किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
साळुंके सोमनाथ आणि सानप पोलिस कॉनस्टेबल
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
लीयान्का विल्सनची बायको.
अंतोन विल्सनचा माणूस.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय राव विनयचे वडील.
सुभद्राबाई विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
भावेश खूनी अंतोन कुठे आहे हे कळलं. पण त्याचा पत्ता विल्सन देत नव्हता. वेळेकर मग गोव्याला गेले आणि त्याची बायको लीयान्काला भेटले. आता वाचा पुढे.
भाग ८३
भाग ८२ वरुन पुढे वाचा......
“पण माझ्या नवऱ्याला तुम्ही अटक केली, आणि आता म्हणता आहात की मी तुमच्यावर विश्वास ठेऊ. कसं शक्य आहे?” - लीयान्का
“यात तुमचाच फायदा आहे. तुमचा संसार वाचेल. विल्सन घरी येईल. पण तुम्हालाच जर विल्सन घरी यायला नको असेल, तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.” - वेळेकर.
“ठीक आहे. मी अंतोनला फोन लावते आणि बोलते त्यांच्याशी.” - लीयान्का
“नको. तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते ठीक नाहीये. तुम्ही फोन नंबर द्या. ते काम आम्ही करतो.” – वेळेकर.
“तुम्ही असं का म्हणता आहात? माझ्या सुरक्षेचा प्रश्न कुठे आला. अंतोन आमचा माणूस आहे.” – लीयान्का
“तो तुमचा माणूस नंतर आहे. आधी तो शूटर आहे. थोडा जरी संशय आला, तर तुम्हाला संपवल्या शिवाय राहणार नाही. अशी माणसं कोणाचीच नसतात. पांच रुपयांसाठी कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. ऐका आमचं.” – वेळेकर.
लीयान्काने एका कागदावर अंतोनचा नंबर लिहून दिला.
“तुमच्या जवळ आणि तुमच्या मुली जवळ किती फोन आहेत?” – वेळेकर.
“ते दोन्ही फोन एक दिवसा साठी आमच्या ताब्यात द्या.” – वेळेकर
“अँ, छे अहो तुम्हाला फोन दिले तर माझा कोणाशीच कॉनटॅक्ट राहणार नाही. सॉरी. मी नाही देणार. अवास्तव मागणी आहे ही तुमची.” – लीयान्का
“तुम्ही कोणाला कॉनटॅक्ट करण्या पेक्षा कोणीच तुमच्याशी संपर्क करू नये असं आम्हाला वाटतं म्हणून. तुमच्या सूरक्षेला धोका होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाहीये. ऐका आमचं. आम्ही पोलिस आहोत. बदमाश नाही. नागरिकांच्या सुरक्षेची चिंता करणं हे आमचं कर्तव्यच आहे.”- वेळेकर.
“आता यात आमच्या सुरक्षेचा प्रश्न कुठे आला?” – लीयान्का
“आता आम्ही अंतोनला मेसेज पाठवणार आहोत तुम्हाला भेटा म्हणून. त्याने जर तुम्हाला फोन केला आणि त्याला संशय आला तर तुम्ही संकटात सापडाल. म्हणून ही खबरदारी घेणं आवश्यक आहे.” – वेळेकर.
“ओके” – लीयान्का
“मॅम, विल्सन कोणच्या भाषेत अंतोनला मेसेज पाठवायचा. म्हणजे इंग्लीश, हिन्दी, कोंकणी असं.” – वेळेकर.
“कोंकणी मधे.” – लीयान्का
“तुम्हाला विल्सन कोणच्या नावाने हाक मारतो? म्हणजे मेसेज मधे तुमचं नाव लिहायचं असेल, तर काय लिहायचं? अंतोन तुम्हाला कोणच्या नावाने ओळखतो? लीयान्का? का काही वेगळं आहे? – वेळेकर.
“लिया. असं लिहा.
“ठीक. मी आलोच पांच मिनिटांत.
वेळेकर आणि सावंत बाहेर आले, त्यांनी शिंदे साहेबांना सर्व कल्पना दिली. आणि सांगितलं की विल्सनच्या मोबाइल वरुन आत्ता जो नंबर पाठवला आहे त्यावर “मी बाहेर आहे. तू ताबडतोब घरी जा आणि लियाला भेट. ती पुढच्या सूचना देईल. तिला फोन करू नकोस. आणि मला पण नको. आम्ही फोन बदलतो आहे.” असा मेसेज करा. कोंकणी भाषेत करा.
“साहेब, आम्ही फोन स्विच ऑफ करतो. मग काय प्रॉब्लेम आहे?” – लीयान्का
“समजा तुम्हाला कोणाला फोन करायची इच्छा झाली आणि तुम्ही पाचच मिनिटा करता फोन चालू केला, आणि त्याच वेळेस अंतोनने फोन केला तर काय करणार तुम्ही? त्याचा फोन कापून उलटाच परिणाम होईल. मोठाच प्रॉब्लेम होईल.” – वेळेकर.
“मेरी,” सावंत बरोबर आलेल्या लेडी कॉनस्टेबलला म्हणाले,
“तुम्ही आता घरी जा आणि मेड जसे ड्रेस घालतात तसा करून या. अंतोनची भेट होई पर्यन्त तुम्ही इथे मेड आहात. आम्ही थांबतो तोपर्यंत इथे. मॅडमच्या केसालाही धक्का लागता कामा नये. त्यांच्या संरक्षणाची तुमच्यावर जबाबदारी आहे.” – सावंत.
सावंतांनी मग लीयान्का, तिची मुलगी आणि त्यांची मेड यांचे फोन ताब्यात घेतले. आणि मेड ला घरी जायला सांगितलं. आणि पुढची सूचना देई पर्यन्त येऊ नकोस अशी सांगितलं.
“माझा फोन?” – मेड.
“तो तुला उद्या मिळेल. तुझा पत्ता देऊन ठेव. आम्ही तुला केंव्हा यायचं याची सूचना देऊ आणि तुझा फोन पण देऊ. आता जा.” – सावंत.
इतकं झाल्यावर वातावरण निवळलं होतं. म्हणून लीयान्का ने चहा आणि बिस्किटं समोर ठेवली.
“मॅम, एकदा तुमचं किचन बघायचं आहे.” – सावंत.
किचन ला एक खिडकी होती. खिडकीला गज नव्हते.
मेरी कॉनस्टेबल आल्यावर वेळेकर आणि सावंत बाहेर पडले. एकाला त्यांनी किचनच्या खिडकी बाहेर असलेल्या अंगणात झाडाच्या मागे लपून बसायला सांगितलं. दोन माणसांना घरासमोर थांबायला सांगितलं.
“सावंत साहेब, आत्ता पासूनच इतक्या लोकांचा पहारा लावला?” – वेळेकर.
“आपल्याला माहीत नाही अंतोन नेमका कुठे आहे. तो जर जवळपास असेल तर आजही रात्री तो येउच शकतो. म्हणून ही खबरदारी.” – सावंत.
“वा सावंत साहेब, मी हा विचार केला नव्हता. मला वाटलं की तो उद्या येण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही बरोबर विचार केलात.” – वेळेकर.
“आणि वेळेकर तुम्ही पण कमाल केलीत. लीयान्काचं मन बरोबर वळवलं तुम्ही. छान निगोशीएटर आहात.” – सावंत.
“मागच्या वेळेस आलो होतो, तर लगेच विल्सनला घेऊन जावं लागलं. आता थोडा अंतोन येई पर्यन्त वेळ आहे तर फिरून यावं म्हणतो.” – वेळेकर.
“चला आधी पोलिस स्टेशन वर जाऊन खबरबात घेऊ आणि मग जाऊ. समुद्र किनारा जवळच आहे. पाचच मिनिटांत विल्सनच्या घरी पोचता येईल. मी पण बरेच दिवसांत समुद्रावर गेलो नाही.” - सावंत
पण ठाण्यावर जाऊन आढावा घेऊन ते जेवायला गेले आणि मग समुद्रावर गेले तेंव्हा रात्रीचे साडे नऊ वाजले होते.
अगदी तेंव्हाच अंतोन, लीयान्काला भेटायला घरी आला. लीयान्काने त्याचं स्वागत केलं आणि मेरीला चहा आणायला सांगितलं.
“विलीचा अर्जंट मेसेज आला. काय प्रॉब्लेम झाला आहे? आणि मोबाइल का बदलला आहे?” – अंतोन.
“माहीत नाही. विलीने सांगितलं, मोबाइल बदल, बदलला. आपण प्रश्न विचारायचे नसतात.” – लीयान्का
“एक मिनिट, ही कोण आहे जिला तू चहा आणायला सांगितलं?” – अंतोन.
“नवीन मेड आहे. जुनी सोडून चालली म्हणून तिला ठेवलं.” – लीयान्का
“हिला कुठे तरी पाहिल्यासारखं वाटतं आहे. कोणी आणली तिला?” - अंतोन.
“जुन्याच मेड ने आणून दिली. पण तू इतका अस्वस्थ का होतो आहेस?” – लीयान्का
अंतोन विचारात पडला. या बाईला आपण कुठे पाहिलं हे आठवायचा प्रयत्न करत होता. शेवटी त्याला आठवलं आणि चेहरा पांढरा फाटक पडला.
“आत्ता आठवलं. लीया, काहीतरी गडबड आहे. अग ही पोलिस आहे. नक्कीच पोलिस. बघतोच आता.” असं म्हणून अंतोन किचन मधे धावला.
तो पर्यन्त किचनच्या खिडकी मधून मेरिने सिग्नल दिला होता. बाहेर उभ्या असलेल्या शिपायाने घरासमोर थांबलेल्या लोकांना मिस् कॉल दिला. आणि त्यांनी सावंत साहेबांना. सगळे अलर्ट मोड वर आले.
अंतोन कीचन मधे धावला. त्याने मेरीचे केस पकडले तिचं तोंड आपल्या कडे फिरवलं आणि म्हणाला,
“कोण आहेस तू? पोलिस? बोल नाही तर आताच गोळी घालतो तुला” आणि त्याने पिस्तूल काढलं.
हे खिडकी बाहेरच्या शिपायाने पाहिलं आणि तो खिडकीवर चढला. अंतोनने त्याला पाहीलं आणि एक हात मेरीच्या गळ्या भोवती टाइट केला आणि उजव्या हातातलं पिस्तूल मेरीच्या कपाळावर टेकवलं.
“खाली उतर, नाहीतर या बाईच्या डोक्यात गोळी घालेन” – अंतोन ओरडला.
अंतोनची आत्ता पर्यन्त पोलिसांशी कधी गाठच पडली नव्हती. त्याला काय माहीत की पोलिस ट्रेनिंग काय असतं ते. त्याने विचार केला की खिडकी वरचा पोलिस महिला पोलिसांचा जीव वाचावा म्हणून शांतपणे खाली उतरेल आणि मग आपण या बाईला धरून कार पर्यन्त घेऊन जाऊ आणि मध्येच रस्त्यात सोडून देऊ. आणि आपण फुरर. पण झालं उलटंच.
खिडकीवरच्या शिपायाने अंतोन वर झेप घेतली. त्याला झेप घेतांना पाहून मेरी सर्व शक्ति एकवटून वळली आणि विद्युत गतीने हालचाल करून, अंतोनचा पिस्तूल धरलेला हात दूर केला आणि दुसऱ्या हाताने अंतोनचं नाक पूर्ण ताकदीने पिळवटलं. अंतोनला हे अगदी अनपेक्षित होतं. त्याचा जीव गुदमरला, त्याच वेळेस खिडकीवरचा पोलिस त्यांच्या अंगावर कोसळला. पोलिसाची झेप इतकी जबरदस्त होती की ते तिघंही खाली कोसळले. अंतोन सर्वात खाली पडला पडतांना त्याचं डोक भिंतीवर जोरात आपटलं. डोक्याला खोक पडली आणि रक्त स्त्राव सुरू झाला. त्यांच्या वरती मेरी आणि तिच्यावरती शिपाई. पडतांना भिंतीवर डोकं आपटल्यामुळे अंतोनच्या हातातून पिस्तूल निसटलं आणि थोडं दूर पडलं. पण या झटापटीत पिस्तुलातून गोळी फायर झाली आणि वरच्या छतात घुसली. गोळीबाराचा आवाज ऐकताच तयारीत असलेले बाहेरचे दोन पोलिस घरात धावले. त्यांनी त्वरेने हालचाल करून अंतोनला पकडलं आणि बेड्या चढवल्या. अंतोन जेरबंद झाला. पाचच मिनिटांत, वेळेकर आणि सावंत पोचले.
“घेऊन जा याला. गोळी चालली आहे तेंव्हा फॉरेन्सिक टीम बोलवावी लागेल. ते झालं की आम्ही येतोच. हा खतरनाक बदमाश आहे. शूटर आहे. त्याला कुठलीही संधि देऊ नका. हातकड्या काढू नका.” – सावंत.
“मॅम खूप आभार तुमचे. तुम्ही मदत केली म्हणूनच हे शक्य झालं. तुम्हाला विल्सन ला भेटता येईल अशी व्यवस्था करतो आम्ही. भेटल्यावर तुम्ही विल्सनला सांगा की सर्व रुपचंदवर ढकलून मोकळा हो. आमच्या जवळ विल्सनच्या विरोधात काहीच प्रूफ नाहीय. आता तर अंतोन सुद्धा पकडल्या गेला आहे. रुपचंद हातात आला की विल्सन आझाद पंछी.” – वेळेकर.
घडलेला सारा प्रकार अगदी डोळ्यासमोर घडला असल्याने, लीयान्का भांबावून गेली होती. पण तिला पोलिसांचं खूप कौतुक वाटलं. विल्सन च्या कामामुळे ती सतत भीतीच्या छायेत वावरायची, पण आता तिच्या लक्षात आलं की पोलिस जनतेचे मित्रच आहेत. मेरीने ज्या धाडसाने आणि शौर्याने अंतोनचा सामना केला, ते पाहून तिला अभिमान वाटला. तिचे डोळे कृतज्ञतेने भरून आले.
फॉरेन्सिक टीमचं काम झाल्यावर वेळेकर आणि सावंत निघाले.
“मेरी मॅडम, तुम्ही आणि” शिपायांकडे निर्देश करून सावंत म्हणाले, “तुम्ही इथेच थांबा. अंतोनचे कोणी साथीदार असतील, तर तुम्ही सावध रहा. मॅम ची तुमच्यावर जबाबदारी आहे.” – सावंत.
लीयान्का खुश झाली तिने समाधानाने मान डोलावली.
“साहेब, माझ्यावर काही अटॅक होणार नाही न? मला भीती वाटते.” - लीयान्का
“असा तर काही चान्स दिसत नाही. पण तुम्ही तुमचे आईवडील फ्री असतील, तर काही दिवसांकरिता बोलावून घ्या. ते बरं पडेल.” – सावंत.
“हो. बोलावते. त्यांना काहीच कल्पना नाहीये. पण सांगितल्यावर ते येतील.” – लीयान्का
सर्व प्रोसीजर पूर्ण करून दुसऱ्या दिवशी रात्री वेळेकर अंतोनला घेऊन अंधेरीला आले. अंधेरीची व्हॅन पाठवण्याची व्यवस्था धनशेखर साहेबांनी केलीच होती. त्यांनी वेळेकरांचं अभिनंदन पण केलं. सावंत साहेबांना धन्यवाद दिलेत.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने