"बरं झालं बाई, सारं सोपस्कार पार पडलं. लेक जावई खुश होऊन गेले ना त्यातच मी सगळी पुण्याई कमावली म्हणायची.. हो ना ग सुलेखा?"
सरलाताई आपल्या सुनेजवळ मनातलं बोलत होत्या.
"हो, आई. धोंड्याचा कार्यक्रम फार छान पार पडला. पुरणावरणाचा नैवेद्य, कपडा- लत्ता, जावयाचा मानपान सारं काही एकदम छान झालं."
सुलेखा देखील भरभरून बोलत होती पण मनातल्या मनात आईचे बोल आठवून तिला भरून येत होतं.
' सुलु एवढ्या वेळी धोंड्याला येऊन जा. अजून तीन वर्षांनी मी असेल की नाही हे माहीत नाही; त्यामुळे तू, सासूबाई आणि जावई असे घरातले सगळे येऊन जा बरं, तेवढंच माझ्या मनाला समाधान !'
' सुलु एवढ्या वेळी धोंड्याला येऊन जा. अजून तीन वर्षांनी मी असेल की नाही हे माहीत नाही; त्यामुळे तू, सासूबाई आणि जावई असे घरातले सगळे येऊन जा बरं, तेवढंच माझ्या मनाला समाधान !'
सुलुला रडू येऊ लागलं पण तिने मनातल्या मनातच आवंढा गिळला. सासरी ननंद आणि नंदावा येणार म्हणून सासुबाईंनी सुलेखा व प्रवीणला धोंड्याला जाऊ दिलं नव्हतं. आज धोंड्याचा नेमका शेवटचा दिवस होता, आपण आपल्या आईची इच्छा पूर्ण करू शकलो नाही याची खंत सुलेखाला बोचू लागली.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सुलेखाने दार उघडले.
" अरे पाटील काकू?"
" अरे पाटील काकू?"
" सुलेखा कशी आहेस?"
"मजेत! तुम्ही कशा आहात?"
" फारच छान.."
" या ना घरात.."
हॉलमध्ये दिमाखात बसलेल्या सरलाताई सिरीयल बघत होत्या.
"काय म्हणतेस सरला?" पाटील काकू
" मजेत बाई! तू काय म्हणतेस?" सरलाताई
" काही नाही, लेक जावई येऊन गेले धोंड्याला. मग सुनेला म्हटलं आज तू ही जाऊन ये; शेवटचा दिवस आहे ना आज!" पाटील काकू
" छान! माझेही लेक जावई आजच सकाळी गेले. काल आले होते त्यामुळे रात्रीच सर्व कार्यक्रम उरकून घेतला आम्ही.. कसं आहे, लेक जावई म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो. त्यामुळे त्यांची पावले या पवित्र महिन्यात आपल्या घराला लागली म्हणजे आपण महान पुण्य कमावल्याची भावना मला खूप सुखावत आहे."
सरलाताई पाटील काकूंना भरभरून सांगत होत्या.
सरलाताई पाटील काकूंना भरभरून सांगत होत्या.
" सुलेखा तू नाही गेलीस का माहेरी?" गहन विचारांत हरवलेल्या सुलेखाला पाटील काकूंच्या या वाक्यांनी विचलित केले.
सरलाताई मध्येच बोलल्या,
" सुलेखाच्या आईने धोंड्याच्या महिन्याच्या सुरुवातीलाच आम्हाला फोन केला होता पण माझे लेक-जावई आल्याशिवाय तिला कसं पाठवू?"
" सुलेखाच्या आईने धोंड्याच्या महिन्याच्या सुरुवातीलाच आम्हाला फोन केला होता पण माझे लेक-जावई आल्याशिवाय तिला कसं पाठवू?"
" बरं झालं. नाही तरी धोंड्याच्या महिन्यात जावयाचा तो मान ठेवायचा असतो आणि सुनेचा तो...." असे बोलून पाटील काकू उपहासात्मक हसू लागल्या.
सुलेखाला खूप वाईट वाटले. ती मध्येच म्हणाली,
" काकू तुम्ही बोला. मी चहा आणते."
" काकू तुम्ही बोला. मी चहा आणते."
सरलाताईंनी सुलेखाला झालेल्या वेदना टिपल्या, त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले.
थोड्यावेळातच सुलेखाने चहा आणला. पाटील काकू चहा घेऊन निघाल्या व जाताना म्हणाल्या,
" धोंड्याच्या महिन्यात जावयाचा मान पहिला असतो. सून काय आपल्या घरीच असते कायम.. तिला कधीही पाठवले तरी काय फरक पडतो?"
" धोंड्याच्या महिन्यात जावयाचा मान पहिला असतो. सून काय आपल्या घरीच असते कायम.. तिला कधीही पाठवले तरी काय फरक पडतो?"
आता मात्र सरलाताई चिडल्या.
"पाटील बाई मग तुम्ही तरी कसं काय पाठवलं तुमच्या सुनबाईंना माहेरी? तिने नक्कीच तुमचं ऐकलं नसेल. सगळ्या सोसायटीला तुमच्या दोघींचा भांडण-तंटा रोज ऐकू येतो; त्यामुळे सुनेने आणि जावयाने धोंड्यासारख्या पवित्र महिन्यात पाळायचे नियम तुम्ही मला नाही सांगितले तर बरं होईल. या आता.."

पाटील काकू पुरत्या खजिल झाल्या आणि तावातवाने निघून गेल्या.
पाटील काकूंच्या बोलण्यामुळे सुलेखा अस्वस्थ झाली व आपल्या रूममध्ये जाऊन बसली. तिला अश्रू अनावर झाले. ती बराच वेळ रडत होती.
तेवढ्यात तिला कोणीतरी आवाज दिला.
" सुलेखा, ए सुलेखा.."
त्या आवाजात एक आपलेपणा, प्रेम, माया होती.
" सुलेखा, ए सुलेखा.."
त्या आवाजात एक आपलेपणा, प्रेम, माया होती.
हा आवाज सुलेखाच्या ओळखीचा होता. तिने डोळ्यांतील अश्रू पुसले व अधीर होत आवाजाच्या दिशेने पाहिले.
नक्की कोण होती ही व्यक्ती? या व्यक्तीला बोलवून सरलाताईंनी, सुलेखाला काही सरप्राईज देण्याचे ठरवले होते का? सुलेखाचे दुःखाचे अश्रू ही व्यक्ती पळवून लावेल?
पाहुया पुढील भागात..
पाहुया पुढील भागात..
क्रमशः..