किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
गंगाधरराव विनयचे वडील.
नर्मदा विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
धनंजय विभावरीचे वडील
सुभद्राबाई विभावरीची आई.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
आता निशांत रुपचंदच्या मागावर निघाला. रुपचंद तर हातात नाही आला, पण कावेरी सापडली. वेळेकरांना टीप मिळाली की रुपचंद चा साथीदार गोव्याचा असू शकतो. म्हणून ते गोव्याला गेले. आता वाचा पुढे.
भाग ७८
भाग ७७ वरुन पुढे वाचा......
“जसा रुपचंदने भावनगरच्या धाब्यावर फोन ट्रक मधे फेकला, तसंच याने पण केलं असेल. त्याचा जुना नंबर आपल्याला माहीत नाही. तो कळला तर माझी खात्री आहे की तो सोळा तारखेची लोकेशन भावनगर दाखवेल.” – वेळेकर.
“यस. करेक्ट आहे. चला आता बंगल्यावर जाऊ. तिथे गेल्यावरच सर्व गोष्टींचा उलगडा होईल..” – सावंत.
“थांबा सावंत. एक अर्धा तास आपण थांबू.” – वेळेकर.
“का? काय झालं?” – सावंत.
पण वेळेकर फोन लावत होते. सावंत थांबले. पण त्यांनी त्यांच्या असिस्टंट ला सांगितल, की बघा जरा काही माहिती मिळते का या साहेबांची.
“साळुंके, रुपचंदचा फोन बंद भावनगरला बंद पडला, त्यावेळेस आपण त्यांच्या फोनचे कॉल लॉगस मागवले होते. ते कॉल्स तपासा, आणि त्यात जर कोणी विल्सन नावाच्या माणसाचा फोन असेल, तर त्याचा नंबर घ्या आणि त्यांचे टॉप अर्जंट बेसिस वर कॉल लॉगस आणि लोकेशन मागवून घ्या. ताबडतोब करा. आणि सांगा.” – वेळेकर. सावंत ऐकत होते, त्यांच्या लक्षात आलं. वेळेकर काय करताहेत ते. म्हणाले,
“विल्सन ची चार महिन्या पूर्वीची लोकेशन मिळाली की मग जायचं म्हणता?” – सावंत.
“मला आत्ताच सुचलं. काल सुचलं असतं तर आजचा वेळ वाया नसता गेला. पण तुम्हाला काय वाटतं.” – वेळेकर.
“एकदम बरोबर. जर ते भावनगरच्या आसपास असतील, तर विल्सनला पुराव्या निशी पकडणं सोपं होईल. आपण थांबूया. एकदा तो हातात आला की रुपचंद आणि कावेरीची सगळीच माहिती मिळेल. ” – सावंत म्हणाले. मग त्यांनी पोलिस पार्टी ला फोन करून सांगितलं की ते नवीन फोर्स पाठवत आहेत, ते तुम्हाला मोकळं करतील.
एक वाजण्याच्या सुमारास साळुंकेने whatsapp वर मेसेज पाठवला. त्यात विल्सनच्या जुन्या नंबरचे कॉल लॉगस होते. लोकेशन होते. लोकेशन भावनगरचे होते. वेळेकरांनी ते सावंतांना दाखवले.
“वंडरफूल. आता वेळेकर हा सगळा गुंता सुटलाच म्हणून समजा. चला. पण आधी मी आपल्या टीमला फोन करतो.” – सावंत साहेबांनी त्यांच्या टीमला फोन केला.
“कोणीही घराबाहेर अजून तरी पडलं नाहीये.” – एक पोलिस.
“साहेब, मी चौकशी केली. माहिती काढली. या विल्सन साहेबांचा कुठेही रेकॉर्ड नाहीये. आणि आपल्या टीमने बंगल्याचा जो फोटो पाठवला आहे, त्यावरून सर मला वाटतं की ही एक मोठी आसामी दिसते आहे. जरा सावधगिरीच बाळगावी लागेल. चौकशी जरा हलक्यानेच घ्यावी लागेल.” - PSI
“ठीक आहे. तिथे गेल्यावर पाहू काय वातावरण आहे ते.” – सावंत.
वेळेकर आणि सावंत जेंव्हा विल्सन व्हीला ला पोचले तेंव्हा दुपारचे तीन वाजले होते.
“बंगल्याला मागे आणि बाजूला काही गेट किंवा दरवाजा असेल तर बघा आणि असला तर एक जण तिथे पहारा द्या. कोणीही पळून जाता कामा नये.” – सावंत.
सावंतांनी पुढे होऊन बेल दाबली. विल्सनच्या तरुण मुलीने दार उघडलं. दारात पोलिस पाहून ती दचकलीच.
“कोण हवय तुम्हाला?” – मुलगी
“विल्सन साहेब आहेत का? त्यांना भेटायचं आहे.” – सावंत.
“काय काम आहे?” – मुलगी.
“त्यांनाच बोलवा. त्यांच्याशीच काम आहे. तुमच्याशी नाही.” – सावंत.
“बाबा बाथरूम मधे आहेत. तुम्ही नंतर या.” – मुलगी.
“ठीक आहे आम्ही बसतो त्यांचं आटोपे पर्यन्त. नो प्रॉब्लेम.” असं म्हणून सावंत घरात शिरले.
“कोण आलंय?” विल्सनची बायको असं विचारात बाहेर आली. पोलिस पाहून तिला आश्चर्य वाटल्याचं दिसलं नाही.
“काय काम आहे? साहेब घरात नाहीयेत. तुम्ही उद्या या.” – बायको.
“कुठे गेले आहेत? पत्ता द्या. आम्ही तिथे जाऊन भेटू त्यांना.” -सावंत.
“मी त्यांची बायको, काय काम आहे ते मला सांगा.” – बायको.
सावंतांनी वेळेकरांकडे पाहीलं. बाई तयार दिसते आहे असाच त्या पाहण्याचा अर्थ होता. वेळेकरांच्या पण ते लक्षात आलंच होतं. त्यांनी नजरेच्या इशाऱ्यानेच पावती दिली.
“तुमची बाथरूम घराच्या बाहेर आहे का?” – सावंत.
“हे बघा फालतू प्रश्न विचारायचे नाहीत. तुम्हाला जड जाईल. तुम्ही उद्या या.”- बायको.
“ते येई पर्यन्त आम्ही थांबतो. आम्हाला काही चौकशी करायची आहे.” – सावंत.
“जे काही असेल, ते मला विचारा.” – अतिशय ताठर आवाजात विल्सनची बायको म्हणाली.
“ठीक आहे. तुम्ही उत्तर देणार म्हंटल्यांवर प्रश्नच मिटला.” असं म्हणून सावंत सोफ्यावर बसले. वेळेकर पण बसले. एक महिला पोलिस बायकोच्या बाजूला आणि एक मुलीच्या बाजूला उभी राहिली.
“हा काय प्रकार आहे? या महिला पोलिसांना बाहेर जायला सांगा.” – बायको.
“आम्ही सगळेच जाऊ. तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, आम्ही निघून जाऊ.”– सावंत.
“ठीक आहे. विचारा काय विचारायचं ते” – बायको.

“ही कसली चौकशी आहे? काय संबंध आहे? असले प्रश्न विचाराल तर मी तुमची वर तक्रार करेन. तुम्हाला भारी पडेल.” – बायको.
“तुमची मुलगी म्हणाली की बाबा बाथरूम मधे आहेत. तुम्ही म्हणता आहात ते बाहेर गेले आहेत. म्हणून विचारलं बाथरूम बाहेर आहे का?” – वेळेकर.
विल्सनची बायको मुलीकडे जळजळीत नजरेने बघत होती. म्हणाली,
“तू आत जा. उगाच काही बडबड करू नकोस. निघ जा बेडरूम मधे जा.” – बायको.
“आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही.” - वेळेकर.
“बाथरूम घरातच आहे. पण साहेब बाहेर गेले आहेत. तुम्ही मला विचारा.” – बायको.
“मुंबईत ज्या टॅक्सीत साहेब बसले होते, त्याच्या समोरच्या टॅक्सीला अपघात झाला होता, त्यासाठी साहेबांची साक्ष घ्यायची आहे. हे साहेब, मुंबईवरून त्या साठीच आले आहेत. – सावंत.
“साहेबांच्या गाडीला अपघात झाला होता? मला कसं माहीत नाही?” – बायको.
“अपघात दुसऱ्या गाडीचा झाला होता. साहेबांना काही झालं नव्हतं म्हणून सांगितलं नसेल. द्या पत्ता द्या. कुठे गेले आहेत साहेब?” – वेळेकर.
हे विल्सनने का सांगितलं नाही? विल्सनची बायको विचार करत होती. कदाचित विसरला असेल असा विचार करून ती म्हणाली,
“मी फोन करून बोलावून घेते.” – बायको.
जरा दूर जाऊन विल्सनच्या बायकोने फोन केला.
“विली तुझ्या समोर एका गाडीला मुंबईला अॅक्सिडेंट झाला हे तू मला सांगितलं नाही.” – बायको.
“अॅक्सिडेंट? नाही असं काही झालं नाही.” – विल्सन.
“मुंबई पोलिस तुझी साक्ष घ्यायला आले आहेत. तू अपघात झाला त्यांच्या मागच्या गाडीत होतास असं त्यांचं म्हणण आहे.?” बायको.
“काय भानगड आहे कळत नाही. पण ठीक आहे मी आलोच.” – विल्सन.
विल्सन खाली आला.
“या विल्सन साहेब. आम्ही तुमचीच वाट बघत होतो.” – सावंत.
“तुम्ही १६ एप्रिलला काय करत होता?” – वेळेकर.
“हे कोण? यांना कधी इथे पाहील्याचं आठवत नाही.” – विल्सन.
“हे वेळेकर साहेब, मुंबई पोलिस. यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या.” – सावंत.
“आता चार महिन्या पूर्वी मी काय करत होतो हे एकदम कसं सांगता येईल.” – विल्सन
“आठवून बघा, नसेल आठवत तर आम्ही काही मदत करू का?” – सावंत.
“तुम्ही काय मदत करणार?” – विल्सन.
“१६ एप्रिल ला तुम्ही भावनगरला होता?” – वेळेकर.
“मी? नाही. मी भावनगरला कधीच गेलो नाही. माझं काम इथे गोवा आणि मुंबईलाच असतं.” – विल्सन.
“तुमच्या जवळ जो मोबाइल आहे तो तुम्ही कुठे घेतला?” – वेळेकर.
“काय प्रश्न आहे? हँडसेट आवडला, घेतला. कुठे वगैरे आठवत नाही.” – विल्सन.
“त्याच वेळेस तुम्ही नवीन सीम पण घेतलं. ते का? जुन्या सिम ला काय झालं होतं? ते का बदललं? ” – वेळेकर.
“तुम्ही कुठल्या तरी गाडीला अपघात झाला होता आणि त्याबद्दल चौकशी करायला आला होता. मग हे प्रश्न का विचारता आहात?” – विल्सन.
“ते आम्ही विचारूच. पण आधी आमच्या प्रश्नांना उत्तर द्या.” – वेळेकर.
विल्सन काही बोलला नाही.
“तूमचा जुना फोन नंबर काय होता?” – वेळेकर.
“हाच नंबर आहे साहेब माझा. तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे.”- विल्सन.
“तुमचा हा नंबर २० एप्रिल ला सुरू झाला आहे, त्या अगोदरचा जो नंबर होता, तो १६ एप्रिल ला बंद झाला आहे. आमच्या जवळ तुमच्या दोन्ही नंबरचे कॉल लॉगस आहेत. तेंव्हा आता तुम्ही खरं खरं सगळं सांगून टाका.” – वेळेकर.
“कोणच्या नंबर बद्दल तुम्ही बोलता आहात?”- विल्सन.
वेळेकरांनी नंबर सांगितला.
“हा आत्ता आठवलं. मी माझ्या एका मित्राला सीम घेऊन दिलं होतं. तो गेला असेल भावनगरला. पण मला कल्पना नाही.” – विल्सन.
“बरोबर आहे. मान्य आहे. पण विल्सन साहेब, तुम्ही दिलेला फोन स्विच ऑफ का येतो आहे?” - सावंत.
“तो माझा मित्र परदेशात गेला आहे, म्हणून असेल कदाचित.” – विल्सन.
“ठीक आहे. हे पण आम्ही समजू शकतो. काय नाव आहे तुमच्या मित्राचं?”- वेळेकर.
“अंतोन. अंतोन नाव आहे त्याचं.” – विल्सन म्हणाला, पण लगेच त्याने जीभ चावली. अंतोनचं नाव घेऊन माती खाल्ली होती त्याने
“स्विच ऑफ होऊन चार महीने झालेत. अजूनही तुमचा मित्र परदेशात आहे?” – सावंत.
“मला कसं माहीत असणार साहेब. माझा आणि त्याचा गेले किती तरी दिवस कॉनटॅक्ट नाहीये.” – विल्सन.
“ठीक आहे. त्याचा पत्ता द्या कदाचित आला असेल, तर त्याला विचारू.” – वेळेकर.
“त्याला कसं काय विचारणार तुम्ही? तो परदेशात आहे.” – विल्सन.
“कसं आणि काय विचारायचं ते आम्ही बघू, तुम्ही पत्ता आणि असेल तर फोटो द्या. मग आम्ही निघतो.” – वेळेकर म्हणाले.
“मला पत्ता माहीत नाही आणि फोटो पण नाही.” – विल्सन.
“तुम्ही ज्याला मोबाइल आणि सीम आपल्या नावावर घेऊन देता, त्याचा पत्ता तुम्हाला माहीत नाही यावर कसा विश्वास ठेवायचा? – सावंत.
“साहेब, होतं कधी कधी असं. मित्र दुरावतात.” – विल्सन.
“असं काय घडलं की चारच महिन्यात तुमचा मित्र दुरावला?” – वेळेकर.
“साहेब, ही माझी व्ययक्तिक बाब आहे.” – विल्सन.
“तुमचे संबंध दुरावले असं तुम्ही म्हणता आहात, तर तुम्हाला कसं कळलं की तो अजूनही परदेशात आहे?” – वेळेकर.
“बातम्या कळत असतात. जग फार छोटं आहे.” – विल्सन.
“ठीक आहे तुमच्या या छोट्या जगाची माहिती द्या. आम्ही त्यांना अंतोन बद्दल विचारू” – वेळेकर.
“माझा फोन कोणीही वापरेल, त्यांच्याशी तुम्हाला काय कर्तव्य आहे? कोणाला फोन देणं हा गुन्हा आहे का?” – विल्सन.
“नक्कीच नाही. पण त्याने गुन्हा केला असेल, तर त्याच्या बद्दल चौकशी करणं हा आमच्या तपास कामाचाच भाग आहे.” – वेळेकर.
“काय गुन्हा केला त्याने?” – विल्सन.
“भावेशचा खून” – वेळेकर आता थांबायला तयार नव्हते. एक अंधारात बांण सोडला त्यांनी. आणि ते आणि सावंत विल्सनच्या चेहऱ्यावरचे फेरफार टिपत होते.

क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने