किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
साळुंके सोमनाथ आणि सानप पोलिस कॉनस्टेबल
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
लीयान्का विल्सनची बायको.
अंतोन विल्सनचा माणूस.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय राव विनयचे वडील.
सुभद्राबाई विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
निशांतला कळलं की कावेरी भावनगरलाच आहे. तिच्या घरी जाऊन निशांतने तिची ओळख सांगितली. वेळेकर आणि धनशेखर विल्सन ची चौकशी करत होते. मध्येच निशांतचा फोन आला. त्याच्याशी बोलल्यावर त्यांना कळलं की कावेरीचा पत्ता लागला आहे. निशांतने जे सांगितलं त्यांच्याशी विल्सनने जी माहिती दिली, ती जुळत होती.
निशांत कावेरीला भेटून आला. भावेश खूनी अंतोन कुठे आहे हे कळलं. आता वाचा पुढे.
भाग ८२
भाग ८१ वरुन पुढे वाचा......
विल्सनने त्यांच्या मोबाइल मधून अंतोन चा फोटो काढला.
“साळुंके तो फोटो तुमच्या मोबाइल वर घ्या. आणि मंगलोर पोलिसांना कॉनटॅक्ट करा. हा माणूस आपल्या ताब्यात आलाच पाहिजे. मॅटर अर्जंट आहे हे सांगा.” – धनशेखर.
सकाळी साळुंके सांगत आला,
“साहेब, मंगलोर वरुन अपडेट आलं आहे. आपण पाठवलेल्या लोकेशन वर मोबाइल सापडला पण माणूस नाही.” – साळुंके.
“म्हणजे काय? मोबाइल दुसऱ्याला देऊन अंतोन पळाला की काय?” – वेळेकर.
“हो, म्हणजे तिथल्या पोलिसांनी हाच निष्कर्ष काढला.” – साळुंके.
वेळेकर भयंकर संतापले. त्यांचे डोळे लालबुंद झाले. “
आता बघतोच कसा अंतोन सापडत नाही ते.” त्यांनी पट्टा काढला.
“साळुंके विल्सन ला घ्या.”- वेळेकर ओरडले. साळुंके घाबरला. त्याला अन्वरची घटना आठवली. धनशेखर साहेब अजून यायचे होते. तो बाहेर गेला. शिंदे साहेब बसले होते. त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. म्हणाला,
“साहेब, आज विल्सनचं काही खरं नाही. धनशेखर साहेब पण नाहीयेत. तुम्हीच करा काहीतरी.” – साळुंके.
“तू विल्सनला घेऊन ये. मी जातो वेळेकरांच्या बरोबर चौकशी करायला. काळजी नका करू.” – शिंदे.
विल्सन आला, त्याने वेळेकरांचा अवतार पाहिला. एक भीतीची शिरशिरी पायापासून डोक्यापर्यंत गेली. वेळेकरांनी अन्वरची काय अवस्था केली होती ते त्याच्या कानावर आलं होतं. अजून वेळेकर सुरू व्हायचे होते, तरी त्याची ही अवस्था झाली होती. अट्टल बादमाश दुसऱ्याला संपवतांना जितके क्रूर होतात, तेवढेच स्वत:वर वेळ आल्यावर पोलिस ठाण्यात पार गळून जातात. रूम मधे आल्यावर त्याने वेळेकरांना बघितलं आणि त्यांच्या पायावरच लोळण घेतली. वेळेकरांचा नाईलाज झाला. मनात नसतांना सुद्धा त्यांचा आवेश आपोआप थंड पडला. त्यांनी शिंदे साहेबांकडे बघितलं. शिंदे पुढे झाले. कॉलर पकडून विल्सनला उभं केलं. आणि एक कानफाटात ठेऊन दिली. आता तर वेळेकरांना चान्सच नव्हता. सगळी सूत्र शिंदे साहेबांनी आपल्या हातात घेतली होती. ते वरिष्ठ होते त्यामुळे वेळेकर थोडे बाजूला झाले. झापड इतकी जबरदस्त होती की विल्सन खाली पडला. आता शिंदे साहेबांनी तोंडाचा पट्टा सुरू केला. या बाबतीत शिंदे साहेबांना शिव्यांची डिक्शनरी तोंड पाठ होती. त्यांच्या शिव्या गाळीनेच विल्सन अर्धमेला झाला.
“साहेब गुन्हा काय ते तरी सांगा.” विल्सन रडत रडतच बोलला. हात जोडलेलेच होते.
“अंतोन कुठे आहे? आत्ता तर मी नुसता बोलतो आहे तू खरं बोलला नाहीस तर सोमनाथ आणि वेळेकर साहेब बोलतील. कुठे आहे अंतोन?” – शिंदे.
‘साहेब, फोन नंबर तर दिला होता मी.” – विल्सन.
“सोमनाथ” – शिंदे कडाडले. सोमनाथ समोर आला.
“साहेब, हात की पाय?” – सोमनाथ.
“साहेब, सांगतो. सांगतो. माफी करा.” - विल्सन.
“बोल. ताबडतोब. वेळ काढू नकोस. एक दोन तीन..” शिंदे साहेबांनी अंक मोजायला सुरवात केली.
“अंतोन पोर्तुगालला गेला आहे.” – विल्सन.
“पोर्तुगाल? तिथे कसा?” – शिंदे.
“गोव्याचे लोक तिथे केंव्हाही जाऊ शकतात साहेब. व्हिसा लागत नाही.” – विल्सन.
“हे तरी खरं आहे का?” – शिंदे.
“हो साहेब तुमच्या पायांची शपथ.” – विल्सन.
“पण तो तिथे का गेला?” – शिंदे.
“साहेब, घाबरला होता. म्हणू गेला.” – विल्सन.
“तुमचा शार्प शूटर घाबरला? कोणाला? विल्सन गेम खेळू नकोस भारी पडेल.” – शिंदे.
“साहेब, आम्ही फक्त पोलिसांना घाबरतो. तुमची टांगती तलवार सतत आमच्या डोक्यावर असते.” – विल्सन.
“ओके. आता त्या गोष्टीला ४ महीने होऊन गेलेत. आता अंतोन कुठे आहे?” – शिंदे.
आणि विल्सनची जीभ घसरली.
“आता गोव्यातच आहे साहेब.” – विल्सन बोलला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याने माती खाल्ली आहे. तो एकदम गप्पच झाला.
“पत्ता सांग.” – शिंदे.
विल्सन काही बोलला नाही. शिंदे साहेबांनी चार वेळा विचारलं, पण विल्सनने तोंड उघडलं नाही. मग शिंदे वेळेकरांना म्हणाले.
भावेश चा खूनी कोण हे कळलं होतं, पण तो ताब्यात आला नव्हता. कोणी तरी सांगत आलं की धनशेखर साहेब आले आहेत. वेळेकर आणि शिंदे बाहेर आले. केबिन मधे धनशेखर साहेबांना आत्ता काय घडलं ते सांगितलं.
“साहेब, आता विल्सन तयारीत आला आहे. अंतोन गोव्यात आहे हे त्याने चुकूनच सांगितलं पण नंतर तोंड घट्ट मिटून बसला आहे. अंतोनचा पत्ता देत नाही. तोंड घट्ट मिटून बसला आहे. तो नाही बोलणार आता. काय करायचं? अंतोन आणि रुपचंद दोघांचाही पत्ता मिळणं गरजेचं आहे.” – शिंदे.
धनशेखर विचार करत होते. थोडावेळ कोणीच बोलत नव्हतं.
“वेळेकरांबरोबर तुम्ही पण इंट्रोगेशनला बसले होते का?” धनशेखर साहेबांनी शिंद्यांना विचारले.
“नाही सर, फारसं काही काम नव्हतं. साळुंके विल्सनला घेऊन जातांना दिसला. म्हणून मी पण बघायला गेलो. थोडं मनोरंजन, अजून काही नाही.” – शिंदे.
“मला माहीत आहे. साळुंके काही तरी बोलला असावा. म्हणून शिंदे साहेब ब्रेक लावायला आले. आल्या आल्या सगळं अतिशय कुशलतेने आपल्या हातात घेतलं. आज त्यांनी विल्सनला नाही, तर मला वाचवलं आहे.” – वेळेकर.
“अरे, वेळेकर एवढे भावुक होऊ नका. आपल्याला रोज कसे कसे नमुने भेटतात ते आपल्यालाच माहिती. डोकं फिरतं बऱ्याच वेळेस. माझं पण फिरायचं सॉलिड राग यायचा. रोजच नराधम, खूनी, बदमाश, उलट्या काळजाचे लोकं भेटणार. पण सिंग साहेबांनी मला बरेच वेळा सावरलं आहे. आपली वर्दी आहे. आपण त्यांच्या सारखं वागू शकत नाही. तुम्ही मनाला एवढं लावून घेऊ नका.” – शिंदे.
“चला ठीक आहे. असंच आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं. बरं माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. ती तुम्हाला सांगतो. वेळेकर तुम्ही गोव्याला जा आणि विल्सन च्या बायकोला टॅप करा. बघा काही लीड मिळते का?” – धनशेखर.
“साहेब, आपण हीच आशा धरून रेहाना ला भेटायला गेलो होतो. ती अंसारीला भेटणार होती, पण ती अजून भेटलीच नाहीये, त्यामुळे अजून आसिफ कोण याचा पत्ता लागला नाही. आताही तसंच होणार नाही कशावरून? वेळ आणि मेहनत वाया.” – वेळेकर.
कोणचीही बाई आपल्याच नवऱ्या बद्दल माहिती द्यायला तेंव्हाच तयार होईल, जेंव्हा तिची खात्री पटेल. थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. पण मला गॅरंटी आहे की रेहाना येईल अंसारीला भेटायला. धीर धरा. आसिफ कोण? याचा पत्ता लागेल.” – धनशेखर.
मग गोव्याला जाऊन काय बोलायचं यांचा मसुदा तयार झाला, आणि रात्रीच्या बस ने वेळेकर गोव्याला निघाले.
“नमस्कार सावंत साहेब.” – वेळेकर.
“वेळेकर साहेब, तुम्ही? काय झालं?” – सावंत
वेळेकरांनी डिटेल्स सांगितले. म्हणाले,
“तो विल्सन काही अंतोनचा आणि रुपचंदचा पत्ता देत नाहीये. आता त्याच्या बायकोशी बोलून बघू. काही हाताला लागलं तर उत्तमच.” – वेळेकर.
वेळेकर आणि सावंत साध्या वेशात विल्सनच्या घरी.
“नमस्कार मॅडम, मी इंस्पेक्टर सावंत आणि हे इंस्पेक्टर वेळेकर. मुंबई पोलिस. आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.” – सावंत.
“माझ्या नवऱ्याला काहीच प्रूफ नसतांना घेऊन गेलात, आता मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. या तुम्ही. तुम्ही माझ्या वर बोलायची जबरदस्ती करू शकत नाही.” – विल्सनची बायको लीयान्का.
“मॅडम तुमचा काही तरी गैरसमज होतो आहे. विल्सन निर्दोष आहे याबद्दल आमची खात्री झाली आहे. पण जो पर्यन्त अंतोन आमच्या ताब्यात येत नाही, तो पर्यन्त विल्सनच्यांच माथ्यावर भावेशचा खूनी म्हणून शिक्का बसणार. विल्सनला सांगून पाहिलं, पण तो बोलायला तयार नाही. तुम्हाला जर तुमचा संसार वाचवायचा असेल, तर अंतोनची माहिती द्या, नाहीतर गेला विल्सन फासावर. विचार करा.” – वेळेकर.
विल्सनची बायको विचारात पडली. वेळेकरांनी खरंच तिला पेचात पकडलं होतं.
“या बसा तुम्ही. मला जरा विचार करू द्या.” असं बोलून विल्सनची बायको ट्रॅप मधे फसली. तिने जसं विचार करू द्या म्हंटलं, वेळेकर आणि सावंतांची खात्रीच झाली की या बाईला नक्की बरंच काही माहीत असलं पाहिजे.
“अंतोन सापडला तर त्याला शिक्षा होईल, पण माझा नवरा सुटेल हे कशावरून? याची काय गॅरंटी?” – लीयान्का
“असं बघा मॅडम, विल्सनच्या विरोधात काहीच नाहीये. त्याने अंतोनला सुपारी दिली याचं काहीच प्रूफ नाही. अंतोनने भावेशचा खून केला हे सत्य आहे. विल्सन जर बोलला नाही, तर त्याच्यावर भावेशच्या खुनाचा खटला भरला जाईल. पण अंतोन सापडला, तर विल्सनला काहीच होणार नाही. विचार करा. याउप्पर तुमची मर्जी.” – वेळेकर.
“मला विली शी बोलता येईल?” – लीयान्का
“नाही आत्ता तरी शक्य नाही. वरतून परमिशन घ्यावी लागेल. आम्ही प्रयत्न करू. आणि तुमची भेट घालून देऊ.” – वेळेकर.
लीयान्का थोडा वेळ विचारात गढली, मग म्हणाली,
“पण माझ्या नवऱ्याला तुम्ही अटक केली, आणि आता म्हणता आहात की मी तुमच्यावर विश्वास ठेऊ. कसं शक्य आहे?” - लीयान्का
“यात तुमचाच फायदा आहे. तुमचा संसार वाचेल. विल्सन घरी येईल. पण तुम्हालाच जर विल्सन घरी यायला नको असेल, तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.” - वेळेकर.
“ठीक आहे. मी अंतोनला फोन लावते आणि बोलते त्याच्याशी.” – लीयान्का
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने