जाणीव प्रेमाची भाग 4
©️®️शिल्पा सुतार
तो तिच्या गावी गेला. मेडिकल समोर बाजूला उभा होता. ती समोर दिसत होती. बर्याच दिवसांनी तो तिला बघत होता. जुना विटलेला ड्रेस, चेहरा कोमजलेला बघून त्याला कसं तरी वाटलं. ती बरोबर काम करत होती. बरेचसे कस्टमर तिने दहा मिनिटात पूर्ण केले. डबा घेऊन ती जेवायला गेली. तेवढ्यात एक कस्टमर आला. मालकीणने हाक मारल्यावर ती पटकन जेवणावरनं उठली आणि कस्टमर बघितला. त्याला तिची परिस्थिती बघून कसतरी वाटलं.
तो घरी परत आला. तिचाच विचार करत होता.
दोन दिवसांनी कोर्टाची तारीख होती तेव्हा तिच्याशी बोलून बघू. त्याने विचार केला.
तो कोर्टात आला. ती बसलेली होती. तिच्या हातात डबा होता. बहुतेक हे काम झाल्यावर तिला मेडिकल मध्ये जायचं असेल. नेहमी प्रमाणे तिची काही तक्रार नव्हती. जो जे म्हणेल ते ती ऐकत होती.
तो वकिलांशी बोलत होता. "त्या लोकांच काही म्हणण नाही. त्यांनी पोटगी साठी आग्रह केला नाही. ही केस लवकर सोडवू. तुम्ही सांगा अजून साक्षी मॅडमने काही त्रास दिला का?"
" नाही, काही पॉईंट्स नाहीत. "तो म्हणाला.
तिचा वकील तिच्याजवळ येऊन उभा राहिला. तो पैशाची मागणी करत होता. तिच्याजवळ पैसे नव्हते. तो तिला बोलत होता. ती खाली मान घालून उभी होती.
"असे जर तुम्ही पैसे दिले नाही तर मी तुमची केस लढणार नाही. तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे की नाही. "
"समोरचे पार्टी जे म्हणतील तसं." ती परेशकडे बघत म्हणाली.
"तुम्हाला पोटगी मिळणार नाही." वकील म्हणाला.
"चालेल. नाहीतरी कोणी कोणाला जन्मभर पुरत नाही. मला जगायच असेल तर कमवावं लागेल. काहीच फुकट मिळत नाही. " ती हळूच म्हणाली.
दोघं वकील बोलत होते.
तो लांबून बघत होता. ती एकदम शांत होती. परिस्थितीचे चटके तसे बसले होते. तो तिच्याशी बोलायला येत होता.
दोघांना आत बोलवलं. तिला विचारत होते,
" तुमचे काही पॉइन्ट्स? "
तिने नाही मान हलवली.
पुढची तारीख मिळाली. तिने कुठेही बघितल नाही. ती पटकन निघाली आणि मेडिकल मध्ये आली. उशिरा आल्यामुळे तिला बोलणे बसत होते. ती गप्प ऐकून घेत होती. त्याने ते बघितलं. तो घरी निघून आला
" काय झालं?" आई विचारत होती.
"पुढची तारीख मिळाली."
"काय तारखा देतात. त्या पोरी पासून कधी सुटका मिळेल समजत नाही."
"जेवायला दे मला कामाला जायच आहे." परेश म्हणाला.
" अजून केल नाही." त्यांनी सांगितल
"ठीक आहे." तो निघून गेला. ना घरात आवरलेल. ना जेवण बनवलं असत. नुसते हाल आहेत. त्याने टपरीवर भजी खाल्ली. चहा घेतला. कामाला गेला. तो मित्राला सगळं सांगत होता.
" अजून हुशार हो. बायकोला घरी घेवून ये. जरा नीट वाग ." मित्र त्याला ओरडत होता.
तो रात्री घरी आला. आई झोपलेली होती.
" काय होत? "
" गुडघे दुखी."
त्याने खिचडी टाकली. आई बाबा दोघांना जेवायला दिल.
बाबा आत आले. तो फोनवर तिचे फोटो बघत होता. त्याने पटकन फोन बाजूला ठेवला.
" एक बोलू का परेश. तुला वाटत ना ते कर. मी मागे ही म्हणालो होतो. एक बाजू ऐकून निर्णय घेवू नकोस. जा तुझ्या बायकोला घेवून ये. "
" आता उशीर झाला बाबा."
" कोणत्याच गोष्टीला उशीर होत नाही. प्रेमाने वाग. माफी माग आणि घरात वचक ठेव. ती आली तर तुझी आई त्रास देईल. तिची बाजू घ्यायला शिक. "बाबा सांगत होते.
" मला यात पडायच नाही. साक्षी तिकडे बरी आहे. ती गरीब आहे. माझ्या मुळे परत त्रासात नको. "
" एवढ मोठ आयुष्य असच घालवणार का? ती नाही दुसर लग्न कर."
" नको. " तो एकदम म्हणाला. तो विचार करत होता. मला तिची गरज आहे. मी एकटा पडलो आहे. चूक झाली.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
