किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
गंगाधरराव विनयचे वडील.
नर्मदा विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
धनंजय विभावरीचे वडील
सुभद्राबाई विभावरीची आई.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
विनयने कावेरीला नर्सिंग होम मधे शिफ्ट केलं. पण नर्मदा बाई तिथे दिवसभर बसायची. भरूचा साहेबांनी त्यांना दिवसभर बसता येणार नाही असं सांगितलं. कावेरीला घरी शिफ्ट केलं. तिला शुद्ध आली. मंगेश आणि विभाचा साखरपुडा पण झाला. आणि आता निशांत रुपचंदच्या मागावर निघाला. रुपचंद तर हातात नाही आला, पण कावेरी सापडली. आता वाचा पुढे.
भाग ७७
भाग ७६ वरुन पुढे वाचा......
निशांतने रुपचंद आणि विल्सन चे फोटो वेळेकरांना पाठवले. ते वेळेकरांनी मुंबई मधे सर्क्युलेट केले. चार पांच दिवसांनी अंधेरी पोलिस स्टेशन मधे संध्याकाळी एक पोलिस इंस्पेक्टर आला. डेस्क वर परब होते. यूनिफॉर्म मधले इंस्पेक्टर साहेब बघून ते समोर आले.
“मी इंस्पेक्टर व्हीन्सेंट डिमेलो. काला चौकी पोलिस स्टेशन. वेळेकर साहेबांना भेटायचं आहे.” – व्हीन्सेंट
परब त्यांना वेळेकर साहेबांकडे घेऊन गेला.
“बसा साहेब. मी वेळेकर. काय काम काढलं?” – वेळेकर.
“साहेब, तुम्ही दोन फोटो पाठवले होते. त्यातला निळा शर्ट असलेल्या माणसा बद्दल काही सांगायचं आहे.” – व्हीन्सेंट
वेळेकरांनी ते दोन्ही फोटो काढले आणि व्हीन्सेंट समोर ठेवले.
“हा साहेब, या माणसाकडे बघा. याची हेअर स्टाइल बघा.” – व्हीन्सेंट
“काय विशेष आहे “ – वेळेकर.
“ही सध्या गोव्या मधे एकदम फेमस स्टाइल आहे. म्हणजे हा माणूस गोव्याचा असेल. मी हे सांगतो आहे त्याचं कारण मी गोव्याचा आहे. आत्ताच दोन एक महिन्या पूर्वी मी घरी गेलो होतो. हा बघा माझ्या भाच्याचा फोटो. सेम हेअर स्टाइल.” - व्हीन्सेंट
“असं असेल तर गोवा पोलिसांना अलर्ट करावं लागेल.” – वेळेकर.
“करेक्ट आहे. म्हणूनच मी इथे आलो. म्हणजे मी फोनवर सांगू शकलो असतो, पण मी इथे जवळच कांदिवलीला राहतो. म्हणून जाता जाता इथे आलो.” - व्हीन्सेंट
“थॅंक यू व्हेरी मच सर. खूप खूप आभार.” – वेळेकर.
“आणि साहेब, काय भानगड आहे हो, हे कळेल का?” - व्हीन्सेंट
मग वेळेकरांनी कावेरी प्रकरणाचा सर्व इतिहास उलगडून सांगितला.
“ठीक आहे साहेब, माझी काही मदत लागली तर जरूर सांगा. खतरनाक केस दिसते आहे.” - व्हीन्सेंट
वेळेकर धनशेखर साहेबांकडे गेले आणि त्यांना व्हीन्सेंट काय म्हणाला ते सांगितलं. “गोवा पोलिसांना हे फोटो पाठवून देतो. काही सुगावा लागला तर चांगलंच आहे. बाकी अशी हेअर स्टाइल आजकाल सर्वच पोरं करतात. ही काही गोव्याची मक्तेदारी नाहीये. तुम्हाला काय वाटतं साहेब?” – वेळेकर.
“हे तर खरंच आहे, पण गोव्याला ही पद्धत जास्त प्रचलित असेल, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? त्या व्हीन्सेंट ने इथे येऊन सांगितलं तर त्याचा काही मान तर ठेवलाच पाहिजे. कळवून टाका गोवा पोलिसांना.” – धनशेखर.
“नाही तर असं करा, वेळेकर तुम्ही स्वत: गेला, तेंव्हाच भावेशचा पत्ता लागला. तुम्ही गेलात तेंव्हाच त्याचा खून झाला हे कळलं. मला असं वाटतं की तुम्ही स्वत:च गोव्याला जा. मला पक्का विश्वास आहे की तुम्हाला यश मिळेल.” – धनशेखर.
वेळेकर रात्रीच निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याला पोचले. व्हीन्सेंट चा एक मित्र इंस्पेक्टर होता. त्याला जाऊन भेटले.
“नमस्कार. सावंत साहेब. मी इंस्पेक्टर वेळेकर. अंधेरी पोलिस स्टेशन.” – वेळेकर.
“हो, या मला थोडी कल्पना दिली आहे व्हीन्सेंट ने. काय करू शकतो मी?” – सावंत
मग वेळेकरांनी पूर्ण प्रकरणाची संक्षेपात कल्पना सावंत साहेबांना दिली. आणि विल्सनचा फोटो दाखवून म्हणाले की,
“या माणसाचा शोध घ्यायचा आहे. नाव माहीत नाही.” – वेळेकर.
“हा माणूस गोव्यात आहे का?” – सावंत.
“माहीत नाही. हा व्हीन्सेंटचा अंदाज आहे.” मग व्हीन्सेंट ची थियरी वेळेकरांनी सावंत साहेबांना सांगितली. सावंत थोडा वेळ फोटो निरखून बघत होते.
“व्हीन्सेंट म्हणाला ते खरं आहे. ही सध्या चालत असलेली हेअर स्टाइल आहे, पण एवढ्यांवरून कसं शोधणार या माणसाला? खबरी लावावे लागतील, पण चटकन होणारं काम नाहीये हे.” – सावंत.
वेळेकर विचारात पडले. सावंत म्हणाले त्यात तथ्य होतं. आणि वेळेकरांनी यांचाही विचार केलाच होता. ते म्हणाले,
“सावंत साहेब, हा माणूस एका मोठ्या रॅकेट च्या वरच्या वर्तुळात वावरणारा माणूस आहे. असे लोकं समाजात आपली प्रतिमा अगदी स्वच्छ ठेवतात. हा माणूस नक्कीच उच्चभ्रू लोकांच्या वस्तीत रहात असला पाहिजे.” – वेळेकर.
“बरोबर आहे. तुम्ही काही योजना घेऊन आला आहात का?” – सावंत.
“हो, सांगतो तुम्हाला. शहरात उच्चभ्रू लोकांच्या वस्त्या असतील तिथे खबरी लावायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन ची मतदार यादी तपासायची. त्यावर मतदारांचे फोटो असतात. फोटो क्वालिटी फारशी चांगली नसते, पण बघावं लागेल. त्या साठी मतदार यादी मागवावी लागेल. पीडीएफ कॉपी मिळाली तर झूम करून बघता येईल. ” – वेळेकर.
“ठीक आहे. करू आपण हे काम.” – सावंत.
सावंत साहेबांनी चार खबरी लोकांना फोटो देऊन सर्व उच्चभ्रू लोकांच्या वस्त्या धुंडाळून काढायला सांगितलं आणि मतदार यादी मागवली. दुसऱ्या दिवसांपासून सावंत, वेळेकर आणि दोन पोलिस कम्प्युटर वर यादी तपासायला बसले. एक करा, सावंत साहेब सांगत होते,
“फोटो वरुन माणूस अँग्लो इंडियन वाटतो आहे. त्यामुळे मराठी, मालवणी कानडी माणसं बघू नका.” – सावंत.
तो दिवस तसंच गेला. दुसऱ्या दिवशी, विल्सनच्या फोटोशी मिळती जुळती ३ नावं मिळाली. त्यांचे पत्ते घेतले आणि त्या एरियात जे खबरी होते, यांना हे फोटो पाठवून दिले. खबरी त्यांच्या मागावर गेले. संध्याकाळी एकाने जवळून काढलेला फोटो पाठवला. विल्सनचा आणि आत्ता हातात आलेला फोटो सावंत आणि वेळेकर अगदी काळजी पूर्वक बघत होते.
“काय वाटतं वेळेकर तुम्हाला? हा माणूस आहे?” – सावंत.
“नाही, केसांचं वळण सारखं आहे, पण चेहऱ्याची बाकी ठेवण जुळत नाही. नाक, कान, हनुवटी काहीच जुळत नाही.” – वेळेकर.
“करेक्ट. मलाही हेच वाटतं आहे.” – सावंत. फोटो रीजेक्ट.
दुसऱ्या दिवशी इतर दोघांचे फोटो आले, ते ही रीजेक्ट झाले. यादी तपासणं चालूच होतं. दोन दिवस वाया गेले होते. तिसऱ्या दिवशी एका खबरीचा फोन आला.
“साहेब मी ज्या घरासमोर उभा आहे, त्या घरातून एक माणूस फॅमिली बरोबर बाहेर पडला आहे. मी त्याचा फोटो पाठवतो आहे, सेम टु सेम माणूस आहे साहेब.” – खबरी.
वेळेकर आणि सावंत फोटो पहात होते. आणि त्यांची पण खात्री पटली की हाच माणूस आहे म्हणून. सावंतांनी लगेच खबरीला फोन लावला.
“घराचा पत्ता आणि लोकेशन पाठव. कोणाचं घर आहे हे कळलं का?” – सावंत.
“गेट वर विल्सन विला अशी पाटी लावली आहे साहेब.” – खबरी.
“आत्ता तो माणूस बाहेर गेला आहे ना? त्यांची वाट पहात तू तिथेच थांब. जसा तो येईल, मला ताबडतोब फोन कर.” – सावंत.
“काय वेळेकर, काय म्हणता?” – सावंत.
“आपला शोध यशस्वी होणार. व्हीन्सेंटने अंधारात मारलेला बाण बरोब्बर लक्षवेध करणार बघा.” – वेळेकर.
“हीच तर कमाल आहे पोलिस खात्याची. बारीक सारिक गोष्टी सुद्धा लक्षात राहतात, आणि कामाला पण येतात.” – सावंत.
“खरं आहे.” – वेळेकर.
“विल्सन नाव बघा मतदार यादीत. हा पत्ता घ्या.” यादी बघणाऱ्या लोकांना सावंत साहेबांनी सांगितलं.
विल्सनचं नाव मिळालं.
“आता सायबर ऑफिस ला संपर्क करा. आणि त्याचा मोबाइल नंबर शोधा. आणि नंबर मिळाल्यावर गेल्या चार महिन्यातले कॉल रेकॉर्डस आणि लोकेशन काढा. ” – सावंत.
मग वेळेकर आणि सावंत वाट पहात बसले. ते आणि चार पोलिस आणि दोन महिला पोलिस थांबले. घरी न जाता तिथेच जेवण मागवलं. रात्रीचा एक वाजला सावंत साहेबांनी खबरीला फोन केला.
“काय रे, तू पाळतीवर आहेस हे त्या साहेबाला कळलं तर नाही? रात्रीचा एक वाजला आहे, अजून परतला नाही? तुला मध्येच झोप तर आली नव्हती?” – सावंत.
“काय साहेब, अश्या कामाच्या वेळेस कोण झोपतं? अजून त्यांचं गॅरेज पण रिकामंच आहे. मी लक्ष ठेऊन आहे. घरात अंधार आहे. सर्व फॅमिलीच बाहेर गेली आहे साहेब. काही तरी फंक्शन असेल साहेब. डांस असेल, वेळ लागतो साहेब.” – खबरी.
पहाटे चार वाजता खबरीचा फोन आला.
“साहेब, पार्टी घरी आली आहे.” – खबरी.
ठीक आहे मी पोलिस पार्टी पाठवतो आहे. ते आल्यावर तू जा.” – सावंत.
“काय करायचं साहेब? आत्ताच जायचं की त्यांना गाढ झोप लागल्यावर जायचं म्हणजे सकाळी आठ साडे आठ वाजता? आपल्याला फक्त संशय आहे. तो जर सभ्य माणूस निघाला, तर त्याला रात्री जाऊन त्रास देणं आपल्याला भारी पडेल.” – सावंत.
वेळेकरांनी संमती दिली. मग सावंत साहेबांनी एक सहा जणांची टीम तयार केली आणि सांगितलं. “
“घराच्या जवळच व्हॅन उभी करा, आणि घरावर लक्ष ठेवा. हा माणूस जर बाहेर निघत असेल तर त्याला रोका. आणि आम्हाला फोन करा.” – सावंत.
सकाळी साडे आठ वाजता सावंतांनी पोलिस पार्टीला फोन केला.
“साहेब, अजून बंगल्यात काही हालचाल दिसत नाहीये.” – एक पोलिस
मग वेळेकर आणि सावंत फ्रेश होऊन नाश्ता करून सकाळी दहा वाजता पोलिस स्टेशन वर पोचले. सायबर ऑफिस कडून अजून लोकेशन बद्दल काहीच उत्तर आलं नव्हतं.
सावंतांनी पुन्हा पोलिस पार्टीला फोन केला.
“नाही साहेब अजूनही बंगल्यात जाग दिसत नाहीये.” – एक पोलिस.
“गॅरेज मधे गाडी आहे का?” – सावंत.
“हो साहेब.” – एक पोलिस.
साडे अकरा वाजता सायबर ऑफिस मधून अपडेट आलं. सीम एप्रिलच्या २० तारखेला अॅक्टिवेट झालं होतं आणि लोकेशन गोवा होतं.
“काय समजायचं आता?” – सावंत.
“जसा रुपचंदने भावनगरच्या धाब्यावर फोन ट्रक मधे फेकला, तसंच याने पण केलं असेल. त्याचा जुना नंबर आपल्याला माहीत नाही. तो कळला तर माझी खात्री आहे की तो सोळा तारखेची लोकेशन भावनगर दाखवेल.” – वेळेकर.
“यस. करेक्ट आहे. चला धाड टाकू बंगल्यावर.” – सावंत.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने