानिधीला, हा प्रश्नच होता.
“चला आपण सोसायटीच्या ऑफिस मधे जाऊ आणि विचारू.” – सूरी.
“नाही दयानिधी नावाचा कोणी इथे रहात नाही.” – सेक्रेटरी.
“भाडेकरू?” – वेळेकर.
“लिस्ट बघतो, पण मला जवळपास सर्वच लोकं माहिती आहेत.” – सेक्रेटरी.
भाडेकरूंच्या लिस्ट मधे पण कोणी दयानिधी नावाचं कोणी नव्हतं. मग वेळेकरांनी दयानिधीचं स्केच काढलं आणि दाखवलं.
“हे बहुधा कुमार साहेब आहेत. पण थांबा मी आमच्या गार्ड ला बोलावतो.” – सेक्रेटरी.
गार्ड आला, त्याने बघितलं आणि कन्फर्म केलं की हा फोटो कुमार साहेबांचाच आहे.
“B बिल्डिंग, फ्लॅट नंबर 903 इथे राहतात हे कुमार साहेब.” – सेक्रेटरी.
“ओनर की टेनेन्ट?” – सूरी.
“टेनेन्ट” – सेक्रेटरी
“काय भानगड झाली आहे साहेब?” – सेक्रेटरी.
“आत्ता काहीच सांगू शकत नाही आणि तुम्ही पण कुठेच बोलू नका. गार्ड ला पण सांगा. जर काही गडबड झाली, आणि हा माणूस पळाला तर तुम्ही दोघं अंदर.” – सूरी.
“आत्ता तो माणूस आहे घरी?” – वेळेकर.
सेक्रेटरीने गार्डला बोलावलं आणि प्रथम हे सांगितलं की तोंडाला कुलूप लावायचं मग म्हणाले की की कुमार साहेबांच्या दोन्ही गाड्या पार्किंग मधे आहेत का पाहून ये. पाहून आल्यावर त्याने सांगितलं की,
“दोन्ही गाड्या पार्किंग मध्येच आहेत.” – गार्ड.
सूरी आणि त्यांची टीम आणि वेळेकर आणि सानप सगळेच कुमारला भेटायला गेले. फक्त सूरी आणि वेळेकर नवव्या मजल्यावर गेले, बाकी आठव्या वरच थांबले.
दार एका बाई ने उघडलं. बहुधा कुमारची बायको असावी.
“दारात पोलिस पाहून ती जरा घाबरलीच,
“कोण पाहिजे.” – बायकोने कसं बसं विचारलं.
“कुमार साहेब. त्यांना भेटायचं आहे. त्यांना बोलवा.” – सूरी.
“काय काम आहे ते तर सांगा?” – बायको.
सूरी साहेबांनी खिशातून व्यालेट काढलं. म्हणाले,
“हे तुमचं आहे का?” – सूरी
“नाही.” – बायको.
“म्हणूनच कुमार साहेबांना बोलवा.” – सूरी.
तिने कुमारला आवाज दिला. कुमार हॉल मधे आला. वेळेकर आणि सूरी हातातल्या मोबाइल वर फोटो बघत होते. 100 टक्के खात्री झाली की दयानिधी हाच कुमार म्हणून.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →