जाणीव प्रेमाची भाग 3
©️®️शिल्पा सुतार
" मला या घरात कोणाचा सपोर्ट नाही." साक्षी म्हणाली.
"कशाला सपोर्ट हवा इथे. तुला काय त्रास आहे." परेश म्हणाला.
" हेच तर तुम्हाला समजत नाही. दादा कशी वहिनीची बाजू घेतात. आई, बाबा नीट रहातात. तुम्हाला ते जमलं नाही. मी एकटी पडते. माझ्यावर नेहमी चुकीचे आरोप लावतात. मला स्वतःला प्रोटेक्ट करावच लागेल. मी चुकीची नाही आहे हे सांगता सांगता मी थकून जाते. तरी कोणी ऐकत नाही. " तिने हळूच सांगितल.
" बघितलं का कशी बोलते आहे. उलट उत्तर देते. आई समोर बोलते. वहिनीला जुमानत नाही." परेश सगळ्यांना सांगत होता.
"नक्की काय प्रॉब्लेम आहे."
"सासुबाई आणि जाऊ बाई काही सुचवू देत नाही. त्या एका बाजूला होतात आणि मला त्रास देतात. ते माझ घर नाही मला कुठला हक्क नाही. म्हणजे या दोघींना त्यांचा नवरा त्यांच ऐकणारा हवा आणि माझ मात्र कोणी ऐकायला नको. आम्हाला आमची खोली नाही. काही सोय नाही तरी मी अॅडजेस्ट करत होते. "साक्षी म्हणाली.
" उपकार केले अॅडजेस्ट करून. आता या सगळ्याच कशा चुकीच्या असतील. हिला काही जमत नाही. " परेश म्हणाला.
" तुम्ही मला चुकतांना बघितल का? आई वहिनी सांगतात ते तुम्ही ऐकतात. मला बोलतात. स्वतः अनुभव घ्या ना. " ती म्हणाली.
" जाऊ द्या हे असे आरोप प्रत्यारोप चालूच राहतील पुढे काय करायचं आहे? "
" मला फारकत हवी. "परेश त्याच्या निर्णयावर ठाम होता.
" आई बाबा तुम्ही सांगा ना. " साक्षी त्यांच्याकडे बघत होती.
" जावई बापू. "
" मला काही सांगू नका. "
" अहो तुम्ही म्हणाल ते मी करेन. आईकडे कशी राहू? त्यांची गरीब परिस्थिती आहे. थोड समजून घ्या."
"आधी समजत नव्हत."
ते खूप समजूत घालत होते. परेशने काही ऐकलं नाही.
मी या नात्याला खूप वेळ दिला. पण यातून काहीच मिळालं नाही. ती आई आणि बाबां बरोबर माहेरी निघून आली.
महिना झाला. डिवोर्स केस सुरू झाली. तिने खूप त्रास करून घेतला. ती झोपून असायची.
एक दिवस आई बाबांना वाटल ती झोपली आहे.
"सरला थोडे पैसे आहेत का. वकीलाला द्यायचे आहेत." रमेश राव विचारत होते.
"होते नव्हते सगळे संपले. तुम्ही कुठून कर्ज मिळत का ते बघा."
"आता कोण कर्ज देईल जुनी देणी बाकी आहे. " दोघ काळजीत होते.
आई, बाबांकडे पैसे नाही. घरात बसुन काही होणार नाही. तिने शाळेत अर्ज केला.
" आता नाही हे वर्ष संपल्यावर नोकरी मिळेल."
" मी काहीही काम करायला तयार आहे. " साक्षी म्हणाली.
ओळखीच्या लोकांच मेडिकल होत. तिथे मदतनीस म्हणून काम मिळालं. घरचा किराणा तरी सुटत होता. सकाळी ती ट्यूशन घ्यायची. घर मुलांनी भरलेल असायच. त्यातून पैसे मिळत होते. दिवस कमी पडत होता. इतक काम होत. रात्री ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. चुलत भावाने सांगितल्या प्रमाणे तिने तो ही फॉर्म भरला होता.
आई बाबा बघत होती तिची धावपळ होते आहे. बर आहे पण ती तीच दुःख तरी विसरते.
******
सुरवातीला परेश खुश होता. आई, वहिनी काळजी घेत होत्या. नंतर नंतर त्या ही कंटाळा करत होत्या. वहिनी तिच्या नवर्या पुरत करायची. मुलाला घेवून बसायची. आई पण लक्ष द्यायची नाही. तो असाच रात्री उशिरा घरी यायचा. जेवला की नाही कोणी बघायच नाही. कधी भाजी संपलेली असायची तर कधी पोळी नसायची.
थोड्या दिवसात परेशच्या ही घरी बर्याच गोष्टी बदलल्या होत्या. मोठा भाऊ, छोटा भाऊ वेगळे रहात होते. परेश आणि आई बाबा एकत्र रहात होते.
साक्षी माहेरी गेल्यावर लहान भावाच लग्न झाल. साक्षी बाबतीत झाल्या तश्या सगळया गोष्टी घरात लहान सुने बाबत होत होत्या. त्यांना रूम नव्हती. आई, वहिनी तिच्यावर आरोप करत होत्या. रोज भांडण होत होती.
पण लहान भावाने बायकोची बाजू घेतली. "मला माहिती आहे, आई वहिनी तुम्ही कश्या आहात. साक्षी वहिनीला किती त्रास दिला तो मी बघितला आहे. दिवस दिवस भर तिला उपाशी ठेवत होत्या. वाटेल ते बोलत होत्या. माझ्या बायकोला मी अस होवू देणार नाही." तो सेपरेट रहायला लागला.
घरात खूप काम पडत होत. त्यामुळे मोठी वहिनी, दादा ही सेपरेट झाले. परेश बघत होता. अरे बापरे हे अस होत का? सगळे आपआपलं बघतात. मी यात मूर्ख निघालो. कमजोर पडलो. माझ्या बायकोची बाजू घेतली नाही. तेव्हा असच होत असेल का? मी दिवसभर कामावर असायचो. आई, वहिनी जे म्हणायचे त्यावर विश्वास ठेवला. साक्षी करायला चांगली होती. माझी किती काळजी घ्यायची. घर नीट नेटक ठेवत होती.
तो आई जवळ बसला. बाबा ही समोर होते.
"आई खर सांगशील. साक्षी इतकी वाईट होती. तिला सहा महिन्यात आपण घराबाहेर काढल."
त्या काही म्हणाल्या नाही.
"तू का अस केल." परेश चिडला होता.
"मी काय केल? तुझी बायको तशी होती आळशी. तूच फारकत बाबतीत बोलला. तिच्या बापाला बोलवून तिला माहेरी पाठवल. मला बोलायच नाही आधीच सांगते." त्या चिडल्या.
" अरे, तूच रोज सांगत होती ना ती अशी करते तशी करते."
" मला यात घेवू नको." त्या झोपल्या.
बाबा बघत होते." हे अस असत परेश. म्हणून ऐकाव जनाच कराव मनाच. अजून वेळ गेली नाही. "
परेश डोक धरून बसला होता. होत्याच नव्हतं झालं. माझ डोक चालत नाही.
एक दिवस साक्षी नेहमी प्रमाणे मेडिकल दुकानात काम करत होती. परेशच्या मित्राने तिला बघितलं. तो दुकानात काहीतरी घ्यायला आला होता. तिने त्याला ओळखल नाही. त्याने परेशला सांगितलं.
" साक्षी वहिनी दुकानात कामाला आहे. त्रासात आहे. वहिनीची तब्येत एकदम खराब झाली आहे. बारीक गरीब अशी दिसते आहे."
तो विचार करत होता. मित्र म्हणाला तेव्हा पासून तो बेचैन होता.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
