किडनॅप
पात्र परिचय
मंगेश कथेचा नायक
कावेरी नायिका
विभावरी कावेरीची मैत्रीण आणि रूम मेट
विश्वासराव कावेरीचे वडील
मालतीबाई कावेरीची आई.
निशांत मंगेशचा मित्र.
धनशेखर असिस्टंट पोलिस कमिश्नर
वेळेकर पोलिस सब इंस्पेक्टर
खबरी १,२,३ आणि गुंजन पोलिसांचे खबरी.
अरुथिला कावेरीची विभाच्या आधीची मैत्रीण आणि रूम मेट
प्राची कावेरीची मुंबईची मैत्रीण
वंदना प्राचीची रजत सहकारी बँकेतली मैत्रीण
ज्योति कावेरीची मोठी बहीण.
गणेशन ज्योतीचा नवरा.
प्रभात कावेरीच्या शेजारच्या फ्लॅट मधे राहणारा मुलगा.
टोळी सदस्य रवी, अन्वर, कासिम, नारायण सिंग बिच्छू, पप्पू
ईश्वर आणि सुशीला.
हंसराज रविचा शेठ
शिंदे, चव्हाण पोलिस इंस्पेक्टर.
वाजीद, पिल्लई आणि निशांतचे गुन्हेगारी जगातले मित्र.
सावळा रमेश
चंदू, थॉमस निशांतचा मित्र सुभाष चे मित्र.
मोनिशा थॉमसची मैत्रीण.
अंसारी किडनॅपर
रेहाना अंसारीची बायको.
अप्पाजी पोलिस इंस्पेक्टर हुबळी
पारेख वापीचे पोलिस इंस्पेक्टर.
पांचाल वापीचे पोलिस हेड कॉंस्टेबल.
गुंडेचा बडोद्याचे पोलिस इंस्पेक्टर.
भावेश कावेरीला ज्या गाडीतून पळवलं त्याचा ड्रायव्हर.
रुपचंद कावेरीला पळवून लग्न करणारा बदमाश
विल्सन आणि पिटर रुपचंदचे साथीदार.
विनय भावनगरचा कारखानदार.
सुभाष विनयचा ड्रायव्हर.
गंगाधरराव विनयचे वडील.
नर्मदा विनयची आई.
उज्ज्वल विनयचा भाऊ.
भरूचा भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर.
गायकवाड भावनगरचे पोलिस इंस्पेक्टर. भरूचांच्या जागेवर.
धनंजय विनयचे वडील.
सुभद्रा विनयची आई.
सरोश कॉँस्टेबल अंधेरी पोलिस स्टेशन.
पूर्ववृत्त
विनयने कावेरीला नर्सिंग होम मधे शिफ्ट केलं. पण नर्मदा बाई तिथे दिवसभर बसायची. भरूचा साहेबांनी त्यांना दिवसभर बसता येणार नाही असं सांगितलं. आता वाचा पुढे.
भाग ७२
भाग ७१ वरुन पुढे वाचा......
अर्धा तास बरेच प्रश्न विचारून झाल्यावर ते निघाले. सुभद्राबाईनी त्यांना विचारलच,
“साहेब, काय वाटतं तुम्हाला? सगळ्या शंका दूर झाल्या का?” – सुभद्राबाई.
“थोडा धीर धरा. बघू आपण काय करता येतं ते.” – गायकवाड म्हणाले, आणि निघाले.
दोन दिवसांनी गायकवाड साहेबांनी विनयला फोन करून बोलावून घेतलं .
“तुमची मागणी मान्य झाली आहे. तुम्ही एक शपथ पत्र लिहून द्या. त्यात काय व्यवस्था करणार आहात त्याचा सविस्तर खुलासा करा. मग मी एकदा तुमच्या घरी भेट देईन. दर आठवड्याला आमचा एक माणूस येईल आणि सर्व व्यवस्थेचा आढावा घेईल. हे तुम्हाला मान्य असेल तर आपण पुढे जाऊ.” – गायकवाड.
“तुमच्या सर्व अटी मान्य आहेत आणि त्यांची पूर्तता पण आम्ही करू याबद्दल तुम्ही निश्चिंत असा. आम्हाला सांगा तुमच्या सर्व रीक्वायरमेंटस म्हणजे त्या प्रमाणे मी व्यवस्था करतो आणि तुम्हाला कळवतो.” – विनय
पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे सर्व व्यवस्था करून झाल्यावर विनयने गायकवाड साहेबांना बोलावलं. त्यांनी ओके केल्यावर, कावेरीला घरी शिफ्ट केल. तिच्यासाठी वेगळी खोली होती आणि २४ तास बायका ठेवल्या होत्या. सुभद्राबाईची देखरेख असणारच होती. एक नवीन अध्याय सुरू झाला होता. हळू हळू सर्वांनाच कावेरीची सवय झाली. प्रत्येक जण अधून मधून कावेरीच्या रूम मधे डोकावून जात होता.
सुभद्राबाईची जबर इच्छाशक्ती म्हणा, किंवा त्यांना कावेरी बद्दल वाटणारी ममता म्हणा, पण पंधरा दिवसांत प्रकृतीत थोडा थोडा फरक दिसायला लागला होता. आधी पायाची बोटं हलायला लागली मग हाताची आणि एक दिवस कावेरीने डोळे उघडले. पण लगेच मिटले. सुभद्राबाईना इतका आनंद झाला की त्यांच्या गळ्यातून आवाजच फुटेना. डोळ्यांना धारा लागल्या होत्या. दुपारची वेळ असल्याने घरात फक्त एक केअर टेकर बाई, आणि सुभद्राबाई आणि धनंजयरावच फक्त होते. कावेरीने पुन्हा एकदा डोळे उघडले आणि काही क्षणातच पुन्हा मिटले.
विनयला फोन गेला. तो आणि उज्ज्वल धावतच घरी आले. त्यांनी डॉक्टरांना फोन करून सांगितलं. ते संध्याकाळी येतो म्हणाले.
संध्याकाळ पर्यन्त कावेरीने काही हालचाल केली नाही पण संध्याकाळी डोळे उघडले.
ती बघत होती, पण तिला काही आकलन होत नव्हते. थोडा वेळ ती नुसतीच इकडे तिकडे बघत राहिली.
“कसं वाटतंय आता?” – डॉक्टरांनी हिंदीत विचारलं.
“डॉक्टरांचा पांढरा कोट, गळ्यात स्टेथॉस्कोप पाहील्यावर ते, डॉक्टर आहेत हे कावेरीला कळलं. तिने क्षीण आवाजात विचारलं
“मला काय झालं आहे?” – कावेरी.
“काही विशेष नाही. प्रवासामुळे थोडा थकवा आला आहे एवढंच.” – डॉक्टर.
“प्रवास? मी कुठे गेले होते?” – कावेरी.
“तुम्ही जास्त विचार करू नका. आता औषध लिहून देतो आहे. ते घेतल्यावर तुम्हाला बरं वाटेल.” – डॉक्टर.
तेवढ्या बोलण्याने सुद्धा कावेरीला थकवा आला आणि तिने डोळे मिटले.
“आता हळू हळू सर्व ठीक होईल. चिंता करू नका. पण आत्ताच तिला प्रश्न विचारून भंडावून सोडू नका. तिला शुद्ध आली आहे, नॉर्मल वर यायला थोडा वेळ लागेल. धिराने घ्या. मी उद्या पुन्हा येईन. तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही जे अपार कष्ट घेतले, ते फळाला आलेत.” – डॉक्टर म्हणाले.
दोन एक तासांनी कावेरीला पुन्हा जाग आली. यावेळी सुभद्राबाईनी तिला पाणी दिलं आणि मऊ खिचडी खाणार का असं विचारलं. ती हो म्हणाल्यावर तिला खिचडी भरवली. खाल्यावर तिला जरा तरतरी आली.
“मी कुठे आहे? हे हॉस्पिटल वाटत नाही.” – कावेरी.
“हे आमचं घर आहे. तुझं नाव काय?” – सुभद्राबाई.
“माझं नाव ...... काय आहे माझं नाव? मला आठवत नाही. तुम्हीच सांगा.” – कावेरी.
विनय, धनंजयराव आणि उज्ज्वल मागेच उभे होते. कावेरीचं उत्तर ऐकल्यावर त्यांना धक्काच बसला. या पोरीला तिचं नाव माहीत नाही? म्हणजे स्मृति गेली की काय हिची? मग आता तिच्या घरच्यांचा शोध कसं घेणार? सगळेच प्रश्न. उत्तर कशाचंच नाही.
“अग, जास्त विचार करू नकोस. कधी कधी होतं असं. उद्या सकाळ पर्यन्त आठवेल. आत्ता तुला मी औषध देते, शांत पणे झोप. आपण उद्या बोलू.” – सुभद्राबाई.
कावेरीने आज्ञाधारक पणे मान डोलावली आणि औषध घेऊन झोपली सुद्धा. तीन महिन्यात खाण्या पिण्याचे खूप हाल झाले होते आणि त्यामुळे अशक्तपणा फार होता. अर्धी वाटी खिचडी खाता खाताच थकली. फारसं काही बोलण्याचं त्राण उरलं नव्हतं.
विनयने डॉक्टरांना जे काही घडलं त्याचा मेसेज केला.
“जसा वेळ मिळेल तसा उद्या येऊन जाईन.” – डॉक्टर.
सकाळी कावेरीला जाग आली. कालच्या पेक्षा आज फ्रेश वाटत होती. नर्मदाबाई होत्याच तिथे. त्यांनी कावेरीला विचारलं,
“तू चहा घेतेस की कॉफी? बिस्किटं आणू का?” – सुभद्राबाई.
“चहा घेते. पण मी आहे कुठे?” – कावेरी.
“तू आधी चहा घे, बिस्किटं खा म्हणजे जरा एनर्जी येईल. मग आपण बोलू.” मग सुभद्राबाईनी केअर टेकर बिंदुला सांगितलं की कावेरीला स्पंजिंग वगैरे आटोपून घे. तो पर्यन्त मी चहा आणते.
स्पंजिंग झाल्यावर कावेरीला एकदम फ्रेश वाटलं. चेहऱ्यावर टवटवी आली आणि ती चहा प्यायला उठून बसली. ते पाहून नर्मदाबाईंना खूपच आनंद झाला. चहा बिस्किटं झाल्यावर, कावेरी म्हणाली,
“आता सांगा मी कुठे आहे?” – कावेरी.
“हे भावनगर आहे.” – सुभद्राबाई.
“भावनगर? मी इथे कशाला आले आहे?” – कावेरी.
“तू कुठून आली आहेस?” – सुभद्राबाई.
कावेरी विचारात पडली. तिला काहीच आठवत नव्हतं. आणि असं का होतं आहे ते पण कळत नव्हतं. ती डोळे मिटून पडून राहिली.
सुभद्राबाईनी विचार केला की तिला डिस्टर्ब करू नये म्हणून त्या बाहेर गेल्या. कावेरीला पण विचार करता करता झोप लागली.
अर्ध्या तासाने डॉक्टर आले. त्यांनी सगळं ऐकून घेतलं. म्हणाले,
“काल मी हिंदीत बोललो, तर तिने हिंदीत उत्तरं दिला. आज तुम्ही म्हणता आहात की ती मराठी बोलते. तुम्ही एक करा, तिची मराठी कुठल्या भागातली आहे हे बघा. म्हणजे, मुंबई पुण्याची मराठी, की माराठवाड्याची की विदर्भातली त्यावरून आपल्याला अंदाज येईल मग त्या अनुसार पोलिस शोधून काढू शकतील. मला वाटतं की तुम्ही कौंसेलर ची मदत घ्या. लवकर पत्ता लागेल.” – डॉक्टर.
कावेरी शुद्धीवर तर आली पण नवीनच प्रश्न उभे राहिले. कावेरीची तब्येत आता झपाट्याने सुधारत होती. ती आता चांगली हिंडती फिरती झाली होती. आता कौंसेलर च्या बरोबर मीटिंग सुरू झाल्या. हळू हळू तिच्या बद्दलच्या माहितीत भर पडत होती. पण अजूनही नाव आठवत नव्हतं.
******
एक दिवस ठरल्याप्रमाणे, विभा आणि विभाचे आईवडील अमरावतीला निशांतच्या घरी आले. चहा पाणी घेऊन फ्रेश झाल्यावर, सर्व मंगेशच्या घरी गेले. निशांतच्या आईवडीलांना मंगेशचे घर परके नव्हतेच. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. तसंही मंगेश आणि निशांत कडून विभा बद्दल खूप ऐकलं होतं. अगदी कावेरी इतकी सुंदर जरी नसली तरी विभा दहा जणीत नक्कीच उठून दिसली असती. पसंती झाली. साखरपुड्याची तारीख पण ठरली. साखरपुडा अमरावतीलाच करायचं ठरला. आणि यथावकाश तो पार पण पडला. आता निशांत मुंबईला जायला मोकळा झाला होता.
“ये निशांत. आटोपले सर्व कार्यक्रम?” – धनशेखर.
“हो सर. आता मी मिशन वर जायला मोकळा. तुम्ही सांगा केंव्हा निघू?” – निशांत.
‘तू नेमकं काय करणार आहेस? थोडी कल्पना देशील तर बरं होईल. सरोश वर काय कामगिरी सोपवली आहे ते लिहावं लागेल.” – धनशेखर.
“भावेशचा जुनागडला खून झाला, त्यामुळे त्याच्याकडून जी माहिती अपेक्षित होती ती काही मिळाली नाही. मग तपास थांबला. आता मी वापी पासून सुरवात करणार आहे. आता आपल्याजवळ गाडीचे डिटेल्स आहे. सगळीकडचे cctv फुटेज बघणार आणि त्या गाडीचा माग काढत काढत रुपचंद पर्यन्त पोचण्याचा प्रयत्न करणार.” – निशांत.
“अरे पण हे किती किचकट काम आहे! ती गाडी ज्या ज्या रस्त्याने गेली, तसा तसा तुला माग काढावा लागणार आहे. एवढं करून जी माहिती मिळेल, ती तीन महिन्या पूर्वीची असणार आहे. तो आत्ता कुठे असेल ते कळणारच नाहीये.” – धनशेखर.
“कळेल साहेब काही तरी लीड मिळेलच अशी मला खात्री वाटते आहे. भावेश असता, तर काम खूपच सोपं झालं असतं आणि आत्ता पर्यन्त रुपचंद गजाआड गेला असता. पण हे इतकं मोठं विषारी वर्तुळ आहे की त्यांच्या करता एखाद्याचा खून करणं ही मामुली गोष्ट आहे. माझ्या मते भावेशने मालकाला चोरून पैशा साठी त्यांना सर्विस दिली, पण त्यांची फार मोठी किंमत त्याला चुकवावी लागली. तो या टोळीचा भाग असेल, असं मला अजिबात वाटत नाही.” – निशांत.
“ठीक आहे तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. वेळेकर आज सर्व प्रोसीजर पूर्ण करतील. उद्या पासून तुम्ही कामाला सुरवात करा.” – धनशेखर.
मग वेळेकरांनी सरोश आणि निशांत ची ओळख करून दिली. सरोशला सर्व प्लॅन समजावून सांगितला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बोरीवली स्टेशन वर भेटायचं ठरवून मीटिंग संपली.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने