किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय विनयचे वडील.
सुभद्रा विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
धनंजय विभावरीचे वडील
सुभद्राबाई विभावरीची आई.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
विनयने कावेरीला नर्सिंग होम मधे शिफ्ट केलं. पण नर्मदा बाई तिथे दिवसभर बसायची. भरूचा साहेबांनी त्यांना दिवसभर बसता येणार नाही असं सांगितलं. कावेरीला घरी शिफ्ट केलं. तिला शुद्ध आली. मंगेश आणि विभाचा साखरपुडा पण झाला. आणि आता निशांत रुपचंदच्या मागावर निघाला. आता वाचा पुढे.
भाग ७४
भाग ७३ वरुन पुढे वाचा......
“कुठे लिहून ठेवलं आहेस का? हँडसेट केंव्हा घेतला ते?” – वेळेकर.
“हो साहेब, पण आता शोधावं लागेल. लगेच नाही सांगता येणार.” – दुकानदार.
“शोध आत्ताच. आणि त्याचं नाव लिहून ठेवलं असेल तर ते पण सांग. आम्ही इथेच आहोत. लाग कामाला.” – वेळेकर.
पोलिस पार्टी दुकानात बघूनच जे लोकं आले होते ते बाहेरच्या बाहेरच चालले गेले. दुकानदार ते पाहून अस्वस्थ झाला पण इलाज नव्हतास. अर्धा तास बऱ्याच चिठ्ठ्या चपाट्या पाहून झाल्यावर एकदाची ती चिठ्ठी सापडली.
“हे बघा साहेब, कृष्णा नाव आहे. ट्रक नंबर नाही लिहिला. १६ तारखेला आला होता तो. ट्रक खाली होत होता म्हणून त्याला काही काम नव्हतं.” – दुकानदार.
वेळेकरांबरोबर वसईचे कॉनस्टेबल लायगुडे होते. त्यांना वेळेकर म्हणाले,
“या दिवशी कुठे कुठे ट्रक अनलोड झाले ते बघावं लागेल. तुम्हाला सगळे गोदाम माहीत आहे का?” – वेळेकर.
“चला मग एक एक गोदाम तपासू.” – वेळेकर.
तो संपूर्ण दिवस गोदाम तपासण्यात गेला. १५ तपासून झाले. काही लीड मीळाला नाही.
“ठीक आहे. मी उद्या सकाळी पुन्हा येईन तो पर्यन्त किती गोदाम या परिसरात आहेत यांची लिस्ट तयार करून ठेवा. बाकी उद्या बघू.” – वेळेकर.
पोलिस स्टेशनला आल्यावर त्यांनी धनशेखर साहेबांना अपडेट दिलं.
“काय शोधता आहात तुम्ही?” – धनशेखर.
“त्या कृष्णाचा पत्ता. त्याची चौकशी केल्यावर, कळेल आपल्याला की तो मोबाइल कुठे फेकला ते. त्यावरून रुपचंदचा रूट काय होता ते कळेल. मग बघू पुढची अॅक्शन काय घ्यायची ते. – वेळेकर.
“ओके. चालू द्या.” - धनशेखर.
दुसऱ्या दिवशी दुपारी एका गोडाउन मधे गेल्यावर,
“हां साब, उस दिन एक ट्रक खाली हो रहा था उसका क्लीनर कृष्णा था।“ – क्लार्क
“चार महिन्या पूर्वीची गोष्ट तुझ्या कशी लक्षात राहिली? काय खास कारण” – वेळेकर.
“साहेब, त्या दिवशी ट्रक खाली होत होता. आमची जेवण्याची वेळ झाली होती, आम्ही ड्रायव्हरला बोलावलं तर तो म्हणाला की कृष्णाला एक मोबाइल सापडला आहे, तो विकायला दुकानात मधे गेला आहे.” – क्लार्क.
“त्याचा नंबर सापडतो का ते बघ?” – वेळेकर.
“त्याचा तर नसेल, पण ड्रायव्हरचा असेल. बिल्टी बघून सांगता येईल. त्याच्यावर ड्रायव्हरचा नंबर असतो. नाव पण असतं.” – क्लार्क.
मग क्लार्कने त्या दिवशीचं ट्रान्सपोर्ट चलान शोधून काढलं. त्यावर ड्रायव्हरचा नंबर होता.
“लाव फोन त्याला, आणि कृष्णाचा नंबर घे त्यांच्याकडून.” – वेळेकर.
क्लार्कने सुखदेव म्हणजे ट्रक ड्रायव्हरला फोन लावला. थोडं बोलला आणि क्लीनर कृष्णाचा नंबर मागितला.
“साहेब, मी वसईलाच आहे. कृष्णा पण माझ्याच बरोबर आहे.” – ट्रक ड्रायव्हर.
“कुठल्या गोडाउन मधे आहे ते विचारा. पत्ता घ्या.” – वेळेकर.
त्याने सांगितलेल्या पत्त्यावर क्लार्कला घेऊन वेळेकर आणि टीम पोहोचली.
“कृष्णा कोण आहे?” – वेळेकर.
“मी साहेब, काय झालं आहे? मी काहीच केलं नाहीये. माझी चौकशी कशाला?” - कृष्णा खूप घाबरला होता. खूप विचार करूनही त्याला समजत नव्हतं की त्याचा गुन्हा काय?
“तू इथल्याच दुकानात एक हँडसेट विकलास, चार महिन्या पूर्वी.” – वेळेकर.
“हो साहेब. तो मला ट्रक खाली करतांना सापडला होता. फोन लॉक होता, मला काही तो उघडता आला नाही. म्हणून मी तो दीड हजारांना विकून टाकला.” – कृष्णा
“कुठे सापडला तुला?” – वेळेकर.
“इथेच साहेब,” मग क्लार्क कडे बोट दाखवून म्हणाला, “यांच्याच गोडाउन मधे ट्रक खाली करतांना सापडला.” – कृष्णा.
आता वेळेकर साहेब गोंधळले. तरी पण त्यांनी विचारलं,
“कुठून माल घेऊन आला तुमचा ट्रक त्या दिवशी? – वेळेकर
“भावनगर ला माल भरला. मुंबईचा माल होता म्हणून इथे वसईला उतरवला.” – कृष्णा.
“मधे कुठे माल भरला का?” - वेळेकर.
“नाही साहेब. फूल ट्रक माल होता. सरळ वसईलाच आलो.” – कृष्णा.
“माल भरून निघालात तेंव्हा काय वेळ होती?” – वेळेकर.
“निघायला दुपारचे ३ वाजले होते साहेब.” – ट्रक ड्रायव्हर.
“असं आहे तर जेवायला कुठे तरी थांबलाच असाल. कुठे थांबला होता?” – वेळेकर.
“चाळीस पन्नास किलोमीटर वर एक चांगला ढाबा दिसला, तिथे धाब्यावर थांबलो होतो साहेब.” – ड्रायव्हर.
वेळेकर विचार करत होते, रुपचंदचा मोबाइल बंद पडला तेंव्हाची लास्ट लोकेशन तीच होती. म्हणजे रुपचंद पण तिथे जेवायला थांबला असेल, किंवा तिथे फक्त त्याने मोबाइल ट्रक मधे फेकला असेल. गोष्टी जुळून येत होत्या.
“तुम्ही तिथे होता, तेंव्हा धाब्यावर काही कार होत्या का?” – वेळेकर.
“हो साहेब, सहा सात कार होत्या. आणि बस होती.” – कृष्णा.
“काही नंबर आठवताहेत का?” – वेळेकर.
“नाही साहेब.” – कृष्णा.
“कुठली बस होती?” – वेळेकर.
“सूरतला जाणारी बस होती साहेब.” – कृष्णा.
“पक्क आठवतं आहे?” – वेळेकर.
“हो साहेब, बसचं चाक पंक्चर झालं होतं, मग आम्ही त्यांना मदत पण केली.”– कृष्णा.
“ठीक आहे. झालं आमचं. तुमचे दोघांचे मोबाइल नंबर द्या. पुन्हा जरूर वाटली तर फोन करू.” – वेळेकर.
अंधेरीला आल्यावर वेळेकरांनी धनशेखर साहेबांना अपडेट दिलं.
“रुपचंद भाव नगरला का गेला? आणि लगेच परत फिरून सूरतला का गेला असावा हे कळत नाहीये. काय उद्देश असेल?” – धनशेखर.
“साहेब, मला वाटतं की कावेरीचा सौदा भावनगर मधे झाला असावा. काम झाल्यावर तो लगेच परत फिरला असावा. कारचे नंबर मिळाले असते तर शोध घेतला असता, पण तो दरवाजा बंद झाला आहे.” – वेळेकर.
“हूं असंच असेल. तो जर बसने गेला असेल तर?” – धनशेखर.
“रुपचंद सारखा माणूस बसने का जाईल सर? आणि तेही सौद्याची लाखों रुपयांची रक्कम बरोबर असतांना? एवढी रिस्क घेईल तो? मला नाही वाटत.” – वेळेकर.
“तुम्ही म्हणता आहात ते लॉजिक पटतंय. पण पुढे काय? विमानातून एवढी कॅश नेणं शक्य नाही. आणि आपल्याला हे ही माहीत नाही की त्याचं नेमकं गाव कोणचं, कुठे गेला असेल?” – धनशेखर.
वेळेकर पण विचारात पडले. बरीच मेहनत झाली होती, पण रुपचंदचा पत्ता नव्हता. “वेळेकर, असं करा. निशांतला सर्व अपडेट द्या. तो बहुधा आता बडोद्याला पोचला असेल. त्याला भावनगर चेक करायला सांगा. भावेशची गाडी तो बघतोच आहे. त्याला परतीच्या टॅक्सी पण चेक करायला सांगा. कदाचित टॅक्सी नंबर मिळाला तर काम पुढे सरकेल.” – धनशेखर.
“हो साहेब लगेच त्याला फोन लावतो.” – वेळेकर.
वेळेकरांनी निशांतला फोन लावून त्यांना मिळालेली सर्व माहिती सांगितली.
“म्हणजे आता बडोद्यात वेळ घालवण्या पेक्षा सरळ भावनगरच्या दिशेने मोर्चा वळवायचा. बरोबर न?” – निशांत.
“हो तसंच तिथेच त्यांच्या हालचाली काय होत्या ते कळेल.” – वेळेकर.
“हे भावनगर कुठून शोधून काढलं त्याने? तो काही गुजराती नाहीये, हे आपल्याला माहीत आहे. मग भावनगर का?” – निशांत.
“माहीत नाही. पण माझा अंदाज असा आहे की तिथे कावेरीचा सौदा झाला असावा. पण मुंबई, दिल्ली सारखी शहरं सोडून त्याने भाव नगर का निवडलं हे त्याचा पत्ता लागल्या वरच कळेल.” – वेळेकर.
“ठीक आहे साहेब. मी उद्याच भावनगर साठी निघतो. पिंजून काढतो सगळं शहर. नक्की काही तरी हातात येईल.” – निशांत.
दुसऱ्या दिवशी निशांत आणि सरोश भावनगरला पोचले. तिथल्या मुख्यालयात जाऊन पोलिसांची मदत मागितली. ती मिळाल्यावर, भावनगर मधे प्रवेश करण्याचे सर्व रस्ते एकेक करून चेक करायला सुरवात केली.
एका आड रस्त्यावर असलेल्या दुकानासमोर कॅमेरा लागलेला दिसला. त्याचं फुटेज चेक केल्यावर भावेशची इनोव्हा दिसली. झूम करून पाहिल्यावर निशांतला धक्काच बसला. गाडीत कावेरी नव्हती.
“सरोश, तू पहातो आहेस न? कावेरी दिसते आहे का मागच्या सीट वर?” – निशांत.
“नाही साहेब, पण बडोद्याच्या बाहेर निघतांनाचा विडिओ आहे आपल्या जवळ. त्यात तर ती दिसत होती. ती क्लिप पुन्हा पाहायला हवी.” – सरोश.
ती क्लिप पुनः एकदा लॅपटॉप वर दोघांनी बघितली. त्यात कावेरी स्पष्ट दिसत होती. आणि आताच्या क्लिप मधे नव्हती.
“यांचा अर्थ बडोदा आणि भावनगर या दोन शहरांच्या मधे कुठे तरी तिचा व्यवहार झाला असावा.” – सरोश.
“हो, मलाही हाच संशय येतो आहे. म्हणजे आपण डायरेक्ट भावनगरला आलो हे चुकलंच. आता पुन्हा हाच रस्ता धरून पाठीमागे बघत जावं लागणार.”– निशांत
“साहेब, एक सुचवू का?” – सरोश.
“बोल.” – निशांत.
“साहेब, या सगळ्या घटनेला ४ महीने उलटून गेले आहेत. एखादा दिवस अजून उशीर झाला तर फार काही फरक पडणार नाही.” – सरोश.
“म्हणजे काय? मला समजलं नाही. दोन दिवस मुंबईला जायचं आहे का?” – निशांत.
“नाही सर मी म्हणत होतो, की आपण आधी रुपचंदला शोधायचं काम पूर्ण करू. नंतर कावेरीला बघू. जर रुपचंद सापडला, तर कावेरी कुठे आहे ते आपोआप कळेल.” – सरोश.
“यस. यू आर राइट. आधी रुपचंद. चला आता भावनगरच्या रस्त्यावरून त्याचा माग काढावा लागेल. तो जर कुठल्या हॉटेल मधे उतरला असेल तर बघावं लागेल. एका चौरस्त्यांच्या कॅमेऱ्या मधे भावेशची कार दिसली. ती एका रस्त्याला वळली. थोडं अंतर गेल्यावर त्यांना एक हॉटेल दिसलं. त्यांनी हॉटेलच्या फ्रंट ला कॅमेरा बघितला, आणि हॉटेल मधे शिरले.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने