किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
धनंजय विनयचे वडील.
सुभद्रा विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
धनंजय विभावरीचे वडील
सुभद्राबाई विभावरीची आई.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
विनयने कावेरीला नर्सिंग होम मधे शिफ्ट केलं. पण नर्मदा बाई तिथे दिवसभर बसायची. भरूचा साहेबांनी त्यांना दिवसभर बसता येणार नाही असं सांगितलं. कावेरीला घरी शिफ्ट केलं. तिला शुद्ध आली. मंगेश आणि विभाचा साखरपुडा पण झाला. आणि आता निशांत रुपचंदच्या मागावर निघाला. आता वाचा पुढे.
भाग ७३
भाग ७२ वरुन पुढे वाचा......
मग वेळेकरांनी सरोश आणि निशांत ची ओळख करून दिली. सरोशला सर्व प्लॅन समजावून सांगितला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बोरीवली स्टेशन वर भेटायचं ठरवून मीटिंग संपली.
निशांत आणि सरोश वापीला पारेख साहेबांच्या समोर बसले होते. सरोशने जवळ असलेली कागदपत्र दाखवली आणि निशांतची ओळख करून दिली.
“त्या वेळेस आम्ही सगळी चौकशी केली होती. त्या जितू ड्रायव्हर शी दोन तीनदा बोलणं झालंय. दुसऱ्या वेळेस तर तुमचेच वेळेकर साहेब आले होते. तो सगळा रीपोर्ट तुमच्या कडे पाठवलाच होता. आता नवीन काय शोधायचं आहे?” – पारेख.
“काय आहे साहेब, इथे झालेल्या चौकशी वरुन त्या दुसऱ्या गाडीचा पत्ता लागला. ती गाडी ज्याची होती, त्यांच्या ड्रायव्हरने सारा घोटाळा केला होता. पण त्या ड्रायव्हरचा खून झाला, त्यामुळे पुढची काहीच माहिती मिळू शकली नाही. म्हणून त्या गाडीच्या मागावर जायचं ठरवून आम्ही आलो आहोत. साहेब, मानव तस्करीची बाब आहे. फाइल क्लोज करून चालणार नाही.” – निशांत.
“ठीक आहे माग काढणार म्हणजे तुम्ही ठीक ठिकाणचे फुटेज बघणार का? पण हे खूप वेळखाऊ काम आहे.” – पारेख.
“साहेब, दूसरा काही मार्ग आहे का?” – निशांत.
“नाही. मला आत्ता तरी तसं काही दिसत नाहीये. गो अहेड. तुमच्या चिकाटीची मात्र तारीफ करावीशी वाटते. ऑल द बेस्ट. मी आमचे पांचाल आहेत, त्यांना तुमच्याबरोबर डेप्युट करतो. तुमचं काम थोडं सोपं होईल.” – पारेख.
“थॅंक यू व्हेरी मच सर.” – निशांत.
मग निशांत आणि पांचाल वापीचा नकाशा घेऊन बसले.
“साहेब तीन मार्ग आहेत. एक दमण ला जातो दूसरा सिल्वासा ला आणि तिसरा वलसाड ला जातो. या तिन्ही रस्त्यावरचे फुटेज बघावे लागतील.” – पांचाल.
“पांचाल साहेब, आपण असं करू प्रत्येक रस्त्यावर असलेले शेवटचे दोन फुटेज तपासू. कुठे तरी दुकानांवर कॅमेरे असतील किंवा चौकात असतील. तुम्ही हे कॅमेरे बघा कुठे आहेत, मग आपला रिसर्च चालू करू.” – निशांत.
तिन्ही रस्त्यावर असलेल्या कॅमेऱ्यांचे तीन महिन्या पूर्वीचे फुटेज तपासले. त्यात पूर्ण दिवस गेला. पण रिजल्ट मिळाला. भावेशची गाडी वलसाड च्या दिशेने जातांना दिसली.
“साहेब हा तुमचा माणूस वलसाडला कशाला जातो आहे? माझ्या मते त्याने वलसाड – सूरत - वडोदरा असा रूट घेतला असावा. कारण हिस्सारच्या माणसाचं वलसाडला काय काम? आपण डायरेक्ट वडोदरा चेक करू.” – पांचाल.
“तुमचं म्हणण बरोबर आहे, पण आपल्याला सर्वच शक्यता पडताळून पाहाव्या लागतील. कारण हा हिस्सारचा माणूस वापीला तरी कुठल्या आधाराने आला होता हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला वलसाडला जाऊन चेक करावंच लागणार आहे. डायरेक्ट निष्कर्षाला पोचणं काही मला पटत नाहीये.” – निशांत.
“संध्याकाळी पारेख साहेबांना अपडेट दिलं तेंव्हा ते म्हणाले की मी वलसाडला फोन करतो. तुम्हाला तिथे सर्व मदत मिळेल. पांचाल ला काही तिथे पाठवता येणार नाही. पण तुम्हाला शोध कार्यात काही अडचण येणार नाही.” – पारेख.
“ठीक आहे.” असं म्हणून आणि त्यांना धन्यवाद देऊन निशांत आणि सरोश निघाले.
वलसाडला सूरतला जाण्याचा मार्ग प्रथम चेक केला आणि एकाच प्रयत्नात यश मिळालं. आता मिशन सूरत. आतापर्यन्त मिळालेल्या फुटेज मधे चार जण दिसत होते. ड्रायव्हर, त्यांच्या शेजारी एक जण आणि पाठीमागे रुपचंद आणि कावेरी. काही क्लिप मधे पुसट तर काही मधे स्पष्ट दिसत होतं. सूरत मोठं शहर असल्याने बाहेर पडायला बरेच रस्ते होते, त्या सर्व रस्त्यांचे फुटेज बघण्यात २ दिवस गेले, पण भरूच च्या रस्त्यावर ती गाडी स्पॉट आउट झाली. आता भरूच.
“निशांत साहेब, आपण हे काम सूरत पोलिसांना सांगितलं असतं तरी चाललं असतं. मग आपण कशाला एवढा खटाटोप करत आहोत?” – सरोशने त्यांच्या मनातली शंका विचारली.
“तूच विचार कर, वेळेकर साहेब स्वत: वापीला गेले आणि त्यांना गाडीची महत्वपूर्ण माहिती मिळाली. बऱ्याच वेळेस दुसऱ्याचं काम करतांना काही गोष्ट सुटून जातात. म्हणजे मुद्दाम कोणी हे करत नाही, पण काही वेळेस अनावधानाने सुटून जातात. आत्ता आपल्या जवळ काहीच क्ल्यू नाहीये, आणि रुपचंदचा पत्ता लागल्या शिवाय कावेरी मिळणार नाही. त्यामुळे हे करावंच लागेल. त्याचा माग काढता आला, तर कावेरी नक्की सापडेल अशी मला आशा वाटते आहे.” - निशांत.
दुसऱ्या दिवशी भरूचचं पण काम आटोपलं. गाडी बडोद्याच्या दिशेने गेलेली दिसली.
आता बडोदा. पण बडोदा हे खूप मोठं शहर आहे, किती तरी मार्ग शहराच्या बाहेर जातात. हे वेळखाऊ काम असणार होतं. पण ते करावंच लागणार होतं.
****
सायबर सेल मधून दुपारी वेळेकरांना फोन आला.
“साहेब, तुम्ही आम्हाला एक फोन नंबर दिला होता, रुपचंदचा. तो स्विच ऑफ झाला होता.” – सायबर ऑफिसर.
“हो आठवतंय काय झालं सुरू झाला का फोन?” – वेळेकर.
“त्याचा IMEI नंबर आम्ही ट्रॅकिंगला टाकून ठेवला होता. आज तो सुरू झाला. पण साहेब, नंबर वेगळाच आहे.” – सायबर ऑफिसर.
“कोणाचा नंबर आहे? काही कळलं का?” – वेळेकर.
“हो साहेब. कोणी उदयसिंग आहे. आणि सध्याची लोकेशन वसई ईस्ट दाखवत आहे. तुम्हाला मी शेयर करतो.” – सायबर ऑफिसर.
वेळेकरांनी धनशेखर साहेबांना सायबर ऑफिस मधून मिळालेली माहिती सांगितली.
“या उदयसिंग ला शोधायला पाहिजे. तोच रुपचंदचा ठिकाणा सांगू शकेल. कदाचित रूपचंदचा हा सहकारी असेल.” – वेळेकर.
“वेळेकर, रुपचंद इतका मूर्ख नक्कीच नाहीये आपल्याच माणसाला फोन द्यायला. फोन चालू झाल्यावर पोलिस आपल्या पर्यन्त पोहोचू शकतात हे त्यांच्या सारख्या निर्ढावलेल्या माणसाला कळणार नाही का?” – धनशेखर.
“सर, तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे. पण या उदयसिंगला शोधायलाच पाहिजे. पण साहेब, आपल्याला इन्फॉर्मेशन होती की हा फोन भावनगरच्या आसपास बंद झाला. मग भावनगरला मिळालेला फोन या माणसाने तो वसईला येऊन का चालू केला? या प्रश्नाचं पण उत्तर मिळायला पाहिजे.” – वेळेकर.
“करेक्ट आहे. तो माणूस जर संबंधित असेल, तर त्याच्याकडून रुपचंदची माहिती आपण काढून घेउच. पण या माणसाची चौकशी व्हायलाच ही.” – धनशेखर.
“ठीक आहे साहेब, मी आत्ताच निघतो वसईला.” – वेळेकर.
वेळेकर वसईला पोचले. लोकेशन च्या जागेवर जाऊन त्यांनी उदयसिंगला फोन केला. उदयसिंगने तो उचलला.
“उदयसिंग आहेत का?” – वेळेकर.
“मी उदयसिंगच बोलतो आहे. कोण आपण? काय काम आहे?” – उदयसिंग
“आम्हाला भेटायचं आहे. तुम्ही कुठे आहात?” – वेळेकर.
“तुम्ही कोण बोलता आहात? आणि काय काम आहे?” – उदयसिंग बोलता बोलता गोडाउनच्या बाहेर आला. समोरच पोलिस पार्टी उभी होती.
“तुम्ही पोलिस आहात का? मी काय केलं आहे? मला का शोधता आहात?” – उदयसिंग
“तुम्ही काहीच केलं नाहीये, एका अपघाताची चौकशी करायची आहे. बस.” – वेळेकर.
“ठीक आहे. या मी समोरच उभा आहे.” आणि असं म्हणून उदयसिंगने हात हलवला.
“कुठला अपघात साहेब? मला तर काहीच आठवत नाही.” – उदयसिंग
वेळेकर उदयसिंगचं निरीक्षण करत होते. साधा कुटुंब वत्सल माणूस दिसत होता. त्यांनी अंदाज बांधला, तिथल्याच एखाद्या गोडाउन मधे कारकुनाचं काम करत असणार. रुपचंद अर्थातच माहागच फोन वापरत असणार, या माणसाची ती ऐपत नक्कीच दिसत नाही. काय भानगड आहे यांचा उलगडा व्हायलाच पाहिजे.
“अपघात नाही झालेला. प्रश्न तुमच्या जवळ असलेल्या फोन चा आहे. आजच सकाळी तुम्ही हा फोन चालू केला ना?” – वेळेकर.
“हो, पण त्याचं काय?” – उदयसिंग त्याला समजतंच नव्हतं की मोबाइल घेतल्यावर चालू करणारच. पोलिसांचा काय संबंध. पण उत्तर द्यावंच लागणार होतं.
“हो.” – उदयसिंग
“हा हँडसेट तुम्ही केंव्हा आणि कुठे घेतला?” – वेळेकर.
“आज सकाळी माझा जुना फोन बंद पडला म्हणून मी कोपऱ्या वरच्या दुकानात जाऊन जाऊन हा घेतला.” – उदयसिंग
“कितीला पडला?” – वेळेकर.
“अडीच हजार. खूप स्वस्तात मिळाला.” – उदयसिंग
“चला ते दुकान दाखवा.” – वेळेकर.
“साहेब, कामाची वेळ अजून संपली नाहीये. डेस्क सोडून गेलो तर मालक रागावेल. माझ्या नोकरीचा सवाल आहे साहेब.” – उदयसिंग
“तुझा मालक इथेच आहे?” – वेळेकर.
“नाही, ते लोहार चाळीत आमचं दुकान आहे तिथे असतात.” – उदयसिंग
“त्यांना फोन लावा, मी बोलतो त्यांच्याशी. तुम्हाला ते काही बोलणार नाही.” – वेळेकर.
“नको साहेब, मी दुसऱ्याला सांगून येतो.” – उदयसिंग
दुकानदार पोलिस पार्टी आणि उदयसिंगला पाहून चमकला.
“हा हँडसेट उदयसिंगला तू केंव्हा विकला?” – वेळेकर.
“आज सकाळी साहेब. काय झालं साहेब?” – दुकानदार.
“हा जुना सेट आहे. तुला कोणी विकला?” – वेळेकर.
एक ट्रक वरचा क्लीनर होता साहेब, त्याने मला दीड हजार रुपयांत विकला.”- दुकानदार
“ही गोष्ट केंव्हाची?” – वेळेकर.
“साधारण चार महीने झाले असतील.” – दुकानदार.
“कुठे लिहून ठेवलं आहेस? हँडसेट केंव्हा घेतला ते?” – वेळेकर.
“हो साहेब, पण आता शोधावं लागेल. लगेच नाही सांगता येणार.” – दुकानदार.
“शोध आत्ताच. आणि त्याचं नाव लिहून ठेवलं असेल तर ते पण सांग. आम्ही इथेच आहोत. लाग कामाला.” – वेळेकर.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने