Login

कथा : विकृती

.
" दहा हजार खूप होतात." -विनय
" साहेब माझी बायको पण माल आहे." -सचिन
विनयने सचिनच्या हातावर दहा हजार रुपये ठेवले. तो खोलीत शिरला. सोबतच सचिनही आत गेला.
" तू का आत येतोय?" विनयने विचारले.
" मला माझ्या बायकोला परपुरुषासोबत संबंध बनवताना पाहून फार आनंद होतो."
" हम्म. पण ही झोपली का आहे?" -विनय
" ती तशीच करते. नशा करते संबंध बनवण्यापूर्वी."
" अच्छा." -विनय
निद्रावस्थेत असलेल्या सुधासोबत विनयने मनसोक्तपणे समागम केला. तो तिच्या नाजूक देहावर तुटून पडला. सचिनला आपल्या बायकोला परपुरुषासोबत पाहून असुरी आनंद मिळत होता. थोड्या वेळाने विनय निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुधा उठली. तिला फार थकवा जाणवत होता.
" काय झाले सुधा?" सचिनने विचारले.
" काल काही झाले का आपल्यात?" सुधाने विचारले.
" हो. आपण एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो होतो."
" मला काहीच कसे लक्षात नाही?"
" तुला गाढ झोप लागली होती. आता जास्त विचार नको करू."
" हम्म."
सचिनचे सुधासोबत लग्न झाले होते. कौटुंबिक दबावाखाली येऊन त्याने सुधासोबत विवाह केला होता. आईवडील गावाकडे राहायचे. त्यांना वाटले लग्नानंतर मुलगा सुधारेल. सचिनला दारूचे व्यसन होते. आळशीपणा , रागीट स्वभाव यामुळे तो एका नोकरीवर जास्त काळ टिकत नसे. सुधा किराणा मालाचे दुकान चालवून पैसे कमावत होती. लग्नानंतर सचिन सुधाला टाळत होता. शारीरिक संबंध प्रस्थापित करत नव्हता. त्याला सुधा आवडत नव्हती. त्यामुळे सुधाची घुसमट व्हायची. नंतर सचिनने सुधाला संशय येऊ नये म्हणून डेटिंग अँपवर सुधाचेच फोटो टाकले. त्याने सुधाची किंमत ठरवली. सचिन सुधाच्या जेवणात बेशुद्धीचे औषध मिसळत. परपुरुषांना घरी बोलावून तो त्यांना त्याच्या बायकोसोबत झोपवायचा. तसेच दोघांना समागम करताना पाहायचा. यात त्याला असुरी आनंद मिळत होता. सोबत त्याला पैसेही मिळायचे.
***
रात्रीचा प्रहर होता. सचिन दारू पीत होता. मोबाईलच्या वॉलपेपरवर सुधाचा फोटो होता.
" सुधा माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण मला संबंध बनवण्याची भीती वाटते. मी तुला ते सुख देऊ शकत नाही जे तुला पाहिजे. लहानपणी एकदा काकाकाकूंना जवळ येताना पाहिले. तेव्हापासूनच मला इतरांना संबंध बनवताना पाहायला आवडते. मजा येते. मला नोकरी नाही. तुझ्याकडून पैसे मागायला लाज वाटते. म्हणून मला घरात परपुरुषांना आणावे लागते. एकदा का तू गर्भवती झाली की मी हे सर्व थांबवेल. तुझी शपथ. मग मीही समाजात मिरवेल की मीपण मर्द आहे." इतके बोलून सचिन जोरजोरात हसू लागला.
***
एकदा सुधाला तिची लहानपणीची मैत्रीण प्रतिभा भेटली. ती पोलीस ऑफिसर होती. दोघांमध्ये लहानपणीच्या गप्पा रंगल्या. सुधाचा अस्वस्थ चेहरा प्रतिभापासून लपला नाही. सुधाने तिला सर्व हकीकत सांगितली.
" दिवसभर सचिन मला साधं जवळही घेत नाही आणि रात्रीच आमच्यात संबंध घडतात. रात्री अचानक चक्कर येते. डॉक्टरांना दाखवले तरी काही फरक पडला नाही." सुधा म्हणाली.
" हम्म. काहीतरी गडबड आहे. मी तुला सीसीटीव्ही कॅमेरे देते. लवकरच सत्य उलगडेल." प्रतिभा म्हणाली.
सुधाने सचिन बाहेर गेल्यावर घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. सचिनने रात्री एका व्यक्तीला घरी बोलावले. सुधा झोपी गेली होती. सकाळी उठल्यावर सुधाने रेकॉर्डिंग चेक केली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती जोरजोरात रडू लागली. आजूबाजूचे लोक जमा झाले पण सुधा कुणाला काही सांगत नव्हती. घराचे दार लावून तिने प्रतिभाला फोन लावला. थोड्या वेळाने सचिन घरी आला. सुधाने सचिनला थोबाडीत मारली.
" का केलं तुम्ही माझ्यासोबत असे? राक्षस पण आपल्या पत्नीला परपुरुषांसोबत झोपवत नाहीत. तुम्ही मला वेश्या बनवलं. तुम्हाला नरकात पण जागा मिळणार नाही. तुम्ही नोकरी करत नाही. दारू पिऊन घरी येतात. बायको म्हणून मी कधी तुम्हाला कसला हट्ट केला नाही. काही हौसमौज केली नाही. किराणा मालाचे दुकान चालवून संसाराचा रहाटगाडा ढकलत आहे. आणि तुम्ही असले नीच कृत्य केले. लाज वाटत नाही का तुम्हाला?"
" मी बाप बनू शकत नाही पण तुला आई बनता यावं म्हणून मी. "
" शी. "
सुधा सचिनला मारू लागली. तेवढ्यात तिथे प्रतिभा आली. तिने सचिनला अटक केली. सचिनने स्वतःचा गुन्हा कबूल केला. त्याला शिक्षा झाली.
***
सुधा प्रतिभाच्या घरी राहत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. तिने एकदोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रतिभामुळे ती वाचली होती.
" सुधा, आता किती दिवस त्याच दुःखात रडत बसणारे ? मला ठाऊक आहे की एका स्त्रीसाठी या वेदना कधीही न भरून निघणाऱ्या असतात परंतु तुला पुढं जावेच लागणारे. चौकशीत कळलं की तुझ्या अन्नात बेशुद्धीचे औषध मिसळून सचिन रोज परपुरुषांना तुझ्यासोबत झोपवायचा आणि स्वतः दारू पीत बलात्कार घडताना पाहत बसायचा."
" माझे वडील वारल्यानंतर सावत्र आईने माझे लग्न मुद्दाम त्या कर्तृत्वहीन सचिनसोबत लावून दिले. पण मी कसल्याच तक्रारी न करता संसार करत राहिले. आता आयुष्य बरबाद झाले. काही उरले नाही जीवनात. माहेरी सावत्र आई येऊ देणार नाही. पण मी इथं जास्त दिवस राहू शकत नाही. माझी सोय एका महिला आश्रमात कर."
" तुला आठवते का जेव्हा माझ्या घरी बेताची परिस्थिती होती तेव्हा माझ्याकडे पुस्तके विकत घेण्याचेही पैसे नव्हते. पण तू मला तुझे पुस्तके द्यायची. तुझ्या बाबांकडे हट्ट धरून माझ्या शाळेची फीस भरायला लावायचीस. आज मी ऑफिसर आहे ते तुझ्यामुळेच. आता माझ्या मैत्रीणीला माझी सर्वात जास्त गरज आहे तर मी तिला वाऱ्यावर सोडून देऊ? इतकी स्वार्थी मी नाही. मी तुला नव्याने उभं करणार. तुझं अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करून तुला स्वतःच्या पायावर उभं करणार. त्यामुळे आता भूतकाळ विसर आणि उज्वल भविष्य घडव. "
" पण मी किती पुरुषांच्या अंगाखाली झोपलीय माझे मलाच ठाऊक नाही. अपवित्र झाले आहे मी. एकदा एका स्त्रीने तिची इज्जत गमावली मग ती पुन्हा पवित्र होत नाही. कुलीन स्त्रिया वेश्या बनतात पण वेश्या कधीच कुलीन बनत नाही."
" स्त्रीची इज्जत तिच्या योनीत आणून कोणी ठेवली? देह हा पिंजरा असतो. ज्यात आत्मा अडकलेला असतो. आत्मा पवित्र असला पाहिजे. तुझा आत्मा तुझं चारित्र्य निष्कलंक आहे. रस्त्यावर चार कुत्र्यांनी चावले तर आपण अपवित्र होत नसतो. आता पुन्हा असं नकारात्मक बोलली तर गाठ माझ्याशी आहे. दोन थोबाडीत लावून देईल."
सुधा हसली आणि तिने प्रतिभाला मिठी मारली.
©® पार्थ धवन


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →