Login

किडनॅप भाग ७९

कावेरीच्या अपहरणाच्या तपासाने सुरू झालेला तपास आता अंतर राष्ट्रीय मानव तस्करी करणाऱ्या टोळीच्या तपासावर येऊन पोचली
किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
साळुंके सोमनाथ आणि सानप पोलिस कॉनस्टेबल
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
लीयान्का विल्सनची बायको.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय विनयचे वडील
सुभद्राबाई विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
आता निशांत रुपचंदच्या मागावर निघाला. रुपचंद तर हातात नाही आला, पण कावेरी सापडली. वेळेकरांना टीप मिळाली की रुपचंद चा साथीदार गोव्याचा असू शकतो. म्हणून ते गोव्याला गेले. विल्सन ची त्यांच्या घरी चौकशी चालू आहे. आता वाचा पुढे.
भाग ७९
भाग ७८ वरुन पुढे वाचा......
“काय गुन्हा केला त्याने?” – विल्सन.
“भावेशचा खून” – वेळेकर आता थांबायला तयार नव्हते. एक अंधारात बांण सोडला होता त्यांनी. आणि ते आणि सावंत विल्सनच्या चेहऱ्यावरचे फेरफार टिपत होते.
विल्सन भावेशचं नाव ऐकून हादरला. एक भीतीची लहर त्यांच्या चेहऱ्यावर दिसली. पण क्षणातच सावरला. पण वेळेकर आणि सावंतांसाठी तेवढं पुरेसं होतं.
“कोण भावेश साहेब, मी ओळखत नाही. आणि त्याचा खून अंतोन का करेल?”– विल्सन.
“तुमचा मित्र आहे, तुम्ही सांगायचं.” – वेळेकर.
“अंतोन माझा मित्र नाहीये.” – विल्सन.
आता विल्सनची गाडी उताराला लागली होती. अजून एखादा धक्का वेळेकरांनी द्यायचाच अवकाश होता.
जो माणूस मित्र नाही, त्याला तुम्ही आपल्या नावावर मोबाइल आणि सीम घेऊन देता? खूपच दिलदार आहात तुम्ही.” – वेळेकर.
“मी कोणालाही काहीही देईन. कोणाला काही देणं हा गुन्हा आहे का?” – विल्सन.
“नक्कीच नाही. पण तो माणूस खूनी असेल तर? पुछ ताछ तो होगी.“ – वेळेकर.
“मी भावेशचं नावच आत्ता ऐकलं. अंतोनशी माझा इतक्यात काहीच कॉनटॅक्ट नाहीये. झालं समाधान?” – विल्सन.
“रुपचंद कोण आहे? तुम्ही ओळखता त्याला?” – वेळेकर.
“नाही, कोण आहे हा रुपचंद?” – विल्सन.
“भावेशला आणि रुपचंदला तुम्ही ओळखत नाही तरीही त्यांच्या बरोबर प्रवास करता? आणि हॉटेल मधे थांबता?” – वेळेकर.
“उगाच काही बोलू नका. मी तुमची वर तक्रार करेन, कसलाही पुरावा नसतांना तुम्ही माझ्या वर आरोप करण्याचा खोडसाळपणा करता आहात. काय आधार आहे तुमच्या म्हणण्याला? – विल्सन.
“विली तू आता थांबू नकोस. विचार कसला करतो आहेस. कमिश्नर साहेबांना फोन लाव.” विल्सन ची बायको.
वेळेकरांनी भावनगरच्या हॉटेल मधली क्लिप समोर ठेवली.
“आधी ही क्लिप बघा आणि मग कमिश्नर साहेबांशी बोला.” – वेळेकर.
विल्सनने क्लिप बघितली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. पण सावरला.
“ही काही तरी गडबड केली आहे तुम्ही लोकांनी. मला अडकवण्याचा प्रयत्न का करता आहात तुम्ही लोकं, मला समजत नाहीये.” – विल्सन.
“ही दुसरी क्लिप बघा.” – वेळेकरांनी वापीच्या हॉटेल मधली क्लिप समोर ठेवली.
त्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की कावेरीला जितूच्या गाडीतून भावेशच्या गाडीत शिफ्ट केलं होतं. त्यात हॉटेलच नाव पण दिसत होतं. मूनलॅम्प हॉटेल.
“आता बोला. विल्सन साहेब. या गाडीत जी मुलगी आहे ती कोण आहे?” – वेळेकर.
“मला माहीत नाही.” – विल्सन.
“मग ती तुमच्या गाडीत काय करत होती?” – वेळेकर.
ती रुपचंदची बायको आहे. रुपचंद तिला घेऊन आला होता.” – विल्सन.
“आत्ताच तुम्ही म्हणाला की तुम्ही रुपचंदला ओळखत नाही म्हणून. मग त्यांच्या बायकोला कसं ओळखता?” – वेळेकर.
“एखाद्या जोडप्याने जर तुम्हाला लिफ्ट मागितली, तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला लिफ्ट देता. आणि आपल्या गाडीत बसवता. सिम्पल.” – विल्सन.
“म्हणजे तुम्ही भावनगरच्या रस्त्यावर होता, हे कबूल करता आहात. पण भावनगरला पोचल्यावर कावेरी तुमच्या गाडीत नव्हती आणि तुम्ही दोघेही रिक्शा करून बस स्टँड वर गेलांत. पहिल्या क्लिप मधे हेच दिसत आहे.” – वेळेकर.
विल्सन काही बोलला नाही. त्याने आता हार मानली होती.
“विल्सन, भावेश आणि कावेरीचा खून केल्या बद्दल आम्ही तुला अरेस्ट करत आहोत. आता पुढे पोलिस स्टेशनवर गेल्यावरच बोलू.” – वेळेकर.
वेळेकर असं म्हणाल्या बरोबर पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या चढवल्या. विल्सनची बायको चुळबुळ करत होती, पण दोन महिला कॉनस्टेबलनी तिला पकडून ठेवलं. मग सगळी वरात पोलिस स्टेशन मधे पोचली.
वेळेकरांनी धनशेखर साहेबांना फोन करून पूर्ण अपडेट दिलं.
“ठीक आहे. वेळेकर तुमचं अभिनंदन. सावंत साहेबांचे पण आभार. मी आता व्हॅन पाठवण्याची व्यवस्था करतो. तुम्ही सगळी प्रोसीजर करून ठेवा.” – धनशेखर.
दुसऱ्या दिवशी विल्सनला घेऊन वेळेकर मुंबईच्या वाटेवर. रात्री अंधेरीला पोचले. दुसऱ्या दिवशी त्याचा रिमांड घेऊन चौकशीला सुरवात.
“बोल आता सर्व सांगून टाक. कावेरी कुठे आहे? भावेशचा खून का केला?”- वेळेकर
“मला माहीत नाही.” – विल्सन.
सोमनाथ पुढे आला. तो पट्टा काढत होता. त्या आडदांड माणसाला पाहिल्यावर विल्सन गळपटला. त्याच्या लक्षात आलं की तो गोव्याला नसून मुंबईला आहे. आता सरेंडर करण्याशिवाय काही पर्याय नाही.
“सांगतो. मला पाणी द्या.” – विल्सन.
कोणी तरी त्याला पाणी दिलं. पाणी प्यायल्यावर तो बोलायला लागला.
“रुपचंद माझा बॉस. त्याला एका चांगल्या मुलीशी लग्न करायचं होतं.” - विल्सन.
“ती सर्व स्टोरी आम्हाला माहीत आहे. कावेरी कुठे आहे ते सांग.” – धनशेखर.
“मी खरं सांगितलं तर तुमचं विश्वास बसणार नाही.” – विल्सन.
“ते तू काय सांगतो आहेस त्यावर अवलंबून आहे. तू बोल.” – धनशेखर.
“भावनगरच्या वाटेवर भावेशला ब्रेक घ्यायचा होता म्हणून आम्ही १० मिनिटं रस्त्यात थांबलो होतो. कावेरी गुंगीत होती म्हणून आम्ही निरधास्त होतो. पण कावेरी चांगली शुद्धीवर होती. ती संधी साधून पळाली. म्हणूनच भावनगरची जी क्लिप तुमच्याकडे आहे, त्यात कावेरी नाहीये. त्यात आमच्या गाडीला कोणीतरी धडकलं म्हणून आम्ही लगेच पळ काढला” - विल्सन.
यावर वेळेकर काही बोलणार होते, पण त्यांच्या फोनची रिंग वाजली. निशांत हे नाव दिसलं म्हणून धनशेखर आणि वेळेकर केबिन मधे आले.
“बोल निशांत काय खबर? आमच्याकडे पण तुला द्यायला एक जबरदस्त खबर आहे. पण तू आधी बोल.” – वेळेकर.
“साहेब, मी जे सांगणार आहे, ते ऐकून तुम्हारे होश उड जाएंगे.” – निशांत.
“बापरे, आता काय गोंधळ झाला आहे?” – धनशेखर.
“गोंधळ अजिबात नाही. आनंदाची बातमी आहे. कावेरी चा पत्ता लागला आहे.” – निशांत.
“काय सांगतो आहेस? जरा सविस्तर सांग. सुखरूप आहे न ती?” – धनशेखर.
“भावनगर पासून २५-३० किलोमीटर वर तिला एका कारने उडवलं. तिला जखमी अवस्थेत पडलेलं पाहून एका सज्जन माणसाने तिला हॉस्पिटल मधे नेलं. जवळ जवळ तीन महीने ती कोमा मधे होती. गेली चार महीने त्या सज्जन माणसाच्या घरचे सर्व लोक तिची सेवा करत होते. आता ती त्यांच्याच कडे आहे, पण तिची स्मृति सपशेल गेलेली आहे. तिला तिचं नाव पण आठवत नाहीये. आम्ही आता तिलाच भेटायला चाललो आहे.” – निशांत.
“खूपच छान बातमी दिलीस. आता मी काय सांगतो ते ऐक. त्या क्लिप मधे रुपचंद बरोबर जो माणूस दिसतो आहे, त्याला आम्ही काल गोव्यावरून ताब्यात घेतला आहे. विल्सन नाव आहे त्याचं. आत्ताच त्याने कबुली दिली की कावेरी पळाली पण त्यांच्या गाडीने कोणाला तरी उडवलं. म्हणून त्यांना भावनगर वरुन तातडीने पळ काढावा लागला. म्हणजे यांचा अर्थ त्यांनी कावेरीलाच उडवलं पण ते त्यांना अजून माहीत नाही.” – वेळेकर.
****
भरूचा साहेबांनी त्यांच्या मोबाइल मधे असलेला कावेरीचा फोटो दाखवला. फोटो पाहिल्यावर निशांत आणि सरोश दोघही उडालेच.
“ही तर कावेरी. साहेब, हिच्याच शोधात फिरतो आहोत आम्ही.”- निशांत.
“काय सांगा आहात? हीच का ती मुलगी? जीचं अपहरण झालं?”- भरूचा.
“हो साहेब, अचानकच आमच्या प्रयत्नांना यश मिळालं. आता तिला केंव्हा भेटू शकतो आपण तिला?” – निशांत.
“सध्या ती केस आमचे गायकवाड साहेब बघत आहेत. मी फोन करून विचारतो त्यांना. काय आहे, त्या मुलीची सध्या काय परिस्थिती आहे ते त्यांनाच माहीत आहे.” – भरूचा.
मग भरूचा साहेब गायकवाड साहेबांशी बोलले.
“गायकवाड साहेब ती मुलगी ज्यांच्या कडे रहात आहे, त्या विनय साहेबांशी बोलून वेळ ठरवा म्हणताहेत. ते पण त्यावेळेस येतील.” – भरूचा.
“मग आता?” – निशांत.
“मी बोलतो विनय साहेबांशी. आत्ताच बोलतो.” – भरूचा.
“हॅलो, विनय साहेब, मी आणि गायकवाड साहेब तुमच्या घरी येतो आहे. त्यावेळेस तुम्ही सर्वांनी घरी असणं आवश्यक आहे. केंव्हा जमेल?”- भरूचा.
एकदम अचानक? काही गडबड आहे का?” – विनय.
“नाही, गडबड काहीच नाही. क्वार्टरली रीपोर्ट द्यायचा असतो, म्हणून . पण तुम्ही सर्व हजर असायला हवं.” – भरूचा.
ठीक आहे संध्याकाळी सहा साडे सहा चालेल? अर्जंट असेल तर लगेच येतो.” – विनय.
“चालेल. आम्ही साडेसहा पर्यन्त पोचतो. तुम्ही सर्वांना कल्पना देऊन ठेवा.” – भरूचा.
“ठीक आहे, आपण जेवण करून घेऊ, मग तुम्ही हॉटेल वर जा. आम्ही तुम्हाला पिक अप करू.” – भरूचा.
मग जेवताना भरूचा साहेबांनी सर्व डिटेल्स सांगितले. निशांत थक्कच झाला.
“एवढं सगळं घडलं? आणि आम्हाला पत्ता पण नाही. आम्ही याच विचारात की कावेरी जगामधे एखाद्या भलत्याच देशात असेल म्हणून. पण ती सुखरूप आहे हे ऐकून फार बरं वाटलं. आता तिच्या आई वडिलांना ही आनंदाची बातमी देता येईल.” – निशांत.
संध्याकाळी विनय च्या घरी गेल्यावर, सांगितल्या प्रमाणे, घरातले सर्व जण हॉल मधे जमा झालेले दिसले.
“या भरूचा साहेब, गायकवाड साहेब.” विनय. मग चहा पाणी झाल्यावर,
“हे कोण दोघं तुमच्याबरोबर आले आहेत?” – विनय.
“हे निशांत साहेब, हे खाजगी डिटेक्टिव आहेत आणि हे सरोश. मुंबई पोलिस.”- भरूचा.
“खाजगी डिटेक्टिव? साहेब, तुम्ही आमच्यावर पाळत ठेवली होती? आणि मुंबईचे पोलिस कशाला आलेत?” – विनय.
“नाही, तुम्ही समजत आहात तसं काहीच नाहीये. मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तुमच्या सगळ्या शंका दूर होतील.” – भरूचा.
भरूचा साहेब म्हणाले, पण विनय सहित सर्वच अस्वस्थ झाले, मुंबईचे पोलीस का आले आहेत आणि खाजगी डिटेक्टिव चा काय संबंध? हे काही त्यांना उमजत नव्हतं.
“हे निशांत साहेब आज आमच्या ऑफिस मधे आले, आणि तुमच्या उत्तराची केस ही साध्या अपघाताची नसून एक फार मोठं कांड आहे लक्षात आलं.” – भरूचा म्हणाले, आणि त्यांनी निशांतला म्हंटलं,
“निशांत, आता तूच सर्व पहिल्यापासून यांना समजेल असं सांग.” – भरूचा.
मग निशांतने पूर्ण कहाणी सांगायला सुरवात केली.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →