Login

किडनॅप भाग ७५

कावेरीच्या अपहरणाच्या तपासाने सुरू झालेला तपास आता अंतर राष्ट्रीय मानव तस्करी करणाऱ्या टोळीच्या तपासावर येऊन पोचली
किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
गंगाधरराव विनयचे वडील.
नर्मदा विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
धनंजय विनयचे वडील.
सुभद्रा विनयची आई.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
विनयने कावेरीला नर्सिंग होम मधे शिफ्ट केलं. पण नर्मदा बाई तिथे दिवसभर बसायची. भरूचा साहेबांनी त्यांना दिवसभर बसता येणार नाही असं सांगितलं. कावेरीला घरी शिफ्ट केलं. तिला शुद्ध आली. मंगेश आणि विभाचा साखरपुडा पण झाला. आणि आता निशांत रुपचंदच्या मागावर निघाला. आता वाचा पुढे.
भाग ७५
भाग ७४ वरुन पुढे वाचा......
हॉटेल मधे गेल्यावर, रीसेप्शन डेस्क वर जाऊन निशांत म्हणाला,
“हा तुमचा समोर लावलेला कॅमेरा चालू आहे का? असेल तर आम्हाला तीन महिन्यांपूर्वीचं फुटेज बघायचं आहे.” – निशांत.
“डेस्क वर असलेला माणूस सरोश कडे पहात होता, म्हणाला,
“तुम्ही पोलिस आहात का?” – डेस्क ऑफिसर.
“तुमचा काय अंदाज आहे?” – सरोश ने जरा रफ आवाजात गुजरातीत विचारलं.
सरोशने खास पोलीसी स्टाइल मधे प्रश्न विचारला. काम झालं.
“काय करू शकतो मी तुमच्या साठी?” – ऑफिसर.
“चार महिन्या पूर्वी १६ तारखेला विशाल किंवा रुपचंद नावाचे कोणी उतरले होते का?” निशांतने रिसेप्शनिस्ट ला विचारलं. त्याने रजिस्टर पाहिलं आणि या नावांचं कोणीच उतरलं नाही म्हणून सांगितलं.
“ठीक आहे, आम्हाला त्या दिवसाचं समोर लावलेल्या कॅमेऱ्याचं फुटेज बघायचं आहे. कोण दाखवेल?” – निशांत.
फुटेज बघातांना हळू हळू उलगडा होत होता. भावेशची कार दिसली, त्यानंतर रुपचंदने कारचा मागचा दरवाजा उघडला, तिथे कावेरी नव्हती हे पाहून त्याने भावेशचा गळा धरला हे ही दिसलं. मग विल्सन ने भावेशला सोडवलं आणि भावेश घाई घाईने निघून गेला. तासभरा नंतर, रुपचंद आणि विल्सन एका रिक्षात बसून निघून गेले.
“थोडा झूम करा. रिक्शाचा नंबर दिसतो का ते बघा.” – निशांत.
नंबर दिसला. तो नोट करून घेतला.
“आता सरोश आपल्याला या रिक्शाचा माग काढावा लागणार आहे. हे दोघं कुठे गेले हे पाहावं लागेल.” – निशांत.
रिक्शाचा माग काढत ते बस स्टँड वर पोचले. तिथल्या फुटेज मधे ते दोघं सुरतच्या बस मधे चढल्याचं स्पष्ट दिसलं.
“आता मिशन सूरत?” – सरोश.
“प्रश्नच नाही. चलो सूरत.” – निशांत.
दुसऱ्या दिवशी सूरतला बस स्टँड वरचं फुटेज पाहिल्यावर, असं दिसलं की ती दोघं बस स्टँडच्या बाहेर पडली. निशांतने मग दिवसभराचे फुटेज बघितले. ती दोघं परतून आलेली दिसली नाही. मग ते रेल्वे स्टेशनवर गेले आणि तिथले फुटेज बघितले. रुपचंद आणि विल्सन स्टेशन वर फिरतांना तर दिसले, पण ते कुठल्या गाडीत बसले आणि कुठे गेले हे मात्र कळलं नाही. कदाचित दिल्ली, कदाचित मुंबई, काहीच कळलं नाही.
निशांतने वेळेकरांना फोन लावून पूर्ण अपडेट दिलं.
“एवढे यातायात करून सुद्धा सारं काही हातातून निसटलं. आता मुंबईत जरी गेला असला तरी त्याला शोधणं कठीण आहे.” – निशांत.
“तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे, पण असे हात पाय गाळून बसता येणार नाही. तू मला दोघांचे फोटो पाठव. मी ते सर्क्युलेट करतो. बघू काही कळतं का? आणि आता तू काय करणार आहेस? कावेरीच्या शोधात पुन्हा भावनगरला जाणार आहेस का? पण ती भावनगरला भावेशच्या गाडीत दिसली नाही असं म्हणाला होतास.” – वेळेकर.
“आता मी बडोदा ते भावनगर हा मार्ग पिंजून काढणार आहे. दोन शक्यता आहेत. एक म्हणजे बडोदा ते भावनगर यांच्या मध्येच तिचं हस्तांतरण झालं असावं. पण मग त्यांना भावनगरला जायचं काहीच कारण नव्हतं. त्यांनी उलट्या पावली बडोदा गाठलं असतं. पण तसं झालं नाही यांचा अर्थ मध्येच कुठे तरी कावेरी निसटली आणि भावनगरला हॉटेल वर पोहोचे पर्यन्त रुपचंदला पुसटशी शंका पण आली नाही.”– निशांत.
“रुपचंदला कळलं नाही हे कुठल्या आधारावर म्हणतो आहेस तू?” – वेळेकर.
मी तुम्हाला भावनगरच्या हॉटेल मधे मिळालेली क्लिप पाठवतो. ती बघितल्यावर असं लक्षात येईल की गाडीत कावेरी दिसली नाही म्हणून रुपचंदने भावेशचा गळा धरला. म्हणजे रुपचंदला अपेक्षित असलेलं काही तरी असं होतं की ते घडलं नाही. आणि गाडीत कावेरी नव्हती. भावेश तसाच उलट्या पावली परत फिरला आणि रुपचंद आणि त्याचा साथीदार हॉटेल मधे शिरले. कावेरी विनाच.”- निशांत.
“मी बघितली क्लिप. तू म्हणतो आहेस त्यात तथ्य दिसतं आहे. ठीक आहे, मी रुपचंदचा माग काढतो, तू कावेरीला शोध.” – वेळेकर.
दुसऱ्या दिवशी निशांत आणि सरोश बडोद्याला गेले. तिथे कॅब भाड्याने घेतली आणि बडोदा भावनगरच्या रस्त्यावरून निघाले. साधारण ५०-६० किलोमीटर वर एक हॉटेल दिसलं तिथे हायवेच्या दिशेने कॅमेरा लागलेला दिसला. तिथे चेक केल्यावर भावेशच्या गाडीत कावेरी दिसली. प्रवास पुढे सुरू. अजून ५०-६० किलोमीटर वर एका CNG पंपावरच्या कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले. तिथेही कावेरी कार मधे दिसली. सरोश फूल यूनिफोर्म मधे असल्याने फुटेज दाखवायला कोणी फारसे आढे वेढे घेतले नाही.
भावनगर पासून ५० एक किलोमीटर वर एका पेट्रोल पंपा वरच्या कॅमेऱ्याचे फुटेज बघितले. त्यात सुद्धा कावेरी दिसली. पण त्या नंतर भावनगर शहरापर्यंत कुठेच कॅमेरा नव्हता. भावनगर मधे शिरल्यावर जो पहिला कॅमेरा दिसला, त्याचे फुटेज चेक केले तेंव्हा त्यात भावेशची गाडीच दिसली नाही.
“या फुटेज मधे गाडी नाहीये, रुपचंद दुसऱ्याच एखाद्या रस्त्याने भावनगर मधे का शिरला याचा अर्थ आता लागतो आहे. पण त्याने असं का केलं असेल? हायवे सोडून मुद्दाम आडवळणाचा रस्ता घेण्याचं काय कारण असेल? आता आपल्याला इथल्या पोलिसांची पुन्हा मदत घ्यावी लागणार आहे.” – निशांत.
निशांतने वेळेकरांना फोन करून अपडेट दिलं. म्हणाला,
“साहेब, रुपचंदचा फोन कुठे आणि केंव्हा बंद झाला ते कळू शकेल का?”– निशांत.
“मी तुला ती लोकेशन पाठवतो.” – वेळेकर.
लोकेशन बघितल्यावर निशांत म्हणाला,
“सरोश, हे बघ रुपचंद चा मोबाइल पण याच परिसरात बंद पडला आहे. याचा अर्थ, आणखी काही अश्या घटना घडल्या असाव्यात की ज्यामुळे, रुपचंदला घाई घाईत पळ काढावा लागला असेल त्यामुळे कावेरीकडे लक्ष द्यायला जमलं नसेल, आणि कावेरी गाडीत नाही हे हॉटेल वर गेल्यावरच कळलं असेल.” – निशांत.
“हो साहेब, मला पण असंच वाटतं आहे. कदाचित एखादा अपघात? मग आता काय? पोलिस स्टेशन?” – सरोश.
“हो लगेच.” – निशांत
निशांत आणि सरोश पुन्हा भावनगरच्या मुख्यालयात पोचले. आधी ज्या इंस्पेक्टरला भेटले होते त्यांनाच पुन्हा भेटू असा विचार करतंच होते, पण सीनियर इंस्पेक्टर भरूचा समोरच होते, त्यांनी सरोशला पाहिलं.
“तुम्ही महाराष्ट्रातून आला आहत का? मी काय मदत करू शकतो?” – भरूचा.
“आम्हाला थोडी माहिती आणि मदत हवी होती.” – सरोश.
“बसा. काय माहिती हवी आहे? आणि कशाच्या संदर्भात?” – भरूचा.
“थोडं डीटेल मधे सांगतो. साहेब, मी सरोश, अंधेरी पोलिस स्टेशन मधे कॉनस्टेबल आहे. हे निशांत साहेब, यांच्या मित्रांची होणारी बायको बेपत्ता झाली म्हणून तक्रार आली म्हणून तपासाला सुरवात झाली. थोडा तपास झाल्यावर हे लक्षात आलं की ही अपहरणाची केस नसून मानव तस्करीची आहे” – सरोश.
“काय सांगता काय?” म्हणजे ज्या १२ मुलींची बातमी टीव्ही वर आली होती ती याच केस च्या संदर्भात होती का?” – भरूचा.
“हो साहेब, १३ मुलींना पळवण्यात आलं होतं. त्यापैकी १२ मुलींची सुटका करण्यात आम्हाला यश आलं. पण तेरावी मुलगी मात्र अजून बेपत्ता आहे. तिला कोणी पळवलं आहे हे पण समजलं आहे. आम्ही त्यांच्याच मागावर इथे आलो आहे.” – सरोश.
“पण भावनगरला कसे आले?” – भरूचा.
“त्या टोळीतले सात आठ लोकं पकडल्या गेले. तीला ज्या अॅम्ब्युलन्स मधून पळवलं, त्याचा पत्ता लागला. अॅम्ब्युलन्स चालवणारा जाळ्यात आला. त्याने दिलेल्या माहिती वरुन कळलं की ते वापीला आहेत. मग वापीला जी टॅक्सी वापरली होती, त्या टॅक्सी चा पत्ता मिळाला, त्याला भेटायला आमचे साहेब गेले तेंव्हा त्यांना कळलं की त्याचा जुनागडला खून झाला आहे.” – सरोश.
“अरे, बापरे. मग?” – भरूचा.

“तपास जवळ जवळ पूर्ण थांबला होता. मग साहेब, हे निशांत साहेब आले, हे पूर्वी खाजगी डिटेक्टिव होते. त्यांनी रुपचंद आणि कावेरीला कसं शोधायच यांची योजना आणली. आमच्या साहेबांना ती पसंत पडली. मग ते काम अधिकृत रित्या मला दिलं. पण काम या साहेबांच्या योजने नुसार करायचं होतं. आमचे ACP धनशेखर साहेब आणि हे निशांत साहेब यांची जुनी ओळख आहे. या आधी दोन चार केसेस मधे दोघांनी बरोबर काम केलं होतं.” – सरोश.
“ओके.” – भरूचा.
“मग यांच्याच योजनेनुसार आम्ही वापीहुन रस्त्यावरचे, हॉटेल वरचे कॅमेरे चेक करत करत आलो. बडोद्याच्या कॅमेऱ्यात टॅक्सी मधे कावेरी दिसत होती, पण भावनगर मधल्या क्लिप मधे ती नाहीये. आम्ही येतांना फुटेज चेक करत करतच आलो, इथून ६० किलोमीटर वर बडोद्याच्या रस्त्यावर असलेल्या एका पंपा वरच्या फुटेज मधे ती मुलगी आहे. पण इथल्या हॉटेलच्या कॅमेऱ्यात नाही.”- सरोश.
“ओके. आलं लक्षात. आता सांगा तुम्हाला काय मदत पाहिजे ते?” – भरूचा.
“सर, त्या रुपचंदला लग्न करण्यासाठी एक सुंदर शिकलेली मुलगी हवी होती, त्यासाठीच त्यांनी कावेरीला वेगळीच पळवली. आता ती मुलगी ५० मैल आधी आहे आणि इथे नाही यांचा काय अर्थ आहे? मी तुम्हाला इथल्या हॉटेल मधे काय घडलं त्यांची क्लिप दाखवतो.” – निशांत.
भरूचा साहेबांनी क्लिप पाहिल्यावर निशांत म्हणाला,
“या क्लिप मधे स्पष्ट दिसतं आहे की रुपचंदने कावेरीसाठी मागचा दरवाजा उघडला आणि कावेरी न दिसल्यामुळे, त्याने भावेशचा गळाच पकडला. आता त्या दिवशी या परिसरात अशी काही घटना घडली आहे का? की ज्यामुळे, रुपचंदचं कावेरीवरून लक्ष उडालं. आणि हॉटेल वर गेल्यावर त्याला धक्काच बसला?” – निशांत.
“हो निशांत साहेब, त्याच सुमारास, आणि जवळ पास त्याच ठिकाणी एक हिट अँड रन ची केस झाली. अजून त्या कार चा पत्ता लागला नाही पण ती मुलगी मागच्या महिन्या पर्यन्त कोमात होती. आता तिला शुद्ध आली आहे पण स्मृति पूर्ण पणे गेली आहे. तिला तिचं नाव पण आठवत नाहीये. इतकी वाईट परिस्थिती आहे. थांबा तुम्हाला त्या मुलीचा फोटो दाखवतो.” – भरूचा.
मग भरूचा साहेबांनी त्यांच्या मोबाइल मधे असलेला कावेरीचा फोटो दाखवला.
फोटो पाहिल्यावर निशांत आणि सरोश दोघही उडालेच.
“ही तर कावेरी. साहेब, हिच्याच शोधात फिरतो आहोत आम्ही.”- निशांत.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →