किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
गंगाधरराव विनयचे वडील.
धनंजय विनयचे वडील.
सुभद्रा विनयची आई.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
धनंजय विभावरीचे वडील
सुभद्राबाई विभावरीची आई.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
विनयने कावेरीला नर्सिंग होम मधे शिफ्ट केलं. पण नर्मदा बाई तिथे दिवसभर बसायची. भरूचा साहेबांनी त्यांना दिवसभर बसता येणार नाही असं सांगितलं. कावेरीला घरी शिफ्ट केलं. तिला शुद्ध आली. मंगेश आणि विभाचा साखरपुडा पण झाला. आणि आता निशांत रुपचंदच्या मागावर निघाला. रुपचंद तर हातात नाही आला, पण कावेरी सापडली. आता वाचा पुढे.
भाग ७६
भाग ७५ वरुन पुढे वाचा......
कावेरी आता बदललेल्या वातावरणाला सरावत होती. स्मृति तर परत आली नव्हती, पण डॉक्टर म्हणाले की हळू हळू आठवेल. काउन्सेलिंग मात्र चालू ठेवा. तो एकाच उपाय आहे.
एक दिवस सकाळी नाश्ता करतांना कावेरी विनयला म्हणाली,
“मी येऊ का तुमच्या बरोबर फॅक्टरी मधे?” – कावेरी.
“तू येऊन काय करणार तिथे?” – विनय.
“मला काहीतरी काम द्या. तुम्ही देवमाणसं आहात. माझ्या सारख्या नाव गाव पत्ता माहीत नसलेल्या मुलीला आपलं मानलं. पण माझी कुचंबणा होते आहे. मी काम करेन.”– कावेरी
“तुझं शिक्षण काय झालं आहे ते आपल्याला माहीत नाही मग कुठलं काम देणार तुला? म्हणजे तू अशिक्षित आहेस असं मी म्हणत नाही, तुझ्या हालचाली वरुन आणि वागण्यावरून हे लक्षात येतं आहे की तू नक्कीच उच्च शिक्षित आहेस. पण विषय कोणचा हे माहीत नाही. तू डॉक्टर आहेस, का इंजीनियर आहेस का अजून कुठल्या विषयात पारंगत आहेस हे कसं कळणार?” – विनय.
“तुम्ही आत्ता जे म्हणालात, त्या हिशोबाने मला बेसिक ज्ञान तर नक्कीच आहे. असंही होऊ शकतं की एखादी गोष्ट पाहिल्यावर मला कळेल की या विषयातलं आपल्याला ज्ञान आहे. निदान एक पाऊल तर पुढे पडेल.” – कावेरी.
“ठीक आहे. तुझ्या बोलण्यात दम आहे. चल तू.” – विनय म्हणाला पण मग म्हणाला,
“पण अशी बिना नावाची कशी तुला बाहेर घेऊन जाऊ? सर्वांच्या सोई साठी घरात आम्ही तुला बेबी म्हणतो, पण बाहेर कसं चालेल ते?” – विनय.
“माझं बारसंच करायची वेळ आली आहे बहुतेक.” – कावेरी म्हणाली आणि हसली. तिचं ते निखळ हास्य बघून, कावेरीची गाडी हळू हळू रुळावर येते आहे असं वाटून, सर्वांनाच आनंद झाला.
“गुड आयडिया. आत्ताच ठरवू नाव आपण. काय बेबी?” – उज्ज्वल.
“खरंच नाव पाहिजे बाई काहीतरी. त्याशिवाय काही मजा नाही.” – सुभद्राबाई.
“एक काम करा. आज तुम्ही चर्चा करून नाव ठरवा, मग उद्या मी हिला ऑफिस मधे घेऊन जाईन.” – विनय.
“एक गोष्ट अजून. सुभद्राबाई, ही मुलगी ऑफिसला जाणार म्हणते आहे, तर तिच्या जवळ साजेसे कपडे आहेत का? असं करा आज दुपारी तुम्ही दोघी जाऊन बाहेर वापरण्यासाठी तिच्या आवडीची खरेदी करा. या घरच्या कपड्यात थोडीच तिला ऑफिस मधे जाता येणार आहे.” – धनंजयराव
दिवसभर नावांचीच चर्चा चालू होती. जेवण झाल्यावर सुभद्राबाई आणि कावेरी जाऊन खरेदी आटोपून आल्या. सुभद्राबाईंनी भरपूर खरेदी केली. कावेरी खूप संकोचली होती. “माझ्या साठी कशाला एवढा खर्च करता काकू? आधीच तुमचे इतके उपकार आहेत माझ्या डोक्यावर. माझ्या मागच्या जन्माच्या पुण्याई मुळेच तुमच्या सारखी माणसं मला भेटली. पण माझ्यावर इतका खर्च नका करू. माझा जीव दडपतो.” – कावेरी.
“तू जास्त विचार करू नकोस. अग हे ऋणानुबंध असतात. आम्ही तुला परकं समजतच नाही. तू आमचीच आहेस.” – सुभद्राबाई.
कावेरी काही बोलली नाही तिने मनोमन देवाला हात जोडले.
“तुला कोणचं नाव आवडेल?” – सुभद्राबाई.”
“तुम्ही जे ठरवाल ते चालेल मला.” – कावेरी.
“माझ्या मनात एक नाव आहे.” – सुभद्राबाई.
“सांगा न.” – कावेरी.
“उत्तरा. हे नाव कसं वाटतंय तुला?” – सुभद्राबाई.
“छानच आहे. आवडलं मला.” – कावेरी.
“ठीक तर मग. हे नाव फायनल.” – सुभद्राबाई.
संध्याकाळी धनंजयराव आणि सुभद्राबाई फिरायला बाहेर पडले, तेंव्हा सुभद्राबाईंनी धनंजयरावांना दुपारचा प्रसंग सांगितला. खरेदी बद्दल आणि नाव काय ठरवलं त्याबद्दल पण सांगितलं.
धनंजयराव चमकले. तसा त्यांनी हे आज ना उद्या होणारच असा अंदाज बांधलाच होता. ते म्हणाले म्हणाले,
“उत्तरा नाव ठेवण्या मागे काय राजकारण आहे?” – धनंजयराव
“कसलं राजकारण? मला हे नाव आठवलं आणि आवडलं म्हणून विचारलं” – सुभद्राबाई.
“मी काही तुला आज ओळखत नाही. तुझ्या मनात काय चाललं आहे यांचा अंदाज आला आहे मला. खरं काय ते सांगून टाक, आणि मोकळी हो.” – धनंजयराव
“काही नाही हो, तुम्ही उगाच तर्क करत नका बसू.” – सुभद्राबाई.
“उत्तरा हे सुभद्रेच्या सुनेचं नाव होतं बरोबर ना?” – धनंजयराव
“कोण सुभद्रा? आपण ओळखतो का तिला?” -सुभद्राबाई.
“उगाच वेड पांघरून पेडगाव ला जाऊ नकोस. सुभद्रा म्हणजे अर्जुनाची बायको, श्रीकृष्णाची बहीण. आणि तुझं नाव काय आहे? सुभद्रा, आणि माझं नाव काय आहे? तर धनंजय” - धनंजयराव
“शेवटी तुमच्या लक्षात आलंच. पण काय हरकत आहे हो? सुंदर आहे, सुशील आहे, चांगल्या संस्कारात वाढलेली दिसते आहे, मग काय हरकत आहे? मी पहाते आहे ना, विनय सुद्धा तिच्याकडे हळू हळू ओढल्या जातो आहे.” – सुभद्राबाई.
“तू म्हणते आहेस ते बरोबर आहे. पण ज्या मुलीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. आपल्यालाच का, तिला सुद्धा तिच्या बद्दल काही आठवत नाहीये. अश्या मुलीशी कशी सोयरीक जुळवणार? आणि तिला शुद्धीवर येऊन जेमतेम महिना होतो आहे, आणि तू भविष्याचे मनोरे बांधायला निघालीस? धन्य आहेस तू.” – धनंजयराव
“मुली वर काय संस्कार झालेत हे कळायला एवढा काळ पुरेसा आहे. मी तिच्या बद्दल जे आडाखे बांधलेत आणि बोलले ते चुकीचं आहे असं वाटतंय का?”- सुभद्राबाई
“तू म्हणते आहेस ते मला पटतंय. पण बाकी गोष्टींचा पण विचार कर. या सगळ्या गोष्टींची घाई होते आहे असं मला वाटतं” – धनंजयराव
“आता बाकी गोष्टी कोणच्या ते सांगाल का?” – सुभद्राबाई.
“उद्या जर तिची स्मृति परत आली, किंवा तिच्या आई वडिलांना पोलिसांनी शोधून काढलं, तर काय होईल? समजा जर तिच्या आई वडिलांना हे मान्य नसेल तर? त्यांचं मन वळवता येईल, पण तिचं लग्न झालं असेल तर? खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहील. विनयचं आणि तिचं दोघांचही आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल.” - धनंजयराव
“तिचं लग्न निश्चित झालं नाहीये. लग्न झालेल्या मुलींचं वागणं वेगळंच असतं. तुम्हाला कळायचं नाही पण आम्हाला बायकांना कळतं.- सुभद्राबाई.
“काहीतरीच बोलू नको. तुझा स्वभाव कुठे बदलला? असं काही नसतं.” – धनंजयराव
“आणि हे बघ, तू विनयशी या बाबतीत काही बोलू नकोस. त्याला विचलित करू नकोस. ती मुलगी सुंदर आहे मितभाषी आहे, लाघवी आहे, हे सगळे गुण तिच्यात आहेत. पण म्हणूनच जर विनय तिच्याकडे आकर्षित झाला आणि नंतर प्रॉब्लेम झाला, तर भारी पडेल.” – धनंजयराव
थोडा वेळ कोणीच बोललं नाही मग सुभद्राबाईच बोलल्या.
“अहो, एवढी सुशील आणि संस्कारी मुलगी कुठल्या दुष्ट चक्रात अडकली आहे. काय दोष होता हो तिचा? वाईट वाटतं हो.” – सुभद्राबाई.
“सुभद्रा, तू म्हणते आहेस ते खरं आहे, आपण सर्व प्रयत्न करतोच आहोत. पण यश देणं देवाच्याच हातात आहे. ती हाती पायी धड वाचली यातच समाधान मान. तू पण तुझ्या परीने प्रयत्न करतच आहेस. सोळा सोमवार करते आहेस ना, नक्की फळतील. सर्व ठीक होईल. माझा विश्वास आहे.” – धनंजयराव
“काय हो, किती बेत केले होते मी. मला ती मुलगी खरंच आवडली आहे. तुम्ही माझ्या सगळ्या इच्छेवर वर पाणी फिरवलं. पण तुम्ही म्हणताय ते पटलं मला. मी नाही बोलणार विनयशी या विषयावर.” – सुभद्राबाई.
“ठीक आहे. पण उत्तरा हे नाव मला पण आवडलं. जर सगळं जुळून आलं, तिचे आई वडील भेटले, त्यांच घराणं आपल्याला पटलं आणि ती अविवाहित असली तर हेच नाव तू पुढे चालू ठेव. पण आताच ठिसुळ पायावर इमारत बांधू नकोस.” – धनंजयराव
“अहो पण एवढी तरणी ताठी मुलगी, घरात असतांना कसं स्वस्थ बसणार आपण? आता पर्यन्तची गोष्ट वेगळी होती, पण आता ती बरी झाली आहे. लोकं विचारातीलच ना, न नात्याची न गोताची अशी अनोळखी मुलगी तुमच्याकडे कशी राहते म्हणून, आपण तिचा गैरफायदा घेतो आहोत असं जर कोणी म्हंटलं तर काय उत्तर आहे आपल्या जवळ? तिच्या भविष्या बद्दल काहीच विचार करू शकत नाही आपण. तिचं नाव, गाव काहीच अजूनही समजलं नाहीये. काय वाढून ठेवलं आहे त्या पोरीच्या नशिबात देव जाणे.” – सुभद्राबाई.
विनय आणि उज्ज्वल कारखान्यांतून आले तेंव्हा कावेरी एकटीच घरी होती. चहा नाश्ता करून ती त्यांचीच वाट बघत बसली होती. टेबल वर आल्यावर,
“मग काय ठरलं का नाव?” – विनय.
“हो काकूंना उत्तरा हे नाव आवडलं आहे.” – कावेरी.
“पण तुला आवडलं आहे का?” – उज्ज्वल.
“माझा प्रश्नच नाही. बाळाला कोणी विचारतं का, काय नाव ठेऊ म्हणून?” आणि कावेरी दिलखुलास हसली. ते पाहून विनयच्या काळजात कुठे तरी कळ आली. तो अनिमिश नेत्रांनी तिच्या कडे बघत राहिला.
“काय झालं? असे काय बघता आहात माझ्या कडे? काही चुकलं का?” – कावेरी.
“नाही नाही, तुझ्या बोलण्याची मौज वाटली इतकंच.” – विनय.
“चला आता बारशाची तयारी. दादा, फुगे वगैरे आणायचे का? आणि हो पाळणा पण लागेल.” – उज्ज्वल.
“मला पाळण्यात घालणार तुम्ही? आणि मला उचलणार कोण? काकू?” – कावेरी म्हणाली आणि पुन्हा हसली. एक कळ पुन्हा एकदा काळजात.
“हा आमचा दादा आहे ना. आमच्या घरातला बॉडी बिल्डर माणूस. तो उचलेल. तू नको काळजी करू.” उज्ज्वल.
“उज्ज्वल, काहीतरीच काय? अरे मस्करीची सुद्धा मर्यादा असते.” – विनय.
विनय चांगला उंचा पुरा तगडा होता. व्यायामशाळेत घुमलेला माणूस होता. क्षण दोन क्षण कावेरी त्यांच्या बांधेसूद शरीराकडे भान हरपून पहात होती. पण लवकरच सावरली. म्हणाली.
“ए नको, उत्तरा नाव छान आहे. आधीच एक पाय मोडला आहे माझं वजन पेलता नाही आलं, आणि मी पडले तर दूसरा पण पाय मोडेल. मग उत्तरा च्या ऐवजी मोडकी हे नाव ठेवावं लागेल. बेकार आहे ही आयडिया.” – कावेरी.
“अग असं काही होणार नाही. दादा म्हणजे कसला जबरदस्त माणूस आहे. हवं तर आपण रिहर्सल करू. चालेल?” -- उज्ज्वल.
“ए काहीतरीच काय? नको रे बाबा, पुन्हा रिस्क नको.” आणि ती खोलीत पळून गेली. पण तिचा चेहरा काही वेगळंच बोलत होता. तिला ही थट्टा आवडली होती.
अशी चकल्लस चालू असतांनाच धनंजयराव आणि सुभद्राबाई आले. सगळं ऐकल्यावर त्यांनाही बरं वाटलं. उत्तरा नाव फायनल झालं. सुभद्राबाईंनी सर्वांना साखर वाटली.
दुसऱ्या दिवशी विनय कावेरीला फॅक्टरीत घेऊन गेला..
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने