Login

किडनॅप भाग ८०

कावेरीच्या अपहरणांने सुरू झालेला तपास आता मानव तस्करी वर येऊन ठेपला होता.
किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
साळुंके सोमनाथ आणि सानप पोलिस कॉनस्टेबल
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
लीयान्का विल्सनची बायको.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय विनयचे वडील
सुभद्राबाई विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
आता निशांत रुपचंदच्या मागावर निघाला. रुपचंद तर हातात नाही आला, पण कावेरी सापडली. वेळेकरांना टीप मिळाली की रुपचंद चा साथीदार गोव्याचा असू शकतो. म्हणून ते गोव्याला गेले. विल्सन ची त्यांच्या घरी चौकशी चालू झाली. निशांतला कळलं की कावेरी भावनगरलाच आहे. आता वाचा पुढे.
भाग ८०
भाग ७९ वरुन पुढे वाचा......
“निशांत, आता तूच सर्व पहिल्यापासून यांना समजेल असं सांग.” – भरूचा.
मग निशांतने पूर्ण कहाणी सांगायला सुरवात केली. कावेरी बदमाशांच्या हातातून निसटली आणि ते टीव्ही फुटेज शोधत शोधत भावनगरला कसे पोचले, इथ पर्यन्त त्याने सांगितलं आणि थांबला.
“बापरे, काय निर्ढावलेले आहेत हे बदमाश! चक्क लग्न करायचं म्हणून पळवली? ते ही ओळख नसतांना? पण मग ती निसटली, तर तिचा पत्ता लागला नाही का? कुठे आहे ते कळलं नाही का?”- सुभद्राबाई.
“कळलं ना. तिचा अॅक्सिडेंट झाला. तिला एका कारने उडवलं. तिचा इतके दिवस पत्ता लागला नाही कारण तिने कॉनटॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही. किंवा ती करूच शकली नाही असं म्हणू आपण.” – निशांत.
“पण असं का?” – विनय.
“कारण ती इतके दिवस कोमात होती.” – निशांत.
थोडा वेळ शांतता पसरली.
“तुम्ही कोणा बद्दल बोलता आहात? उत्तरा बद्दल तर नव्हे?” – सुभद्राबाई.
“बरोबर ओळखलं तुम्ही. तुमची उत्तराच. पण तिचं खरं नाव कावेरी आहे.” – निशांत.
काही वेळ कोणीच बोललं नाही.
“माझं नाव कावेरी आहे? पण याला आधार काय? मला तर काहीच आठवत नाहीये. तुम्ही कसे मला ओळखता?” – कावेरीने विचारले. ती सॉलिड गोंधळली होती.
“मी निशांत. मंगेशचा मित्र. मंगेश आठवतो आहे का? तुझी मोठी बहीण ज्योति आठवते का? विभा आठवते आहे का?” – निशांत.
“नाही मला काहीच उमज पडत नाहीये. कोण आहेत ही सगळी मंडळी? – कावेरी.
“तू बंगलोरला असतांना विभा तुझी रूम पार्टनर होती. ज्योति तुझी सख्खी मोठी बहीण. आणि मंगेश तुझा बंगलोरचा मित्र.” – निशांत.
कावेरी थोडावेळ मेंदूला ताण देत होती, मग म्हणाली की,
“नाही मला काहीच आठवत नाहीये. माझे आई बाबा? ते कुठे आहेत?” – कावेरी.
“मुंबईचे ACP धनशेखर साहेबांना आम्ही इथून गेल्यावर सर्व अपडेट देऊ. मग ते तुझ्या आई बाबांना आज कळवतील” – निशांत.
“चला, एक बरं झालं उत्तराच्या आई बाबांचा पत्ता मिळाला. आता सर्व ठीक होईल. ते इथे येतील आणि आपल्या भेटी होतील काय सुभद्राबाई बरोबर ना?” – धनंजयराव.
मग निशांतने त्यांच्या मोबाइल मधे असलेले तिच्या आई बाबांचे फोटो दाखवले. विभा आणि मंगेश चे पण दाखवले. कावेरीने अर्थातच कोणालाच ओळखले नाही. पण तिच्या डोक्यात चक्र फिरायला लागली होती हे तिच्या चेहऱ्या वरुन दिसत होतं.
“हे बघा तुम्ही कोणीच टेंशन घेऊ नका. आम्ही आज मुंबईला कळवतो, मग अर्थातच कावेरीचे आईवडील इथे यायला निघतील ज्योति कोचीनला राहते, ती केंव्हा येऊ शकेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. आम्ही आता तुझ्या आई वडिलांनाच घेऊन येऊ. मग ठरवू.” – निशांत.
“निशांत साहेब, तुम्ही सर्वांची नावं घेतली, पण सर्वात महत्वाच्या व्यक्ति बद्दल सांगायला विसरलात.” – सुभद्राबाई.
“नाही काकू, सगळ्या संबंधित लोकांची नावं घेतली. फोटो पण दाखवले.” – निशांत.
“अहो, तिच्या नवऱ्याचा फोटो कुठे दाखवला?” – सुभद्राबाई.
“काकू अहो तिचं लग्नच झालेलं नाहीये, मग नवरा कुठून आणू? तिच्याशी लग्न करण्यासाठीच तर तिला पळवण्याचा घाट घातला गेला. पण फेल गेला. कावेरीने अत्यंत धाडसाने स्वत:ची सुटका करून घेतली.” – निशांत म्हणाला.
सुभद्राबाईंना एकदम सुटल्या सारखं झालं. आपल्या चेहऱ्यावरचा आनंद कोणाला दिसू नये म्हणून त्या म्हणाल्या,
“ठीक आहे. सर्वांसाठी चहा करते, आणि काही खायला पण आणते.” असं बोलून त्या स्वयंपाकघरात अंतर्धान पावल्या. धनंजयरावांना त्यांची अवस्था कळली. ते पण तिच्या मागे किचन मधे गेले.
“काय सुभद्राबाई? खुश?” – धनंजयराव.
“हो. खूपच. आता सर्व मना सारखं होईल.” – सुभद्राबाई.
पोलिस स्टेशन वर परत आल्यावर निशांतने वेळेकर साहेबांना फोन करून सर्व अपडेट दिल.
“खूपच चांगली बातमी दिलीस निशांत. तुझं मिशन यशस्वी झालं. म्हणजे आम्हाला खात्री होतीच. तुझ्या हातात एकदा काम आलं की ते पूर्ण करतोसच असाच लौकिक आहे तुझा. असो. आम्ही आत्ताच कावेरीच्या घरी जाऊन त्यांना ही बातमी देतो. आणि काय प्रोग्राम ठरतो, ते तुला सांगतो. तू तो पर्यन्त भावनगरलाच थांब.” – वेळेकर.
“ओके. विल्सन ची चौकशी झाली का? रुपचंद बद्दल काही कळलं का?” – निशांत.
“चौकशी चालू आहे. इतक्या सहजा सहजी तो तोंड उघडेल असं वाटत नाही. पण आम्ही पण गप्प बसणार नाहीये. अरे हो, मंगेश आणि विभाला काय सांगणार आहेस? सांभाळ रे बाबा, अवघड गोष्ट आहे.” – वेळेकर.
“सगळं स्पष्ट सांगून मोकळा होणार आहे. उगाच गोष्टी लोंबकळत ठेवण्यात काही अर्थ नाही. इथलं निपटलं की मीच बंगलोरला जायचा विचार करतो आहे.” – निशांत.
“मला वाटतं की तसं करण्यात फार उशीर होईल. ते लोकं हर्ट होतील. तू त्यांना ताबडतोब भावनगरला बोलावून घे. हॉटेलवर सर्व चर्चा करा, मग सर्वच कावेरीला भेटायला जा. आत्ताच फोन कर.” – वेळेकर.
निशांतने मंगेशला फोन लावला. विभा तिथेच होती.
“काय निशांत एकदम अचानक? काही विशेष?” – मंगेश.
“हो विशेषच आहे. तुम्ही दोघं ताबडतोब भावनगरला या. मिळेल ती फ्लाइट पकडून या.” – निशांत.
“अरे काय हे? सगळं ठीक आहे ना? आणि भावनगर कुठून शोधलं तू? काय घडलं आहे ते सांग. इतक्या तातडीने बोलावतो आहेस म्हणजे नक्कीच काही तरी घडलं आहे. आम्ही येतो. पण काही कल्पना तर दे.” – मंगेश.
“फोन वर नाही सांगता येणार. पण दोघेही ताबडतोब निघा. मी भावनगरलाच आहे. पोचल्यावर फोन करा. मी तुमची रूम माझ्याच हॉटेल मधे बूक करतो आहे.” – निशांत.
***
पोलिस आणि निशांत वगैरे लोकं गेल्यावर, सर्व जण एकत्र होते, पण प्रत्येकाचे चेहरे काही वेगळंच सांगत होते. सुभद्राबाई आणि विनय, कावेरीच लग्न झालं नाही म्हणून आनंदात होते. धनंजयराव कावेरीच्या वडीलांशी बोलतांना कावेरी आणि विनयच्या लग्नाचं सुतोवाच कसं करायचं याचा विचार करत होते. उज्ज्वल आनंदात होता कारण त्याला कावेरी, वहिनी म्हणून खूपच आवडली होती. तशी ती समवयस्क असल्याने त्यांचे विचार चांगले जुळत होते. कावेरी मात्र फार गोंधळली होती. या घडामोडीवर कसं व्यक्त व्हावं हेच तिला काळात नव्हतं.
“काय ग? कसल्या विचारात एवढी गढून गेली आहेस?” – सुभद्राबाई.
“काकू, जे काही माझ्या आयुष्यात घडतंय, त्याचाच विचार करते आहे. आई बाबा येणार म्हंटल्यांवर मला आता त्यांच्या बरोबर जावं लागणार. मला काहीच समजेनासं झालं आहे.” – कावेरी.
“अग, मग त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे?” – सुभद्राबाई.
“मला आई बाबा, माझी बहीण ज्योति, माझं बालपण काहीच आठवत नाहीये. डोकच फिरायची वेळ आली आहे. तुम्ही लोक खूप मोठ्या मनाचे आहात. माझी काहीच ओळख नसतांना मला तुमच्या घरचं सदस्य बनवलं. अजिबात परकेपणा जाणवून दिला नाही की उपकाराची भाषा कधी केली नाहीत. माझा इथून पाय निघणार नाही हो. काय करू मी.” – कावेरी.
“माझ्या जवळ याचं सोल्यूशन आहे. सांगू का?” – सुभद्राबाई.
“काय सोल्यूशन आहे? सांगा न.” – कावेरी.
“तू इथेच रहा कायमची.” – सुभद्राबाई.
“काकू, कसं शक्य आहे ते?” – कावेरी.
“का ग? तुला आवडणार नाही का? अग आम्हाला तुझी इतकी सवय झाली आहे की तू कुठे जाऊच नये असं वाटतं आहे.” - सुभद्राबाई.
“पण हे कसं शक्य आहे? आईबाबा आल्यावर मी आपल्या घरी जाणं हे सयुक्तिक आहे. पण मग मला आनंद का होत नाहीये? काकू काय करू मी सांगा न.”- कावेरी.
“आम्ही बोलू तुझ्या आई बाबांशी. मग तर झालं?” – सुभद्राबाई.
“अहो, पण ते कसे तयार होतील? असं कोणी आपल्या मुलीला दुसऱ्याच्या घरी राहू देतं का?” – कावेरी.
“आमची सून, विनय ची बायको म्हणून येतेस का? अगदी वाजत गाजत तुला याच घरी घेऊन येऊ. तूच ठरव. हे बघ आम्हाला तू हवी आहेस. विनय पण तयार आहे. आता तूच निर्णय घ्यायचा आहे.” – सुभद्राबाई.
सुभद्राबाईंनी अचानक बॉम्ब टाकला होता. अगदी कावेरीच्या मनात होतं तेच त्या बोलल्या होत्या. पण कावेरी ते ऐकून चमकली म्हणजे काकूंच्याही मनात तेच होतं? ती हरखली. ती फॅक्टरीत जायला लागल्या पासून दोघांमधील जवळीक जरा जास्तच वाढली होती. एक कटाक्ष तिने विनय कडे टाकला. त्याच्या चेहऱ्यावर तिला उत्सुकता दिसली. तो तिच्याच कडे एक टक पहात होता. कावेरी लाजली. आणि चेहरा दोन्ही हातात लपवून तिथून खोलीत पळून गेली.
कावेरीची पावती मिळाली होती. आता काहीच अडचण नव्हती. सुभद्राबाईंच्या मनावरचं ओझं उतरलं. त्या म्हणाल्या,
“काय विनय, ठीक आहे ना?” – सुभद्राबाई. विनय काही बोलायच्या आताच उज्ज्वल म्हणाला,
“ठीक आहे का काय? त्याला काय विचारते आहेस. मला विचार. एकदम फिट. मेड फॉर ईच अदर जोडी आहे. फायनल करून टाक.” – उज्ज्वल.
धनंजयरावांनी टाळ्या वाजवल्या.
“सूनबाई, या समोर या. आता एक फर्मास चहा होऊन जाऊ द्या.” – धनंजयराव.
****
धनशेखर आणि वेळेकर इंट्रोगेशन रूम मधे होते. समोर विल्सन होता. चेहरा विदीर्ण झालेला होता.
“आता सध्या रुपचंद कुठे आहे?” – वेळेकर
“आमचा प्लॅन पूर्ण फासला, २५ लाख रुपयांची चोट बसली. तो खूप अस्वस्थ झाला होता. म्हणाला कुठे तरी एक महिना युरोप अमेरिकेमध्ये मधे फिरून येतो. आता नेमका कुठे गेला आहे ते माहीत नाही.” – विल्सन.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →