जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी 26
"डॉक्टर,काही घाबरण्यासारखे नाही ना? लवकर बरी होईल ना अमृता?"
अमृताचे वडील डॉक्टरांना काळजीच्या स्वरात विचारत होते.
"घाबरण्यासारखे आता काही नाही. आवश्यक तेवढ्या सर्व टेस्ट केल्या आहेत. रिपोर्टसही नॉर्मल आले आहेत. सर्व ठीक आहे. तिला अचानक मानसिक धक्का बसला, त्यामुळे तिची तब्येत बिघडली. तिला जास्त काही टेन्शन देऊ नका. होईल ती लवकर बरी."
डॉक्टरांनी अमृताच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला व धीर देत म्हणाले.
डॉक्टरांच्या डोळ्यांतील विश्वास व बोलण्यातील ठामपणा पाहून, अमृताच्या वडिलांना थोडेसे हायसे वाटले. मनावरचे खूप मोठे टेन्शन कमी झाल्यासारखे वाटले.
अमृताची अवस्था पाहून ते इतके घाबरले होते की,
आता सर्व संपले असे वाटू लागले होते.
पण आता डॉक्टरांनी व्यवस्थित समजावून सांगितले, त्यामुळे त्यांना थोडे बरे वाटले.
आता सर्व संपले असे वाटू लागले होते.
पण आता डॉक्टरांनी व्यवस्थित समजावून सांगितले, त्यामुळे त्यांना थोडे बरे वाटले.
" काय सांगितले डॉक्टरांनी?"
अमृताच्या आईने डॉक्टर बाहेर जाताच, अमृताच्या वडिलांना विचारले.
"आता घाबरण्यासारखे काही नाही. सर्व टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल आले. फक्त तिला आता काही टेन्शन देऊ नका असे सांगितले."
अमृताचे वडील आपल्या बायकोला म्हणाले.
"देवा, माझ्या अमृताला लवकर बरे कर."
अमृताच्या आईने देवाला प्रार्थना केली.
"कल्पना, आपल्या अमृतासाठी आपला जीव इतका घाबरला होता आणि ती लवकर चांगली व्हावी म्हणून आपण चांगल्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेत आहोत. देवाला प्रार्थनाही करत आहोत. आपली अमृता चांगली होऊन घरी आली की आपल्याला खूप आनंद होईल. पण अमेयच्या आई-वडिलांचे काय गं! अमेय तर आता परत कधी येणार नाही. कसे वाटत असेल त्याच्या आई-वडिलांना? आपल्या अमृतावर पण किती आघात झाला आहे! अमेयने असे नको करायला होते. त्याच्या अशा वागण्याने त्याचे कुटुंबही दुःखात आहे आणि आपल्या अमृताचीही आज अशी अवस्था झाली आहे."
अमृताचे वडील आपल्या पत्नीला कल्पनाला म्हणाले.
"हो, ना! आपली मुले दुःखात असली किंवा आजारी असली की आई वडिलांना खूप काळजी वाटते. अमृताची तब्येत बघून माझे तर हातपायच गळले होते. डॉक्टरांनी आता सर्व व्यवस्थित आहे असे सांगितले, तेव्हा जीवाला थोडे बरे वाटले.
पण अमेयच्या आई-वडिलांची परिस्थिती कशी असेल? याचा विचार करूनच कसे तरी होते आहे. अमृताला असे सोडून तिथे जाऊ पण शकत नाही आणि त्यांच्यासमोर कसे जावे? तेवढी हिंमत पण नाही माझ्यात. अमेयने असे नको करायला हवे होते. स्वतःचे आयुष्य संपवले आणि इतरांनाही खूप मोठे दुःख देऊन गेला. त्याच्या व अमृताच्या प्रेमाला आपण दोघी कुटुंबानी स्वीकारले होते आणि लग्नाचा विषयही सुरू झाला होता. या आनंदाच्या बातमीने अमृता व अमेय दोघेही किती आनंदी झाले होते! त्यांचे आनंदी चेहरे पाहून आपणही किती आनंदी झालो होतो! आणि आता हे असे कसे झाले? कुणाची नजर लागली पोरांच्या सुखाला? अमेय गेला आणि अमृताची अशी स्थिती! काय म्हणावे या सर्वाला?"

कल्पनाताईंनी आपले दुःखी मन व्यक्त केले.
क्रमश:
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा